Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्नील जोशीचा अभिनय खूपच
स्वप्नील जोशीचा अभिनय खूपच खालावत गेलाय
त्या पीसी च्या स्क्रीन समोर किती मट्ठ तोंड करून बघत होता
react पण निट करत नाही कोणाच्याही बोलण्यावर ,
मुक्ताच्या अभिनयापुढे तर तो खूपच down वाटतो
स्वप्ना
स्वप्ना
>>त्या पीसी च्या स्क्रीन समोर
>>त्या पीसी च्या स्क्रीन समोर किती मट्ठ तोंड करून बघत होता
त्या अवस्थेला बहुधा 'तूर्यावस्था' म्हणत असावेत
अमेरिकेतलं ऑफिस नुस्तं पाहून त्याला निर्वाणपद प्राप्त झालं
काल राधाला तिच्या बॉससमोर
काल राधाला तिच्या बॉससमोर हनीमूनबद्दल बोलताना बघून संताप झाला
राधाला अजून का आशा वाटतेय? म्हणजे घना तसा अजिबातच वागत नाहिये. आणि हि चक्क हनिमूनची स्वप्नं बघतेय. हाईट आहे . आता हि मालिका बघणं बंदच करावं. बाकि ,गुं हृ हे आणि ह्या मालिकेत हे दाखवलय कि नायकाने कसहि वागलं तरी नायिकेने सती सावित्रीपणा सोडायचा नाहि. नायक हज्जारदा नायिकेचा अपमान करणार तरी हि त्याच्याच पाठी. 
मी ह्या गोष्टीबद्दल त्रागा
मी ह्या गोष्टीबद्दल त्रागा करायचं सोडून दिलंय. अति झालं आणि हसू आलं अश्यातली गत झाली आहे. अशी स्टोरी एका स्त्रीलेखिकेने लिहावी हे दुर्देव
तूर्यावस्था' ख्या ख्या ख्या
तूर्यावस्था'
ख्या ख्या ख्या
लोक्स म्हणूनच मी लिव्हलं आहे
लोक्स म्हणूनच मी लिव्हलं आहे कि स्त्री प्रतिमा बदललेली नाही. तीच आहे. रीड माय लेख प्लीज.
मामी, जगाच्या सुरुवातीपासून
मामी, जगाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहाणार्या दोनच गोष्टी - झुरळ आणि स्त्रीची प्रतिमा
स्त्रीची प्रतिमा हे दाखवतात
स्त्रीची प्रतिमा
हे दाखवतात त्याबद्दल काय म्हणायचं
(संदर्भ लोकप्रभेतला लेख )
http://www.lokprabha.com/20120817/coverstory-02.htm
घरातील सुनेनं एखादी चूक केलीय किंवा आपला अपमान केलाय असं वाटलं की तिचा हात उकळत्या पाण्यात बुचकळायचा, घरातील आणखी कुणाचं कारस्थान उघडकीला आलं की त्या व्यक्तीला व्हीलचेअरवर बसवून जिन्यावरून ढकलून द्यायचं, घरातल्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या कुणा गर्भवती स्त्रीचा नायनाट करायचा असेल तर पुस्तकाच्या पानांना विष लावून ठेवायचं आणि हा प्रकार उघडकीला आला की घरातल्या कर्त्यां म्हणवणाऱ्या स्त्रीनं शिक्षा म्हणून संबंधित महिलांना पुस्तकाची पानं गिळायला लावायची, कधी आई आणि मुलीला शिक्षा म्हणून एकमेकीच्या थोबाडीत न थांबता मारत राहायला सांगायचं.. कसं वाटतं हे सगळं? मराठी संस्कृती, संस्कृती म्हणतो ती हीच ना? मराठी घराघरातील वास्तव हेच आहे का? सध्या वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवरून ज्या मालिका प्रसारित होताहेत त्यातील दृश्यं पाहिली की मराठी संस्कृतीत एवढं क्रौर्य कधीपासून आलं, या संस्कृतीला तालिबानी वळण कधीपासून लागलं यांसारखे प्रश्न मनात घोंघावायला लागतात.
अशी स्टोरी एका स्त्रीलेखिकेने
अशी स्टोरी एका स्त्रीलेखिकेने लिहावी हे दुर्देव
>>> ही कथा श्रीरंग गोडबोले ह्यांची आहे, पटकथा चिन्मय मांडलेकर. मनस्विनी फक्त संवाद लिहिते. सॉफ्टवेअर बद्दल अजून अभ्यास करुन संवाद लिहिता आले असते हे मान्य पण मुळात ह्या प्रसंगात राधा घनाविषयी भावूक होऊन बोलेल, प्रेमात शरणागती पत्करेल असंच सांगितलं तर राधाचा बाणेदारपणा दाखवायला फार स्कोप उरतोच कुठे ?
>>कधी आई आणि मुलीला शिक्षा
>>कधी आई आणि मुलीला शिक्षा म्हणून एकमेकीच्या थोबाडीत न थांबता मारत राहायला सांगायचं..
हे 'दिल्या घरी' मधलं आहे. मी ह्याबाबत झीकडे मेल करून तक्रार केली होती आणि सीसी http://ibfindia.com ला पाठवली होती.
३ दिवसात २५० पोस्टी पडणार
३ दिवसात २५० पोस्टी पडणार काय?
हा धागा २००० पोस्टींचा विक्रम गाठणार काय?
स्त्रीने स्वतंत्र अस्तित्व
स्त्रीने स्वतंत्र अस्तित्व दाखवले तर तिला व्हिलन ठरवुन मोकळे होतात ... त्या राधाला पण म्हणून त्याच लाइन वर आणले....
'तू तिथे मी' विकृत
'तू तिथे मी' विकृत आहे.>>>+१०००००....
३ दिवसात २५० पोस्टी पडणार
३ दिवसात २५० पोस्टी पडणार काय?
हा धागा २००० पोस्टींचा विक्रम गाठणार काय?
>>>>
पोष्टींची संख्या पाहता ह्या मालिकेचा टी आर पी ध्यानी येतो!
शिव्या घालूनही किती आवडीने पहातात!! तसेही पहाण्यासारख्या मालिकाही नाहीत त्या यडपट पेटीवर... आम्हा सारखे यडपट प्रेक्षक पहाणार तरी काय?
३ दिवसात २५० पोस्टी पडणार
३ दिवसात २५० पोस्टी पडणार काय?
हा धागा २००० पोस्टींचा विक्रम गाठणार काय? >>
अगदी माझ्या मनातलं बोललीस.
'तू तिथे मी' विकृत
'तू तिथे मी' विकृत आहे.>>>+१०००००....+१००००००००००००००००००००
हो कितीहि शिव्या घातल्या तरि,
हो कितीहि शिव्या घातल्या तरि, हे हि खरेच कि ती एकच मालिका बघण्यासारखी आहे ...
स्वपना ते सगळं 'पुढचं पाऊल'
स्वपना ते सगळं 'पुढचं पाऊल' मध्येपण झालयं विष लावणंअ, थोबाडीत मारणे.. ई..
हो कितीहि शिव्या घातल्या तरि,
हो कितीहि शिव्या घातल्या तरि, हे हि खरेच कि ती एकच मालिका बघण्यासारखी आहे ...
>>>
एडिट कर ते वाक्य
कितीही शिव्या घातल्या तरी हे खरेच की ती एकच मालिका बघण्यासारखी होती
ती एकच मालिका बघण्यासारखी
ती एकच मालिका बघण्यासारखी होती>>>
अजुन ३ दिवसांचे पाणी शिल्लक आहे
कृष्णा दादा आय मीन ती एकच
कृष्णा दादा आय मीन ती एकच मालिका पुर्वी पहाण्यासारखीहोती आता ती ही राहिली नाहीये
आपण स्त्रीलेखिका आणि पुरुष
आपण स्त्रीलेखिका आणि पुरुष लेखिका असा भेद मानता काय ?
मानतो ना, भारतात पुरुषांना
मानतो ना, भारतात पुरुषांना स्त्रियांची दु:खं कळत असतील असं वाटत नाहिये आजकाल जे चाललंय त्यावरून. तुम्हाला कळत असतील तर तुम्ही नियमास अपवाद असाल.
स्व्प्ना कोणत्या देशातल्या
स्व्प्ना कोणत्या देशातल्या पुरुषांना कळतात स्त्रियांची दु:खं???????? घनाला पाठऊ आपण त्या देशात
रीया ... तुझा सात्विक संताप
रीया
... तुझा सात्विक संताप दिसत आहे ... हत्ती गेला शेपुट रहिले आहे
जरुर माना. मी फक्त
जरुर माना.
मी फक्त स्त्रीलेखिका आणि पुरुषलेखक असाच भेद मानतो. 
पुरुष लेखिका असा भेद मानता
पुरुष लेखिका असा भेद मानता काय ?>>> बाबु,
कंटाळा आला राव.......
कंटाळा आला राव.......
भारतात पुरुषांना स्त्रियांची
भारतात पुरुषांना स्त्रियांची दु:खं कळत असतील असं वाटत नाहिये
>>>>>>>>>>>>>>>>>>>
मग काय "पैठणी" आणि "भांडा सौख्यभरे" उगाच चाललय का वर्षानुवर्षे
इतर कोणाला न कळोत पण भाओजी आदेश बांदेकर आणि प्रसाद ओक यांना स्त्रियांची (उंबरठ्याबाहेरच्या :डोमा:) दु:खेच कळतात....
Pages