मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

This is like to cook $ 5 chicken, I have to purchase $ 100 extra ingredients
>>>>> भाषांतर जोरदार आहे Lol
नुसतं It cost me an arm and a leg for nothing असही काही तरी चालू शकेल......

अजुन एक मक्या उवाच :
जवा येतीय चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळ!

नवरा केला सुखासाठी, पैसा नायी कुकासाठी

घरची म्हणते देवा देवा,शेजारणीला चोळी शिवा!

FTW, have people lost their self respect here.

If you dont have anything good to contribute, dont ruin this thread by posting some junk.

श्री. माणूस उगीच सोळभोकपणाचा आव आणू नका. या म्हणी खरोखर आस्तित्वात आहेत. तुम्हाला जानपद जीवनाचा अनुभव नाही. खेड्यातील मानसे रांगडी अन स्पष्टवक्ती असतात्.असल्या म्हणी तिथे बायकाही बिनदिक्कतपणे वापरतात्.असल्या म्हणी ऐकतच आम्ही मोठे झालो आहोत. तुकारामाचे अभंगांत तर यापेक्षा भयानक वापर आहे. आपल्याला वाचवत नसेल तर , अन आमच्या सारख्या झोपडपट्टी संस्कृतीच्या लोकांचा वास येत असेल तर,डोळे बन्द करून तिकडे कुठेतरी सदाशिव पेठी बी बी का शोधत नाहीत?

सेल्फ रेस्पेक्ट वगैरेच्या भाषा वापरायला देखील तुम्हाला इन्ग्रजीचा आधार घ्यावा लागतोय खरे तर तुमची मायबोलीवर पाऊल ठेवण्याची सुद्धा लायकी नाही.

रॉबीनहुड ना अनुमोदन!! जुन्या काळाची सुसंस्कृत लोकं पण या म्हणी वापरत!!
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

रॉबिनला संपूर्ण अनुमोदन. यातील काही 'जंक' म्हणी - धू म्हटले की धुवायचे, डोक्यावर बसवले, रिकामा सुतार - मी माझ्या आजीआजोबांच्या तोंडून ऐकल्या आहेत. त्यांना self respect नसावा.
अशीच एक 'जंक' म्हण (ग्रामीण भागात राहणार्‍या एका नातेवाईकाकडूनच ऐकलेली) - घाईत घाई अन् म्हातारीला न्हाण येई.

    ***
    लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
    खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

    चार आण्याच्या कोंबडीला बारा आण्यांचा मसाला

    अशी एक आहे म्हण

    आणि 'धू म्हंटलं की...' चा अर्थ मुळात ऐकल्यावर पहिल्यांदा वाटतो तसा नाहीच आहे ना? ते काहीतरी रामशास्त्री प्रभुण्यांना हातावर पाणी घालताना कानातील भिकबाळीकडे लक्ष गेलं आणि पाणी भलतीकडेच पडलं म्हणून त्यातून निघाली ही म्हण असे मी पूर्वी ऐकले होते.

    फारेंडा ती बहुदा दंतकथा असावी ... Happy
    ----------------------------------------
    मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

    मस्त. ए न लाजता लिहा रे. कायम सोज्वल बोलायला आपन काहि सुलोचना नाहि. कोन गैर्समज मरुन घेनार नाहि.

    गैर्समझ करुन घेनार नाहि.
    ध चा मा झाला क्श्मस्व

    हौसेनं केला पती, त्याला झाली रगतपीती....

    Ignorance is bliss

    असे म्हणून थांबणार होतो, पण आज काही जास्त काम नाही म्हणून पुढचे.

    स्वतःचे ठेवायचे झाकुन, आणि लोकांचे बघायचे वाकुन.
    आपले स्वतःचे नावदेखील मराठी नाही, आणि लोक मराठी कसे नाहीत हे दाखवत बसायचे.

    मानले वरील काही गोष्टी मराठी भाषेचा एक प्रकार आहे, पण म्हणून उगाच त्यांना उगाळत बसायची काही गरज नाहीय. ह्याच म्हणी वेगळ्या (चांगल्या) शब्दात देखील मांडता आल्या असत्या, पण...

    खेड्यात रहानारी लोक रानटी, कृर, अ-सुसंकृत वैगेरे वैगेरे म्हणायची देखील गरज नाहीय. मी खेड्यात वाढलोय. पण आम्हाला आपली वाणी स्वच्छ असावी असेच शिकवण्यात आलेय.

    With every passing day man should always try to become more and more perfect and not continue to use some im-perfect things. Use the things you learn to bring up yourself and your society and not to fight within among.

    anyway जो पर्यंत शकीलाचे चित्रपट आणि vivid किंवा hustler च्या चित्रपटांमधील फरक कळनार नाही तो पर्यंत हे असेच चालणार... त्यामुळे कोणालातरी आपले बोलणे आवडत नाहीय म्हणून तुम्ही अजुन काहीतरी चित्रविचीत्र शब्दातली वाक्य लिहीनार... तर लिहा, मी ignore करण्यापलीकडे काय करु शकतो?

    robeenhood, Please keep the castism away and be mature in your remarks. Yes I am writing this is english to sound it more gentle.

    अरे माणसा, काही कळले नाही. जुन्या म्हणी काय politically correct करून सुधारून घ्यायच्या काय? हा बाफ म्हणींसाठीच असल्याने सगळे टाकणारच ना?

    बाबुनाना, हुडाला सल्ला दिलात, चांगलं केलंत! पण बाकी इतर ठिकाणी मायबोलीवर बरेच महाभाग ओढून ताणून कुठल्याही चर्चेत जाती आणत असतात, तेव्हा आपली पोस्टं दिसली नाहीत कुठे! म्हणून विचारण्याचा भोचकपणा केला.

    फारेंडाला अनुमोदन.
    माणसा, या म्हणी, वाक्प्रचार हेसुद्धा आपले वैभवच आहे. त्यातील उल्लेख अतिशय स्पष्ट असल्याने काही लोकांना ते खटकू शकते हेही मान्य. पण ग्रामीण सांस्कृतिक जाणिवा आणि शहरी सांस्कृतिक जाणिवा यांत फरक आहे म्हणून ते imperfect ? हे कसे रे ?
    वाणी स्वच्छ असावी म्हणजे नक्की काय ? आपल्या वाणीने कोणी दुखावले जाऊ नये, कोणाचा अपमान होऊ नये हे महत्त्वाचे. आता इथल्या म्हणींनी तू दुखावला गेलास, संतप्त झालास, हे मान्य. पण त्याच वेळी या म्हणी कोठून आल्या, का आल्या, वगैरे विचार न करताच जर लोकांच्या self respect वर उतरलास तर तूसुद्धा 'ए भडव्या' म्हणण्याऐवजी 'तुम्ही वेश्यांचे दलाल आहात' हे म्हणत आहेस रे शेवटी... चांगल्या, वेगळ्या शब्दांत. पहिली अस्वच्छ आणि दुसरी स्वच्छ असे आहे का ?

    चांगले, वेगळे शब्द वापरण्याचा अतिरेकी आग्रह धरणे आणि स्वच्छ वाणी असणे यांतील फरक मला कळतो. तो फरक कळणे आणि hustler, vivid, शकीला यांचे 'चित्रपट' यांतील फरक कळणे याचा संबंध काय ? "hustler, vivid चे चित्रपट चमकदार असतात, उत्तम निर्मितीमूल्याचे असतात. तद्वत वाणी/भाषा दिखाऊ, चमकदार, स्वच्छ पाहिजे, त्यामुळे 'काय दाखवत आहोत, काय सांगत आहोत' हे दुय्यम ठरते किंवा ते खपून जाते"... असा जर समज असेल तर ते सर्व चित्रपट घरच्यांना एकदा अवश्य दाखव. उपरोल्लेखित म्हणी अजूनही चारचौघांत वापरल्या जातात, फक्त खाजगीतच नाही.

    बाकी वेळ असूनही मराठीत न लिहिता इंग्रजीचा आधार घ्यावा लागण्याबद्दल मी काही बोलत नाही... ते इंग्रजीसुद्धा चुकीचे आहे याकडेही दुर्लक्ष करतो.

      ***
      लख्ख लाखेरी देहाच्या निळ्या रेषा मापू नये
      खुळ्या, नुस्त्या डोळ्यांनी रान झेलू जाऊ नये (महानोर)

      स्लार्टी ला अनुमोदन! खूप मुद्देसुद पोस्ट, पटलं.

      पारध्याच गोड गाणं हरिणीसाठी जीवघेण.

      शेजार्‍याचं घर जळेना का, माझं वांगं नीट भाजलं पाहिजे.

      सवळं दाट आणी महारवाड्यातून वाट !

      आधिच कामाचा कन्टाळा, त्यात माहेरचा सान्गावा !

      इथे कुणालाही दुखवायचा हेतू नाही. म्हणी गमतीदार आहेत म्हणून लिहिल्या

      आधी गुंतु नये, मग कुंथु नये.
      आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
      ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक

      माझे बाबा मला म्हणायचे,
      शिंगरु मेलं येरझारा घालुन!

      घोडं मेलं ओझ्याने
      शिन्गरु मेलं हेलपाट्याने

      जावे त्याच्या वंशा तेचा कळे.
      घर फिरले की घराचे वासेही फिरतात.
      पळसाला पाने तीनच.
      घरोघरी मातीच्या चुली.
      भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी.
      नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे.
      सोनाराने कान टोचणे.

      तेरड्याचा रंग तीन दिवस.
      सरड्याची धाव कुंपणापर्यंत आणि मुल्लाची मशिदीपर्यंत.
      चुकला फकीर मशिदीत.
      घरात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा.

      Pages