व्यायामशाळा - व्यायामाचा प्रचार/प्रसार ते पैसे उकळण्याचा नवा व्यवसाय....विविध बरे वाईट अनुभव

Submitted by मेधावि on 31 August, 2012 - 21:59

काल आमचा मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या होत्या. महत्वाच्या विषयावर गाडी आलीच्......जवळपास सर्वच जणींची दुखरी नस्..वाढलेले वजन्...ओघानेच सध्याची जिम्स व त्यांचे बरे वाईट अनुभव कथनही झाले. बर्‍याच नव्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. जाहिराती पाहून आपण जिम लावतो व नंतर जर काही कारणाने वजन उतरले नाही तर बरेचदा स्वतःला दोषी ठरवतो व "झाकली मुठ सव्वा लाखाची"..झाकलेलीच रहाते. बर्‍याच गोष्टी लोकांपुढे येतच नाहीत. हा धागा तुम्हा-आम्हाला आलेल्या जिम्स्च्या अनुभवांची देवाण घेवाण करण्याकरता.....

सध्या बरेच नामांकीत जिमवाले कॉर्पोरेट मेंबरशीप्स देतात. आठ हजारांमधे वार्षिक सभासदत्व मिळते त्यामुळे बरेच जण सभासदत्व घेतातही. पण माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीने सांगितलेला अनुभव म्हणजे सकाळी ६ ला जेव्हा जिम उघडते तेव्हा बाहेर रांग असते सभासदांची. मग पळापळ करून मशिन्स पकडावी लागतात. आणि पहिले मशिन संपवून दुसर्‍या मशिनवर जाताना परत रांगेतून जावे लागते. अगदी व्यायामाच्या शेवटी शवासन करायला जमिनीवर झोपण्यासाठीचे मॅट पण रांगेतून मिळते व आडवे होण्याकरता जागासुद्धा...अखेर ह्या सगळ्याचा परिणाम जिमला न जाण्यात होतो. ग्राहकाला वाटते की आपण जात नाहीये म्हणून ते चुप व ते आले नाहीत तर आम्ही काय करणार असे सांगून जिमवाले नवीन ग्राहकांना ओढायला व नवीन जाहीराती करायला मोकळे. वास्तविक त्यांनी घेतलेल्या मेंबरशीप्स व सभासदांच्या सोयीच्या वेळा त्यांना माहीत असतात. सकाळी सहा ते नउ पर्यंत आपल्याकडे किती जण व्यवस्थितपणे व्यायाम करू शकतात ही माहीती त्यांच्याकडे असते पण ती लपवली जाते. जर का सभासदसंख्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर त्यांनी त्यावर उपाय शोधायला हवा किंवा सभासदांना ही वेळ उपलब्ध नाही असे तरी कळवायला हवे.

शिवाजी मंदिरमधे हरिभाऊ सानेंनी चालवलेली महिलांची व्यायामशाळा, किंवा ट्रेनींग कॉलेजमधे योगासने शिकवणारे आगशे गुरुजी ही चांगली उदाहरणेही आहेतच....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत असताना जिम जॉईन केली..... अनुभव मस्त..... अलटरनेट डेज ट्रेडमिल,सायकलिंग,वजन उचलने, पोटाचे व्यायाम केले...... बॉडी चांगली टोनअप झाल्यासारखी वाटली...... माझे वजन जास्त नव्हतेच फक्त तेच वजन नेहमी राहण्यासाठी म्हणुन जिम जॉईन केली...... जिमचा मालक सौनाचे पॅकेज घ्या.... त्यांची प्रोटीन्स सप्लिमेंट्स घ्या असे काही सांगत होते पण नाही घेतले....

आता सिंगापुरात घरीच ट्रेडमिल घेतली आहे..... त्यावर धावणे, पोटाचे व्यायाम करणे, फळे-भाज्यांचा जास्त वापर याने वजन कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करत आहे

चांगली चर्चा सुरुय. Happy

घाम गाळणे आणि कॅलरी बर्न होणे ह्याचा संबंध नाही हे खरय पण घाम गळाला तर शरीरातले टॉक्सिन्स निघुन जातील अशी माझी खुळी समजुत आहे. ती कुठुन डोक्यात बसली आहे माहीत नाही त्यामुळे ती कितपत खरी हे देवच जाणे. Happy

पाटील यानी लिहिल्याप्रमाणे बरेच जण ट्रेनरने दिलेले श्येड्युल फॉलो करत नाहीत. त्याना रोज ट्रेडमिलवरच पळायच असतं. Lol
आमच्या जीम मध्ये सध्या असले हाय फाय लोक नाहियेत त्यामुळे ते गपचुप ट्रेनरचं ऐकतात.
त्यातच फायदा आहे हे ही कळायला हवं.

एरोट्रीमचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. >> माझा पण.. Happy
सोलरिस पण चांगलं आहे..

माझ्यामते व्रुषालीज अत्युत्तम आहे.. Happy

बहुतेक चांगल्या जिम ३ दिवसाचे फ्री ट्रायल देतात. त्या तीन दिवसात जिम मधल्या गर्दिचा, ट्रेनरच्या ज्ञानाचा, व्यायामच्य पद्धतीचा अंदाज येतो. त्याव्रुन ठरवा कि जिम तुमच्या साठी योग्या आहे की नाही. American Council on Exercise (ACE) चे सर्टिफिकेशन हे ट्रेनरसाठी उत्तम सर्टीफिकेशन मानले जाते मात्र अशे फार कमी लोक उपलब्ध आहेत. मुंबईत लिना मोगरे, कैझाद कपाडीया ई. लोकांच्या ट्रेनिंग ईन्स्टीट्युट्स आहेत . त्यांचा अभ्यासक्रम चांगला आहे. असे ट्रेन्ड ट्रेनर असतील तर तुमच्या फिट्नेस गोल प्रमाणे व्यायाम देतिल. सुरवातीला ते प्रकार योग्य रीतीने ( पोश्चर, रिपिटेशन ई.) करायला शिकवेल. पर्सनल ट्रेनर घेतलात तर तुम्हाल मोटिवेट करण्याबरोबरच तुम्हाल वैयक्तीक रित्या पुर्ण्वेळ मार्ग्दर्शन करेल. त्यामुळे त्यासाठी वेगळे पैसे घेणे गैर नाही.
बॉडी बिल्डिंग आणि फिजिकल फीट्नेससाठी केलेला व्यायाम हे दोन वेगळे प्रकार आहेत. त्यात गल्लत करता कामा नये.

पिंपळे सौदागरमध्ये अर्नोल्ड भाऊंचा प्रसिद्ध जिम आहे आमच्या घराजवळ.
जिम उघडल्या उघडल्या सहा ते साडे सहा मध्ये गेले तर चांगला व्यायाम होतो.पण साडे सहा ते साधारण साडे दहा प्रचंड गर्दी असते. बरेचदा लोकांना नंबर येईपर्यंत योगा मॅट वर काहीतरी करत राहावे लागते.
पण हॅप्पी अवर्स मध्ये (साधारण १२ ते ५ वगैरे) रेट कमी आणि गर्दी कमी असते.
जिम वाल्यांनी कपॅसिटी इतके लोक घेणे, किंवा ठराविक स्लॉट मध्येच लोकाना यायला सांगणे किंवा सर्किट घेणे (प्रत्येक उपकरणावर १-१ मिनीट,आणि एक मिनीट झाले कि रांग शिफ्ट.) सर्कि मध्ये पाहिजे तितके लोक घेता येतील.
भरपूर पैसे चार्ज करणे,सारखे सारखे मानसिक दबाव आणून अ‍ॅन्युअल मेंबरशिप घ्यायला लावणे, कपॅसिटीपेक्षा भरपूर जास्त लोक 'कधीही या सर' म्हणून घेणे या चुकीच्या गोष्टी आहेत. यातून "या जिम ला जातो" हे प्रेस्टिज आणि जिम मधून ओळखी होऊन जमणे(तरुण मुलं) आणि चांगल्या नोकर्‍या/मित्र मिळणे(संसारी लोक) हे दोनच फायदे दिसून येतात.

मी बिबवेवाडीतल्या एका जिम मध्ये जात होते. एका महिन्यात जिम + डाएटने जवळपास ११ किलो वजन कमी झालं. परंतु रोजचा संपुर्ण व्यायाम (वॉर्म अप सह) जवळपास अडीच तास लागत असे. शिवाय कधी स्टीम बाथ घ्यायची वेळ आली तर तीन-साडेतीन तास सहज. शिवाय संपुर्ण स्वयंपाकघर साबांच्या ताब्यात असल्याने डाएटसाठी मला कमी कॅलरीयुक्त इ. काही बनवायची वेळ आली कि जीवावर येई.

मग मध्ये ऑफिसमध्ये खुप काम असल्याने जिममध्ये वेळ देता येणार नाही या कारणाने महिनाभर जिम सोडली ती पुन्हा लावलीच नाही.

माझे स्वतःचेच ऑब्झर्वेशन असे आहे कि मला त्या निर्जीव मशिनसोबत काहीही करायला बोर होते. यापेक्षा एखादा डान्स क्लास वै. लावला तर आनंद जास्त मिळतो. आणि शरीराची काही ना काही हालचाल होत राहाते. (मी जायचे त्या वेळेला तरी तिथे गाणी/ म्युझिक इ. मोठ्या आवाजात लावायला परवानगी नव्हती कारण वरच्या मजल्यावर लोक राहायचे नी आवाज वाढला कि ओरडायचे. छान संगिताच्या ठोक्यावर व्यायामाला उत्साह येतो तो उत्साहच जायचा मग.)

>>>> व्यायामाची इन्टेन्सिटी हळुहळु वाढवत न्यावी ह्या तत्वाला हरताळ का फासला त्या ट्रेनरने काय माहिती <<<<<
झकोबा, हे तत्व सायन्टिफिकली सिद्ध झाले आहे काय? Wink

बाकी मी एक सांगू का? राग मानू नका क्रुपया कोणी.....
पण स्वतःच्या मनावर ताबा मिळवुन काही करण्या ऐवजी, स्वतःचे मन व शरीर एखाद्या ट्रेनरच्या(?) हातात सोपविणे मला शक्य नाही.
शिवाय तिथे जितक्या फीया भरायला लागतात, तेवढ्या रक्कमेत स्वतःचे जीम उभे राहू शकेल दोन तिन वर्षात.
लागतय काय सुरवातीला?
वार्म अप चे हातवारे जोडीला थोडे रनिंग.... शाळेतली पीटी आठवा
सूर्यनमस्कार / जोर बैठका... मागास वाटत असले तरी हे अत्यावश्यक
थोडी डंबेल्स वापरुन व्यायाम...
एखाद बार व काही थाळ्या वापरुन व्यायाम...
शेवटचे दोन प्रकाराकरता लागणारे मटेरिअल आजही पाच हजाराच्या आत यावे. व हे वापरुन काय करायचे याचे हातवारे गुगल केलेत तर चिक्कार मिळतील.
अन सगळ्यात शेवटी, वजन कमी करायचे, तर आधि तोंडावर आय मीन "गिळण्यावर" ताबा हवा. तोच मिळवला नाही तर तुम्ही कितिही का घाम गाळा.. वजन कमी होणार नाही.

आठ, दहा, पंधरा हजार (वार्षीक असले म्हनुन काय झाले?) असे आकडे ऐकले की माझे तरी डोळेच फिरतात व या आकड्यांच्या चिंतेने/धास्तीनेच माझे पाचपन्नास ग्र्याम वजन आपोआप कमी होते Proud

लिंबुरावः सहमत आहे.
हां काही खास, बॉडी बिल्डिंग करायची आहे, क्रिडापटु व्हायचंय इत्यादि तर गोष्ट वेगळी, मग जिम लागेलच.

तिकडे गर्भसंस्काराबाबत गळा काढणारे इकडे जीममधिल लुटीबद्द्दल काही बोलायला जात नाहीत, नै का?
असो.

मला माहित आहे की जर मला बॉडी बिल्डींग करुन शोमधे नुस्त्या लंगोटावर उघडा उतरुन अंगावरचे सगळे केस कापून वर लाल रंग व तेल चोपडून तुकतुकीत अंगाने मसल्स अन दंडाच्या गोट्या दाखवित शड्डू ठोकीत देहप्रदर्शन करायचे असेल, जर टाईट्ट शर्ट/टीशर्ट घालुन वरची बटने उघडी टाकुन रस्त्याने तमत जायचे असेल जेव्हा बाकी बिचकून बाजुला सरकुन वाट करुन देतिल.... तर मला जीम लावणे आवश्यक.
विशिष्ट मसलला कसा किती व्यायाम देऊन ताणायचे/सैल सोडायचे हा व्यायाम जीममधेच करणे भाग पडेल.
पण मला जर फक्त माझी शरिरयष्टी धडधाकट सुयोग्य आकारात, सुयोग्य वजनाची व कष्ट करण्यास सक्षम अशी हवी असेल, तर आधीच्या पोस्ट मधील व्यायाम पुरेसे होतात, जोडीला खाण्यावर ताबा.

अडचण अशी असते की आमच्या लहानपणि आम्हाला रोजच्या रोज पाचशे लिटर पाण्याचि टाकी शंभर फुटांवरुन लोखंडी बकेट बकेटने भरायला लागायचे. दळण/किराणा व इतर वजने उचलणे/वाहणे नित्याचे. साधे प्रातर्विधीला जायचे झाले तर लिटरभर पाणी भरलेले टमरेल बोटात लटकवत घेऊन फर्लांगभर अंतर चालायला लागायचे.
कुठेही जायचे तर पायी चालणेच, सायकल म्हणजे चैन, व पुढे तर रोजचे ५०किमी सायकलिंग कमित कमी.
मला सांगा, गरज काय होती जीमफिमची?
पण आता? आताची जीवन शैलि अशी की, पाणि भरणे सोडाच, आंघोळिचे पाणी चुलीवरुन काढुन बाथरुम पर्यंत न्यायचेही कष्ट नाहीत, नुसती बादली इकडुन तिकडे सरकवा.... तितकाच काय तो व्यायाम. अन अन्गावर पाणी घ्याय्चेही कष्ट नकोत तर शॉवर आहेच दिमतीला.......
अहो इतकेच काय, तर ढुंगण धुवायला टमरेल उचलुन मागे न्यावे लागते तितकेही कष्ट व्हायला नकोत म्हणून हल्ली स्प्रेचे पाईप किंवा टॉयलेटच्या सीटच्या मागेच तिथे पाईप आणुस बसविलेला, कष्ट इतकेच की फक्त नळाची कळ फिरवायची.......
बरे इतके कश्ट कमी झाले, गिळते तितक्या प्रमाणात कमी केले का? तर नाही..... गिळणे आहे तितकेच ठेऊन बाकी जगण्याचे नित्याचे कष्ट कमी करत गेल्यावर वजन वाढणार नै तर काय होणार?
मग परत एकदा घाम गाळणे आवश्यक. पण इथेच धोका संभवतो.
होते काय की माणुस व्यायाम करु लागतो. परिणामी चरबी कमीही होऊ लागते. पण शरिराची अंतर्गत कार्यप्रणाली असा "ग्रह करुन घेते" की या माणसास यापुढील काळही अशाच कष्टात घालवावा लागणार आहे, तेव्हा शरीर आधीपेक्षा दुप्पट जोमाने अन्नाचे पचन करुन चरबी साठवू लागते. अन अशा स्थितीत जर आहारावर ताबाच नसेल्,तर वजन कमी होण्या ऐवजी वाढताना दिसते. अशातच व्यायाम थांबविला असेल, तर परिस्थिती अधिकच बिघडते.
सबब, क्रेझ म्हणुन, दुसर्‍याने केलेले पाहिले म्हणुन इर्ष्येने, उगाचच करुन बघावे म्हणुन वा कल्ट म्हणुन व्यायाम करु नये.
स्वतःला नेमक काय पाहिजे, काय कारणाने कसा कसा व्यायाम्/आहार करणार याचे स्वतःच्या प्राप्त जीवनशैली नुसार सुनिश्चित वेळापत्रक आखुन त्याचे तंतोतंत पालन तेव्हाच करावे जेव्हा मनातुन आंतरीक तीव्र इच्छा झाली असेल की हे करावेच. एकदा सुरु केले की खंड पडू देऊ नये. काही कारणाने खंड पडला तरी परत जोमाने सुरु करावे.
हे सर्व करताना इश्वराचे "अधिष्ठान" असो द्यावे. Happy

कुठेही न जाता, घरच्याघरी कुठल्याही इंस्ट्रूमेंट्सशिवाय करता येणार्‍या व्यायामप्रकारांबद्दल ( कोअर बिल्ड, बायकांसाठी ग्लुटस वगैरे ) कोणी लिहिलेले दिसत नाही. अर्थात घरच्याघरी केलेल्या व्यायामप्रकारांना बॉडी बनत नाही, पण एन्ड्युरंस / स्टॅमिना मात्र खूप वाढतो.

मी स्वतःदेखील घरच्याघरीच व्यायाम करतो. त्या प्रकारांवर टाकतो एक लेख Happy

सही पोस्ट लिंबूदादा. केदार लेखाची वाट पाहातोय!
मला पण ते जिम म्हणजे पैसे वाया घालवणं वाटतं.

आपल्या पैशाचं खा. लोकांच्या लोखंडाची उठाठेव करा. आणि त्यांनाच याबद्दल जबरी फी द्या... कैच्याकै! Uhoh

वर ते महागडे व्हे-प्रोटीन्स अन अजून काय काय आपल्याच पैशाने... नाय बा पटत.

केदार , नक्की लिहा.

वर मी अनुने लिहिलेल्या <<<<< भरपूर पैसे चार्ज करणे,सारखे सारखे मानसिक दबाव आणून अॅन्युअल मेंबरशिप घ्यायला लावणे, >>>>> या वाक्याला +1000

मी ही तळवलकर्स जॉइन केले होते . तीन महिन्याची मेंबरशिप होती . तीन महिने संपायला एक दोन आठवडे होते . तेवध्यातच त्यांच मॅम , आता ऑफर आहे , वर्षभराची फीज कमी किमन्तित भरा वगैरे. वैताग यायचा रोजच जिमिंग करुन निघतानाच प्रमोशन ऐकून. हो हो करायचे फक्त . माझी मेंबरशिप संपली तस बाय बाय म्हटल आणि जॉगिंग ट्रैकवर चालण सुरु केलेय सकाळच .

याचा अर्थ जिमिंग वाईट आहे असे नाही.जिमिंगचा फायदाही झालाय. पण आपल्याला नेमकं काय हवे आहे, काय अचिव करायच आहे हे लक्षात घेऊन प्रमोशनला बळी न पड़ता जिमिंग कराव

योकुच्या व्हे प्रोटीन्सशीही सहमत . मला त्या तळवलकर्सच्या ट्रेनरने , डायटीशियनने काय काय पावडर्स सांगितलेल्या. तुम्ही हेच खा ते खा .मी साफ़ शब्दात नकार दिला. आणि रेग्युलर चौरस आहार घेण चालू ठेवल .

इनफॅक्ट मसल बिल्ड करायचे असतील तर प्रोटिन पावडर, शेक हे वरून घ्यावे लागतात. भरपूर व्यायाम केल्यावर मसल्सला असे शेक मिळणे गरजेचे असते.

हाय इंटेंसिटी इंटर्व्हल्स नंतर मी देखील प्रोटिन पावडर पाण्यात घालून घेतो. सध्या मसल ब्लेझचे घेतोय. पण मला हॅमरचे आवडले. ते भारतात मिळत नाही. GN चे पण चांगले आहे.

आणि व्यायाम / क्रिडाप्रकार करायच्या आधी खाणेही जरूरी असते. ज्यांना वजनच कमी करायचे असते त्यांनी हाय इंटेसिटी व्यायाम न करता झोन २ ( संदर्भासाठी माझा हार्ट रेट मॉनिटरचा लेख) व्यायाम खूप वेळ करावा म्हणजे त्यातून कार्ब आणि फॅट कन्झुम होतील त्या लेखात मी शरीरातील इनर्जी सिस्टिम्स देखील लिहिल्या आहेत.

शेक मिळण् गरजेच् आहे हे मान्य . पण नेमकी कोणती पावडर घ्यायची हे कस ठरवणार ? बर त्या जिमिंगवाल्यांना टार्गेट्स पूर्ण करायची असतात म्हणून ते गळ्यात मारायला बघतात. प्रत्येकाच्या प्रकृतिला झेपेलच अस नाही . माझ्या मावशीने या पावडर्स घेऊन पाहिल्या तीन महीने . बंद केल्यानंतर वजन जैसे थे .
त्यामुळे या पावडर्स घेताना डॉक्टर सल्ला घ्यावा हे उत्तम

पावडर वजन कमी करायला? कधी ऐकले नाही. ती लोकं काहीही सांगू शकतात हे खरे.

मी मात्र केवळ व्हे प्रोटिन बद्दल लिहितोय. पोस्ट व्यायाम, रिकव्हरी ड्रिंक म्हणून चांगले असतात.

आहारशास्त्राचं ज्ञान, डॉक्टरांपेक्षा न्युट्रिशनिस्टना जास्त असतं.
निदान असायला तरी हवं.

अर्थात टार्गेट पूर्ण करणे म्हणुन मागे लागणे / मार्केटिंग हा प्रकार असतोच. तसं असेल तर
बाहेरच्या / जे पूर्णवेळ न्युट्रिशनचे काम करतात त्यांच्याकडुन सल्ला घेणं उचित.

केदार व्हे प्रोटिन केव्हा घेणं उचित आणि साधारण प्रकृतीच्या व्यक्तीनं एका वेळेस किती घ्यावं?

हो केदार , माझ्या मावशीने केलेला प्रयोग . ती आणि तिची मैत्रीण . कसलीतरी प्रोटीनची प्रोटिक म्हणून पावडर होती. ती दुधात मिसळून प्यायची म्हणे . वजन तर काय कमी झालच नाही उलट 20000 ची फोडणी खिशाला बसली. कसल गुळमट लागत ते. एकदा चमच्याने चाखून पाहिलेल

मानव पृथ्वीकर , बरोबर ! डॉक्टरांऐवजी न्यूट्रीशियन / डायटिशिन शब्द योग्य आहे

ते तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. उदा तुम्ही १० किमी चालला असाल तर अजिबात गरज नाही. पण तुम्ही १० किमी धावत असाल तर रिकव्हरी लवकर व्हावी म्हणून प्रोटिन शेक / पावडर घ्याल तर दिवसभर एकदम थकल्यासारखे वाटणार नाही. जनरली २५० मिली ( एक स्टीलचा ग्लास) पाण्यात २ चमचे ( त्या डब्यात येणारा) मिसळवून घ्यावे.

(तसेच तुम्ही १० किमी सायकल चालवली तर गरज नाही पण ५० किमी चालवली तर नक्कीच उपयोगी.)

थोडक्यात इंटेसिटी महत्त्वाची. जिम मध्ये रिगरस ४० मिनिटे घातली तर नक्कीच उपयोगी, पण तिथे जाऊन लाईन लावून केवळ २० मिनिटेच व्यायाम केला तर ( जो खरे तर वॉर्म अप टाईम होऊ शकतो) मग गरज नाही.

तुमच्या डॉक्टरांपेक्षा आहारतज्ञाच्या पोस्टला सहमत. सहसा डॉक्टरांना स्पोर्ट्स मधले काहीही कळत नसते. ४ वर्षापूर्वी देशात आल्यावर मी अनेक सो कॉल्ड्स स्पोर्ट्स डॉक्टरांना भेटलो. विक मध्ये सायकलवर माझी रेग्युलर चक्कर ३५ ते ४० किमी असते आणि विकेंडला ८०-१०० असे म्हणल्यावर त्यांनी सायकलींग १० किमी करा असा सल्ला दिला. तो मी माणला असता, तर कधीही आज सायकलीच्या ज्या फिटनेस मध्ये आहे तेवढा राहू शकलो नसतो.

Pages