दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते (तरही)

Submitted by शेळी on 1 August, 2012 - 13:51

दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते
हास्य क्षणभंगूर असते दु:ख कायम साचते

दूर तू गेलीस हे मी आजही ना मानतो
माझिया श्वासात तूझे रोज पैंजण वाजते

फल धरावे याजसाठी भ्रमर तो बोलावला
पण फुलांची पाकळी मग का उगाचच लाजते

भाग्य सार्‍या मानवांचे मनगटातच साठले
माणसांची व्यर्थ दृष्टी पत्रिकेला वाचते

रेशमाचा गोड धागा प्रेमबंधी बांधला
दु:ख त्याचे त्यास ठावे ते जयाला काचते

प्रेरणा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूर तू गेलीस हे मी आजही ना मानतो>>>>>>>>>>>>>>>.

हा शेर खटकला. आपले सदस्यत्व पहिले. अवलोकनात आपण 'स्त्री' असे लिहिले आहे .म्हणून हा शेर पचला नाही (आपण कुणाचे तरी तोतया आहात अशी शन्का बाळगणे त्यामुळे भाग पडते )

असो
हा शेर मी असा वाचला ..................
(अर्थात तत्पूर्वी माझे दोन्ही कान पकडून , माझे 'पर्यायीगझल'-गुरुजी यान्चे नाव स्मरले आहे)

दूर तू गेलास हे मी आजही ना मानते
तू दिलेले , माझिया श्वासात..(../पायात) पैंजण वाजते !!

असे केल्याने हा शेर मतला-ए सानी होवू शकतो ..............हेही विशेष!!

आपला एक अल्पज्ञानी सह माययबोलीकर
वै व कु

दूर तू गेलीस हे मी आजही ना मानतो>>>>>>>>>>>>>>>.

हा शेर खटकला. आपले सदस्यत्व पहिले. अवलोकनात आपण 'स्त्री' असे लिहिले आहे .म्हणून हा शेर पचला नाही (आपण कुणाचे तरी तोतया आहात अशी शन्का बाळगणे त्यामुळे भाग पडते )

<<

हे मायबोलीवरुन अनेकदा हाकलून लावलेले "जागोमोहनप्यारे" उर्फ "जागो मोहन प्यारे" उर्फ "कमलाबाई सोनटक्के" उर्फ "नर्मदाबाई बारटक्के" उर्फ वगैरे उर्फ वगैरे आहेत.

धन्यवाद रॉबिन्हुड

असो

आपल्या अवलोकनात आपली माहिती देवूशकाल काय??(शक्यतो खरीखुरी द्या )

माझ्या विपूत दिलीत तरी चालेल
धन्यवाद

हा शेर खटकला. आपले सदस्यत्व पहिले. अवलोकनात आपण 'स्त्री' असे लिहिले आहे .म्हणून हा शेर पचला नाही (आपण कुणाचे तरी तोतया आहात अशी शन्का बाळगणे त्यामुळे भाग पडते )

नाव, आय डी, त्यात लिहिलेले लिंग, गाव यांचा वास्तवाशी संबंध असतो का? कवितेतील शेरातील कर्ता पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी कुणीही असू शकतो...

आपल्या अवलोकनात आपली माहिती देवूशकाल काय??(शक्यतो खरीखुरी द्या )

काय करणार माहिती घेऊन? आता दिलेली माहितीही द्यावी लागते म्हणुन दिलेली आहे. त्या रोबिन हुडाने तेही दिलेले नाही.. नुस्त्या रेष मारल्या आहेत.

चिलू नको ......
असो असो ....
उगी उगी उगी....
हत् रे वैवकु ..!
अमच्या 'मे-अ-मे' ला त्रास...
दिलास तल बग.....!!
तुजं घल पाव्सात बान्धीन !!!!!!!

__________

काय करणार माहिती घेऊन???:अओ:
........त्याचं पन घल पाव्सात बान्धीन !!!!!!:D

आधी पाऊस तर पडू द्या.. मग बांधा सगळ्यांची घरं पावसात

नभी मेघ हिंडायचे बंद झाले... विसरलाय काय गुरुंची गझल? Proud

दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते
गर्व हरणे हर जिवाचा हेच नियती जाणते

मेघ झाले पांढरे पाऊस कोठे हरवला
श्वेतवस्त्रा मूक विधवा त्यातुनी डोकावते

वैभ्या, पैसे नेटवर उधळू नको, सत्पात्री वापर, तुझेच भले होईल

कोण खरा, कोण खोटा, यात जीव अडकवू नको

ही सगळी माया आहे