प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 07:30

मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्‍या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!

हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्‍यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का? Wink
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.

उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
Zabbu_003.jpg
आणि नवीन क्लू दिला- होडी

तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
IMG_1339.JPG
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)

चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्‍यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)

*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेच्या तारा
गच्चीतून सूर्यास्त क्लिक करताना आलेल्या विजेच्या तारा

DSCN1148_0.JPG

सूर्यास्त....................घ्या खूप सोप्पा क्लू !

हे काय संयोजक... दुसरा झब्बु खेळ ४ दिवस ठेवलात आणि तिसरा १ दिवसात बंद??? Sad मला मिळालच नाय खेळायला... किमान ३ दिवस तरी ठेवा की...

Happy

गोंधळ.... Sad

नी... Lol

नी... पण क्लू तर देउन ठेवायचास ना... Wink म्हणजे आम्ही आमचे रुमाल तयार ठेवु शकतो ना... Proud

Pages