चित्र बोलते गुज मनीचे - (काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा) (प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 27 August, 2012 - 19:06

chitrolya.JPG

असं म्हणतात "A picture is worth thousand words !"
तर मायबोलीकरांनो, खालील प्रकाशचित्रांवरून एखादी कविता सुचतेय का ते पहा बरं!

नियम व अटी

१. खाली दिलेल्या चित्रांवर स्वरचित चारोळी पाठवा.
२. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
३. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
४. प्रवेशिका स्वीकारण्यास, दि. १९ सप्टेंबर २०१२, गणेश चतुर्थी, या दिवशी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरवात होईल.
५. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशी, या दिवसापर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याच्या प्रमाणवेळेनुसार) राहील.
६. स्पर्धा खुली होईल तेव्हा प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.
९. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.

प्रकाशचित्र क्र. १
Zabbu_0024.jpg

प्रकाशचित्र क्र. २
Zabbu_008.jpg

प्रकाशचित्र क्र.३
Zabbu_007.jpg

*सर्व छायाचित्रे जिप्सी आणि बित्तुबंगा यांच्याकडून साभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या स्पर्धेबद्दल काही शंका असल्यास येथे विचारू शकता. तुम्हा सगळ्यांचा भरगोस प्रतिसाद अपेक्षित आहे.