निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे रानफूल कोणत? >>>> रानतीळ - जागूने अनेकदा टाकले आहेत याचे सुंदर सुंदर फोटो....

वा, नवीन भाग, नवीन माहिती.....

दिनेशदा ह्या १०,००० पोस्टचे सगळ्यात जास्त श्रेय तुम्हालाच आहे. तुमच्या कडचा निसर्गाच्या माहीतीचा खजीना तुम्ही ह्यात ओतत आहात.

दिनेशदा ह्या १०,००० पोस्टचे सगळ्यात जास्त श्रेय तुम्हालाच आहे. तुमच्या कडचा निसर्गाच्या माहीतीचा खजीना तुम्ही ह्यात ओतत आहात. >>> आणि अजूनही ओतणार आहेतच इथे....

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच
निर्ममो निरहंकारः समदु:खसुख क्षमी || अ. १२, श्लो. १३||

उत्तमाते धरिजे | अधमाते अव्हेरिजे | हे काहीचि नेणिजे | वसुधा जेवी || १४५||
का रायाचे देह चाळू | रंकाते परौते गाळू | हे न म्हणेचि कृपाळू | प्राणु पै गा ||१४६||
गाईची तृषा हरु | का व्याघ्रा विष होऊनि मारु | ऐसे नेणेचि गा करु | तोय जैसे ||१४७||
तैसी आघवियाचि भूतमात्री | एकपणे जया मैत्री | कृपेसी धात्री | आपणचि जो ||१४८||

चांगली मंडळी असो वा वाईट मंडळी असो - दोघांनाही ज्याप्रमाणे वसुधा धारण करते / आधार देते.
राव असो वा रंक असो -दोघांमधेही भेदभाव न करता त्यांच्या शरीरात चलनवलन करणारा जसा कृपाळू प्राण एकच असतो.
पाणी प्यायला गाय येवो वा वाघ येवो -ते पाणी जसे त्या दोघांचीही तहान भागवते.
तसे सर्वच्या सर्व प्राणीमात्रांशी ज्याची सदैव मैत्रीच असते व ज्याच्या ठिकाणी सतत कृपा वास करुन असतो तो भक्त जाण अशी माऊलींनी भक्ताची व्याख्या या नितांतसुंदर ओव्यातून केली आहे. सृष्टीतलीच उदाहरणे देऊन सृष्टीशी सदैव मित्रत्वच राखायचे /विश्वव्यापकत्व अंगी बाणवायचे हेच जणू माऊली समजाऊन सांगत आहेत.

सुंदर विवेचन शशांकजी. Happy

निगच्या ११व्या भागाबद्दल निगकरांचं हार्दीक अभिनंदन!!

अर्रे अकरावा भाग आला पण!! सही!
सूर्यकिरण, रानतिळाचा फोटो सुंदर आलाय.
गौरी, कस्ली सुंदर फुलं आहेत! ही फुलं बरीचशी गम ग्वायकम(गायत्री) सारखी वाटताहेत, फक्त केसर सोनेरी पिवळ्या रंगाचे नाहीत! ह्यांचं नाव माहिती आहे?

दिनेशदा ह्या १०,००० पोस्टचे सगळ्यात जास्त श्रेय तुम्हालाच आहे. तुमच्या कडचा निसर्गाच्या माहीतीचा खजीना तुम्ही ह्यात ओतत आहात. >>> आणि अजूनही ओतणार आहेतच इथे....>>>>>> अगदी अगदी..:स्मित:

ही स्पायडर प्लँटची फुलं.......
इतकी इवली इवली फुलं बघून, जिप्सीने त्याच्या एका प्रचिंच्या थीममधे कोट केलेलं गाणं आठवलं...'एक फुलले फूल आणि फुलुन नुसते राहिले....'

Image1101.jpgImage1104.jpg

निगचा अकरावा भाग सुरु झाला देखील ...
सर्व निसरग प्रेमींच अभिनंदन !

सूर्यकिरण, रानतिळाचा फोटो छान आलेत.

इथे जागूच्या फुलपाखरांसाठी फुले आली म्हणायची !

माहीतीचं म्हणताय ? मी तो भारवाही हमाल फक्त !

असंच, आता आलोच आहोत म्हणून,

इजिप्तमधे त्रिकोणी इमारती (पिरॅमिडस ) , ग्रीसमधे चौकोनी इमारती ( अथेन्सचे देऊळ ) आणि रोममधे गोल, किंवा गोल घुमटाच्या इमारती ( कोलोसियम, जिथे ग्लॅडीएटर च्या लढाया होत ते ) यामागचे कारण माहीत आहे ?

बहुतेक सगळ्या राजांना भुमितीचे वेड असावे, .किंवा सगळे भुमितीत फेल होत असावेत, मग शिक्षकांना दाखवण्यासाठी की ते दिसायचे तितके कच्चे नव्हते........................ Wink

हो चिमुरी, आता लगेच लिहितो.

इजिप्तच्या राज्याला लवकर स्वर्गात जायचे होते, त्याच्यामूळे त्याला उंच इमारत हवी होती, त्यांच्याकडचा जो दगड होता, त्याचा भरीव आकार त्यांनी रचला आणि मॉडेल ठेवले डोंगराचे, निसर्गतः तोच आकार तग धरू शकतो. पण पिरॅमिडस भरीव आहेत, त्यामूळे वजनाच्या भाराचा प्रश्न नव्हता.

त्यांनी पोकळ म्हणजे वर छप्पर असणार्‍या इमारती बांधायचा प्रयत्न केला, त्यावेळी असे लक्षात आले कि, आडव्या तूळ्या फार मोठ्या असून चालणार नाहीत, कारण त्या तग धरू शकणार नाहीत. त्यामूळे त्यांच्या तशा इमारतीत, खांब ( तेसुद्धा एकावर एक चकत्या रचून केलेले ) भले मोठे आणि मधली जागा फार थोडे, असे झाले.

ग्रीकांना ती कल्पना आवडली, पण त्यांना मधली जागा मोकळी हवी होती. त्यांच्याकडे जो संगमरवर होता, त्याच्या आडव्या तूळ्या तग धरू शकत होत्या, आणि त्यांना आधार देणारे खांबही नाजूक असून चालणार होते. खांबांचा आकार, ऊंची आणि छपराचा आकार यावर त्यांनी खुप अभ्यास केला. आजही त्यांचे ते डिझाईन,
आपल्याकडच्या अनेक इमारतीत ( उदा मुंबईची सेंट्रल लायब्ररी ) दिसते.

इतालीमधे मात्र त्यांना अजून एक देणगी मिळाली, ती म्हणजे ज्वालामुखीची राख. ही राख आणखी काही रसायनात मिसळून त्यांना दोन विटातली सांधेजोड करता आली. मग त्यांनी कमानीचा प्रयोग करुन बघितला. कमानीचा भार तिच्या मध्याभागी अजिबात नसतो. तर तो दोन्ही बाजूला आधार देणार्‍या खांबांवर असतो. त्यामूळे कमानीला मधून आधार द्यायची गरज नसते आणि याचेच विकसित रुप म्हणजे, गोलाकार घुमट.
त्यामूळे त्यांना तशा इमारती बांधणे सहज शक्य झाले.

थोडक्यात इमारतींचे आकार माणसांनी नाही, तर दगडांनी ठरवले.

संदर्भ - डॉ. इयान स्टेवर्ट

बहुतेक सगळ्या राजांना भुमितीचे वेड असावे, .किंवा सगळे भुमितीत फेल होत असावेत, मग शिक्षकांना दाखवण्यासाठी की ते दिसायचे तितके कच्चे नव्हते........................ >>>>>>:हहगलो:

दिनेशदा, मस्त माहिती....आणि असा 'हमाल' आम्हाला माबो मुळे मिळाला!!.....:स्मित:

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).

अकराव्या भागानिमित्त अभिनंदन!!!!

अरे वा सुंदर सुरवात ,
सुकी, गौरी,शांकली सुंदर प्रचि , दा , शशांकजी ,जिप्सी ( तुला जिप्सी लिहायला जीवावर येत जिप्स्याच बर वाट्त Happy )छान माहीती. Happy

हे असच काहीतरी.

सा.सकाळच्या २००८ च्या दिवाळी अंकात श्री.अनिल अवचटांचा मॉरिशसवर एक छान लेख आला आहे. त्यातला एक छोटा भाग...
'ठिकठिकाणी हिरवीगार, उंच आणि पानांनी भरलेली झाडं. ही झाडं कोणती, विचारताच अम्रू म्हणाली,"हेच ते चायनीज ग्वाव्हा. या झाडानंच इथं प्रॉब्लेम तयार केलाय. हा इतका माजलाय की मूळ इथली - एन्डेमिक - झाडं जगू शकत नाहीत; कारण ती त्यांच्याशी स्पर्धा करतात. बाहेरून आलेली एक्झॉटिक - झाडं ही झपाट्यानं वाढतात. त्यांना फुलोरा येतो. बिया तयार होऊन पडून गेल्या, की दुसरा फुलोरा लगेच. याउलट इथली एन्डेमिक झाडं. वर्षातून एकदा फुलं येणार, तीही थोडीच."
बरोबर. आपल्याकडेही तसंच नाही क? गुलमोहर फुलला की झाड लाल होऊन जातं, तितकं त्याचं पुनरुत्पादन जास्त. त्यामानानं देशी झाडं. हळू वाढणारी.फुलं कमी येणारी. डोळ्यांसमोर कॅशिया, टबूबिया आले. पटापट वाढणारी ऑस्ट्रेलियन बाभूळ, युकॅलिप्टस आले. दिसायला छान, झाडं लवकर येतात हे खरं पण आपली देशी झाडं मागे पडतात त्याचं काय?
रस्त्यालगत दोन्ही बाजूला चिनी पेरूच्या भिंती उभ्या होत्या. अम्रू म्हणाली, " त्यातून जाता येत नाही, इतकी ती दाट असतात. आणि मागचं ते इथलं एन्डेमिक झाड बघ कसं खुरटलंय. आता त्या झाडाला वर फांद्या फुटल्यात. त्यात पक्षी घरटं करू शकतात. या बाहेरून आलेल्या झाडांवर ते घरटी करत नाहीत. ते मरायला टेकले तरी या चिनी पेरूचा पेरू ते खाणार नाहीत. ते त्यांचं ठरलेलं अन्नच खाणार. त्या पक्ष्याला आम्ही वाचवतोय तो पिंक पीजन (गुलाबी कबुतर). आता या पिंक पीजनची सवय म्हणजे तो जमिनीवर चालत रेतीसारखे दगड गोळा करतो आणि पोटातल्या अन्नासोबत गिळतो. त्यामुळे छान चर्निंग होतं. त्यामुळे तो जमिनीवर फिरत असतो छोटे दगड गोळा करायला. पण आता या माजलेल्या एक्झॉटिक झाडांनी त्यांना तशी जागाच ठेवली नाही बघ."
पक्षी का खात नसतील इतर झाडांची फळं? मी तो टोमॅटोसारखा दिसणारा पेरू खाल्ला. छान, आंबटसर चव होती. त्यात पोषणमूल्य नक्कीच होतं, तरी असं का? मग लक्षात आलं, त्यांना निसर्गानं ठरवून दिलेलं ते अन्न आहे. दुसरं फळ गोड असेल, पण त्याचे दूरवरचे परिणाम आपल्याला माहीत आहेत का? नाही ना, मग नको. इतके निसर्गाला धरून राहणारे ते पक्षी.'

जो पिंक पीजन वाचवायचा प्रयत्न केला जातोय त्याच्या बद्दलपण एक गमतीदार माहिती....
पिंक पीजन नर आधी आपला विभाग (टेरिटरी) निश्चित करतो. त्यासाठी त्याची एक आरोळी म्हणा आवाज असतो. तो दिल्यावर तो मादीच्या शोधात फिरतो. मादीसमोर जपानी लोक जसं वाकतात तसं वाकून एक आवाज काढतो. मादीनं पसंत केला की त्यांची जोडी जमते ती अखेरपर्यंत. हे मला नवीन होतं. तसं मी म्हणताच डेनी हसून म्हणाला, "काही डायव्होर्स होतात त्यांच्यात."
अम्रू म्हणाली, "पण फार क्वचित."
मग घरट्याची तयारी सुरू होते. नर काड्या गोळा करतो...(यावर अम्रू : 'नाही हा, मादीही गोळा करते'.. हा तिचा फेमिनिझम) नर घरटे तयार करताना मादी बाजूला बसून कसं करायचं ते सांगत असते. मग अंडी घातली, की मादी त्यावर बसते, तरी नर शेजारी बसून रहातो. मग मादी उठते. ती तिचं अन्न मिळवायला जाते, तेव्हा अंड्यांवर नर बसतो. असं आळीपाळीने चालतं. रात्री मात्र मादीच बसते.
अम्रू हसत म्हणाली, "बसते; पण सारखी पेंगत असते आणि तेव्हाही नर शेजारी बसून असतो. सीझन नसतानाही ते कायम जोडीनं बरोबर असतात. त्यांचं अन्न मिळवणं वगैरे एकत्रच असतं"
या पातिव्रत्याच्या किंवा एकपत्नीव्रताच्या कितीतरी हकीकती त्यांच्याकडे अगदी 'नावानिशी' होत्या.

व्वा.. नविन भाग.. निसर्गप्रेमींच्या अशाच गप्पा सदैव रंगू दे.. Happy

शशांक, हो ही फुलं Erathemum pulchellum चीच आहेत. घरचीच आहेत, त्यामुळे निवांत, हवा तो अँगल घेऊन काढायला मिळाला फोटो. नर्सरीमध्ये जांभळी अबोली म्हणून मिळालीय.
दिनेशदा, शांकली, मस्त माहिती. (पण ... गुलाबी असली तरी शेवटी कबूतरंच ती. त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न? Happy )

शशांक, दिनेश दा, सुरेख माहिती..
जिप्सी.. साने गुरुंजीच्या पुस्तकातील उतारा देऊन नॉस्टेल्जियाच्या विमानात बदवून दिलंस ..धन्स!! Happy
शांकली.. पिंक पिजन बद्दल मस्त माहिती सांगितलीस..
फोटो ही असेल तर टाक प्लीज

आजच्या लोकसत्ता लोकरंग पुरवणीतील श्री राजेंद्र येवलेकर यांचा मोबाईल टॉवर आणि चिमण्या, मधमाशांचे अस्तित्व या विषयावरचा अतिशय सुरेख लेख Happy

मधमाश्यांची आपल्याला एरवी फारशी माहिती नसलेली महती सांगायची वेळ आज आली आहे. त्यांच्याविषयी द्रष्टा शास्त्रज्ञ आइन्स्टाईन याने पूर्वीच असे म्हटले आहे की, ‘जर पृथ्वीतलावरून मधमाश्या नष्ट झाल्या तर माणूस त्यानंतर चार वर्षेही जगू शकणार नाही.’ मधमाश्या नाहीत तर परागीकरण नाही आणि मग त्याद्वारे निर्माण होणाऱ्या वनस्पतीही नाहीत. मग त्यावर अवलंबणारे प्राणीही नाहीत. अन् माणूस? तोही नाहीच! काही विकासवाद्यांनी ‘आइन्स्टाईनने असे म्हटल्याचे पुरावेच नाहीत,’ असे सांगून वादही घातले आहेत. परंतु त्यापायी मधमाश्यांची निसर्गसाखळीतील कामगिरी नजरेआड करता येणार नाही. .....

मधुघटचि रिकामे पडती घरी..

Pages