एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chloroquine prevents the development of malaria parasites in the blood. Proud

माझ्या मुलीने रचलेली नव्वी कोर्री चारोळी..

झिंग चिका झिंग चिका झिंगा..
दु:ख घाली आमच्या दारी पिंगा...
एल्दुगोला कुणी आता संपवा..
करा आमची जाचातुन सुटका..
झिंग चिका झिंग चिका झिंगा..

Proud

आज आपली मराठीवर ही मालिका आल्यावर काहीवेळाने ऑडीओ गंडला होता म्हणून काही ऐकू आले नाही (त्यामुळे काही बिघडलेही नाही म्हणा!). जेवढे ऐकू आले ते पुरेसे होते. आज मी पाहिला प्रसंग म्हणजे राधा आणि तिच्या बॉसमधला. कित्ती कित्ती दिवसांनी ही हसताना पाहून मला धन्य झाले. बाकी शेवटी काही ऐकू आले नाही पण घनाचा चेहरा विचित्र दिसत होता. दोनजण सायकलवरून जाताना दिसले. एकाच गोष्टीचं जरा वाट्टय की शेवटपर्यंत कुहूचे कपडे तेच ते!

घनाचं मत परिवर्तन झालेलं दाखवायला जास्त वेळ दिला गेला नाही असं माझं मत. त्यामानाने राधाला बरेच प्रसंग आणि बरेच दिवस मिळाले Happy . आता शेवटी घना काय निर्णय घेणार हे माहित्ये. पण तो निर्णय त्याने राधावरच्या प्रेमामुळे न घेता , तिची झालेली सवय / तिने मन मोकळं केलंच आहे, त्यामुळे त्याला वाटणार्‍या अपराधीपणातून घेतल्यासारखं दिसेल ( असं मला तरी वाटतं. Proud )

प्रतिक्रिया सुंदर आहेत. मालिका न बघता मायबोली वाचत बसावे. "एका लग्नाची" व " अग्निहोत्र दोन्ही मालिका सरा नी खरेच थोडक्या मोहापायी घालवल्या.

कालच्या भागात घनाला अमेरिकेला न पाठवण्याची त्याच्या बॉसले दिलेली कारणं ऐकून कान धन्य झाले. धन्य तो बॉस आणि धन्य ती कंपनी!!!

कालच्या भागात घनाला अमेरिकेला न पाठवण्याची त्याच्या बॉसले दिलेली कारणं ऐकून कान धन्य झाले. धन्य तो बॉस आणि धन्य ती कंपनी!!!>> + १००००००००००
मॅरीड माणुस सगळे पैसे देशात पाठवणार, सगळा वेळ फोन करण्यात घालवणार म्हणुन मॅरिड माणुस नको Uhoh
अरे सॉ ई. आहे का सैनिक आहे. सैनिकाला, पोलिसाला सुद्धा लग्न करता येते
इथे वर्क लाईफ बॅलन्स वर सेमिनार झडतायेत आणि हे कोणत्या जगात आहेत?
कै च्या कै Sad कोणी लिहिलेत हे डाय्लॉग ????

इथे वर्क लाईफ बॅलन्स वर सेमिनार झडतायेत आणि हे कोणत्या जगात आहेत?
कै च्या कै कोणी लिहिलेत हे डाय्लॉग
>>> +१

मॅरीड माणुस सगळे पैसे देशात पाठवणार, सगळा वेळ फोन करण्यात घालवणार म्हणुन मॅरिड माणुस नको
अरे सॉ ई. आहे का सैनिक आहे. सैनिकाला, पोलिसाला सुद्धा लग्न करता येते
इथे वर्क लाईफ बॅलन्स वर सेमिनार झडतायेत आणि हे कोणत्या जगात आहेत?
>>>>>>>> +१००००००००

कोणत्याही कारणाने घनाला अमेरिकेला पाठवायचं नसतं तर ही असली फाल्तू आणि unrealistic कारणं देण्यापेक्षा फक्त visa stamping ला पाठवलेला दाखवायचं होतं. आपसूकच त्याचा visa reject झाल्याचं दाखवता आलं असतं आणि ते realistic सुद्धा वाटलं असतं ........ Happy

अरे,
थोडक्यात त्यांना, लग्नाचा घाट घालून घरच्यांना तात्पूरते गप्प बसवून, अमेरिकेला जाणार्‍या घनाला- लग्नामूळेच अमेरिका हूकवलेली दाखवायचे आहे... मग थातूर मातूर कारणांची खैरात आहे. मूळात 'घनाचे ओव्हर्व्हेल्मिंग अमेरिका ड्रीम' ह्या संपूर्ण मालिकेतच unrealistic आहे की! Happy

आपसूकच त्याचा visa reject झाल्याचं दाखवता आलं असतं आणि ते realistic सुद्धा वाटलं असतं ........ >>> +१
तेच ना .... काहिही खपवत आहेत .....

अनायसे पावसाळा आहे ओता पाणी

साधना, तुझी लेक सही आहे. Proud कुठली सॉफ्टवेअर कंपनी सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांसाठी मानसोपचार तज्ञ नेमते? हा काय टेररिस्ट्सना इन्टरॉगेट करणारं सॉफ्टवेअर बनवणार आहे का? का वेड्याच्या इस्पितळासाठी हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सिस्टिम बनवतोय? बरं तो मॅरीड आहे म्हणून त्याला रिजेक्ट केलं तर आधी कन्सिडरच का केलं? तेव्हा त्याचं लग्न झालं होतंच की.

सर्वात महत्त्वाचा प्रश्नः घना काम नक्की काय करतो? बॉसच्या केबिनमध्ये जाऊन बसण्याखेरीज तो अन्य काही करताना दिसत नाही. आणि सगळ्यांपेक्षा त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे? ये क्या हो रहा है?

ज्या अन् मॅरीड निलेशला पाठवणार आहेत त्याने काय जन्मभर अविवाहित राहीन असा कंपनीला बाँड लिहुन दिला आहे का?

संपदा + १.
ह्या गोष्टीचा जीव छोटा आहे. फोकस मुख्य पात्रांवर ठेवून वेळ घालवला असता ( संपदा म्हणते तसं घनाची मनस्थिती उलगडणारे प्रसंग ) तर मालिकेत तोचतोपणा आला असता पण ती भरकटली तरी नसती.
संवादांपेक्षा ह्या मालिकेची पटकथा भयाण गंडलेली आहे. 'तू तिथे मी' करता करता मांडलेकर बुवांनी इकडे पाट्या टाकलेल्या आहेत.

पण 'तू तिथे मी' मध्ये तरि कुठे दिवे लावले आहेत .... मला सध्या बघावी लागत आहे .... अशक्य गोष्टी आहेत त्यात ...

'हे बघ आपलं अमेरिकेतलं ऑफिस' असं बॉसने म्हटल्यावर काय तो घनाचा चेहेरा. असं वाटलं की स्क्रीनमधून आत्ताच जातोय का काय आत. काय सोमालियात आहे का सध्या हा माणूस? भारत एव्हढाही वाईट नाहिये. Angry

अवना, 'तू तिथे मी' विकृत आहे. सुरुवातीचे काही एपिसोड्स बघितले पण त्यानंतर कधीच नाही. शक्यच नाहीये बघणं.

नमस्कार, आजची एकच ठळक बातमी:

आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार नायगारा धबधबा अचानक कोसळण्याचा थांबल्याने अमेरिकेत सर्वत्र खळबळ माजली आहे. स्वातंत्र्यदेवतेच्या हातातील ज्योतही विझली असून माऊन्ट रशमोअर वरील सर्व प्रेसिडेन्टसचे चेहरे काळजीने काळवंडले आहेत. २०१२ मध्ये जगाचा अंत होणार ह्याची ही नांदी तर नव्हे ह्या शंकेने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. प्रेसिडेन्ट ओबामांनी शांतता, तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.

ओबामा ह्यांचे एक विशेष सल्लागार स.दा. मायबोलीवर ह्यांनी डगमगून न जाता नेटाने तपास केला असता भारतातील श्रीयुत घन:श्याम काळे ह्याना अमेरिकेला जायची संधी कंपनीतर्फे नाकारण्यात आल्याने निसर्गाचा कोप झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी त्वरेने ही बाब प्रेसिडेन्ट ओबामांच्या कानी घातली. प्रेसिडेन्ट ओबामा तसेच सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन ह्यांनी भारतात त्वरेने फोन करून पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्याजवळ तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ह्या प्रकरणी जातीने लक्ष घालून तातडीने कारवाई करायची विनंती केली आहे असं समजतं.

मराठी माणसावर झालेल्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी शिवाजीपार्कच्या डाव्या भागात शिवसेना तर उजव्या भागात मनसे ने आंदोलन छेडण्याची सुरुवात केली आहे. अण्णा हजारे आझाद मैदानावर तर बाबा राम्देव जंतरमंतरवर उपोषणास बसणार असल्याचंही बोललं जात आहे. इराणचे प्रेसिडेन्ट अहमादिनेजाद तसेच ज्युलियन असांज ह्यांना आश्रय देणारं इक्काडॉरचं सरकार ह्यांनीही श्रीयुत घन:श्याम काळे ह्याना आश्रय देण्याची तयारी दर्शवली आहे.

एफबीआय, सीआयए वगैरेंना जे जमलं नाही ते एका मर्‍हाटी माणसाने करून दाखवल्याने समस्त मराठी लोकांची मान ताठ झाली आहे. "स.दा. मायबोलीवर ह्यांचं करावं तेव्हढं कौतुक थोडंच आहे. आज सह्याद्री धन्य झाला' ह्या शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी त्यांचं कौतुक केलं.

रात्री उशीरापर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आल्याचा दावा मनमोहन सिंग सरकारनं केला असून श्रीयुत घन:श्याम काळे ह्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करता न आल्याचं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं.

घनाला अमेरिकेला जायचंय हे खरंतर मालिकेच्या सुरुवातीपासूनच दाखवलं गेलंय. संवाद लिहिताना सॉफ्टवेअर फील्डचा जरा तरी अभ्यास करून / त्याविषयी थोडी विचारपूस करून / माहिती जमा करून मनःस्विनी लता रविंद्रने संवाद लिहिले असते तर ते आत्तासारखे हास्यास्पद झाले नसते. हे फील्ड सोडता पूर्ण मालिकेतले तिने लिहिलेले बरेचसे संवाद उत्तम असतात . एकूण काय तर मालिका आणि त्यातली पात्रे आवडत असल्यानेच एव्हढा विचार केला जातो. Happy

अवना, 'तू तिथे मी' विकृत आहे. सुरुवातीचे काही एपिसोड्स बघितले पण त्यानंतर कधीच नाही. शक्यच नाहीये बघणं.
>>>>>>>> +१

Pages