तिरंगा

Submitted by शायर हटेला on 23 June, 2011 - 02:15

भगव्या झेंड्याखाली जमणारे,
हिरव्यांना शिव्या देताहेत,

हिरवा झेंडा खांद्यावर घेणारे,
भगव्यांना उध्वस्त करण्याचे मनसुबे आखताहेत,

मदतीच्या आमिषाखाली पांढुरके लोक्,
धर्मांतरे घडवताहेत.,

आणि मी आजही तिरंगा शोधतोय.

-शायर हटेला.

गुलमोहर: 

जियो शायरमिया...जियो !
क्या बात कही है.....
आमची माते असती इथे तर म्हणाली असती "कोण आहे रे तिकडे? शिपै, याला दहा गावे इनाम देवुन टाका!"

ब क वा स

भगव्या झेंड्याखाली जमणारे,
हिरव्यांना शिव्या देताहेत, >>>>>> त्या शिव्या फक्त तोंडाच्या वाफा असतात ... अगदी नाका तोंडाशी पाणि आल्या शिवाय भगवा खवळुन उठत नाही ....त्याच्यात तेवढा दमच नाहीये

हिरवा झेंडा खांद्यावर घेणारे,
भगव्यांना उध्वस्त करण्याचे मनसुबे आखताहेत, >>> नुसते आखतातच नाही तर पुर्णही करतात ...उदाहरणे पावला पावलावर सापडतील

मदतीच्या आमिषाखाली पांढुरके लोक्,
धर्मांतरे घडवताहेत., >>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी

आणि मी आजही तिरंगा शोधतोय. >>>> नाही सापडणार हो तुम्हाला ... ...शेळपट मेंढ्या बकर्‍या.....लांडगे कोल्हे .....आणि ......व्हायरस बॅक्टेरीया कधी एकत्र सुखा समाधानाने राहु शकतील काय ?

नाही सापडणार हो तुम्हाला ... ...शेळपट मेंढ्या बकर्‍या.....लांडगे कोल्हे .....आणि ......व्हायरस बॅक्टेरीया कधी एकत्र सुखा समाधानाने राहु शकतील काय ? >>> हाहाहाहा हे पण खरंच आहे.

शायर, कल्पना सुरेख आहे.

भगवे
हिरव्यांना शिव्या देताहेत,

हिरवे
भगव्यांना उध्वस्त करण्याचे मनसुबे आखताहेत,

मदतीच्या आमिषाखाली
पांढुरके धर्मांतरे घडवताहेत.....

आणि या शोकचक्रात
मी आजही तिरंगा शोधतोय.

मुळ कविता उत्तम आहेच. हा आपला उगाचच केलेला आगाऊ शहाणपणा.

सातीला अनुमोदन..अशोक चक्राचा ही उल्लेख करायचा होता अजुन छान जमली असती...>>>>

स्मितू..सातीला काय म्हणायचेय ते तुला उमजलेले दिसत नाही. सातीचा रोख अशोक चक्राकडे नाही दुसर्‍याच गोष्टीकडे आहे, काय साती? Wink