एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टार प्रवाह वरच्या बर्‍याच मालिकांपेक्षा ही मालिका बरीय..
खरच एकदा त्या मालिका बघुन घ्या डोक्याला शॉट.

देवयानी म्हणे लयी फेमस.
"तुमच्यासाठी कायपण" वरुन जोक बनायला लागलेत आता...
असो.

ए ल दु गो मध्ये काय झाल?
आजीसमोर क्लीअर झाल म्हणजे सर्वाना कळवायला हरकत नाहिये ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच?

ए ल दु गो मध्ये काय झाल?

मंजात्येस्टाईल मुद्देसूद सांगायचा प्रयत्न करते
१) आजींनी घना-राधाला थेटच विचारलं की कधी संपतोय तुमचा करार? घ-धांना धक्का! हे महेशरावांनाही ठाऊक आहे हे ऐकून राधा रडवेली.
२) राधेने कबूल केलं की करार-लग्न ही चूक आणि आता वेगळं होणं क्लेशकारक. घनाशिवाय राहणं अशक्य. पण घना ठाम असल्याने कुहूचा साखरपुडा झाल्यानंतर घटस्फोटाचे कागद फाईल करणार.
३) घरातले इतर अस्वस्थ- की आजींच्या खोलीत चारच जणांचे काय चालू आहे? दिग्याकाका एकदम अपसेट. त्याचे कारण कळले नाही.
४) महेशरावांनी राधेला काहीही झालं तरी सपोर्ट करायचे ठरवले. आपल्या एकाकीपणामुळे मुलीला हा निर्णय घ्यावा लागल्याची बोच.
५) एपिसोडच्या शेवटच्या पाच सेकंदात घना 'मलाही काही सांगायचे आहे' असे म्हणतो आणि भाग संपतो.

दिग्याकाका एकदम अपसेट. त्याचे कारण कळले नाही.

दिग्या जरी इनोसंट असला तरी माऊ थोडेफार डोके चालवते. तिच्या पुढाकाराने दोघांनी जाऊन विनोद व माईसमोर सरळ विचारले घरात कायतरी चालु आहे, आम्हाला माहित नाहीय, आता एकतर सांगा किंवा सांगाय्चे नाही असे म्हणा. शेव्टी माईनी सांगितले.

हा असा अ‍ॅटिट्युड आधीपासुनच सगळ्यांनी ठेवला असता तर बरे झाले असते.

नताशा, प्रेक्षकवर्ग खुप वेगवेगळे आहेत. माझ्या बाईला एलदुगोत काय चाललेय याच्याशी काहीही देणेघेणे नाहीय. ती माझ्या घरी येऊन सकाळी १० वाजता हक्काने टिवी लावून 'राशीबहु खड्ड्यात पडलीय, बाहेर कशी येणार' याची चिंता करत बसते. आज खुष होती, राशीबहु एकदाची आली बाहेर म्हणुन...

पण ह्या धाग्यावर आवडेल ते घेते आणि उरलेले सोडून देते.
>>>>>>>>>>>>>
+१०००००००००००० जनरली सर्वच धाग्यांवर हे केले पाहिजे.

मला वाटतं........ मालिका संपण्याआधी हा धागा "२००० पोस्टी" पार व्हावा याची जबाबदारी काही समंजस आयड्यांनी घेऊन वरील चर्चासत्र घेतले असावे.... Proud

तर पुन्हा बॅक टू नॉर्मल येऊया. Happy

"तुमच्यासाठी कायपण" वरुन जोक बनायला लागलेत आता...

राम रावणाचं घनघोर युध्द सुरू असतं........ सूर्यास्त झाला तरी दोघे लढत असतात.
अचानक रावण घड्याळात बघतो..........

रावणः श्रीरामा, अरे ८.३० वाजले........ टाईम प्लीज टाईम प्लीज (आपल्या चौथ्या तोंडाची थूक आपल्या सातव्या हातावर लावत रावण म्हणतो ) Proud
अरे, आता देवयानी बघून येतो जरा...... उरलेलं युध्द नंतर करूया.

श्रीरामः जा रावणा जा...... तुमच्यासाठी काय पण Proud Wink

मी सुरवात थोडी पाहिली नी नंतर शेवट पाहिला. विनय आपटे खरेच विवश, मुलीच्या काळजीने व्याकुळ आणि तिला हे करायला आपल्यामुळे लागले या कारणाने स्वतःवरच रागावलेले वाटले. राधा ठिक होती. घना नेहमीसारखाच ब्लँक...

रिया ................. ' तारक मेहेता का .......' आणि ' लापतागंज '
>>>>
अरे बाप्रे!
मी त्यापेक्षा १०० वेळा एलदुगो पाहीन
कारण यात किमान काही कॅरेक्टर्स तरी बरे आहेत ( अबिर, पप्पा, राधा,उल्का आत्या, तिचे मिस्टर ईटीसी ईटीसी)
तारक मेहता पाहताना तर माझ्या डोकंच फिरतं ... नको नको.. विषयही नको तो

साधना, आम्ही (घरातले सगळे) गोपीराशीबहु आणि एलदुगो दोन्ही आवडीने बघतो.

सबवरच्या मालिकांत सांगून सवरून वेडेपणा करतात. त्यामुळे तो खटकत नाही. लापतागंज शरद जोशींच्या कथांवर आधारित आहे. रात्री दहाच्या आधी असती तर बघायला आवडली असती.

आता एलदुगोकडे वळतो.परवाच्या भागात वर्गात खोड्या करणार्‍या मुलांना वर्गशिक्षक हेडमास्तरांकडे घेऊन जातात तसे राधा-घना आणि विनोदकाका माईआजींसमोर उभे होते. राधा घाबरट विद्यार्थिनी. त्यातून तुझ्या पालकांना आम्ही आधीच सगळे सांगितलेय म्हटल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली. घना मात्र पक्का डँबिस असल्यामुळे मी 'पुन्हा अशी चूक करणार नाही' असे कान धरून म्हणायला तयार नाही.
आता सत्तावीसपर्यंत मालिका ढकलायची म्हणून वल्लभकाकांकडे कोणीतरी दहा लाख मागताहेत.(मागणारे हणमंतराव असतील का याचा सस्पेन्स) मग कुहूचा साखरपुडा. मग लग्नाचा वाढदिवस.
परवाच्या भागात शेवटी घनाने मुझे कुछ कहना है म्हटल्यावर काल जे काही सांगितले (एक वर्षात नाही ठरले ते तो तीन दिवसांत ठरवणार?) त्यावर राधा आणि आजी यांच्या संतापाचा कडेलोट झालेला बघायला आवडला असता. अजूनही दोन दगडांवर पाय ठेवतोय आणि कबूलही करत नाही.

राधाचे मुळुमुळु रडणे अजिबात आवडले नाही (भुंगा, वाचताय ना?)

मला वाटते, काळ्यांनी घनाला अमेरिकेला खुशाल जाऊ द्यावे आणि राधाला आपल्याकडेच ठेवून घ्यावे.

घनाला , हो हो तू अमेरिकेला जायला हवे असे सांगणारी एकही व्यक्ती नाही? तो त्याचा मित्र/कलीग सोडला तर. अगदी तो अंगद कश्यपही काळेवाडीत जन्माला आल्यासारखा.

अमेरिकेला जायला नाही मिळालं तर घटस्फोट नाही का असं कोणी विचारलं नाही घनाला Sad , राधा तर तिची चूक असल्यासारखी का वागत होती कोण जाणे

कालचा भाग आवडला.. विशेषतः राधा आणि तिचे बाबा यांचा फोनवरचा संवाद आणि अभिनय फारच आवडला Happy
अर्थात हा भाग एका महिन्यापूर्वीच यायला हरकत नव्हती Wink

त्यावर राधा आणि आजी यांच्या संतापाचा कडेलोट झालेला बघायला आवडला असता. अजूनही दोन दगडांवर पाय ठेवतोय आणि कबूलही करत नाही.>>अगदी अगदी
'मला माझे चार दिवस हवे' म्हणे....इतके दिवस इतर सगळ्यांचे होते जणू.
राधाच्या वडिलांनी राधाला आता तिथे वेळ घालवु नको, सरळ घरी ये असे सांगावे.
घनाचे चार दिवस, कुहूचा साखरपुडा, इतर सगळ्यांची मने संभाळून मग तिने घर सोडावे. का?

विशेषतः राधा आणि तिचे बाबा यांचा फोनवरचा संवाद आणि अभिनय फारच आवडला

+१.
मुक्ता बर्वे फारच गुणी अभिनेत्री आहे. रडू येणे म्हणजे नुसते डोळ्यातून पाणी काढणे नाही, हे तिला उत्तम कळते. कालच्या भागात तिचा फोनवर बोलतांनाचा अभिनय अप्रतिम होता ! हुंदके, आवंढा गिळणे, शब्द घशात अडकणे, आवाज ओला होणे, आवाजातले चढ-उतार, पॉजेस हे सर्व इतके अस्सल वाटले की मुक्ताला दाद दिल्याशिवाय राहवत नाही.

हॅट्स ऑफ.

<<मुक्ता बर्वे फारच गुणी अभिनेत्री आहे. रडू येणे म्हणजे नुसते डोळ्यातून पाणी काढणे नाही, हे तिला उत्तम कळते. कालच्या भागात तिचा फोनवर बोलतांनाचा अभिनय अप्रतिम होता ! हुंदके, आवंढा गिळणे, शब्द घशात अडकणे, आवाज ओला होणे, आवाजातले चढ-उतार, पॉजेस हे सर्व इतके अस्सल वाटले की मुक्ताला दाद दिल्याशिवाय राहवत नाही.>>+१००

मुक्ता खरच ग्रेट आहे ! तिच्या साठीच तर बरेच जण सीरिअल पाहतात .

मी गेले कित्येक दिवस माबो वरील लेख वाचते आहे. खूपच छान लिहितात सगळे. आपल्या मनातील विविध विषयावरील मतं छान मांडली जातात इथे. एलादुगो वरील लोकांच्या प्रतिक्रिया छान आहेत. योगी आपल्याला अनुमोदन. टीका करणारे सगळेच शत्रू नसतात. प्रथितयश कलाकारांकडून अपेक्षा उंचावल्या जातात. राजवाडेंनी आधी फारच चांगल्या कलाकृती दिलेल्या आहेत तरी आपले बरेचसे प्रश्न योग्य आहेत. टीकेत आकस जाणवत नाही, आपण कलाकारांना नावं ठेवलेली नाहीत, कथेतील विसंगतीला नावं ठेवली आहेत. कदाचित कथानक भरकटण्यात वाहिनीवाले जबाबदार असतील. सब वरच्या मालिका बालिश वाटतात पण त्या संपूर्ण कुटुंबांनी एकत्रित बघण्यासारख्या तरी असतात. असो चर्चा चालू ठेवा. आणखी एक गोष्ट माबोवर फक्त एलादुगो वरच चर्चा जास्त आहे हे त्यातील कलाकारांचे यशच आहे म्हणूनच अपेक्षा जास्त उंचावतात आणि राजवाडे यांची दिग्दर्शक म्हणून जबाबदारीही वाढते.

पौर्णिमा, अपडेटस बद्दल खूप खूप धन्यवाद! माझे शुक्र आणि शनि दोन्ही एपिसोड्स चुकले होते.

>>शेवटी घनाने मुझे कुछ कहना है म्हटल्यावर काल जे काही सांगितले

काय सांगितलं?

>>घनाचे चार दिवस, कुहूचा साखरपुडा, इतर सगळ्यांची मने संभाळून मग तिने घर सोडावे. का?

+१००००००००

आता सत्तावीसपर्यंत मालिका ढकलायची म्हणून >>
हि मालीका २६ तारखेला संपत आहे का?
दुसर्‍या मालीकेची जाहीरात येते आहे पण ती ९.००पी एम ची आहे ना?

घनाने सांगितले की अंगद कश्यपच्या कंपनीत त्याच्यासह तिघांना नोकरी मिळालीय. काही महिन्यांनी त्यातल्या एकालाच अमेरिकेला जायची संधी मिळेल. लग्नाचं काय करायचं याचा विचार करायला त्याला चार दिवस एकट्याला हवेत. (म्हणजे अमेरिका मिळाली तर राधा नको, अमेरिका नाही मिळाली तर राधा आहेच असे का? मात्र हे त्याला कोणीही विचारले नाही. राधाला सांगितले होते की कुहूचा साखरपुडा झाला की घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सह्या करायच्या त्याचे काय तेही माहीत नाही.) वर राधा घनाच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही जवळ आला आहे. (एका वर्षात दिवाळी बिवाळी कशी नाही आली ते विचारायचे नाही).
काँट्रॅक्ट मॅरेजची कल्पना माझी एकट्याची होती हे घनाने अगदी ठासून सांगितले. राधाने निर्णय दोघांचा होता असे सांगितल्यावरही नाही माझा एकट्याचाच.

मी शुक्रवारच्या भागातली पहिली वीस मिनिटे पाहिली नाहीत. आजीबाईंसमोर उभे राहिल्यावर राधानेच सगळी बडबड+रडारड केली, आपल्या चुकांचा पाढा वाचला आणि घना मख्ख चेहरा करून उभा होता असे शेवटच्या दहा मिनिटांत वाटले. तेव्हा राधाने आजीलाही मी सासरच्या मंडळींत तशीच घनामध्येही गुंतलेय पण घना काही माझ्यात गुंतलेला नाही असे सांगितले.

Pages