अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

Submitted by मी-भास्कर on 31 July, 2012 - 03:36

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा विविध १०० अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.
Anna and corruption.jpg

आदरणीय अण्णा,
सादर दंडवत.
एक समर्थक या नात्याने हे पत्र.
कोणत्याही सत्तेला एक व्यवस्था चालवावी लागते. लोकशाही मार्गाने सत्ताप्रदान हा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. सत्तेचा कल कॆंद्रीकरणाकडेच असतो. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि अनिर्बंध सत्ता संपूर्ण भ्रष्ट करते. सत्तेतील माणसे भ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी चांगली घटना, कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असते. आपल्या लोकशाही-व्यवस्थेत मुख्य सत्ता सत्तारूढ पक्षाकडे एकवटली आहे. विरोधी पक्ष स्वच्छ, जागरूक व प्रबळ असेल तर तो सत्तेवर अंकुश ठेवू शकतो. आपल्या इथे या सर्वांचे तीन तेरा वाजल्याने एक फार अवघड लढाई आपल्याला या वयात हाती घ्यावी लागली आहे.
भ्रष्ट व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा अती बलिष्ट वर्गाशी हा संघर्ष आहे. यांच्याच आश्रयाला असलेला वर्गही प्रचंड संख्येने आहे. ही ताकदच संसदेत कोण जाणार हे ठरवते. याच व्यवस्थेने सर्वसामान्यांनाही इच्छा असो वा नसो भ्रष्टाचाराची सवय लावली आहे. किंबहुना असे म्हणता येईल की जवळपास प्रत्येक जण ( खर्‍या अर्थाने भ्रष्ट नसला तरी ) कोणत्या ना कोणत्या कारणाने भ्रष्ट ठरविला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कोणत्याही पाठिराख्याला ’भ्रष्टाचारी’ म्हणून ’अंदर’ करून बदनाम करणे सत्तेला सहज शक्य आहे. त्यामुळे शक्तीच्या दृष्टीने ही अगदी विषम लढाईआहे.
अंतीमतः पुरेशा संख्याबळाने तुमचे समर्थक संसदेत असल्याशिवाय भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी आवश्यक ते बदल होऊच शकत नाहीत. पाठीशी असणारे संख्याबळ जास्तीत जास्त वाढवणे हेच फक्त तुमच्या हाती आहे. सरतेशेवटी विरोधकांना निवडणुकीत पराभूत करून चळवळीच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी संख्याबळ हवेच. तुमची ही शक्ती वाढूच नये याची पूर्ण खबरदारी तुमचे विरोधक घेताहेत आणि आपण त्यांच्या सापळ्यात नकळत अडकता असे आम्हाला वाटते.
तुमच्या मागे अल्पसंख्य व दलीत नाहीत असे आरोप केले की तुमची टीम इमेज क्रिएशनच्या मागे आपली शक्ती वाया घालविते. तुमच्या मागे संघ आहे म्हटले की तो कसा नाही हे सांगण्यासाठी आटापिटा केला जातो. आता उद्या तुमच्यात आदिवासी कोठे आहेत असे म्हटले की पुन्हा शक्तिव्यय. हे सर्व करतांना आपला शक्तीव्यय तर होतोच पण संख्याबळही वाढत नाही, असे आपल्याला वाटत नाही का? अगदी ताजे उदाहरण रामदेवबाबा आणी मोदी भेटीचे आहे. तुमचे विरोधक या भेटीबाबत आक्षेप घेऊन जुनेच 'डिव्हाईड अँड काँकर' चे तंत्र वापरत आहेत. उद्या कोणी आदिवासी नेता तुम्हाला पाठींबा द्यायला आला तर ते त्याला माओवादीही ठरवतील आणि तुमची देशद्रोह्यांशी हातमिळवणी आहे असे म्हणतील. मग पुन्हा शक्तिव्यय! असे असूनही आपण त्याच त्या सापळ्यात का अडकतां?
या ठिकाणी चर्चिलचे एक वाक्य आठवते. लढाईची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जाहीर केले की "हिटलरचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी मी सैतानाची मदत घेण्यासही मागेपुढे पाहाणार नाही."
इतक्या टोकाचे जरी नाही तरी -
" भ्रष्टाचाराच्या लढाईत प्रामाणिकपणे साथ देणार्‍या कोणाही भारतीयाची मी मदत घेईन." असे ठणकावून सांगण्यात आपल्याला काय अडचण आहे?
आणिबाणीविरुद्ध लढतांना जयप्रकाशांनी हेच केले होते आणि म्हणून ते जिंकले. त्यामुळे
' दिल्ली तो अभि बहोत दूर है| ' हेच खरे!

16 September, 2012
अण्णा नवी टिम निवडून आंदोलन सुरू करणार असल्याचे वाचले.
या नव्या टीमच्या आंदोलनाचा मागोवा घ्यायचा आहे खालील धाग्यावर :
http://www.maayboli.com/node/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी भास्कर, बाळू जोशी आणि इब्लीस

गाडी पूर्वपदावर आणल्याबद्दल धन्यवाद. इतरांकडे दुर्लक्ष करूयात. इथे आपले दृष्टीकोण भिन्न होताहेत आणि ते होणारच. मी कामं हातावेगळी झाली कि निवांतपणे पाहतो.

मी भास्कर

राळेगणसिद्धीला अण्णा लष्करातून निवूत्ती घेतल्यावर स्थायिक झाले. गावातलं पाण्याचं दुर्भिक्ष, कत्तलखान्याकडे जाणारी जनावरं आणि दारूचं थैमान यावर त्यांनी काम केलं. पाण्याचं दुर्भिक्ष दूर करण्यासाठी जलसंधारणाचं जे मॉडेल त्यांनी शासनाच्या अधिका-यांना सुचवले त्यातल्या एका अधिका-याला ते आवडल्याने त्याने तो रिपोर्ट बनवून पाठवला. अण्णांना मंत्र्यांच्या भेटीस बोलवण्यात आले. त्यानंतर शासनाची सुत्रं वेगाने फिरली आणि मुख्यमंत्री (कोण होते लक्षात नाही) यांच्या आदेशानुसार पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेची निवड करण्यात आली. शासनाच्या पातळीवर या प्रकल्पाला प्रसिद्धी देण्यात आली. केंद्र सरकारला या योजनेची माहिती दिल्यानंतर केंद्राने त्याचा पाठपुरावा केला आणि निधी मिळवून दिला. जलसंधारणाच्या या योजनेला अशा प्रकारे शासकिय मदतीतून अभूतपूर्व यश मिळाले.

अण्णा गांधीवादी आहेत हा समज असल्याने त्यांना यथोचित आदर मिळत होता. अण्णांची राहणीही साधी. त्यातून त्यांना स्वतःलाही काही कमवायचं नसल्याने शासनदरबारी त्यांना मान मिळत होता. अण्णांच्या या योजनेतून राळेगणसिद्धीचा कायापालट झाला हा इतिहास आहे. या दृश्य परिणामांमुळे अण्णांकडे आपोआपच गावची अलिखित पाटीलकी चालून आली. अण्णांचा शब्द हा गावात अंतिम झाला. ग्रामपंचायत देखील अण्णांच्या शब्दाने हलू लागली. इथून पुढचा भाग नंतर पाहू.

पण अण्णांच्या राळेगणसिद्धीला केंद्रातून आणि इतर राज्यातून पथके भेट देऊ लागली. देशपातळीवर वरच्या वर्तुळात अण्णा हे एक चर्चेचं नाव झालं. ही प्रसिद्धी शासकिय पातळीवर मिळाली होती. इथून पुढे अण्णांचे जाहीर सत्कार होऊ लागले. अण्णांना विचारून विवाह होऊ लागले. अण्णांची व्यक्तिपूजा याच दरम्यान सुरू झाली.

केंद्राकडून अण्णांना देशपातळीवर जलसंधारणाचे काम करण्यासाठी निमंत्रण मिळत होते. मप्र.चे मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे अण्णांना घेऊन अनेकदा मप्रच्या दुर्गम भागात हिंडले. अण्णांनी जर जलसंधारण हेच त्याचं वैशिष्ट्य बनवलं असतं तर आज बाबा आमटे, पाणी ओडीट वाले राजेंद्रसिंह, चिपकोफेम सुंदरलाल बहुगुणा इ. प्रमाणे या कामातून कित्येक खेड्यांचा कायापालट झाला असता. आजही अण्णा मदतीला तयार असतात. पण ते इतर प्रांतात जात नाहीत. याबद्दल असंख्य वृत्तपत्रातून आणि अण्णांच्या अनेक सहका-यांकडून लिहीलं बोललं गेलेलं आहे. याच मायबोलीवर अण्णांबद्दलचे तीन धागे वर्षांपूर्वी निघालेले होते त्यात अनेक अभ्यासूंकडून लिंक्स देखील दिल्या गेलेल्या आहेत. ज्याला जाणून घ्यायचं तो ते पाहीलच.

आता मुद्दा असा आहे कि अण्णांनी जलसंधारणाची आणि ग्रामविकासाची आपली गाडी धीमे धीमे का होईना हाकली असती तरी ते एक आंदोलन बनलेच असते. मग अचानक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करणं योग्य होतं का ?

ज्या बारकाईने राळेगणचा कायापालट केला गेला त्याच बारकाईने भ्रष्टाचाराच्या मुद्द्याकडे पाहीलं गेलं का ? लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चांगली घटना, कायदे आणि अंमलबजावणी हे भ्रष्टाचार रोखण्यास आवश्यक आहे. पण अंमलबजावणीसाठी नीतीची गरज आहे. नीतीच नसेल तर इतर गोष्टी निष्प्रभ ठरतात. म्हणून केवळ पोलिसांवर पोलीस, त्यांच्यावर आणखी पोलीस आणि कायद्यांवर कायदे करून काही फायदे नाहीत हे अण्णांना सांगणा-यांना अण्णांनी जेव्हां झिडकारलं तेव्हाच अण्णांना काय साध्य करायचंय याबद्दल शंका निर्माण झाल्या.

पुढंच आपणास माहीतच आहे.

@बाळू जोशी
>>खरे सांगू का, भ्रष्टाचार या मुद्द्यावर या देशात जनमत संघटित होणे फार कठीण म्हनण्यापेक्षा नजीकच्या भविष्यात तरी अशक्यच आहे. हा मुद्दा कधीही या देशातल्या जनतेने टॉप प्रायॉरिटीचा मानलेला नाही. त्याचे उत्तर इथल्या समाजरचनेच्या व्यामिश्रतेतही आहे. ह्या मुद्द्यावर जर लोकांनी मते दिली असती तर आपल्या हुशार राजकारण्यानी तोच नसता का उचलला ? मग त्यांनी अपरिहार्यता म्हणून स्वच्छ प्रशासन नसते का दिले? <<
हा भाग वाचनातून कसा काय सटकला कोण जाणे. पण असो.
भ्रष्टाचार हा मुद्दा कधीही या देशातल्या जनतेने टॉप प्रायॉरिटीचा मानलेला नाही. असे दिसून येते हे खरेच. पण स्वतम्त्र होऊन ६५ वर्षे झाली तरि भ्रष्टाचारामुळेच सर्व क्षेत्रात अपेक्षित असलेली प्रगति होऊ शकली नाहि उलट अन्न, वस्त्र , निवार्‍यासारख्या मूलभुत गरजा प्रामाणिकपणे भागवणेही दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहे. हे त्यांना पटवणे हेच काम खरे तर अण्णांनी करीत राहावे पण राजकारणात पडू नये हेच माझे म्हणणे आहे.

भास्कर तुमचा मुद्दा चूक नाही. तुमची तळमळ ही स्वागतार्ह आहे. प्रश्न फक्त तुम्ही चुकीचा आणि अत्यन्त सामान्य वकूबाचा माणूस निवडला आहे एवढेच. महाराष्ट्राने हे पाहिले आहे. म्हणून इथे त्याना कोणीही विचारीत नाही. अण्णा हे व्यक्तिगत रीत्या स्वच्छ आहेत पण अहंकारी आहेत. प्रसिद्धी लोलुप आहेत. बालिश आणि भम्पक आहेत. त्यांचे स्तोम इथल्या राजकारण्यांनी एकमेकांच्या विरुद्ध वापरता यावे म्हणून मुद्दाम माजविलेले आहे. त्यांना कोणामार्फत मॅनेज करायचे हे सरकारी यंत्रणेला पूर्ण ठाऊक आहे. अण्णांच्या 'लीला' एक स्ट्रॅटेजी म्हणून सुरेश जैन(ते स्वतः कसेही असले तरी) यांनी ८०० पानाचे बाड प्रसिद्ध करून उघड केल्या आहेत.
विकासाचे म्हणाल तर त्याचे कर्ते वेगळे आहेत. मग राळेगणच्या पंचक्रोशीतली गावे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन का नाही सुधारली.? भ्रष्टाचाराचे म्हनाल तर त्यांच्या डोळ्यासमोर चाललेला नगर जिल्ह्यातील १७ साखर कारखाने, दूध संघ, शिर्डी संस्थान येथील भ्रष्ताचाराबद्दल त्यांनी अद्याप अवाक्षरही काढलेले नाही. कारण अण्णांना स्थानिक माणसाना अंगावर घ्यायचे नाही. पत्रकार , चॅनेलवाले नसतील तर ते एक दिवस सुद्धा उपोषण चालू ठेवणार नाहीत.
आंदोलने करून लोकांच्या अपेक्षा वाढवून त्यांना वार्‍यावर सोडून देऊन पुन्हा आपल्याला वाटेल तेच करायचे हा त्यांचा इतिहास आहे. त्यांच्या मागे सध्या महाराष्ट्रातले कोणते चांगले लोक उभे आहेत हे जरा शोधाल का भास्करजी? अण्णांनच्या आंदोलनांवर बर्‍याच लोकांन्च्या दुकानदार्‍या चालू आहेत .

बाळू जोशी

तुम्ही एकदम घणाघाती घावच हाणला. पण रोखठोक आहे मुद्दा. यानंतर काही मुद्दा शिल्लक राहत नाही. अण्णा ज्यावेळी महाराष्ट्र शासनाविरुद्ध शड्डू ठोकत त्या वेळी केंद्र सरकारच्या भ्रष्ट अधिका-यांविरुद्ध ते बोलत नसत. आता केंद्रातल्या सरकारविरुद्ध त्यांनी शड्डू ठोकले आहेत तेव्हां गुजरातमधे लोकायुक्त नसणे किंवा येडीयुरप्पा आदि प्रकरणांविरुद्ध ते अवाक्षर काढत नाहीत. या गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत.

Kiran..,

इथल्या माहितीबद्दल धन्यवाद. Happy

१.
>> अण्णांनी जर जलसंधारण हेच त्याचं वैशिष्ट्य बनवलं असतं तर आज बाबा आमटे, पाणी ओडीट
>> वाले राजेंद्रसिंह, चिपकोफेम सुंदरलाल बहुगुणा इ. प्रमाणे या कामातून कित्येक खेड्यांचा कायापालट
>> झाला असता.

चांगल्या लोकांनी केलेली चांगल्या कामांचा प्रभाव सरकारी भ्रष्टाचारामुळे ओसरण्याची वेळ केव्हानाकेव्हातरी येतंच असावी. (असं मलातरी वाटतं.) त्यामुळे जलसंधारणामुळे मिळालेल्या लोकांच्या पाठिंब्याचं रूपांतर नैतिक आंदोलनात करणं अण्णांना अपरिहार्य बनलं असावं. हा झाला माझा तर्क. अर्थात अण्णांचं अधिकृत मत काय आहे ते ठाऊक नाही.

अण्णांनी एकदा यशस्वी जलसंधारण केलं म्हणून आयुष्यभर ग्रामविकासक्षेत्रात रहावं हे मला तितकसं पटत नाही. या न्यायाने जनरल विजयकुमार सिंगांनी निवृत्तीनंतर केवळ सैन्यक्षेत्रात कार्य करायचा आग्रह धरल्यासारखं होतं.

२.
>> पण अंमलबजावणीसाठी नीतीची गरज आहे. नीतीच नसेल तर इतर गोष्टी निष्प्रभ ठरतात.

राज्यकर्ते नीतिवान असावेत असं असलं तरीही नीती ही गोष्ट राज्यघटनेत कुठेही चर्चिलेली नाही. अनीतीवान राज्यकर्त्यांना पदावरून दूर करण्यासाठी केवळ निवडणुका हेच घटनादत्त माध्यम आहे. यात अडचण अशी आहे की निवडणुका केवळ पाच वर्षांनीच होतात. राज्यकर्त्यांना रोजच्यारोज खोपच्यात घेण्याची कुठलीच सोय नाही.

अशा पार्श्वभूमीवर लोकपाल हा उन्मत्त राज्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचा एक मार्ग होऊ शकतो. जसा माहितीचा अधिकार हा एक दबाव टाकण्याचा स्रोत आहे तसाच लोकपाल हाही एक मार्ग व्हायला पाहिजे. हा निव्वळ एक कायद्यावर दुसरा कायदा अशा प्रकारचा नाही.

नीतिवान लोक निवडून येत नसतील तर अनीतीवान लोकांवर वचक बसवायला हवा. म्हणून लोकपाल ही एक तडजोड आहे. मात्र लोकपाल तरतूद म्हणजे सर्वगुणगुटिका (सिल्व्हर बुलेट) आहे असा रंग फासला गेलाय.

ही अर्थात माझी मते. या मुद्यांवर अण्णांची अधिकृत मते वेगळी असू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

बाळू जोशी.,

अण्णा कसेही असले तरी उन्मत्त भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध केवळ जनतेसाठी लढताहेत. म्हणून तरी त्यांना पाठींबा द्यायला हवा. ज्या लोकांशी ते झुंजताहेत ते लोक पक्के बनेल आहेत. त्यामुळे अण्णांच्या अंगावर चिखल उडणारच.

जर जैन यांना अण्णांच्या 'लीला' ठाऊक आहेत तर त्यांनी आवाज का उठवला नाही? ज्याअर्थी त्यांनी न्यायालयात जाऊन खटला दाखल केला नाही, त्याअर्थी त्या जनतेच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नसाव्यात.

अण्णा अगदी भंपक. लोलुप आणि अजून काहीबाही असतील, जोवर ते भ्रष्ट नाहीत तोवर काळजीचं कारण नसावं.

हे झालं माझं मत. इतरांची मते वेगळी असू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

मात्र लोकपाल तरतूद म्हणजे सर्वगुणगुटिका (सिल्व्हर बुलेट) आहे असा रंग फासला गेलाय.>>>>
गामा हे बरोबर आहे असे माझे मत, म्हणूनच लोकपालासारख्या गोष्टीत जीवनमरणाचा लढा करू नये. आपली सिस्टीम अशी आहे की कोणालाही अनिर्बंध स्वातंत्र्य नाही आहे. अगदी राष्ट्रपतीही मनमानी कारभार करू शकत नाही. कोणी कोणाच्या डोक्यावर बसू नये याची उत्तम व्यवस्था आपल्या घटनेत आहे. लोकपाल आला तरी पुराव्याच्या कायद्याच्या बाहेर त्याला जाता येनार नाहीच्.आज उघड उघड लोकाना ज्यांच्या भानगडी माहीत आहेत ते केवळ पुराव्याच्या कायद्यातील तृटीमुळे सुटतात.आपल्याकडे प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागते.साधा पंचनामा घ्या . पोलीसाना तो पुन्हा पंचांना बोलावून कोर्टात त्याची सत्यता सिद्ध करावी लागते.त्यात पंचांनी (इतक्या वर्षानी)असंबद्ध उत्तरे दिली तर तो पंचनामा खोटा ठरवला जाण्याची शक्यता. मुळात आरोपीच्या वकीलाचे म्हनणेच असते की तो खोटा आहे,पंचाना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून तिथेच तयार केला आहे वगैरे... एखाद्या अधिकार्‍याने एखादा आदेश दिली असेल तर तो पुन्हा कोर्टात बोलावून त्याचीच सही आहे का असे विचारून डॉक्ञुमेन्ट् प्रूव्ह करावे लागते. उलट तपासणीत तो गडबडला की डॉक्युमेन्ट अग्राह्य. केवळ पुराव्याच्या व तपासाच्या तृटी मुळे किती गुन्हे सुटतात व खरे गुन्हेगार अडकतच नाहीत. लोकपालालाही हाच पुरावा कायदा वापरावा लागणार आहे.इन्कम टॅक्स लाही हाच वापरावा लागतो.
यात पुन्हा आपल्या मानसिकतेतही मूळ आहेच. १०-१० खून करनारा आय विटनेस असला तरी कोर्टात प्रथम गुन्हा शपथेवर नाकबूल करतो. मग तो सिद्ध करण्याची जबाबदारी पोलीसांची ... साक्शीदारांनी पुन्हा वेगवेगळ्या दबावाखाली उलटायचे. नगर इथल्या एका केसम्ध्ये एका बाईवर तिच्या नवर्‍यादेखत बलात्कार करून तिच्यादेखत तिच्या नवर्‍याचा खून करूनही त्या बाईने कोर्टात साक्ष फिरवली. काय करणार पोलीस? सुटले सगळे गुंड. पाश्च्यात्य देशात गुन्हेगार शपथ घेतल्यावर गुन्हा कबूल करतात. अगदी अलोकडे अनुज बिडवे च्या केसम्ध्येही त्या गुन्हेगाराने खून केल्याचे मान्यच केले ना. त्यामुळे तर तो खटला इतक्या लवकर निकाली निघाला.आपल्याकडे गुन्हेगार कशाला कबूल करा त्यापेक्षा लढवून निर्दोष सुटू. चार्ल्स शोभराज नावाच्या 'अनुभवी' आंरराष्ट्रीय क्रिमिनलने तर भारतीय कायदे एकदम पुळचट आहेत असे मुळी सर्टिफिकेट्च दिलेले आहे.त्यामुळे अण्णा, खैरनार यांनी ट्रकभर पुराव्याच्या बाता केल्या तरी त्यातून काहीही बाहेर आलेले नाही. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीना ते पुरावे मानतात. त्यामुळे लोकपाल येऊन तो काय वेगळे करणार आहे तेच कळत नाही. कर्नाटकातील लोक आयुक्ताला तपासाचे अधिकार आहेत. ते धाडी घालू शकतात्.त्यांच्या हाताखाली पोलीस यंत्रना आहे. त्यानी अनेक गुन्हे दाखलही केले आहेत. पुढे काय झाले? लोक आयुक्तानी दाखल केलेल्या गुन्ह्यात किती जणांना शिक्शा झाल्या? मला तर एकही आठवत नाही शेवटी ह्या सगळ्या केसेस कोर्टात जाणार आहेत हे सगळे का विसरतात. त्यामुळे लोकपाल हा अक्सीर इलाज आहे हा चुकीचा समज सगळीकडे पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे.
(जैन आणि अण्णा यांची लढाई कोर्टात चालूच आहे :))

@Kiran.. | 11 August, 2012 - 14:51
रुमाल.<<

उगि उगि. रुमाल लागावा इतकेही भावनाविवश होउ नका.
आज रुमाल दिला तर माझ्या एखाद्या पोस्टीनंतर फायर एस्टींग्विशर द्यायची वेल नको यायला.

@मी भास्कर

मला तुमच्या आकलनशक्तीची कल्पना नव्हती. रुमाल याचा अर्थ जागा धरणे.

( च्यायला इथेही तो दर्प आहेच होय Proud असो. यावरून आमीरच्या एका धाग्यावर बबडू वगैरे वरून एकाने घातलेल्या इरिटेटिंग आणि बालिश पोष्टींची आठवण झाली. Light 1 )

@गामापैलवान | 12 August, 2012 - 02:13
अण्णा कसेही असले तरी उन्मत्त भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध केवळ जनतेसाठी लढताहेत. म्हणून तरी त्यांना पाठींबा द्यायला हवा. ज्या लोकांशी ते झुंजताहेत ते लोक पक्के बनेल आहेत. त्यामुळे अण्णांच्या अंगावर चिखल उडणारच. <<
सहमत
इतरांच्या दृष्टीने अण्णा अगदी भंपक, लोलुप आणि अजून काहीबाही असतील तरी जोवर ते भ्रष्ट नाहीत तोवर काळजीचं कारण नसावं याशी सहम्त.
आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला दुसरा कोणि तित्का चाम्गला माणूस तरी कोठे दिसतो आहे. सुब्रम्हन्य स्वामींनी एकाकी खरे तर चांगली कामगिरी बजावली आहे. दुर्दैवाने या सर्व शक्ति एकत्र येतांना दिसत नाहीत.

@Kiran.. | 12 August, 2012 - 08:53 नवीन
मला तुमच्या आकलनशक्तीची कल्पना नव्हती. रुमाल याचा अर्थ जागा धरणे.
( च्यायला इथेही तो दर्प आहेच होय असो. यावरून आमीरच्या एका धाग्यावर बबडू वगैरे वरून एकाने घातलेल्या इरिटेटिंग आणि बालिश पोष्टींची आठवण झाली. )<<
तुम्हाला अभिप्रेत असलेला 'रुमाल्'चा अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद!
अलिकडे यष्टीशी संबंध न आल्याने हाही एक अर्थ 'रुमाल'चा असु शकेल हे ध्यानात आले नाही. यावरून आकलनशक्तीबद्दल भाष्य करणे बालिश नाहि काय?
मुळात इथे 'जागा धरण्या'चा काय संबम्ध? कळेल का? यापुढे अर्थ विचारला तर असेच सांगत चला. माझ्या आकलनशक्तीची तुम्हाला कल्पना आली आहेच.

>>बाळू जोशी. | 12 August, 2012 - 09:09
सुब्रम्ह. नी जनहितासाठी थोडेच केले आहे? त्याना त्यांचे वैयक्तिक स्कोअर सेटल करायचे होते इतकेच
<<
कशासाठी का असेना त्यामुळे इतके हाय प्रोफाईल लोक कांही दिवस तरी 'आत' गेले. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणार्‍याम्ना थोडा आशेचा किरण तरी दिसला. वैयक्तिक स्कोअर सेटल करण्यासाठी का असेना नेत्यांनी एकमेकाचे भ्रष्टाचार नुसतेच उघड नव्हे तर स्वामींप्रमाणे शेवटास न्यावे. शेवटी लोकांचा पैसा लाटलेल्यांना शिक्षा आणि खाल्लेला पैसा परत द्यावा लागल्याशी मतलब. असे झाले की भ्रष्टाचारावर आपोआप थोडेतरी नियंत्रण येईल.

@बाळू जोशी. | 12 August, 2012 - 09:24 नवीन
टीम अण्णासारखी टीम मायबोली मध्येही भांडणे सुरू झाली वाटते <<

मुलीच नाहि. किरण म्हणजे काही रानडुक्कर वा पिसाळलेला हत्ती नव्हे.

तर स्वामींप्रमाणे शेवटास न्यावे
>>> प्रकरण शेवटास जाईल असे दिसत नाही. कुठले गेले आहे? तूर्त जामीन मिळाला नाही एवढेच्.तेही व्हीआयपी प्रोफाईल्स असल्याने.(शेवटी तो ही मिळाला.) सिद्धता फार कठीण आहे. कोणाची किती जबाबदारी आहे याचे कोडीफिकेशन कुठे आहे? पैसा खाला आहे हे कुठे आहे. ? सरकारचे नुकसान आहे एवढेच. आदर्श मध्ये तर मंत्री ही आपली जबाबदारी आहे हे मानायलाच तयार नाही. अधिकार्‍यानी दिशाभूल केली म्हणे. विदीन गिव्हन सेट ऑफ कंडिशन्स त्यानी निर्णय घेतला तो गुड फेथ्मध्ये अनलेस थेअर इस एक्ष्प्रेस्स प्रोविजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे जर कोर्टाने मान्य केले तर ग्रंथ आटोपला. नेक्सस आणि गिल्टी माईंड प्रूव्ह करणे फार अवघड आहे. मग कोर्टाचाही नाईलाज होतो... कोर्टालाही ऑर्दरमध्ये रिझनिंग द्यावे लागते.

Anna Hazare had run away from the battlefield during the 1965 India- Pakistan War, alleged G R Khairnar, former deputy commissioner of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and Maharashtra's original 'Mr Clean'.

कोणतीही गोष्ट शेअर करण्याआधी पडताळून पहायला फार श्रम आणि वेळ लागत नाहीत. मागेही तुम्ही दारासिंग यांच्या मृत्यूची बातमी अशीच दिली होती.

गापै,
>.जर जैन यांना अण्णांच्या 'लीला' ठाऊक आहेत तर त्यांनी आवाज का उठवला नाही? ज्याअर्थी त्यांनी न्यायालयात जाऊन खटला दाखल केला नाही, त्याअर्थी त्या जनतेच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नसाव्यात.<<<

जैन यांनी खटला तर दाखल केलेलाच आहे, वरून एकदा गम्मत म्हणजे ते अण्णांच्या समोर मांडव टाकून उपोषणाला बसले होते.

@गापै
जर जैन यांना अण्णांच्या 'लीला' ठाऊक आहेत तर त्यांनी आवाज का उठवला नाही? ज्याअर्थी त्यांनी न्यायालयात जाऊन खटला दाखल केला नाही, त्याअर्थी त्या जनतेच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नसाव्यात. <<

राजकीय नेते जनतेचा विचार करतात कि मतांचा? मला वाटते कि ते त्यांच्या 'मतदार्-जनतेचा' सदासर्वकाळ विचार करतात.

>>जैन यांनी खटला तर दाखल केलेलाच आहे, वरून एकदा गम्मत म्हणजे ते अण्णांच्या समोर मांडव टाकून उपोषणाला बसले होते. <<

राजकीय नेत्यांच्या सर्व छोट्यामोठ्या गोष्टी नेहमीच 'गम्मत' ने काठोकाठ भरलेल्या असतात. मग जैन तरी अपवाद कसे असतील? वेगळ्या विनोदांची खरे तर गरजच भासू नये. त्यांतील बहुतेकांनी महात्माजींचे नाव घेतले रे घेतले कि विनोदाला सुरुवात होते. फक्त नेत्याचा इतिहास थोडा माहीत हवा. म्हणून तर माझा आग्रह आहे कि अण्णांनी राजकारणात न 'पडता' निवडणुकीला उभ्या राहाणार्‍या उमेदवारांचा इतिहास मतदारांना माहीत करून द्यावा. त्यामुळे नेत्यांची भाषणे ऐकतांना इतिहासामुले झालेले प्रबोधन आणी 'नेत्याच्या कथनि आणि करणी' मधील तफावती मुळे होणारी करमणूक असे दोन्ही लाभ मतदारांना मिळतील.

@Kiran.. | 12 August, 2012 - 08:53
मला तुमच्या आकलनशक्तीची कल्पना नव्हती. रुमाल याचा अर्थ जागा धरणे.
( च्यायला इथेही तो दर्प आहेच होय असो. यावरून आमीरच्या एका धाग्यावर बबडू वगैरे वरून एकाने घातलेल्या इरिटेटिंग आणि बालिश पोष्टींची आठवण झाली. )<<

माझ्या पोस्टीमध्ये दर्प भरलेला आहे असे तुम्हाला वाटले. असेलही त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.
मी मायबोली वाचू लागलो सुमारे वर्षापूर्वी. तुम्ही मात्र येथे बर्‍याच वर्षांपासून सुप्रतिष्टीत आहात असे दिसते.
आता माझ्यासारख्याला तुमच्यासारख्या सुप्रतिष्ठितांचे संक्षिप्त शब्द, रुमाल ( म्हणजे 'जागा धरणे ' असा अर्थ तुम्हाला अभिप्रेत होता नाही का?) वगैरे सारख्या कांहि शब्दांमागे तुम्हाला अभिप्रेत असलेले अर्थ माहीत नसतील आणि त्यामुळे कांही गफलत झाली असेल तर लगेच त्यावरून लगेच त्या आयडीच्या आकलनशक्तिबद्दल भाष्य करणे हे कोणत्या सभ्यतेत बसते?
मायबोलीवर मि सुप्रतिष्टीत आहे म्हणून मि वापरलेल्या प्रत्येक शब्दामागची 'शेड' वाचकाला माहीत असलिच पाहिजे असा दर्प तुम्हाला आला आहे असे मी म्हणले तर चालेल काय?

मी भास्कर

तुम्हाला कळले नव्हते तर थेट विचारण्याचा मार्ग मोकळा होता असं मला वाटतंय. त्याऐवजी उगी उगी सारखी बालीश पोस्ट Biggrin आणि माझ्या पोष्टीमुळे तुम्हाला फायर एक्स्टेनग्विशरची गरज लागेल यातून जाणवणारा दर्प हे तुम्हाला लक्षात येईल असं गृहीत धरलं होतं... पण असो. लोक वाचतात त्यांना कळते सारे.

ज्या अर्थी इथे हजेरी लावून आणि शब्दाला शब्द दिल्याने टीआरपी वाढवण्याचं टाळलेलं आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईलसं वाटलं होतं. द्विरुक्ती झालीये खरी तुमच्या प्रश्नांची खरं तर तुमच्या कुठल्याच पोष्टीला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्याच उपकरणांचा वापर प्रभावीपणे होत नसल्याचे दिसल्याने सहानुभूती म्हणून हा प्रपंच...

@गामा
मात्र लोकपाल तरतूद म्हणजे सर्वगुणगुटिका (सिल्व्हर बुलेट) आहे असा रंग फासला गेलाय<<

सहमत.
परिणामी सरकारने सध्याच्या परिस्थितिवर कांहीही परिणाम होणार नाही अशी लोकपाल नामक टाकाऊ सर्वगुणगुटिका तयार करून लोकसभेत टाकली. विरोधकाना ती अमान्य करून सरकारच्या कोर्टात परत ढकलणे भागच होते. अशा रणनितिने सरकारने तेही (टाकावू ) बिल पास न होण्याचे खापर विरोधकांवर फोडून नामानिराळे होण्यात यश मिळवले.

Pages