"माळशेज घाट" सिर्फ नाम ही काफी है!!!

Submitted by जिप्सी on 14 September, 2012 - 00:51

६ Bikes 11 भटके
कभी Rain तर कधी ऊन Climate जरा हटके
गरमागरम वडापाव Masala Tea के साथ
Another भीगा Weekend @ Malshej Ghat Happy

"नेमेचि येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणेच पावसाळ्यासोबत येतात ते सह्याद्रीच्या कडेकपार्‍यातुन वाहणारे निर्झर आणि मग आठवण येते ती "माळशेज घाटाची". पावसाळी भटकंतीतील माझे अत्यंत आवडते ठिकाण. काहि गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास माळशेजची भटकंती नेहमीच आनंददायी ठरते. माझ्या आयुष्यातील पहिला वर्षाविहार हा माळशेज घाटातच. कदाचित त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याची ओढ मला लागते आणि नेहमी याचे सौंदर्य मला वेगवेगळे भासते.म्हणतात ना "पहला प्यार कभी भुलाया नही जाता" असंच काहितरी. ;-). दरवर्षी अगदी न चुकता श्री सत्यनारायणाच्या महापूजेसारखे याचे दर्शन घेऊन येतो. Happy

तर मंडळींनो,
सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही माळशेज घाटात पावसाळी भटकंती करून काहि प्रकाशचित्रे काढली आहेत तरी आपण सहकुटुंब सहपरीवार अगत्य येऊन आणि बघुन या प्रचिंचा आनंद घ्यावा हि आग्रहाची विनंती. Proud

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

(पुढच्या वर्षी पुन्हा भेटुच... Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्पर्ब!! एक नंबर प्रचि! Happy
प्रचि ९ धडकी भरवतोय. प्रचि २२ खुप आवडलं.
आणि वडापाव, कणिस तर क्या कहने!!

वा Happy

वा वा वा वा - बहोतही बढिया........

डोळ्याचे पारणे फिटले रे ही पावसाची जादू पाहताना........

मस्त रे....अस वाटंतय पळत पळत जाव तिथ आणि निवांत भटकाव Happy

पण ते आमच्या नशीबी नाही.... पण तुझ्यामुळे ते पुर्ण झाल.... खुपच छान आहेत सगळ्या प्रचि Happy

कभी Rain तर कधी ऊन Climate जरा हटके >>
अगदी प्रचिंतुन तेच दिसतय.
आवडल Happy

प्रचि ७,८ जास्त आवडले..वडापावाचा फोटो कसला जबरी आलायं

सहीच Happy
मी एकदाही गेलो नाहिये माळशेजला.
गर्दी आणि टुकार पब्लिक ह्यामुळे.
मुंबै कडुन वर घाट चढत यायला जास्त मजा येइल असं वाटतय फोटु बघुन. Happy

प्रचि १५ मधील इसमाने जंगी रिस्क घेतली आहे असं माझं मत आहे.
पावसाने आणि पाण्याने दगडं शेवाळलेली असतात आणि निसरडी झालेली असतात.
अशाच एका पराक्रमात आमचे एक मित्रवर्य खांद्याला खिळे मारुन बसवुन घरी पडी मारत आहेत सध्या.

प्रचि १८ मधील स्विफ्टुकली आवडलीच.
तिने पावसाळा मनापासुन एन्जॉय केलात हे लक्षात येतय. Happy

ए तू महान आहेस रे.... खरंच!!

मी आधीही म्हणाल्याप्रमाणे, तुझ्या लेन्सला 'नजर' ट्रान्सफर झालीये तुझी, तू उगाच हवेत क्लिक केलेस तरी, कुठलातरी मस्त सीन कॅप्चर होईल् इतकी....

प्रचंड आवडलेत सगळेच प्रचि.. पहिला अफाट, मका तर ऑसम्म, किटलीही जबरी, घाटातले तर अहाहा... सगळेच मस्त मस्त!!!

ऐसेहीच फिरते रहो, क्लिकते रहो Wink Happy

तुझ्या लेन्सला 'नजर' ट्रान्सफर झालीये तुझी>> वेगळ्या भाषेत मी ह्याला केमिस्ट्री म्हणतो.
तुझी आणि तुझ्या कॅमेर्‍याची केमिस्ट्री जबरदस्त जमली आहे. Happy

गड्या तेव्ह्डा तो वडा-पाव पाठवुन दे अफ्रिकेला...तो. पा. सु. यार....सारखा जळवत असतोस लेका.. पाप लागेल तुला पाप .... Wink

Pages