मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - मोमो विथ ट्विस्ट - तिखट – saakshi

Submitted by saakshi on 29 September, 2012 - 05:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१.तांदळाची पिठ्ठी (अगदी बारीक दळलेलं तांदळाचं पीठ) १ वाटी
२. सफरचंद - १
३.बटाटे - २ मध्यम आकाराचे
३.फ्लॉवरचे तुरे - ३ ते ४
४. जीरे - १ चमचा
५.तेल - १चमचा
६. मीठ, तिखट चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

आज बाप्पा जाणार मग मोदक करायचे होते मग मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् आठवलं, म्हटलं काहितरी वेगळं करुया...:स्मित:
खूप दिवस मोमोज करून बघायचे होते.... साहित्य होतंच घरात...
मग केलं सुरू....

मोमोच्या पारीसाठी तांदळाची पिठ्ठी मळून घेतली थोडीशी मऊ...

बटाटा आणि फ्लॉवर कुकरमध्ये शिजवून घेतले.
मग कढईत तेल तापवून जिरे तडतडवले आणि बटाटा आणि फ्लॉवरची तिखट, मीठ घालून भाजी केली.

ini.jpg

मळून घेतलेल्या तांदळाची पिठ्ठीचे छोटे गोळे केले आणि पारया लाटून घेतल्या. सफरचंदाचे बारीक उभे काप करून घेतले.

ini2.jpg

मग त्यात भाजी आणि सफरचंदाचे काप भरून करंजीच्या आकाराचे मोमो केले.

लाटलेल्या पारया आणि सारण :

p1.jpg

पारी :

p2.jpg

एका पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळणीत मोमो ठेवून उकडून घेतले.

आणि हे तयार मोमोज........

m3.jpgm4.jpgm2.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके....
अधिक टिपा: 

तिखट मोमोंमध्ये मधूनच लागणारी सफरचंदाची मस्त गोड चव हा या मोमोतला ट्विस्ट!!!!!!!!! Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मस्त !

दुसरी पाककृती - मोदक तुमचीच का? त्या पाककृतीत कौशल्य आहे. पण ही पाककृती जास्त कल्पक आहे. फोटो सुंदर आहेत. ह्या पाककृतीसाठी तुम्हाला शुभेच्छा ...

अनघा, दुसरी पाकृ माझी नाही.... आयडी सेम आहेत.... Happy

दुसरी पाककृती - मोदक तुमचीच का? त्या पाककृतीत कौशल्य आहे. पण ही पाककृती जास्त कल्पक आहे. फोटो सुंदर आहेत. ह्या पाककृतीसाठी तुम्हाला शुभेच्छा ...
>>>> धन्यवाद सिमन्तिनी.... Happy दुसरी पाकृ - मोदक माझी नाही...........