व्यायामशाळा - व्यायामाचा प्रचार/प्रसार ते पैसे उकळण्याचा नवा व्यवसाय....विविध बरे वाईट अनुभव

Submitted by मेधावि on 31 August, 2012 - 21:59

काल आमचा मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या होत्या. महत्वाच्या विषयावर गाडी आलीच्......जवळपास सर्वच जणींची दुखरी नस्..वाढलेले वजन्...ओघानेच सध्याची जिम्स व त्यांचे बरे वाईट अनुभव कथनही झाले. बर्‍याच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. जाहिराती पाहून आपण जिम लावतो व नंतर जर काही कारणाने वजन उतरले नाही तर बरेचदा स्वतःला दोषी ठरवतो व "झाकली मुठ सव्वा लाखाची"..झाकलेलीच रहाते. बर्‍याच गोष्टी लोकांपुढे येतच नाहीत. हा धागा तुम्हा-आम्हाला आलेल्या जिम्स्च्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याकरता.....

सध्या बरेच नामांकीत जिमवाले कॉर्पोरेट मेंबरशीप्स देतात. आठ हजारांमधे वार्षिक सभासदत्व मिळते त्यामुळे बरेच जण सभासदत्व घेतातही. पण माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीने सांगितलेला अनुभव म्हणजे सकाळी ६ ला जेव्हा जिम उघडते तेव्हा बाहेर रांग असते सभासदांची. मग पळापळ करून मशिन्स पकडावी लागतात. आणि पहिले मशिन संपवून दुसर्‍या मशिनवर जाताना परत रांगेतून जावे लागते. अगदी व्यायामाच्या शेवटी शवासन करायला जमिनीवर झोपण्यासाठीचे मॅट पण रांगेतून मिळते व आडवे होण्याकरता जागासुद्धा...अखेर ह्या सगळ्याचा परिणाम जिमला न जाण्यात होतो. ग्राहकाला वाटते की आपण जात नाहीये म्हणून ते चुप व ते आले नाहीत तर आम्ही काय करणार असे सांगून जिमवाले नवीन ग्राहकांना ओढायला व नवीन जाहीराती करायला मोकळे. वास्तविक त्यांनी घेतलेल्या मेंबरशीप्स व सभासदांच्या सोयीच्या वेळा त्यांना माहीत असतात. सकाळी सहा ते नउ पर्यंत आपल्याकडे किती जण व्यवस्थितपणे व्यायाम करू शकतात ही माहीती त्यांच्याकडे असते पण ती लपवली जाते. जर का सभासदसंख्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यांनी त्यावर उपाय शोधायला हवा किंवा सभासदांना ही वेळ उपलब्ध नाही असे तरी कळवायला हवे.

शिवाजी मंदिरमधे हरिभाऊ सानेंनी चालवलेली महिलांची व्यायामशाळा, किंवा ट्रेनींग कॉलेजमधे योगासने शिकवणारे आगशे गुरुजी ही चांगली उदाहरणेही आहेतच....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिंपरीतली एक नावाजलेली जीम.
नाव मोठं, अ‍ॅड भरपुर वै वै...

तिकडे आजवर कधीही व्यायाम न केलेला आणि ओव्हरवेट असलेला एक वंगबंधु गेला.
सर्व पाहुन झाल्यावर तीन महिन्यासाठी पर्सनल ट्रेनर घेवुन जीमला सुरवात करण्याचा निर्णय घेतला.
(मानलं जीमच्या मार्केटींग वाल्याना. त्याच्या खिशात पर्सनल ट्रेनर घेण्याइतके पैसे आहेत हे त्याच्या खिशात हात न घालता ओळखल त्यानी आणि बरोब्बर तसाच प्लॅन त्याच्या गळी उतरवला) त्याचे बिफोर आफ्टर मधले बिफोरवाले फोटो काढले गेले.
जीमच्या पहिल्याच दिवशी वंगबंधुला त्याच्या ट्रेनरने लेग्स सेक्शन मध्ये नेवुन स्क्वॉटस मारायला लावले.
मोठा ४५ पौंडाचा बार घेवुन नुसता नाही त्याला दोन्ही बाजुला प्रत्येकी ४५ पौंडाची वजनं लावुन. हा त्याला म्हणतोय की अरे मला तीनच महिन्यात वजन कमी नाही करायचय. वेळ लागला तरी चालेल पण ट्रेनर काय नाही होत. मार तु. ह्यावर अडुन बसला. त्याने पहिल्या दिवशी कुथुन कुथुन जे जमत ते केल. (नाही म्हणायला जमल नाही त्याला)
गुढघे आणि पाय कुरकुरु लागले पण तो कसाबसा तीन दिवस जीममध्ये जात राहिला. (तीन महिन्याचे पैसे आगाउ भरलेले. न जाउन करतोय काय. ) तीनही दिवस ट्रेनर त्याच्या कपॅसिटीच्या बाहेरचा व्यायाम घेत राहिला.
ह्याने जान बची तो लाखो पाये म्हणत त्या जीमला तिलांजली दिली.

६ महिने होउन गेले. तो अजुनही नुसत्या बॉडी वेटनेही स्क्वॉट्स मारु शकत नाही. (गुढघे दुखतात त्याचे स्क्वॉट्स मारताना). सध्या मात्र त्याने डोळे उघडे ठेवुन जीम शोधली. त्याची जीम सुरु आहे आता. (पोरात गट्स आहेत. एवढा त्रास झाल्यावर एखाद्याने परत घाबरुन कुठल्याच जीमच तोंड पाहिल नसतं)

व्यायामाची इन्टेन्सिटी हळुहळु वाढवत न्यावी ह्या तत्वाला हरताळ का फासला त्या ट्रेनरने काय माहिती. Sad

सर्टिफाइड ट्रेनर प्रत्येक जीम मध्ये किती असतात हा आकडा शोध घेण्यासारखा आहे.
ह्याविषयी कळालेला एक किस्सा नंतर सांगतो.

हो. आजकाल हे पर्सनल ट्रेनर्स घेतले की रिझल्ट्स चांगले मिळतील असे जिमवालेच सांगतात. मला ह्याचा अर्थ नीट कळलेला नाहीये. जिममधे एवढे पैसे घेतले जातात की त्यात प्रत्येकाला व्यायाम निट करण्यासाठी व्यक्तीगत मार्गदर्शन मिळायलाच हवे ना? त्यासाठी वेगळा ट्रेनर म्हणजे अधिक पैसे कशाकरता? तळवळ्कर्स मधे (इतर ठिकाणीही असेच असेल बहुते)तर हे ट्रेनर्स पुढची मशिन्स पकडून देतात म्हणूनही त्यांचा फायदा होतो...

व्यायामाची इन्टेन्सिटी हळुहळु वाढवत न्यावी ह्या तत्वाला हरताळ का फासला त्या ट्रेनरने काय माहिती >> बरेच ठिकाणी वर्षाची फी आगाऊ घेतात. जर अशा ट्रेनरमुळे "गिर्‍हाईक" पळुन गेलं की त्याना फायदाच की!

आपण तर ब्वा जीमच्या वाटेला गेलोच नाही. कॉलेजला असताना एकावेळी दोन जीमची सभासदत्व होती यावरून अजूनही मित्र खेचतात... पण आपल्यात ती चिकाटी नाही हे वेळीच लक्षात आलं.. आणि नाद सोडला Happy

हल्लीचे मित्र मैत्रीणींचे जीम आणि ट्रेनरचे किस्से ऐकून केलेले हे विडंबन....... विषय पाहून रिक्षा फिरवायची हौस आली Proud पहा वाचून.... विषयाला धरूनच आहे.

http://www.maayboli.com/node/21453
ट्रेनर ... कल हो ना हो

मला मात्र चांगला म्हणता येईल असाच अनुभव आहे : सुसज्ज उपकरणांसहीत जीम, प्रवेश घेतानाच तुमचा नंबर तुम्हाला सांगितला जातो आणि वेळ कोणता ते सांगितलं जातं, वेळ बदलून हवी असेल तरी किमान एक आठवडा जीम मधे नेहमी यावं लागतं, त्यानंतर तुम्हाला हव्या त्या वेळेतला एखादा मेंबर बदली करून तुम्ही वेळ बदली करू शकता, ( बहुसंख्य कॉलेज कुमार असल्यानं हे सहज शक्य होतं )
ट्रेनर हा फक्त जीमचा मालकच आहे तो प्रत्येक नविन एक्सरसाईज किंवा मशीन देताना आधी समोर उभं राहून करवून घेतो
फायदा क्र ३ इथले बिल्डर्स ( बॉडी बिल्डर्स ) कधीही व्यायामात मदतीला तयार होतात आणि काहीच दिवसात तुम्हाला एक व्यायाम पार्टनर मिळवून देतात जेणे करून तुमचा सेट व्यवस्थित होईल.
तोटे : जीम तिसर्‍या मजल्यावर असल्यानं स्कॉट्स मारून निघताना ब्रम्हांड आठवतं Proud
ए सी हा प्रकार अद्याप नसल्यानं उन्हाळ्यात जरा त्रास होतो Wink

कचा, ग्रेट वर्क.

शक्यतो जिम एसी नकोच. तेव्हढाच घाम गळतो.

जिम जॉईन करण्यापूर्वीच सगळ्या चौकश्या / पहाण्या करुन घ्याव्या. पर्सनल ट्रेनर म्हणजे जो तुमच्याकडून 'योग्य' व्यायाम करवून घेतो. ट्रेनर म्हणजे जो तुम्हाला व्यायाम 'योग्य रीतीने कसा' करावा याचं मार्गदर्शन करतो. जिममध्ये ट्रेनर असावाच लागतो. चुकीच्या पद्धतीने व्यायाम करून खूपच तोटे होतात. तुम्हाला शंका असल्यास ट्रेनरच्या सर्टिफिकेशनची चौकशी करता येईल की जिमच्या व्यवस्थापनाकडे.

झकासराव, ४५ पौन्ड म्हणजे काहीही जास्त नाही. आपल्या बॉंगबंधूंचे स्वत:चे वजन किती होते ? पण त्यात दोन्ही बाजूला ४५ पौन्ड अडकवले असतील तर फर्स्ट टायमरसाठी नक्कीच जास्त आहेत. त्याने जिमच्या ओनरकडे कंप्लेन्ट केलीच पाहिजे.

जिमपेक्षा आमच्या पुर्वीच्या व्यायामशाळा बर्‍या. ठाण्यात तरी अजून बर्‍याच व्यायामशाळा शिल्लक आहेत. मावळी मंडळ, स्फूर्ती, बी कॅबिनमधली एक (नाव आठवत नाही)......

व्यायाम करताना चांगला पार्टनर ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे. एकमेकांना मदत करत, उत्तेजन देत व्यायाम करणं दोघांनाही फायदेशीर ठरतं

भारतात लोकसंख्याच जास्त. मग सगळीकडे गर्दी होणे, लांब रांगा हे ओघानेच आले. आणि जागा पण कमी नि मशिने तरी किती घेणार?
आमच्या लहानपणी मशिने नसलेली व्यायाम शाळा होती. तिथे सूर्यनमस्कार, योगासने, जोर बैठका, मुद्गल फिरवणे इ. साधे सोपे व्यायाम असत. त्याला जागा हि जास्त लागत नसे. त्यामुळे आपण केंव्हाहि जाऊन आपले व्यायाम करू शकत असू. रांगा नाहीत. पैसे पण अगदी कमी. एक छोटे मैदान होते तिथे धावायला लोक जात. एक पावसाळा सोडला तर इतर वेळी वर्षभर पहाटे उत्तम हवा. रांगा लावायला नकोत मशिनसाठी. या सर्व व्यायामप्रकारात चरबी जळणे स्नायूंना योग्य तो व्यायाम मिळणे हे सर्व शक्य होते.

अर्थात तेंव्हाहि लोकसंख्या कमी असल्याने स्वच्छता ठेवणे सोपे होते. आजकाल ऐकले की मैदानात घाण असते, लोक थुंकतच असतात, मुले घाण करतात.

मग व्यायमशाळेत जरा तरी स्वच्छता असते. (असावी!) शिवाय मशिन वापरून झाल्यावर ते जंतूनाशक मारून स्वच्छ पुसणे, असा नियम असल्याने व तो पाळल्याने, इतरांच्या घामातून, किंवा त्यांना असलेल्या संसर्गजन्य रोग आपल्याला लागत नाहीत.

पण लोकसंख्येचे काय करणार?
अर्थात व्यायामशाळेत जाण्याचे इतर फायदे असे की शरीरसौंदर्य दिसेल असे निरनिराळे कपडे घालून मिरवणे, ओळखी करून मैत्री (!) करणे वगैरे. एकदा मैत्री झाली की व्यायमशाळे ऐवजी हॉटेल, सिनेमा, पार्कात जाणे असे करायला मशिने लागत नाहीत नि रांगा पण नाहीत!! Happy

वेगळेवेगळ्या चांगल्या/वाईट जिम्सचे अनुभव समजले तर बाकीच्यांना उपयोग होईल.
एरोट्रीमचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. गर्दी व व्यायामासाठी रांगा ह्यामुळे मैत्रीणींनी तळवळ्कर्स व एन्डयुरन्सला फार नावे ठेवली. त्यातल्या ४ जणींनी वार्षिक सभासदत्व रु १५ हजार भरले होते तरी गर्दीमुळे अति कंटाळून जाऊन सोडले. त्यातल्या काही जणींनी जाऊन भांडणेही केली पण नो फायदा.

कचा चांगल लिहिलस.

ट्रेनर हा फक्त जीमचा मालकच आहे>>> मला वाटत हे फार महत्वाच आहे.
पर्सनल लक्ष मालकाच आहे म्हणल की बाकीचे ट्रेनर म्हणुन जॉब करणारेही नीट काम करतात.

मी ज्या जीममध्ये सध्या जातो तेथे दोनच ट्रेनर आहेत. पैकी एक मालक आणि एक त्याच जीममध्ये अनेक वर्षापासुन येत असलेला मेंबरच.
मालकांनी वेगवेगळे कोर्सेस पुर्ण केले आहेत. कोणतीही शंका विचारली तर त्याचं नीट कारणासहीत शंकानीरसन करतात.

बाबु ४५ पौंड इकडे आणि तिकडे असे ९० पौंड झाले. बार ४५ पौंडाचा. टोटल झाले १३५ पौंड.
कधीच जीम न केलेल्या माणसाच काय होइल मग. Happy

माझा तरी जिमचा अनुभव अतिशय चांगला आहे.
मी सिंहगड रोडच्या क्लब अमिडात जाते. वेळेचे बंधन नाही. सकाळी ६ ते रात्री ९ कधीही जिम करायला जाऊ शकतो. सकाळी मशिन्स बिझी असतात. पण फार वाट पहावी लागत नाही.

जीममधे पैसे उकळले जातात हे खरं. नवीन आलेल्या सभासदाला वेगवेगळे प्लान्स सांगताना वार्षिक सभासदसत्वावर भर दिला जातो. शक्यतो तीन महिन्याचा प्लान घ्यावा. त्या तीन महिन्यात तुमच्याकडे नक्कीच लक्ष पुरवलं जात कारण तुम्ही पर्मनंट कस्टमर होण्याची शक्यता असते. पण या अवधीत आपला लेखाजोखा आपल्याला तयार करता येतो. एकंदरीत तिथल्या ट्रेनर्स आणि सर्विसचा आढावा घेऊन पुढचं प्लान ठरवता येतो. जीम जॉईन करताना तेथील एकूण अस्तित्वात असलेली उपकरणे आणि ट्रेनर्स यांची माहीती घेणे गरजेचे असते. त्यानंतर वेळा आणि त्या वेळेत उपकरणांची उपलब्धता. फार गर्दी असली तर खोळंबा होतोच शिवाय बॉडी वॉर्मनेस मूळ पदावर परत येतो. एनर्जी लेव्हल घसरते. मुळात पर्सनल ट्रेनरची गरज नसते. एकदा तुम्ही कसा वर्कआऊट करायचा ते नीट समजून घेतलं तर मग ट्रेनरचं काम लक्ष ठेवणं किंवा सपोर्ट करणं इतकचं असतं. तुम्ही विचाराल तेव्हा तुम्हाला सल्ला देण्यास ट्रेनर बांधिल असतो. काही वेळा ट्रेनर्स तुमचा फॉर्म चुकीचा असला तरी तुम्हाला काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. गरज आपल्याला असल्याने आपण त्यांच्याकडून वेळोवेळी सल्ला घेणे गरजेचे. कोणतेही वजन उचलताना फॉर्म अचूक असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्यायाम सुरु करण्यापुर्वी तो नीट समजून घ्यायलाच हवा. पायातलं अंतर, हाताची ठेवण, वजन उचलण्याची पद्धत... यातली छोटी चूक सुद्धा हानीकारक ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीममधे दिला जाणारा डायट प्लान. त्याची शहानिशा आपल्या डॉक्टरकडून करून घ्यायला हवी. जेवण कमी करून येणार्‍या विकनेसमुळे तुमची स्ट्रेंथ कमी होते आणि वजन ढासळते. तुमच्या वजनात पडलेला हा फरक तुमच्या उपयोगाचा नसतो. याची नक्कीच काळजी घ्यावी. दुसरं म्हणजे जीममधे सुचवला जाणारा अतिरिक्त प्रोटीन्स किंवा टॅबलेटसचा आहार. त्याची योग्य रित्या शहानिशा केल्याशिवाय तो घेऊ नये.

एन्डयुरन्स मधे जिमव्यतिरिक्त १ हजार रु. देऊन डायटेशिअन आहे. म्हणजे जिमच्या मेंबरशीपच्या फीमधे ती सल्ला देत नाही. ती अपाँईंट्मेंट घेवून तिथे भेटते व व्हे प्रोटीनचा प्रचार व प्रसार करते. तिथे एक छोटे दुकान पण आहे व्हे प्रोटीनचे. बायका/पुरुष, वजन वाढवणारे/उतरवणारे सर्वांनाच ती ते घ्यायला सांगते. व्हे प्रोटीन घेणे चांगले असते का? काही जणांकडून समजले की त्यात उत्तेजके असतात.

भांडारकर रस्त्यावर असलेलं "द लंजेस" हे एक अतिशय सुरेख जिम आहे..एरोबिक्स आणि मशिन वर्क-आऊट साठी चांगले ट्रेनर्स आहेत आणि व्हॅल्यू फॉर मनी पण नक्कीच आहे.

कोणाला अधिक माहिती हवी असल्यास संपर्क करा! (मला, वि.पु त)

फक्त फिटनेससाठी व्यायाम करणार्‍यांना आहारातून मिळणार्‍या प्रोटीन्सवर भर देणे उत्तम. अतिरिक्त प्रोटीन्स बॉडीबिल्डींगसाठी किंवा पोजिंगसाठी उतरणार्‍या व्यायामपटूंना जास्त आवश्यक. काहीमधे उत्तेजके असतात असं मीही ऐकलय. प्रत्यक्ष अनुभव नाही. वजन उतरवणार्‍यांनी तर फॅट्स कडे लक्ष देणे जास्त गरजेचे. वजन कमी करण्यासाठी काही वेळा टेबलेटस दिल्या जातात. त्यात स्टेरॉईड असतं, ज्यांचा किडनीवर परिणाम होऊ शकतो.

मेघना राजे नावाच्या एका डॉक्टर बाईंच्या स्लीमींग सेंटर मधे तर हर्बल्-लाईफ विकायला होते. (सोर्स मैत्रिण). साधारणपणे "व्यायाम" व "आहारनियंत्रण" ह्या दोनच गोष्टींनी वजन उतरवणे "बरोबर" व बाकी सर्व गोष्टी म्हणजे दिशाभूल हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. असे असताना जिम्-वाल्यांनी ह्या बाकीच्या गोष्टींचा आधार घेणे किती बरोबर आहे? असे करून ग्राहकांच्या जिवाशी खेळणार्‍यांना काहीच नियम्/कायदा नसतो का?

पळापळ करून मशिन्स पकडावी लागतात. आणि पहिले मशिन संपवून दुसर्‍या मशिनवर जाताना परत रांगेतून जावे लागते. अगदी व्यायामाच्या शेवटी शवासन करायला जमिनीवर झोपण्यासाठीचे मॅट पण रांगेतून मिळते व आडवे होण्याकरता जागासुद्धा >> अगदी अगदी. मी यातून गेलोय. पैसे दान केले त्या जीमला Happy

एरोट्रीमचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. >> अनुमोदन.. त्यांची कोथरूडची शाखा चालू आहे काय अजून?

मनीष, त्यांची कोथरुडची शाखा आधी पौड रोडला नैवेद्यमच्या वर होती ती नाहीये आता. डहाणुकर मधे सुरु झाली आहे त्यांची नवी जिम. तीही उत्तम आहे.

शक्यतो जिम एसी नकोच. तेव्हढाच घाम गळतो. >>>> बाबु ही समजुत चुकीची आहे घाम गळण्याचा आणि कॅलरी जळण्याचा एकमेकांशी काही संबंध नाही. एसी असेल तर तुमच्या रिपीटीशन वर फरक पडतो Happy

अनुमोदन कचा.. Happy

माझी जिम एसी आहे कारण पुरेशा खिडक्या नाहीत, एसी नसती तर मी इमॅजिन नसते करू शकले काय अवस्था असती. कोज्ड रूम्स मध्ये फ्रेशनर मारल्याशिवाय जाणे इम्पॉसिबल असते.

जिम माल्काच्या बाजुचा जरा विचार करा. दिवसातले चार तास जर पिक अवर्स धरले आणि येक मेंबरला कार्डीओ साठी तीस मीनटे दिली तर येका ट्रेड मिल मागे २४०/३० = ८ सभासद अकोमोडेट होउ शकतात. येका सभासदाला अप्पर बॉडी , लोवर बॉडी, कार्डीओ अस व्यायाम दिला तर येका मशिन मागे २४ सभासद . साधारण तान हजार चौरस फुटाच्या जागेत १० ट्रेड्मिल, वेट्स सेक्शन , चेंजींग रुम, स्टिम , रेसेप्शन जेमेतेम बसतो. हेविडयुटी ट्रेड्मिल चि किंमत २ लाखाच्या पुढे असते ( हि किंमत ईंडीयन मॅन्युफॅकर्ड इक्युपमेंट ची उदा. Jerai. परदेशी उपकरणांची उदा. technogym, Nordic track किंमत काही पट आहे), बाकीचे इक्युपमेंट ( स्मिथी बेंच, पुली, लेग मशिन्स) हि महाग असतात. यात जागेचे रेंटल, कमर्शील रेट ने वीज्/पाणी, इन्स्ट्रक्टर , जाहिरात अ‍ॅड करा. हे सगळे केल्यानंतर ८ हजार रुपयात वर्षभराची मेंबरशिप स्वस्तः म्हणायला हवी.

मेंबर्स घेताना ८ हजारात मेंबरशीप देवू नये ना मग. महाग ठेवावे. पण तिथे गेल्यावर व्यायाम करता येईल असे पहावे. ८ हजार संपूर्ण वाया जाण्यापेक्षा १५ हजार संपूर्ण वापरता येतील ग्राहकाला. मेंबरशीप देताना ह्या गोष्टीची कल्पना तरी द्यावी निदान. माझ्या तळवळ्कर्स च्या मैत्रिणीने सांगितले की तिथे मेंबरशीप आणणार्‍या कर्मचार्यांना इन्सेन्टीव्ह मिळतो. मैत्रिणिने त्यांना प्रवेश घेतानाच विचारले होते की मी सकाळी ७ लाच येउ शकेन आणि त्यावेळेस फार गर्दी असेल तर मग मी ह्या महिन्यात येउ नाही शकणार, नंतर येईन, तेव्हा....आमच्याकडे तुमचा वर्क आउट नीट होईल काळजी करु नका असे सांगून प्रवेश घ्यायला लावून नंतर गर्दीचे कारण पुढे आल्यावर कानावर हात ठेवले. ह्या प्रकारची फसवणूक माझ्या ऑफिसमधे अनेकांची झाली आहे असे नंतर समजले. अनेकांनी वर्षाच्या भरलेल्या पैशांवर पाणी सोडले. मगाशी कलीगशी बोलताना समजले की त्यांची वर्षाची मेंबरशीप पंधरा हजार होती. माझ्या माहीतीत ३ जणांची ती वाया गेली. जिमवाल्यांशी भांडायला आपण एकटे व खूप लहान पडतो पण किमान इथे अनुभव लिहून बाकेच्यांना सावध तरी करु शकतो.

सगळ्या नविन मेंबर्स्ना फक्त ट्रेडमिलवर धावायचे असते. ट्रेनरने समजाउन सुद्धा elliptical , stepper रिकामे पडलेले असतात. वेट्स करायचे बरेच जण टाळतात आणि पुढे गर्दी, वेळेचा अभाव अशी कारणे देउन गळतात.
मी गेल्या पंधरा वर्षात मुम्बईतल्या वेगवेगळ्या नावजलेल्या जीम चा मेंबर होतो/आहे आणि ज्याना ज्येन्युअनलि फीटनेस राखायचाय त्याना काही प्रोब्लेम येत नाही हे स्वानुभ्वाने सांगतो.

कचा, मी व्यायाम आणि एसी या दोन्ही फिल्डशी संबंधित आहे. एसी तूम्हाला डिहायड्रेट करतो त्यामुळे व्यायाम करताना क्रॅम्प्स येण्याची शक्यता वाढते. व्यायाम करताना घाम येत नसेल तर व्यायामाचा पुरेसा फायदा होत नाहीये हे नक्की. एसी खोलीचे तपमान घटवतो. व्यायामाने रक्ताभिसरण वाढून शरीराचे तपमान वाढते. हे परस्पर विरोधी असल्याने व्यायामशाळेत एसी नसल्यास जास्त फायदा होतो. किंवा एसीचे सेटींग २५ ते २६ वर ठेवणे उत्तम.

बादवे नॉन एसी म्हणजे कोंदट / कुबट नव्हे. वायुवीजन (अर्थात खेळती हवा) असणे गरजेचे असते.

पाटीलसाहेब, तुम्ही म्हणता ते खरे असेलही...पण वर उल्लेख झालेली काही चांगली जिम्स आहेत ज्यान्च्याशी तुलना झाल्यावर फसवाफसवी करणार्‍या जिमवाल्यांचा लबाडपणा उघडकीस येतो.

मी पाच वर्षांपूर्वी कर्वेनगरमध्ये पेगासस जीम लावले होते.मला त्याचा चांगला अनुभव आला.आता सध्याची स्थिती माहित नाही.

मी व्यायाम आणि एसी या दोन्ही फिल्डशी संबंधित आहे.>>>>> बा.बु. मी सुध्दा Happy पण एसी डिहाययड्रेट करतो हे नाही पटत, बघ म्हणजे एसीची हवा कोरडी त्यामुळे येणारा घाम चटकन उडून जातो. बॉडी वॉर्म अप आणि तापमान याचा काही संबंध नाही, अन्यथा उन्हाळ्यात काही न करता वजन घटलं असत ;), आणि टेंपरेचर सेटिंग बद्दल मात्र अचुक बोललास बहूतांशी जिम मधे सेटींग २६ च असतं Happy

काही वर्षांपूर्वी जिम लावली होती. नंतर भरमसाट गर्दी वाढल्याने कोर्स पूर्ण करायला वेळ व्हायला लागला. जिम सोडल्यानंतर आहार तोच राहील्याने वजन वाढते हे माहीत होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने फिरणे चालू केले. जोडीला बॅडमिंटन शनिवार रविवार इतकेच मर्यादीत ठेवलेय. व्यायाम असा असावा जो आपण वयोमानानुसार दीर्घ काळासाठी कंटीन्यू करू शकू असं अनेकांचं मत ऐकण्यात आलंय. खखोतजा.

Pages