"माळशेज घाट" सिर्फ नाम ही काफी है!!!

Submitted by जिप्सी on 14 September, 2012 - 00:51

६ Bikes 11 भटके
कभी Rain तर कधी ऊन Climate जरा हटके
गरमागरम वडापाव Masala Tea के साथ
Another भीगा Weekend @ Malshej Ghat Happy

"नेमेचि येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणेच पावसाळ्यासोबत येतात ते सह्याद्रीच्या कडेकपार्‍यातुन वाहणारे निर्झर आणि मग आठवण येते ती "माळशेज घाटाची". पावसाळी भटकंतीतील माझे अत्यंत आवडते ठिकाण. काहि गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास माळशेजची भटकंती नेहमीच आनंददायी ठरते. माझ्या आयुष्यातील पहिला वर्षाविहार हा माळशेज घाटातच. कदाचित त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात याची ओढ मला लागते आणि नेहमी याचे सौंदर्य मला वेगवेगळे भासते.म्हणतात ना "पहला प्यार कभी भुलाया नही जाता" असंच काहितरी. ;-). दरवर्षी अगदी न चुकता श्री सत्यनारायणाच्या महापूजेसारखे याचे दर्शन घेऊन येतो. Happy

तर मंडळींनो,
सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही माळशेज घाटात पावसाळी भटकंती करून काहि प्रकाशचित्रे काढली आहेत तरी आपण सहकुटुंब सहपरीवार अगत्य येऊन आणि बघुन या प्रचिंचा आनंद घ्यावा हि आग्रहाची विनंती. Proud

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

(पुढच्या वर्षी पुन्हा भेटुच... Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त्.......................तुमचे आणि तुमच्या कॅमेर्‍याचे एकदा तरी दर्शन व्हावे ईतकच वाटतय.........

पहिल्या तीन फोटोंबरोबर मी ही निघाले. अन चवथ्या फोटोला मी गुंगून बघतच राहिले. पाचव्या फोटोत स्वप्नवत वाटत होतं, तोच सहाव्याने धस्स झालं. पुन्हा ७-८-९ ने धुंद केलं. १० ला जरा जपूनच ओलांडलं.
११ ला आहा म्हणत थोडी पुढे झाले. अन झालं १२ व्याने चक्क भिजवलंच की Happy १३, १४ त जरा पाय भिजवले. अन १५ जरा काळजीपूर्वकच ओलांडला.
१६, १७ मन भरून पाहिली. १८ ला पुन्हा काळजीपूर्वक वळसा घातला. १९ च्या रस्त्यावर येऊन थबकून बघतच राहिले, ढगांचा तो खेळ ! २०व्यात त्या ढगाने त्या सुळक्याबरोबरच मलाही वेढून घेतले.
अन मग हलकेच तरंगत तरंगत २१ मधून पर्वतराशी अनुभवली. वा-याचा एक झोत आला अन भस्सकन त्या सुळक्या जवळ पोहोचले. पण तेव्हढ्यात २२ च्या त्या भोकसातून झमक्कन वारा आला अज मला दाण कन जमिनीवर उतरवून गेला.
मग काय बसले आपली पाण्यात पाय टाकून, २३, २४ मध्ये. २५ मधल्या किटलीतल्या वाफाळत्या चहा बरोबर, अन २६ मधला गरमागरम वडापाव चापत. शेजारी २७ मध्ये उकळत असलेल्या कणसाचा सुवास घेत.
चला ही ट्रीप तर मस्त पार पडली जिप्सीमुळे. आता पुढच्या वेळेस कुठे नेतोय्स रे Happy

सुरवातीच्या लाईन मस्त....हटके..
प्रचि बद्दल काय बोलणार.....तोड नाही
(फोटो काढावेत तर ते फक्त आपणच...जातीचे असावे...)

व्वा! डोळ्यांचे पारणे फिटले. काय अप्रतिम प्रचि आहेत. आम्हाला माळशेज घाटावर फिरवून आणलं म्हणुन खूप खूप धन्यवाद! जिप्सीराव तुम्ही कमाल आहात अगदी.

सर्वच प्रचि म्हणजे मनं रानात गेलयां..टाईपचेच आहेत.अ प्र ति म !!!

प्रचि १ मध्ये जे वळण आहे, तिथेच ३ वर्षापूर्वी हरीच्छंद्रगडाच्या ट्रेकच्या वेळी आमच्या ग्रुपमधिल ३ बाईक्सचा विचित्र असा अपघात झाला होता...एकूण ६ जणांपैकी ५ जणांचे डावे गुडघेच फुटले होते.. प्रचि ६ मध्ये असलेले रेलिंग नविनच टाकलेले दिसत आहे..बाकी संपूर्ण माळशेज घाट परीसर म्हणजे एक स्पेशल ट्रीटच असते.

मुसळधार प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!! Happy

स्मिता, सेना, आरती, बागेश्री Happy Happy

मुंबै कडुन वर घाट चढत यायला जास्त मजा येइल असं वाटतय फोटु बघुन.>>>>झकास अगदी अगदी रे Happy

प्रचि १५ मधील इसमाने जंगी रिस्क घेतली आहे असं माझं मत आहे.>>>>एकदम बरोबर. अशाच काहि गोष्टीमुळे तर माळशेज घाट बदनाम झाला आहे. मी पण कधी तो एकदाचा फ्रेम बाहेर जातोय त्याची वाट पहात फोटो काढायचा थांबलो होतो पण नाही गेला. उगाच शायनिंग मारत होते.

प्रचि १८ मधील स्विफ्टुकली आवडलीच.>>>>>:-)

वडापाव खाऊन खल्लास
गड्या तेव्ह्डा तो वडा-पाव पाठवुन दे अफ्रिकेला>>>>अतुलजी, शागं Proud

रोमा Proud वातावरणनिर्मिती करतोय रे. Wink Wink

आरती>>>>> प्रतिसाद सुप्परलाईक Happy

सह्याद्री>>>> Sad Sad

बाकी संपूर्ण माळशेज घाट परीसर म्हणजे एक स्पेशल ट्रीटच असते.>>>>+१०००० Happy

बागेश्रीची कमेंट आवडली. Happy
२०-२१-२२ नोस्टॅल्जिक. आत्ता तिथले पॅचेस कांय भारी असतील??
मला केव्हा नेणारेस तुझ्याबरोबर? .. नायतर तू तरी ये माझ्याबरोबर.. Happy

सर्व प्रकाशचित्रांचे फ्रेमिंग बिनतोड आहे.

एव्हडी सुंदर क्लॅरीटी मानवी दृष्टीसही सापडत नाही. अर्थात ती ६/६ च्याही पलिकडे़ जाउच शकत नाही. मित्रा, तुझी मॅन्युअल एक्स्पोजरवर ब्रोमाईड फीतीवर घेतलेली प्रकाशचित्रे बघायला जास्त आवडेल. काळी-ढवळी असतील तर सोन्याहुन पिवळं ...

मस्त फोटो. मजा येते ना, माळशेजला? शनिवार - रविवार -सुट्टी सोडून गेलेला दिसतोस. नाहीतर माणसं आणी गाड्याच दिसतात.

जिप्सी, मी ऑफिसच्या लोकांबरोबर जवळ जवळ १२ वर्षांपुर्वी ट्रिपला गेले होते माळशेजला, त्याची आठवण झाली. खूप छान फोटो आहेत.

जिप्सी, येकदम झ्याक फोटवं हाईत! मोऽऽऽप फिरवलंत घाटातून आमास्नी! येवडं फिरल्यावर भूक लागनार न्हाई? म्हून वडाप्पाव आनं कणसंबी दिली. जबरदस्त पाहुणचार क्येलान की तुमी! वडापावासंगे मिरच्याबी हव्या होत्या! पन न्हाई घावल्या म्हून नाराज नाय बरंका आमी. म्होरल्या खेपेस द्येऊन टाका! थकबाकीसकट!! Happy

प्रचि अप्रतिम आलीयेत हे सांगणं म्हणजे लता मंगेशकर महान कलाकार आहेत असं सांगण्यासारखं आहे! Happy अशीच वेळोवेळी प्रचि काढून आम्हाला फिरवून आणत जा. धन्यवाद! Happy

बरं, त्या प्रचि १० मध्ये नेढं दिसतंय का? की कृत्रिम (मानवनिर्मित) छिद्र आहे? असो. प्रचि ०७ मध्ये दिसतोय तो रस्ता आहे का? आणि ते पांढुरकंसं दिसतंय तो प्रचि ०६ मधला कठडा तर नाही...?

आ.न.,
-गा.पै.

वा! व्वा!! व्वा व्वा व्वा!!!
तुझ्या प्रचिंना प्रतिसाद द्यायला आता दुसरे शब्द शोधावे म्हणतेय Happy

सुर्रेख!!

धो धो प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

बरं, त्या प्रचि १० मध्ये नेढं दिसतंय का? की कृत्रिम (मानवनिर्मित) छिद्र आहे? >>>>गापै तो माळशेज घाटाला बोगदा आहे.

प्रचि ०७ मध्ये दिसतोय तो रस्ता आहे का?>>>>होय तो रस्ताच आहे. Happy

आणि ते पांढुरकंसं दिसतंय तो प्रचि ०६ मधला कठडा तर नाही...?>>>>नाही तो कठडा नाहीये, तेथे दरड कोसळल्यामुळे रस्ता तुटला त्याचे बांधकाम चालु आहे. Happy

Pages