दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते

दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते (तरही)

Submitted by शेळी on 1 August, 2012 - 13:51

दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते
हास्य क्षणभंगूर असते दु:ख कायम साचते

दूर तू गेलीस हे मी आजही ना मानतो
माझिया श्वासात तूझे रोज पैंजण वाजते

फल धरावे याजसाठी भ्रमर तो बोलावला
पण फुलांची पाकळी मग का उगाचच लाजते

भाग्य सार्‍या मानवांचे मनगटातच साठले
माणसांची व्यर्थ दृष्टी पत्रिकेला वाचते

रेशमाचा गोड धागा प्रेमबंधी बांधला
दु:ख त्याचे त्यास ठावे ते जयाला काचते

प्रेरणा

Subscribe to RSS - दु:ख प्रत्येकास असते कोणते ना कोणते