एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा भाग मला दिसला नाही ते बरच झालं असं वाट्टय!
एलदुगोवाले दर थोड्या दिवसांनी सगळ्या पात्रांनी एकमेकाशी संवादायची परम्युटेशन्स झाली का हे तपासतात. मग एकदम, "अरे अरे! राधा आणि देवकीमातेच काही बोलणं गेल्या साडेसत्तावीस तासांत झालेलच नाहीये, लिहा संवाद आणी येऊ द्या डोळ्यांना पूर!" असं करतात. बरं झालं स्वप्नाच्या प्रतिसादामुळं आजचा वेळ वाचला. Wink

आजच्या एपिसोडमधल्या तसच आजच्या ईथल्या मा.बो.वरच्या घडामोडींबद्दल काहीही स्वारस्य वाटत नाहीय आज.

विवेक लागुच्या भाषेत मांडायच झाल तर

देवानांच ऋषिणांच गुरुं कांचन संन्निभं । बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं |
देवानांच ऋषिणांच गुरुं कांचन संन्निभं । बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं |

Happy

आजच्या एपिसोडमधल्या तसच आजच्या ईथल्या मा.बो.वरच्या घडामोडींबद्दल काहीही स्वारस्य वाटत नाहीय आज.

अगदी अगदी....

सरा नावाला जागला शेवटी, आपला लौकिक राखला त्याने, प्रत्येक मालिका एका ठराविक उंचीवर न्यायची, प्रेक्षकांच्या अपेक्षा त्याहीपेक्षा उंच कशा जातील ते पाहायचे आणि मग द्यायचे ढकलुन मालिकेला... मुकी बिचारी जा गडगडत.. लोक बघतील तु कसा रसातळ गाठ्तेस ते..

राधाच्या कॅरॅक्टरला जेवढ्या कोलांट्या मारायला लागल्या तेवढ्या दुस-या कोणी मारल्या नसतील. घरी गेली काय, परत परतुन आली काय आणि घनाच्या गालावरुन हात फिरवते काय.. कुठुन कुठे पोचले ते कॅरॅक्टर...

काल तर वैताग आला. तो पेनड्राइव आता पुर्ण घरात फिरेल आणि सगळ्यात शेवटी स्गळ्यांच्या समोर घनाच्या हातात जाईल आणि तो सर्वांसमोर त्याच्यातला मजकुर ऐकेल.. राधाने त्याच्या मोबाईलशेजारीही जरी तो ठेवला असता तरी घनाला मिळाला असता. तिने कुहूसारख्या प्रचंड मॅच्युअर, जबाबदारीने वागणा-या मुलीच्या हाती तो विश्वासाने दिला तेव्हाच त्याचा पुढचा प्रवास मुर्क्रर झाला. असो, मालिकेत एकदा नळ सोडायचा हे ठरवले की असे सगळे करावेच लागते. पर्याय नाही. (काल कधी नव्हे ते मला कधी एकदाचे ९ वाजताहेत आणि दीया बाती सुरू होतेय असे झाले. काय दिवस आलेत. दीयाबाती एलदुगोपेक्षा जास्त मनोरंजक वाटायला लागली Sad )

आता २६ चा एपिसोड येईपर्यंत किती पाणी पडणार आहे हेच पाहायचे. जे काही घडेल ते २६ ला घडेल,. २७ पासुन सासु हवी असलेल्या मुलीच्या कथा ज्यांना पाहायची त्यांनी पहा.. आमचा गुडबाय.... टिवीला... सध्यातरी....

ओहो, ते पेन ड्राईव्हचं काय प्रकरण आहे? काल माऊली हाती घेऊन तो निरखत होती. पण आजकाल आम्ही मालिकेचा बराचसा भाग म्यूट करून किंवा लो व्हॉल्यूम वर पहातो त्यामुळे संदर्भ लागला नाही.

आता २६ चा एपिसोड येईपर्यंत किती पाणी पडणार आहे हेच पाहायचे. जे काही घडेल ते २६ ला घडेल : २५ला हो. २६ला रविवार आहे.
राधाने घनासाठी एक संदेश ध्वनिमुद्रित करून त्या पेन ड्राइव्ह मध्ये ठेवला आहे.
बाकी राधाचा अगदी पायपोस करून टाकलाय. "तू काय निर्णय घेणार त्यावर माझा निर्णय ठरणार." म्हणजे घनाने लग्न कंटिन्यू करायचे ठरवले तर ही डिसकंटिन्यू करणार की त्याने डायव्होर्स मागितला तर तो देऊन त्याला घराबाहेर काढणार?

>>राधाने घनासाठी एक संदेश ध्वनिमुद्रित करून त्या पेन ड्राइव्ह मध्ये ठेवला आहे.

पण घना तो ऐकणार तरी कधी? तो तर नेहमी लॅपटॉप उघडून दाणकन बंद करतो नुस्ता. Proud मला वाटतं फक्त गुरु, शुक्र आणि शनि ह्या दिवशीच काय व्हायचं ते होईल.

सोमवार ते शनिवार असे सहा दिवस मालिकेतल्या एकाच दिवसाचे दर्शन होईल (का?)
मॅच वाचवायची (ड्रॉ करायची) असली की वेळ काढायच्या युक्त्या शोधल्या जातात, की कसेही करून एवढे शेवटचे मँडेटरी ओव्हर्स तटवून काढू तशी मालिकेची मदार आता फ्लॅशबॅक्स आणि कुहूवर.

आधीच्या एका भागात दिगंबर वल्लभला म्हणाला की प्रभातची आई 'ती' २०-२५ वर्षांपूर्वीची बीचवरची झुरळवाली मुलगीच असेल तर? लग्न ठरलं तरी विहीणीचे तोंड पाहिले नाही का? मला वाटलं होतं लो बजेटमध्ये विहीण बसत नाही.

निर्माते, मुख्य दिग्दर्शक, पटकथाकार, संवाद लेखिका या सगळ्यांना एका खोलीत बंद करून मालिकेचे सगळे भाग सलग बघायला लावले पाहिजेत.

मला या मालिकेतल्या अभिनेत्यांची दया यायला लागलीय.

मला या मालिकेतल्या अभिनेत्यांची दया यायला लागलीय.

या वाक्याला खो खो हसणारी बाहुली टाकावी की धो धो रडणारी बाहुली टाकावी हे न कळल्याने मी गोंधळलेली बाहुली टाकत आहे.

'एक रुका हुआ फैसला'
>>>
Rofl Lol

या वाक्याला खो खो हसणारी बाहुली टाकावी की धो धो रडणारी बाहुली टाकावी हे न कळल्याने मी गोंधळलेली बाहुली टाकत आहे.
>>
अनुमोदन Lol

पेन ड्राइव तोंडासमोर धरून त्यात रेकॉर्ड कसे करायचे? त्या दिवशी राधा तसेच काही तरी करत होती.

आता अगदी फिल्मी शेवट करणार का सरा? म्हणजे घना 'तो डिसर्व करत असलेल्या' अमेरीकेला जायला विमानात बसणार. उगाच तो एसर चा लॅपटॉप उघडून (एवढा आपटून टिकणारा लॅपटॉप एसरचाच असतो असं रणबीर कपूर सांगतात) पेन ड्राइव वापरणार मग त्याला राधाचा निरोप मिळणार मग तो चालू झालेले विमान थांबवून पळत सुटणार राधाकडे जायला!

देवा तूच वाचव रे आता!

पेन ड्राइव तोंडासमोर धरून त्यात रेकॉर्ड कसे करायचे? त्या दिवशी राधा तसेच काही तरी करत होती.

तिने मोबाईल वापरुन रेकॉर्ड केले आणि मग ते पेड्रामध्ये सेव केले. एका खोलीत राहुनही बिचारीला हे करावे लागले. त्याच्या गालावरुन हात फिरवत होती तेव्हाच त्याच्या हातात एक पत्र लिहुन चिकटवले असते तरी चालले असते. आणि कहर म्हणजे तिने जे काही सेव केलेय ते एका प्रसंगात बोलुन झालेय आणि काल घनाला ते आठवलेही. त्यामुळे पेड्राचा उपयोग पाणी वाढवणे यापलिकडे केला जाणार नाही.

एक रुकरुक के चलनेसे फसा हुवा फैसला - जास्त चांगले आहे Happy

काल राधा 'घना अजुन झोपलाय' म्हटल्यावर देवकीकाकू काय लाजत होत्या. त्यांनी 'डोळ्यावर कातडेच ओढायचे, धडधडीत जे समोर दिसतेय ते नाकारायचे' असेच ठरवलेय काय?? त्यांना दिवसभर राधा नी घना एकमेकांच्या प्रेमात ठार बुडाल्याचेच दिसते फक्त...

>> त्याच्या गालावरुन हात फिरवत होती तेव्हाच त्याच्या हातात एक पत्र लिहुन चिकटवले असते तरी चालले असते.

एव्हढं होऊनही ठोंब्या झोपला होता? माणूस आहे का दगड? इथे आम्हाला आमच्याच केसाची बट आमच्याच चेहेर्‍यावर आली तर जाग येते. धन्य आहे!

>> काल राधा 'घना अजुन झोपलाय' म्हटल्यावर देवकीकाकू काय लाजत होत्या.

ही बाई अशक्य आहे. पिकल्या पानाचा रंग बराच हिरवा आहे. केव्हढं ते क्लोरोफिल आहे त्यात Happy बिच्चारे घनाचे बाबा! म्हणून दिवसभर स्तोत्र म्हणत असतात. त्यांना 'डाबरका केसरी जीवन' ची अ‍ॅड करायला का सांगत नाहीत?

त्यांना 'डाबरका केसरी जीवन' ची अ‍ॅड करायला का सांगत नाहीत? >> त्यांनी अ‍ॅड केलेले कुठलिही गोष्ट लोक वापरतील? तुझा आशावाद दुर्दम्य आहे स्वप्ना Happy

प्रसन्न, स्वप्ना, हसून फुटले, द्वाड मुले आहात तुम्ही.

अचानकच मला ते दोघे एकत्र येण्यातलाच इंट्रेस्ट गेला आहे.

त्यांना 'डाबरका केसरी जीवन' ची अ‍ॅड करायला का सांगत नाहीत? >>

चेहर्‍यावर नेहमी धौती योग चूर्ण घेतल्यासारखे भाव असतात त्यांच्या....... Happy

आगाऊ....

Chlorophyll gives leaves their green color and absorbs light that is used in photosynthesis.

Pages