एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

उलकीने ब्लंट कट वरून आंबाडा कसा घातला असा केशरचनेशिअस प्रश्न पडला मला.>>> मलाही पडला.
पण तिचा ब्लंट कट हा सुद्धा वीग आहे ना?

लिसन काकू आणि दिग्याला माईआजीने घना आणि राधा बद्दल सांगितले का? ईथे नेटवरच्या भागात बरेच सीन कट केलेले असतात त्यामुळे कळले नाही.

इतका त्रास होतो तर (किंवा तरीही) का अशा सिरीअल्स बघता लोकहो? Happy

हसायला येतं खरंच ! दिग्दर्शकाला किंवा लेखकाला आपला गुलाम असल्यागत एकेरीत शिव्या देणे, एखाद्या कलाकाराच्या दिसण्या-वागण्यावरून हिणकस शेरेबाजी करणे, कुठल्यातरी काल्पनिक टीव्ही-पात्राच्या मुस्काडात ठेवून द्यावीशी वाटणे इत्यादि लक्षणे आपले मानसिक स्वास्थ्य ढासळल्याची निदर्शक आहेत, असे नाही का वाटत? अशी वैयक्तिक स्वरूपाची शेरेबाजी करतांना आपल्याला (मलासुद्धा) एक पानभर निबंध तरी बिनचूक लिहिता येतो का, किंवा आपला आरसा रोज दाखवतो ते रूप कितपत राजबिंडे वगैरे आहे असा विचार केला तर?

आवड-नावड, अपेक्षा असणे वगैरे आपल्या जागी ठीक आहे, पण एका साध्या टीव्ही सिरीअलवर इतके दातओठ खात तुटून पडणे माझ्या आकलनाच्या कक्षेत येतच नाही. समजतच नाही मला हे ! एका मालिकेवर इतका राग असू शकतो? Happy मग का बघता ती मालिका? आयुष्यातला अर्धा तास आनंदात घालवण्याचे कित्येक मार्ग आहेत जगात !!

एके काळी खुसखुशीत आणि नर्मविनोदी असणारा हा धागा सध्या अत्यंत आक्रस्ताळा आणि क्वचित शिवराळही होऊ लागला आहे. हे बघवत नसल्याने एवढे लिहिले. पटेल तर / पटेल तेवढे घ्या, बाकी सोडून द्या.
सवाल-जवाबात इन्ट्रेस्ट नाही.

वा ज्ञानेश... योग्य शब्द मिळत नव्हते त्यामुळे म्हणता येत नव्हते ते तुम्ही अगदी चपखलपणे लिहिलंय.

आक्रस्ताळा आणि क्वचित शिवराळही होऊ लागला आहे. <<<< +१००००००००००

उभ्या आयुष्यात ४० च्या वर स्पीड ने गाडी न चालवण्याचा सराव नसणाऱ्या ड्रायव्हर ने एकदम रेस मध्ये भाग घेवून १४० च्या स्पीड ने गाडी चालवून रेस जिंकावी ,तसे आज सिरीयल मध्ये खूप वेगाने घडामोडी झाल्या आहेत !राजवाडे बहुधा सिरीयाल लवकर गुंडाळण्याच्या मूड मध्ये दिसतात ...हा माबो इफेक्ट तर नव्हे नां?

राधा ने आपले मन तर उघडे केले ,आता बघुया घना काय म्हणतोय,?

.............आज उत्सुकता ताणली गेली .............................

फेसबुक वर असंख्य दर्शकांनी "आजी असावी तर माई-आज्जी सारखी " अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे !!!!!!!!!!!!!

एल्गो संपली की १००० फटाक्यांची माळ लावणार आणि दगडूशेठ ला नारळ्,उदबती देणार.सद् बुडईधी देण्यासाठी.
असो.
>>>> हो? मग पिंजरा, दिल्या घरी .. तमाम केकता सीरियली संपल्यावर हत्तीवरुन साखर वाटावी लागेल ना.
ज्ञानेश +१
भाषेचं तारतम्य बाळ्गणे, कलाकारांच्या दिसण्यावर पर्सनल कॉमेंट्स टाळणे.

मालिकावालेही प्रेक्षकांचा अंत पाहतात.....

अर्थात रिमोट आपल्या हातात आहे हे वैश्विक सत्य आहेच पण तरीही टिवीने आज सगळ्या घरातली संध्याकाळ व्यापलेली आहे हेही तितकेच खरे वैश्विक सत्य आहे. मी आज एक मालिका पाहतेय, काहीजण अनेक पाहतात इतकाच फरक. मी माझ्या मर्जीने पाहतेय, इथल्या काहीजणांना घरातले इतर पाहतात म्हणुन पाहावी लागते.. चालायचेच...

सुरवात चांगली झाली की अपेक्षा उंचावतात. पण मालिकेतले मुळ विषय सोडुन इतर पाणी वाढले की इथेही विषय सोडुन इतर टिप्पण्या चालु होतात. काय करणार? मालिकेत जेव्हा काही चांगले चाललेले तेव्हा इथे सगळ्यांनीच चांगलेच लिहिले होते. आता मालिकाच रटाळ झाली तर काय करणार??

झीवरच्या सारेगामाबद्दल लिहिताना त्यातल्या एका परिक्षकांनी लिहिले होते की झीने त्यांना काय बोलावे आणि काय बोलु नये याबद्दल्च्या सुचना आधीच दिलेल्या. त्या सुचना वाचल्यावर त्यांना १ तासाचा कार्यक्रम ह्या सुचना लक्षात ठेवुन कसा काय रेटावा तेच सुचेना. शेवटी त्यांनी संगित सोडुन इतर गप्पागोष्टी करत कार्यक्रम रेटायला सुरवात केली.. इथेही तेच आहे.. आता इतके महिने इमानेइतबारे मालिका पाहिली तर शेवटही पाहावा म्हणुन पाहायचे आणि मग काहीच हाती लागत नाही तर कलाकारांच्या पर्सनल गोष्टी पाहायच्या... काय करणार??

राधा ने आपले मन तर उघडे केले ,आता बघुया घना काय म्हणतोय,?

तो काय वेगळे म्हणणार?? मालिका संपत आलीय, त्यामुळे तो आता आपल्या लाडक्या भारतीय संस्कृतीला नी कुटुंबसंस्थेला अपेक्षित असेच उद्गार काढणार आणि शेवटी ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड म्हणत मालिका संपणार..... यापेक्षा वेगळा काहीतरी शेवट करायचे धैर्य निर्माता, दिग्दर्शक आणि चॅनेल यापैकी कोणी दाखवेल का?

उभ्या आयुष्यात ४० च्या वर स्पीड ने गाडी न चालवण्याचा सराव नसणाऱ्या ड्रायव्हर ने एकदम रेस मध्ये भाग घेवून १४० च्या स्पीड ने गाडी चालवून रेस जिंकावी ,तसे आज सिरीयल मध्ये खूप वेगाने घडामोडी झाल्या आहेत !राजवाडे बहुधा सिरीयाल लवकर गुंडाळण्याच्या मूड मध्ये दिसतात ...हा माबो इफेक्ट तर नव्हे नां?>>>

हा माबो इफेक्ट नाही, 'राजवाडे स्पेशालिटी' आहे.

आणि ज्यांना माहीत आहे ते कायम कामंधामं सोडून कायम माबोवरच पडीक असतात, हा पा सर्व गोष्टी स्सर्व (हो अगदी सर्व धावत्या बीबीवर!!) बीबीवरच्या लोकांना सांगत सुटतात, अगदी डोकेदुखीपासुन दात काढले-पाडले इथपर्यंत चर्चा माबोवरच दुसरी काही करमणूक जशी अशा लोकांना नाही तसेच टीवी पाहणार्‍यांना कायम पडीक रहावी अशी माबो नाही. म्हणून ते लोक टीवी पाहतात. यांना आपल्याला कुणी बायकॉट करतय हे ही लक्षात येत नाही आणि आलं तरी ते तिकडे दुर्लक्ष करुन ते त्यांच्या चर्चेत भाग घेतच राहतात.

ज्ञानेश, बरोबर आहे तुमचे.

हे मायबोली आहे, त्यामुळे तुम्ही वर लिहिलेले फक्त ह्या नाही इतर असंख्य धाग्यांना लागू पडते.
पटेल तर / पटेल तेवढे घ्या, बाकी सोडून द्या. >> खास करुन हे.

मी तर सिरीयल पाहत पण नाही पण ह्या धाग्यावर आवडेल ते घेते आणि उरलेले सोडून देते.

मागच्या महिन्यातले एपिसोड पहाता मालिका करण्याऐवजी चित्रपट जास्त छान बनला असता असे वाट्टेय. हीच cast घेऊन. मालिकेसाठी पटकथा ( मालिकेला पटकथा असते की नाही माहीत नाही, पण तुम्हाला कळ्ळेय) कमी पडलीये. (माझे मत!)

मला विनोद काका सुरुवातीस खूप अवघडलेला वाटला होता देहबोलीमधून पण आता त्याची संवाद्फेक ऐकून खूप छान कलाकार वाटतो.

मला मालिका खूप आवडली. बरेच दिवसानी ( 'पारू ला भेटायला जाय्चं जायचं, पारू ला भेटायला जायचं नंतर! Happy )!!!

शेवटी मालिका म्हटले की पाणी हे असायचेच.

सगळेच कलाकार उत्तम.. पण मी माई आज्जी, कुहु (खरा वाटणारा भाबडेपणा), सुप्रियाकाकू , दिग्याकाका, राधा आणि घना ला awards देइन..

ज्ञानेशराव, असे चिडू नका. टीका करणं सर्वात सोपं असत, हे बरोबर आहे पण जे लोक चांगलं करू शकतात आणि करत नाहीत तेव्हाच टीका केली जाते हो. ह्या मालिकेतील ८५-९० % कलाकार हे रंगभूमी, चित्रपट, लेखन, दिग्दर्शन ह्यात वाखाणण्याजोगे काम करतात. मग ज्यावेळी आपण दमूनभागून येवून टीव्ही लावतो तेव्हा ह्या मास्टर लोकांकडून मनोरंजनाची अपेक्षा ठेवणे चूक आहे का? आणि ह्यामध्ये इतर मालिकांचा उल्लेखही केलेला नाही. काय आहे 'सचिन' खेळला नाही की वाईट वाटते तसे 'मुरलीविजय' खेळला नाही तर वाटेल का? आणि क्रिकेटवर बोलणारे शालेयपातळीवर तरी क्रिकेट खेळलेले असतात का? ज्या पात्रांचा उल्लेख केला आहे ते कलाकार म्हणून ग्रेटच आहेत. नुसते कौतुक करणारे असतील तर चांगले काम आपल्या आवडत्या कलाकारांकडून कसे होणार. ह्यात आपल्यासारख्या मालिकेच्या पाठीराख्यांच्या भावना दुखवायचा हेतू नव्हता तर फक्त कथानकात खटकणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला. हे बदलणं दिग्दर्शकाच्या हातात असते म्हणून राजवाडेवर टीका! त्यामध्ये वैयक्तिक आकस नाही. चर्चा चालू ठेवा कदाचित चर्चेमधून माझ्यासारख्याची मते बदलू शकतात. टीका करणारे सगळेच शत्रू नसतात.... बघा पटतंय का?

उलकीने ब्लंट कट वरून आंबाडा कसा घातला असा केशरचनेशिअस प्रश्न पडला मला.
<< कमॉन , त्यात काय अशक्य आहे !
असा बांधतात बघा, http://www.youtube.com/watch?v=vz7Buzvlk28
उल्का अत्या पेक्षा शॉर्ट हेअर्कट आहे हिचा Proud

निदान मी तरी शिव्या वगैरे दिल्या नाहीत पण मनोरंजन हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्यासारखी परिस्थिती आहे. चांगल्या कलाकारांची नावे पाहून लोक त्यांचा वेळ खर्च करून टिव्हीपुढे बसतात, त्यातून आधीचे भाग जरा बरे दाखवले म्हणून की काय आशाही होती. ज्या कलाकारांची त्या त्या पात्रासाठी निवड होते ते जर घाऊकरित्या नाकारले गेले तर चूक प्रेक्षकांची नाही. प्रेक्षक आज बर्‍याच अपेक्षा ठेवतात. एखादा सॉफ्ट. इंजिनीयर फक्त लॅपटॉप बंद करताना दाखवला तर चालू शकत नाही........सॉफ्टवेअरच्या जमान्यात तर नक्कीच नाही. टिकीट काढून सिनेमा बघितल्यावर तो जर वाईट निघाला तर आपण दिवे ओवाळत नाही, नावंच ठेवतो. इथेही तसेच आहे. मी तरी बरेच वर्षांनी सिरियल बघण्याचं धाडस केलं आणि पुन्हा करीन असं वाटत नाही. प्रेक्षकांना नाखूष ठेवणे परवडते असे दिसत आहे. किती दिवस? ते ज्याच्यात्याच्यावर अवलंबून आहे. मालिकेचा दर्जा खालावला यात दिग्दर्शकांची चूक किती आणि वाहिनीची किती हे माहीत नाही पण एखादा सिनेमा/ सिरियल ही प्रेक्षकांनी स्विकारली तरच यशस्वी होते हे अंतिम सत्य आहे.
असो. आजच्या भागात काहीतरी पहायला मिळाल्यासारखे वाटले, हाती लागल्यासारखे वाटले, पण आता शेवट आलाच.

पिंजरा, दिल्या घरी तू सुखी रहा, तू तिथे मी किंवा हिंदीतल्या बहुतेक सर्वच.. असला कचरा सुखेनैव चालू आहे हे बघता प्रेक्षक खरंच अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षेला न जागल्यास नाकारतात असं काही वाटत नाही.

टिका करणे इतपत ठीक. पण उदाहरणार्थ बहुतेक घरांमधे पोटं सुटलेले पन्नाशीचे बाप्ये असताना सिरीयलमधला ५० चा माणूस वेलबिल्ट, टोनड दिसला पाहिजे हे फारच गमतीशीर. तुमच्या आमच्यातली कॅरेक्टर्स तर हवीत पण त्यांनी खर्‍या माणसांसारखं दिसायचं नाही हे काय आहे?

मायबोलीवर बोललेलं वाचून तिकडे बदल केले जातात हे फार म्हणजे फारच विनोदी. पण अनेकांची सिरीयसली तशी समजूत दिसते.

मालिकेचा दर्जा खालावला यात दिग्दर्शकांची चूक किती आणि वाहिनीची किती हे माहीत नाही पण एखादा सिनेमा/ सिरियल ही प्रेक्षकांनी स्विकारली तरच यशस्वी होते हे अंतिम सत्य आहे. <<<<
म्हणजे जो सगळा सिरीयलींचा कचरा चालू असतो तो प्रेक्षक स्वीकारतो म्हणूनच.

म्हणजे जो सगळा सिरीयलींचा कचरा चालू असतो तो प्रेक्षक स्वीकारतो म्हणूनच.

कितीही खोटं वाटलं तरी हे सत्य असावे. कितीतरी मालिका टिआरपी कमी म्हणुन गुंडाळल्या गेल्या आहेत. आता सारख्याच आचरट असलेल्या एका मालिकेला टिआरपी आहे आणि दुसरीला नाही याचे उत्तर काय असावे? हा टिआरपी मोजणा-या संस्थाही आहेत. त्यांचे काहीतरी ठोकताळे आहेत.

अगदी खालच्या पातळीवरचा हिंसाचार दाखवणा-या पुढचे पाऊलसारख्या मालिकांचे निर्माते 'लोकांना हे बघायला आवडते' असे जाहिरपणॅ म्हणतात.

काल आजींसमोर मनातले सगळे बोलून झाल्यावर शेवटच्या क्षणी राधा थोडीशी हसली असे मला वाटले. ती नक्की हसली की रडू आवरले कळले नाही.

ज्ञानेश +१

बाकी मालिकांना नावं ठेवल्या जात नाही अन हिलाच का याचं उत्तर मला वाटतं मालिका कुठल्या प्रेक्षकवर्गासाठी बनवलिये किंवा कुठला प्रेक्षकवर्ग ही मालिका बघतोय यावर अवलंबून असावं. एलदुगोचा प्रेक्षकवर्ग बहुतकरुन शहरी, सुशिक्षीत, नोकरदार, मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीय असावा. (कॉर्पोरेट नोकर्‍या करणारे स्त्रिया अन पुरुषही बहुतेक कित्येक वर्षात ही पहिलीच मालिका आवडीने बघत असावेत. ) हाच पुर्ण च्या पुर्ण संच नक्कीच तू तिथे मी किंवा पिंजरा बघत नसणार. (थोडा ओवरलॅप असू शकतो). त्यामुळे एलदुगो ची तुलना त्या टाइपच्या मालिकांशी नाहीच आहे. ही मंडळी कदाचित अनेक वर्षापुर्वी पाहिलेल्या चांगल्या मालिकांशी तुलना करताहेत. पण बदलत्या काळानुसार "चॅनेल चालवणार्‍यांची सक्ती" अन "टीआरपी साठी पाणी घालणे" हे या मंडळींना सुट होत नाहीये. त्यामुळे चिडचिड होत असावी. अर्थात वाईट भाषा वापरण्याची गरज नक्कीच नाही. अनेक वर्षात इतकी हलकीफुलकी मस्त मालिका आलीच नाहीये. त्यासाठी तरी एलदुगो टीमचे श्रेय कुणीच नाकारणार नाही (अगदी टीका करणारे सुद्धा नाही.)

अगदी खालच्या पातळीवरचा हिंसाचार दाखवणा-या पुढचे पाऊलसारख्या मालिकांचे निर्माते 'लोकांना हे बघायला आवडते' असे जाहिरपणॅ म्हणतात.
>> हे खरे असावे. मी वर लिहिल्या प्रमाणे एलदुगो अन या भिकार मालिकांचे प्रेक्षकवर्ग हे जवळजवळ mutually exclusive sets असावेत. (थोडा ओवरलॅप सोडल्यास.) हे म्हणजे "तुम्ही अमुक फाइव्ह स्टार हॉटेलातल्या जेवणाला इतकी नावे ठेवता तर नाक्यावरच्या अस्वच्छ गाडीवाल्याकडे खायला कसे चालते?" असं म्हणण्यासारखं आहे. दोन्हीचे ग्राहक वेगळे आहेत. त्यामुळे अपेक्षा वेगळ्या आहेत.
हे कुणालाही उद्देशून नाही. सहज चर्चा सुरु आहे म्हणून लिहिलेय.

Pages