बाळंतविडा

Submitted by अनया on 9 October, 2012 - 04:05

बाळ आणि बाळाच्या आईसाठी कलाकुसर!

काही दिवसांपूर्वी माझ्या एका नातेवाईकांकडे एका लहान परीराणीचे आगमन झाले! आम्ही घरातले सगळेच त्या गोड बाळाच्या अगदी प्रेमात पडलो. माझा लेक आता बालपण संपवून तारुण्याच्या सीमेवर उभा आहे. त्यामुळे आता ही परी जेव्हा घरी येते, तेव्हा पुन्हा घरभर चैतन्य येत.

तिच्या साठी केलेले हे काही स्वेटर्स आणि बाळाच्या आईसाठी भरतकाम केलेला कमीझ.

ह्यातल्या पांढऱ्या लोकरीच्या झबल्याची कृती प्रतिभा काळेंच्या ‘लोकरीचे विणकाम’ ह्या पुस्तकातील आहे.

स्वेटर-टोपी आणि सर्वात लोकप्रीय झालेले बूट!

0sweter-1.JPGएक रंगी-बेरंगी स्वेटर

0sweter2.JPGआई-बाबांबरोबर गाडीवरून जाताना घालायला उबदार पोंचो

0poncho1.JPG

एक जाकीट

0jacket 1.JPGसिंधी / कच्छी टाक्याचे भरतकाम केलेला कुडता

0kudta3.JPG0kudta1.JPGकुडत्याच्या बाहीवरील बॉर्डर

0kudta2.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

अरे वा !!! मस्तच आहे..

माझ्या कडे पण ते पुस्तक आहे... मी पण माझ्या लेकीला ३-४ स्वेटर्स केले होते. पण ती उकडकांदा असल्याने एकही अंगाला लावुन घेतला नाही. ( अजुनही ती स्वेटर्स च्या विरुध्ध्च असते). शेवटी नात्यातल्या एका बाळाला दिले. मोजे मात्र खुप वापरले...

आता परत मी ते सगळं कधी करणार.... लेकीचं लग्नच लावुन देते...

खुप छान झालेत. बुट तर एकदम मस्त.... खरच ही पोरं मोठी का होतात ?????

मीरा, लेकीच्या लग्नाची आईडिया एकदम भारी! मला स्वतःलाही फारसे गरम कपडे लागत नाहीत. मग कोणालातरी पकडून (म्हणजे बऱ्याचदा लहान बाळांना!) विणत रहायचं.

<<<.... खरच ही पोरं मोठी का होतात ?????>>>+१००००

वा ! स्वेटर, टोपी, बुटु, भरतकाम सगळेच मस्त !
>>>लेकीच्या लग्नाची आईडिया एकदम भारी! मला स्वतःलाही फारसे गरम कपडे लागत नाहीत. मग कोणालातरी पकडून (म्हणजे बऱ्याचदा लहान बाळांना!) विणत रहायच>>><<< अगदी अगदी Happy माझ्यापण लेकचे लग्न लावावे काय Proud

वा.......अगदी साग्रसंगीत बाळंतविडा..... !!
सगळेच प्रकार खूप खूप सुरेख, सुबक झाले आहेत.

Pages