मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घर फिरले की घराचे वासेही फिरतात.
ह्या म्हणीचा अर्थ मी माझ्या नवर्‍याला असा सांगितला की "दिवस बदलले (म्हणजे वाईट परिस्थिती आली) की जवळची म्हणवणारी लोकही बदलतात" त्याला ते पटत नाही आहे त्यामुळे प्लीज जर ह्या म्हणीचा काही वेगळा अर्थ होत असेल तर सांगा, मी सांगितलेला अर्थ बरोबर असेल तरी सांगा.
अजुन एक ही म्हण १ली ते १०वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात होती का? ते ही सांगा.

"दिवस बदलले (म्हणजे वाईट परिस्थिती आली) की जवळची म्हणवणारी लोकही बदलतात" >> हो असाच आहे अर्थ.

सखूबाई, ती म्हण

मुखडा भोळा, लफडी सोळा अशी आहे Happy

घर फिरले की घराचे वासेही फिरतात <<< मी याचा अर्थ "उच्च पातळीवर एखादी घटना घडली की आपोआप तिचे पडसाद तिच्या अंतर्गत पातळ्यांवर उमटतात," असा घेत होतो.

उदा. तुमच्या प्रतिस्पर्धी संघातला एक खेळाडू तुमचा चांगला दोस्त आहे, पण दोन्ही संघांत अशी एखादी घटना घडली की त्या संघाचा कप्तान किंवा तो संपूर्ण संघ तुमच्या संघाचा द्वेष करू लागला. आणि तुमच्या लक्षात येते की तुम्ही ज्याला चांगला दोस्त समजत होतात तोही तुमच्याशी पूर्वीसारखा वागत नाहीय.

एकाचढ एक आहेत सगळ्या.
दक्षिणा, ह्या नाही कळाल्या.

केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी.
दुधात साखर आणि आंघोळीत लघवी.
जेवण जेवावं पंगतीत आणि मरण यावं उमतीत (उमतीत?)

.

केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी. >> याचा अर्थ मलाही आठवत नाही आता. Sad पहावा लागेल शोधून.

दुधात साखर आणि आंघोळीत लघवी. >> म्हणजे थोडक्यात कामात काम.. दुधात साखर ज्या पद्धतीने विरघळते तसंच अंघोळ करता करता लघुशंका उरकली तर कळतही नाही. अशा अर्थाने.

जेवण जेवावं पंगतीत आणि मरण यावं उमतीत (उमतीत?) >> उमतीत म्हणजे युद्धात.
खर्‍या जेवणाची जमा पंगतीत चार चौघात आणि मरण खरं ते युद्धात या अर्थाने.

लाज नाही मना, कोणी काही म्हना
मनात मांडे आणि पदरात धोंडे
लाडे लाडे, केले वेडे
वाणला तितका घाणला (जितकी स्तुती केली तितका बिघडला)
मान सांगावा जना, अपमान सांगावा मना
बिगारिच्या घोड्याला तरवड्याचा फोक
पळणार्‍यास एक वाट, शोधणार्‍यास बारा
दाम करी काम आणि बिवी करी सलाम
तुम्ही आम्ही एक आणि कंठआळिला मेख

@दक्षिणा
दुधात साखर आणि आंघोळीत लघवी. >>
म्हणजे थोडक्यात कामात काम.. दुधात साखर ज्या पद्धतीने विरघळते तसंच अंघोळ करता करता लघुशंका उरकली तर कळतही नाही. अशा अर्थाने.
<<
'दुधात साखर ' ही म्हण 'मुळात चांगल्या गोष्टीत अधिक चांगल्याची भर पडली' हे सुचविण्यासाठी वापरतात असे व्यवहारात दिसून येते.
वर आपण दिलेला अर्थ ओढून ताणून आणल्यागत वाटतो. मुळात ही म्हण पूर्वी ऐकलेली नाही.

जेथे भरे डेरा (पोट) तोच गाव बरा
चढेल तो पडेल, आणि पोहेल तो बुडेल
गावचा राजा गावात बळी, परदेशात गाढवे वळी
अन्नाचा मारलेला खाली पाही, तलवारीचा मारलेला वर पाही.
आंधळ्यापुढे नाच आणि बहिर्‍यापुढे गायन

काही प्रचलीत

जोशी असो वा मोकाशी
आपले काम भोकाशी

बारा लूगडी पण सदा उघडी

अपना काम बनता . माँ.............. जनता

नाग नाय नफा चल झपझपा

किरण तुझा मराठीचा अभ्यास अगदीच तोकडा दिसतोय.
तु लिहिलेल्या म्हणी प्रचलित नसून ऐकिव आहेत.
आणि अशा फोरम वर अशा म्हणी नकोतच (हेमावैम)
यात पहिली आणि तिसरी तर चक्क अश्लिल आहेत.

यात पहिली आणि तिसरी तर चक्क अश्लिल आहेत.

मग वरच्या काय संतवाणी होत्या काय
ब-याच ठिकाणी आलेत असे विचित्र आणि अश्लिल शब्द ,
प्रचलित म्हणजे तरी काय - खूप लोकांकडून ऐकलेल्याच ना

गावचा राजा गावात बळी, परदेशात गाढवे वळी
अन्नाचा मारलेला खाली पाही, तलवारीचा मारलेला वर पाही.
>>> या दोन्ही म्हणी आवडल्या.

Pages