चला रे उठा देश जागा करूया !!!

Submitted by वैवकु on 29 September, 2012 - 12:03

चला रे उठा देश जागा करूया !!!
धरू प्राण हाती, लढूया!! लढूया !!

नशीबी कशी आज आली अवस ही
करू पौर्णिमा चांदवा मोहरूया

मला फक्त हे सुक्त माहीत आहे
लढूया असे ;मारुया वा मरूया !!

तुझी मोहना नीच कॉंग्रेसनीती
गरीबीस फाडू अमीरी शिवूया

फिरंगी पुन्हा येत आहेत जाणा
मने रंगवूया..... तिरंगी बनूया !!

चला रे उठा देश जागा करूया .............धरू प्राण हाती लढूया!! लढूया!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीप :
१)जे मनापासून पटतंय ते आणि जसं पटतंय तसंच लिहिलंय !!
२) आज कुणीही या गझलेबाबत मला सुचवण्या बिचवण्या करू नयेत ही नम्र विंनती.(भाण्डण नकोय मला या गझलेवरून !!)
३)आवडल्यास मात्र जरूर कळवा बरकां ( तेवढाच माझा गेलेला मूड परत आला तर बरय की नै !!)Happy

तशी बरी आहे.... पण....न्न्न्न्न्न्न्न्न्न्नाही आवडली बुवा!
मोहरूया --- अर्थशः चुक्ल्यासारखा वाट्टोय हा शब्द

गझलेबाबत मला सुचवण्या बिचवण्या करू नयेत

अरे यार सॉरी रे वैभू... मी तुझी ही सुचना वाचलीच नव्हती आगोदर..!

ऑर्फी , आकाश जी धन्यवाद

डॉ. साहेब विशेष आभार लिन्क आवडली

______________________

ऑर्फी ..... अरे ते 'चान्दवा मोहरणे' हा माझ्या मेन्दूचा उपद्व्याप नाहीये

मधे 'झी'वर ...."महाराष्ट्राची लोकधारा" लागायची त्यात एक अन्गाईगीत सादरझालं होतं गीतकार सन्गीतकार लक्षात नाहीयेत पण त्याचे धृपद असं होतं

नीज गे श्रीहरे चांद ये मोहरू
नंदराणी तुला गातसे हल्लरू

अन मला ह्या ओळी बेहद आवडल्या
एकतर अंगाईगीत !! श्रीहरी चा उल्लेख !! चांद मोहरणे ही भन्नाट कल्पना!!.......;अन हल्लरू हा जबराट शब्द !! (याचा अर्थ मी अंगाई असा लावला)!!
........सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला यात एक शेर दिसला !! मग काय लक्षात रहायला अवघड नव्हतंच मुळी नाही का !!

असो आठवण अरून दिल्याबद्दल धन्स ...ही गम्मत विसरलोच होतो मी !!

धन्स रे जितू

तुला म्हणून सान्गतो कुणाला सान्गू नकोस....... ती टीप नव्हतीच हो ,ती ट्रिक होती !!!(..तू बरोबर ओळखलीस
अभिनन्दन !!;))

खरे पाहता मी माझ्या , देशाच्या शेराच्या आशयाबाबत कमालीचा गंभीर असतो !!

मागे एकदा एका व्यक्तीने माझ्या एका देशावरच्या शेराचे विश्लेषण करून वर 'यात देशाचा काय संबंध??' असा खोचक प्रश्न विचारला होता त्यावरून मला खूप राग आला अन मी त्या व्यक्तीला अश्लाघ्य शिव्या हासडल्या ...त्याचा पुढे मला पश्चातापही खूप झाला ;पण मुद्दा असा आहे की मला एकवेळ माझ्या विठ्ठलाच्या शेरावरून काहीबाही बोला मी सहन करेन पण देशाच्या शेराच्या बाबतीत बाबतीत अजिबात नाही....मला जमतच नाही .जमणारही नाही !!

आता या गझलेवर कोणी सुचवण्या दिल्या असत्या पर्यायी दिले असते तर नक्कीच मी त्या व्यक्तीलाही शिव्या घालणार अन पुन्हा पश्चाताप करत बसावा लागणार म्हणून मग नकोचना !!हो कि नै?
म्हणून आधीच लिहून तसे ठेवले बघ !!

असो
प्रतिसादासाठी पुनश्च धन्स

आवडली.

फिरंगी पुन्हा येत आहेत जाणा
मने रंगवूया..... तिरंगी बनूया !!

कमालीचा शेर -फिरंगी-तिरंगी विरोधाभास मस्त पकडलाय.F.D.I. च्या संदर्भात अगदी चपखल.

फिरंगी पुन्हा येत आहेत जाणा
मने रंगवूया..... तिरंगी बनूया !

ह्या ओळी फार आवड्ल्या. गझल वास्तव वादी आहे

प्राजु धन्स
__________________________________________________
ओर्फी...तुझा चौथा प्रतिसाद थोडाफार अन्तर्मुख करणारा आहे
असो
हा घे नवा मतला.......... .आवडलाच तर कर गझल .............(व्यक्तिशः तुला गृहपाठ म्हणून दिला आहे रे!!:))

पाणी उजेड वारा धरणी जिवंत नाही की आसमंत नाही
देशास आज माझ्या जागे करावयाला कोणी जिवंत नाही

प्रयत्न करताना गझल मुसल्सल होईल या अंगाने जरा अधिक लक्ष पुरवलेस तर मजा येईल बघ .

धन्यवाद