रसपात्रा - गुजराती पदार्थ

Submitted by अवल on 4 August, 2012 - 04:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अळूच्या उकडलेल्या वड्या ५ - ६
चिंचेचा कोळ अर्धी वाटी
गूळ एक मोठा - लिंबा एव्हढा खडा
तिखट १ चमचा
हळद पाव चमचा
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर
कढीपत्त्याची ४ -५ पाने
तेल २ चमचे
जिरे अर्धा चमचा
पाणी अर्धा कप

क्रमवार पाककृती: 

पातेल्यात तेल टाकून तापत ठेवा.
त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कढीपत्ता टाका. हिंग टाका. तिखट, हळद, मीठ टाका. आता त्यात चिंचेचा कोळ टाका. गूळ टाका. पाणी टाका. कोथिंबीर टाका.
एक उकळी आली, गूळ नीट विरघळला की त्यात अळूच्या वड्या सोडा. उकळी आली की झाकण ठेऊन २ -४ मिनिटं शिजवा.
तयार आहे झणझणीत रसपात्रा.

1344067956967.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोघांना पुरेल
अधिक टिपा: 

हे नुसतेच खायचे ( खरे तर ओरपायचे) जसे इडली सांबार खातो तसे. या नंतर मस्त मुगाच्या डाळीची खिचडी. आत्मा तृप्त Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक गुजराती पदार्थ, आजी-आईकडून शिकले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोपा आहे करायला. इथे तयार अळूवड्या मिळतात त्यामुळे काम सोप्पं. पाण्यात ह्या वड्या मिळून येतात का, म्हणजे रस्सा पाणीदार लागत नाही ना?

मस्त आहे हा प्रकार.
सायो, वड्या मिळुन येत नाहीत ...आंबटगोड पाण्याबरोबर किंवा पाण्यात चुरुन खायच्या.

मी केला. मस्त लागला. धन्यवाद अवल.
सायो, रस्सा पाणीदार लागत नाही. चिंच आणि गुळाने दाटपणा येतो. मी दीपच्या वड्या घातल्या. काही तुकडे करुन घातल्या. त्यात तीळ-खोबरेही असते ते दिसते आहे-

patra.jpg

बघितल्यावर शाकाहारी सात्त्विक गुजराती पदार्थ आहे असे वाटत नाही. Wink

धन्यवाद सर्वांना.
वा लोला, मस्त दिसतोय. अगदी जमलाय Happy >>>बघितल्यावर शाकाहारी सात्त्विक गुजराती पदार्थ आहे असे वाटत न<<< अगदी अगदी Happy

मी ही आज केली ही भाजी. मस्त लागली चवीला. फ्रोजन अळूवड्या वापरल्यावर करायलाही काहीच खटपट नाही. रस मात्र मी अंगासरशी ठेवला.