एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पुढचा भाग शेवटाला पाहिला त्यात घना मला माझे हे चार दिवस हवेत व.व. बडबड करतो. हे कसले चार दिवस हवेत त्याला?? याआधी कोणी थांबवलेले त्याला??

लग्नाला वर्श कधी झाले? मॅरेज ६ महिन्याचेच होते ना?

लग्नाला वर्श कधी झाले? मॅरेज ६ महिन्याचेच होते ना?>> तेच की!
जाऊदे. लॉजिकच्या जास्त मागे लागू नये हेच बरे. अन्य मालिकांमध्ये शोधतो का आपण? - अशी आपलीच समजूत काढावी.

घ-धाची प्रेमकहाणी हळूहळू तयार होईपर्यंत कथा मस्त चालू होती.
त्यानंतर डिव्होर्सचे भिजत घोंगडे, अबीर, मानसिक उलघाल, घरच्यांची ढवळाढवळ, कुहू-प्रभात हे खूपच इश्यूज एकाचवेळी आले आणि वर डेडलाईनचे प्रेशर- त्यामुळे मालिका गंडली आहे Sad अबीरची एन्ट्री एकदम प्रॉमिसिंग होती. त्यानंतर पुढे काहीच म्हणावे इतके घडले नाही Sad

आता राधाची मंगळागौर ??????????? चला ग मंगळागौरीचा करू या जागर..... काय चाललय काय?

ह्म्म्म...धन्यवाद भरत. एकूणात घनाची व्यक्तिरेखा दिवसेदिवस अधिक स्वार्थी होत चाललेय. शेवटच्या काही एपिसोडमध्ये त्याच्या ह्या वागण्यामागे काही महान (पण अतार्किक) कारण दाखवून प्रेक्षकांना धोबीपछाड घालायचा तर राजवाडे आणि कंपनीचा बेत नाही ना? म्हणजे घना अमेरिकेला 'वॉर ऑन टेरर' मध्ये टेक्निकल सहाय्य करायला जातोय आणि तालिबान्यांकडून आपण मारले गेलो तर आपल्यामागे राधाची परवड होऊ नये वगैरे उदात्त विचार तर नसावा ना...:-)

घना अमेरिकेला 'वॉर ऑन टेरर' मध्ये टेक्निकल सहाय्य करायला जातोय आणि तालिबान्यांकडून आपण मारले गेलो तर .........................>>>>>

@स्वप्ना_राज..... यू हॅव व अ‍ॅन एक्सलंट क्रिएटिव माइण्ड. इफ नॉट, यू शुड बी इन अ‍ॅडवर्टायझिंग वर्ल्ड. Happy

स्वप्ना_राज..... यू हॅव व अ‍ॅन एक्सलंट क्रिएटिव माइण्ड. इफ नॉट, यू शुड बी इन अ‍ॅडवर्टायझिंग वर्ल्ड. >>>>>>>>> तेच म्हणतेय मी Happy

'वॉर ऑन टेरर' मध्ये टेक्निकल सहाय्य करायला जातोय आणि तालिबान्यांकडून आपण मारले गेलो तर आपल्यामागे राधाची परवड होऊ नये वगैरे उदात्त विचार तर नसावा ना...>> अगगगगं.. Lol

त्यामुळे मालिका गंडली आहे >> मग काय तर?? इतर जोड्या जुळवा करण्यापेक्षा फक्त राधा-घना जोडीकडे लक्ष दिलं अस्त तर अज्जून काय्तरी चांगलं कथानक बघाय्ला मिळालं अस्त.. पण बाकीच्या सिरेलींपेक्षा खूsssssssपssssssssच सुसह्य आहे अजूनही..

स्वप्ना.. Lol

अरे तो घना काहीतरी बोलणार होता आजीसमोर ना..... तो भाग झाला का????

काय बोलला काय नक्की तो तुंदिलतनू.......... अपडेट्स प्लीज. (नेटवर नेटाने एपिसोड पाहाण्याचा आळस आहे, प्लीज हेल्पच...... Proud )

यू शुड बी इन अ‍ॅडवर्टायझिंग वर्ल्ड
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

व्हू नोज....... असेलही ती Proud मला तर कधीकधी स्वप्ना एखाद्या चॅनलमध्येच क्रियेटिव्ह हेड म्हणून कामाला असल्यासारखी वाटते........ नाही नाही म्हणत किती मालिकांवर तिचं बारीक लक्श्य असतं...... माईआजींसारखं..........

स्वप्ने, "आजी तुझा आशीर्वाद Wink "

म्हणजे घना अमेरिकेला 'वॉर ऑन टेरर' मध्ये टेक्निकल सहाय्य करायला जातोय आणि तालिबान्यांकडून आपण मारले गेलो तर आपल्यामागे राधाची परवड होऊ नये वगैरे उदात्त विचार तर नसावा ना <<<
हा भारी होता Lol

म्हणजे घना अमेरिकेला 'वॉर ऑन टेरर' मध्ये टेक्निकल सहाय्य करायला जातोय आणि तालिबान्यांकडून आपण मारले गेलो तर आपल्यामागे राधाची परवड होऊ नये वगैरे उदात्त विचार तर नसावा ना <<< Rofl
हे तुलाच सुचू जाणे स्वप्ना.

कुहूची स्टोरी यात आणायची ज्याची आयडिया त्याला मी आज मनातल्या मनात प्रचंड फटके मारले..
अरे किती बोर कराल त्या सोनचाफा,साबुदाण्याने? तीदोघं , त्या दोघी काकू, तो ज्ञाना!! सगळे वैत्ताग्ग!!
Angry

म्हणजे घना अमेरिकेला 'वॉर ऑन टेरर' मध्ये टेक्निकल सहाय्य करायला जातोय आणि तालिबान्यांकडून आपण मारले गेलो तर आपल्यामागे राधाची परवड होऊ नये वगैरे उदात्त विचार तर नसावा ना >> Rofl
तो मागे ओसामामाऊली आणि ओबामामाऊलीचा पण भारी होता!! Lol

सिरियल सुरु झाल्यापासुन घनाराधा दोघही नाही असा पहिलाच एपिसोड असावा अती टाईमपास..
मालिका सुरवातीपासुन चांगलीच होती आता जरा ट्रॅक सोडुन चाललिय अस वाटतय.

६ महिन्यांचं काँट्रॅक्ट मॅरेज वर्षाच झालं ? Uhoh
लग्नाची तारीख त्यांनी २३ कि २४ मार्च अगदी प्रेक्षकांना पत्रिका दाखवत अनाउन्स करून दाखवली सिरियल मधे , राइट ?
अता एकिकडे पहिला मंगळागौरीचा सिझन वगैरे म्हणतायेत, मग वर्षं कसं झालं Uhoh

मला वाटत होतं कि कि ९ ला साखरपुडा, दहाला घधा डिव्होर्स फाइल करणार आणि ११ ला ठरल्या प्रमाणे संपेल सिरियल !
वाट लागलीये पूर्ण !!

मालिकेत सध्या चाललेल्या आचरटपणाचा जाम कंटाळा आलाय. काहीही खपवतायत त्या डिओर्सच्या नावावर Angry

राधा घना सोडून.. अख्ही दुनिया दाखवत बसलेत>>
जाउदे, कुहुला दाखवतात तोवर बघणेबल आहे मालिका. Wink

स्वप्ना- उदात्त विचार Rofl

कालच्या एपिसोड मध्ये ज्ञाना उगाच भाव खात होता....
मी कोपलोय म्हणे...... Happy
त्याच्यातले आणि प्रभात मधले संवाद काहीतरीच होते....

मंडळि असे कोपु नका.. या मालिकेत एकेकाने सुट्टीवर जायची परंपरा पहिल्यापासुन जोपासली गेलीय. सध्या लेखक, दिग्दर्शक इ.इ. पडद्यामागची मंडळी सुट्टीवर गेलीत. जाताना फायर ब्रिगेडचा होज मालिकेत टाकुन नळ चालु करुन गेलीत. आता ती मंडळी परतोनी येईपर्यंत पाहायचे पुलाखालुन म्हंजे आप्लं मालिकेतुन किती पाणी वाहतंय ते...

काल ते मंगळागौरीचं पाहिल्यापासुन मी जराशी धसकलेयच.. मालिका एखादा आठवडा पुर्ण स्किपच करावी असा विचार काल मालिका सुरू व्हाय्च्या आधी डोक्यात घोळू लागलेला, मालिका संपेसंपेपर्यंत त्यावर पुर्ण शिक्कामोर्तब झाले.

टी जे एस बी च्या अ‍ॅड मध्ये, 'सर्व सुरळीत होईल हे मला माहितीच होतं' असे घना म्हणतोय... राजवाडे असं आडून काही सुचवतील वाटलं नव्हतं हं! Wink

ते चार दिवस - घनाची बडबड - जॉबमध्ये तिघे सिलेक्ट झालेत, त्यातल्या एकाला अमेरिकासहल घडणार. त्या तिघात घना नसला तर मग इथेच राहायचे आणि घटस्फोट घ्याय्ची गरज बहुतेक पडत नाही आता असा विचार कराय्चा... . जर घना सहलीवर निघाला मग घटस्फोट घ्यायची गरज बहुतेक आहे आता असा विचार करायचा..... हा गहन विचार करायला त्याला ते चार दिवस हवेत. बहुतेक हेच असावे कारण मी नेटवर शोधुन हे पाहिले आणि त्याच्या त्या चाचरत बोलण्यातुन मला हा शोध लागला.

राधाने हे ऐकल्यावर फक्त बाहेर निघुन जायचे काम केले. तिथे मी असते तर आधीच आणलेल्या घटस्फोटाच्या कागदावर सही करुन ते घना, विनोद नी आज्जीसमोर टाकले असते आणि बॅग भरण्याइतपतही वेळ वाया न घालवता तडक आधी या असल्या माणसाच्या घराबाहेर आणि आयुष्याबाहेर पडले असते.

Pages