अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

Submitted by मी-भास्कर on 31 July, 2012 - 03:36

अण्णा, जिंकण्यासाठी लढताय कि..[१]

राजकारणात उतरल्यावर तर कुस्ती अशा विविध १०० अगडबंब सुमोंशी आहे हे नक्की.
Anna and corruption.jpg

आदरणीय अण्णा,
सादर दंडवत.
एक समर्थक या नात्याने हे पत्र.
कोणत्याही सत्तेला एक व्यवस्था चालवावी लागते. लोकशाही मार्गाने सत्ताप्रदान हा सर्वात उत्तम मार्ग मानला जातो. सत्तेचा कल कॆंद्रीकरणाकडेच असतो. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि अनिर्बंध सत्ता संपूर्ण भ्रष्ट करते. सत्तेतील माणसे भ्रष्ट होण्यापासून रोखण्यासाठी चांगली घटना, कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असते. आपल्या लोकशाही-व्यवस्थेत मुख्य सत्ता सत्तारूढ पक्षाकडे एकवटली आहे. विरोधी पक्ष स्वच्छ, जागरूक व प्रबळ असेल तर तो सत्तेवर अंकुश ठेवू शकतो. आपल्या इथे या सर्वांचे तीन तेरा वाजल्याने एक फार अवघड लढाई आपल्याला या वयात हाती घ्यावी लागली आहे.
भ्रष्ट व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशा अती बलिष्ट वर्गाशी हा संघर्ष आहे. यांच्याच आश्रयाला असलेला वर्गही प्रचंड संख्येने आहे. ही ताकदच संसदेत कोण जाणार हे ठरवते. याच व्यवस्थेने सर्वसामान्यांनाही इच्छा असो वा नसो भ्रष्टाचाराची सवय लावली आहे. किंबहुना असे म्हणता येईल की जवळपास प्रत्येक जण ( खर्‍या अर्थाने भ्रष्ट नसला तरी ) कोणत्या ना कोणत्या कारणाने भ्रष्ट ठरविला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कोणत्याही पाठिराख्याला ’भ्रष्टाचारी’ म्हणून ’अंदर’ करून बदनाम करणे सत्तेला सहज शक्य आहे. त्यामुळे शक्तीच्या दृष्टीने ही अगदी विषम लढाईआहे.
अंतीमतः पुरेशा संख्याबळाने तुमचे समर्थक संसदेत असल्याशिवाय भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी आवश्यक ते बदल होऊच शकत नाहीत. पाठीशी असणारे संख्याबळ जास्तीत जास्त वाढवणे हेच फक्त तुमच्या हाती आहे. सरतेशेवटी विरोधकांना निवडणुकीत पराभूत करून चळवळीच्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी संख्याबळ हवेच. तुमची ही शक्ती वाढूच नये याची पूर्ण खबरदारी तुमचे विरोधक घेताहेत आणि आपण त्यांच्या सापळ्यात नकळत अडकता असे आम्हाला वाटते.
तुमच्या मागे अल्पसंख्य व दलीत नाहीत असे आरोप केले की तुमची टीम इमेज क्रिएशनच्या मागे आपली शक्ती वाया घालविते. तुमच्या मागे संघ आहे म्हटले की तो कसा नाही हे सांगण्यासाठी आटापिटा केला जातो. आता उद्या तुमच्यात आदिवासी कोठे आहेत असे म्हटले की पुन्हा शक्तिव्यय. हे सर्व करतांना आपला शक्तीव्यय तर होतोच पण संख्याबळही वाढत नाही, असे आपल्याला वाटत नाही का? अगदी ताजे उदाहरण रामदेवबाबा आणी मोदी भेटीचे आहे. तुमचे विरोधक या भेटीबाबत आक्षेप घेऊन जुनेच 'डिव्हाईड अँड काँकर' चे तंत्र वापरत आहेत. उद्या कोणी आदिवासी नेता तुम्हाला पाठींबा द्यायला आला तर ते त्याला माओवादीही ठरवतील आणि तुमची देशद्रोह्यांशी हातमिळवणी आहे असे म्हणतील. मग पुन्हा शक्तिव्यय! असे असूनही आपण त्याच त्या सापळ्यात का अडकतां?
या ठिकाणी चर्चिलचे एक वाक्य आठवते. लढाईची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जाहीर केले की "हिटलरचा संपूर्ण पाडाव करण्यासाठी मी सैतानाची मदत घेण्यासही मागेपुढे पाहाणार नाही."
इतक्या टोकाचे जरी नाही तरी -
" भ्रष्टाचाराच्या लढाईत प्रामाणिकपणे साथ देणार्‍या कोणाही भारतीयाची मी मदत घेईन." असे ठणकावून सांगण्यात आपल्याला काय अडचण आहे?
आणिबाणीविरुद्ध लढतांना जयप्रकाशांनी हेच केले होते आणि म्हणून ते जिंकले. त्यामुळे
' दिल्ली तो अभि बहोत दूर है| ' हेच खरे!

16 September, 2012
अण्णा नवी टिम निवडून आंदोलन सुरू करणार असल्याचे वाचले.
या नव्या टीमच्या आंदोलनाचा मागोवा घ्यायचा आहे खालील धाग्यावर :
http://www.maayboli.com/node/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विषयावर खूप चर्चा झालेली आहे. मधल्या काळात अण्णांबद्दल भ्रमनिरास झाला. सरकारकडून अपेक्षा नाहीतच. भ्रष्टाचार या विषयावर बोलण्याचं नैतिक धैर्य कुणाच्यात आहे हे समजत नाही. अण्णा भ्रष्ट नाहीत, पण आंदोलनाला आवश्यक असणारं प्रगल्भ नेतृत्व ते देऊ शकत नाहीत. हे आंदोलन गुजरातमधे नऊ वर्षे लोकायुक्त नाही याबद्दल चकार शब्द बोलत नाही, येडीयुरप्पा यांच्याबद्दल मौन बाळगून राहतं आणि भ्रष्टाचा-यांविरुद्ध बोलण्याऐवजी संसद व संसदीय लोकशाहीबद्दल भाषणं ठोकत राहतं.

पत्ते सर्वांचेच उघड झालेले असल्याने आता गेल्या वेळचा क्लोजचा गेम रंगणार नाही हे नक्की !

सॉरी ब्लाईंड गेम म्हणतात त्याला ! त्या त्या क्षेत्रात दर्दी असावं लागतं, नाहीतर अशा चुका होतात, नाही का ?

सरतेशेवटी अण्णांना निवडणूकीच्या रणमैदानात राजकीय पक्ष म्हणून उतरविण्यात राजकारणी लोकांनी यश मिळवलच म्हणायच!
आता तर ही लढाई आणखीच विषम होणार. या खेळात अरूण भाटिया, शेषन, अविनाश धर्माधिकारी, शरद जोशी यांचे काय झाले हे आपण पाहिले आहे. यामुळे राजकीय पक्ष स्थापण्यापेक्षा आणि या रिंगणात सरळ न उतरता मतदानावर प्रभाव पाडणे एवढेच करणे योग्य ठरेल. जयप्रकाश देखील एकेकाळी राजकारणात होते तरीहि त्यांनी देखील जनता पक्ष उभा केला तो आधीच अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांच्या एकिकरणातून. अण्णा व त्यांचे सहकारी कांही मुरब्बी राजकारणी नव्हेत. फ़ेसबुकवर मते देणाऱ्यांमधून पक्ष उभा राहू शकत नाही. हे मुठभर लोक मते द्यायला तरी जातील का याची खात्री नाही. त्यापेक्षा अण्णांनी ज्या आम्दोलनांद्वारे महाराष्ट्रातिल चार मंत्र्यांना घरि जायला भाग पाडले ते यशही काही कमि नव्हते.
त्यापेक्षा हे अधिक परिणामकारक होईल:
(अ) उभ्या असलेल्या उमेदवारांची खालील बाबतीत सविस्तर माहिती मिळवून ती मतदारांसमोर ठेवणे व मतदारांना मतदान करतांना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे याबद्दल एक सर्वसाधारण मार्गदर्शन करणे हेच शक्यतेच्या कोटीतील आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे पुढील निवडणुकांमध्ये जरा बरे उमेदवार पक्षांकडून उभे केले जातील अशी अपेक्षा आहे.
उमेदवारांबाबत खालील माहिती जमवावी लागेल :
१) सत्तेत आल्यापासून त्याच्या व त्याच्या नातेवाईकांच्या संपत्तीची वाढ संशय यावा अशी वाढ झाली आहे काय?
२) त्याच्यावर दाखल झालेले खटले आणि त्यांचे तोपर्यंत लागलेले निकाल.
३) त्याने केलेली समाजसेवा वगैरे
(आ) शिवाय सुब्रम्हण्यम स्वामींनी न्यायालयात चालवलेल्या खटल्यांनी फार मोठी कामगिरी बजावली. तोही मार्ग चोखाळावा.
(इ)निवडणुक सुधारणांबाबत आग्रह धरावा.
ज्या जनतेच्या जोरावर आपण राजकिय पक्ष काढायचा म्हणता तिला इतकि स्वच्छ आणि उच्च दर्जाची संसद खरोखरच हवि आहे का हेहि तपासावे लागेल. त्याची सुरुवात अगदि ग्रामपंचायतिंच्या निवडणुकांपासुनच करावी लागेल.
’आधी पाया नि मग कळस’ कि ’आधी कळस नि मग पाया’ असा हा तिढा आहे. प्रयत्न तर प्रत्येक स्तरावर करावे लागतिल मतदानावर प्रभाव पाडण्यासाठि. निवडणुकीत ’पडण्यासाठी’ नव्हे.

या भास्करना ( उर्फ दासु याना) मायबोलिचे अण्णा अशी पदवी द्यायला हवी.

ते सारखेसारखे उपोषण करतात
आणि हे बंद करुनही पुन्हापुन्हा धागे काढतात.

Proud

असंगाशी संग आणि सतत कोलांटउड्या मारल्यामुळे अण्णा विश्वास गमावून बसले आहेत, एका चांगल्या आंदोलनाचा शेवट असा होईल असं वाटले नव्हते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अशा गोष्टीसाठी जो निग्रह लागतो, तो आहे का केजरीवाल, बेदी आणि मंडळीत? अण्णांचे ठीक आहे ते सैनिक होते आणि त्यांचे कार्यही मोठे आहे, पण त्यांच्या टीम मधील इतरांकडून अशी अपेक्षा नाही करता येणार.

@मेरो अल्ला मेहेरबान | 2 August, 2012 - 20:25
>>या भास्करना ( उर्फ दासु याना) मायबोलिचे अण्णा अशी पदवी द्यायला हवी. <<
मायबोली संस्था नात 'अण्णा'गिरी चालणार नाहि. माझा 'शेतकरी' व्हावा अशि इच्छा आहे काय?
>>उर्फ दासु <<
हे काय? कलले नाहि.

>>ते सारखेसारखे उपोषण करतात आणि हे बंद करुनही पुन्हापुन्हा धागे काढतात. ,<

याचा त्रास होत असेल तर दरबारि मंडळींचे पैशाला पासरी धागे उपल्ब्ध आहेत. तिथे मनोरंजन करून घेण्याचा पर्याय आहे. अवश्य जा.

मी-भास्कर,

अण्णांनी रिंगणात ना उतरता मतदारांवर प्रभाव टाकण्याचा मार्ग मलाही इष्ट वाटतो. उमेदवारांची संपूर्ण माहिती काढून त्यांची अंडीपिल्ली खोलून लोकांसमोर ठेवल्याने मतदारांना योग्य निर्णय घेण्यास वाव मिळेल (असे वाटते). तसेच आपली कुंडली उघडी पडण्याच्या भीतीने उमेदवारही वचकून राहतील. जर स्वच्छ लोकांना निवडवून आणता येत नसेल तर अस्वच्छ लोकांना पाडायला काय हरकत आहे?

आ.न.,
-गा.पै.

@गामापैलवान
पुर्ण सहमत.
एसेमेस द्वारा निर्णय घेण्याचि पद्धतहि आवडली नाही.
जनलोकपाल नको असलेले लोक निवडनुकीच्या खेळात अत्यंत तरबेज आहेत. त्यांनिच अण्णांना राजकीय पक्ष स्थापून निवडणुक लढ्वा असे एसेमेस मोठ्या प्रमाणात केले असावेत. आपल्याला सोईच्या बॅटल फील्ड मध्ये अण्णांना खेचून आनण्यात त्यांचे विरोधक यश मिळवणार असे दिसते.

मी-भास्कर व गा पै ,

उमेदवारांची सर्व माहीती आम जनते समोर यायला हवीच, पण त्यासाठी
निवडणुक आयोगाने पुढाकार घ्यायला हवा. नव्हे तो त्यांचा कामाचा भाग असावा.

देशाची अर्धी जनता निरक्षर असल्याने ही माहिती जनते पर्यंत कशी पोहोचवावी हा दुसरा सर्वात मोठा अडसर
ठरणार आहे. या शिवाय जनतेची स्मरण शक्तिही ईतकी कमी असते की अशा उमेदवारां बद्द्ल माहिति सतत
प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला जनते समोर मांडली जावी.

टिम अण्णाना एक राजकीय पर्याय देशाला द्यावा लागेल. सध्या आम जनतेला निवडणुकीच्या रिंगणात
चांगले पर्यायच उपलब्ध नाहीत, असे पर्याय उपलब्ध झाल्यास व त्या जागी अशी स्वच्छ प्रतीमेची माणसे
आली तरच चित्र बदलेल.

गेल्या महीन्यातच केरळातल्या CPI पक्षाच्या कुटील राजकारणाला वैतागुन पक्षातून बाहेर पडलेल्या टि पी
चंद्रशेखरन यांचा निघ्रुण खुन केला गेला. हा खुन CPI पक्षानेच घडवून आणला असल्याच बोलल
जातय, खुनामागच कारण चंद्रशेखरन ह्यानी नवीन पक्ष स्थापन करून CPI पक्षालाच आवाहन दिले होते.
सांगण्याचा मुद्दा हा की हे राजकारणी कुठल्याही थराला जावु शकतात.

२००८ च्या मुंबई हल्या नंतर पूर्ण भारत खडबडून जागा व्हायला हवा होता पण कालच्या पुण्याच्या बाँब
स्फोट प्रकरणातुन दिसून आले की महाराष्ट्र राज्य किती तयारीत आहे.

म् हाराष्ट्रात बाँब स्फोट होणे हे नित्याचच झाले आहे आणि स्फोटके निकामी करणार्या दलाला आपल्या
कामगीरी साठी नित्य तयार रहावे लागत असणार,तरीही स्फोटके निकामी करणार्या दलाला ४ -५वर्षा
नंतर ही ऊघड्या हातांनी आणि कुठल्या ही सुरक्षे शिवाय स्फोटके निकामी करावी लागतात ह्या वरून सर्व
कारभाराचा अंदाज येऊ शकेल.

चांगल लोकपाल व त्याचा वापर करणार चांगल सरकार आल तरच देश वाचु शकेल.

ह्या धाग्या वर कोणी येऊन आपले द्रूष्टीकोण समोर ठेवणार नाही याची ही मला खात्री आहे. काही लोक काही
तरी कुचकट लिहीतीलच

या खेळात अरूण भाटिया, शेषन, अविनाश धर्माधिकारी, शरद जोशी यांचे काय झाले हे आपण पाहिले आहे.
>>>
दुर्दैवाने या सर्व व्यक्ती अहंमन्य आणि नैतिक अहंकाराने पछाडलेल्या होत्या.या सर्वांच्या मनात इतरांबद्दल कमालीची तुच्छता होती.त्यामुळे ते कधीही चांगले संघटक होऊ शकले नसते. माझ्याशिवाय जगात कोणीही स्वच्छ नाही ही त्यांची बेसिक धारणा होती. लोकशाहीमध्ये माझा हा मुद्दा आहे; माझे जितके बरोबर आहे तितके किंवा त्याहून अधिक दुसर्‍याचेही बरोबर असण्याची शक्यता आहे हे बेसिक प्रिन्सिपल असले पाहिजे . याचा त्यांच्या कडे अभाव होता. अण्णाही तितकेच अहंकारी ,तुसडे , प्रसिद्धी लोलुप व बालिश आहेत. (हे धर्माधिकारी सरांना विचारा...)केवळ वैयक्तिक चारित्र्य भ्रष्ताचारी नसणे आणि अहंकारी असणे हे कौतुकास्पद पण निरुपयोगी असते . शुद्ध चारित्र्याच्या गायीसारखे !! लीडर्शिप साठी त्याचा उपयोग होत नाही.
इथेच म. गांधींचे द्रष्टेपण दिसून येते.....

भारतात आजच्याघडीला कोणी द्रष्टा नेता असेल तर ते म्हणजे " इटा-ऐलीयन सोनिया गांधी व राहूल गांधी" बरोबर ना. बाकीचे सर्व अहंमन्य आणि नैतिक अहंकाराने पछाडलेले, इतरांबद्दल कमालीची तुच्छता असलेले असेच आहेत.

----------------------------------------
@ गामापैलवान
तुम्ही एकाद्या धाग्याच्या पानावरिल, प्रतिसादाची नेमकी तेवढीच लिंक कशी कॉपी करता याबद्दल माहीती देवू शकता का?

विजय आंग्रे, मी फायरफॉक्स वापरतो. त्यामध्ये फायरबग नावाचे अ‍ॅडऑन आहे. त्याच्यात स्पष्ट दिसते.
आ.न.,
-गा.पै.

जर स्वच्छ लोकांना निवडवून आणता येत नसेल तर अस्वच्छ लोकांना पाडायला काय हरकत आहे?

काय विनोद आहे! त्याला पाडणे शक्य असते तर त्या स्वच्छ माणसालाच निवडून नसते का आणले लोकानी??

या खेळात अरूण भाटिया, शेषन, अविनाश धर्माधिकारी, शरद जोशी यांचे काय झाले हे आपण पाहिले आहे.

यापैकी शरद जोशी यांच्याकडे निदान आपण राजकारणात का पडलो याची वैचारिक स्पष्टता तरी आहे. बाकी सारे सरकारी नोकरीत प्रशासकीय पदावर असताना मिळालेली प्रसिद्धी कॅश करायचा फसलेला प्रयत्न.

चांगल्या व्यक्तिंना वाईट विशेषणे द्यायची स्पर्धा असल्यागत सगळे सुटले आहेत. प्रसिद्धी कॅश काय, उद्धट काय अहंकारी काय. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. उचलले बोट बडवला कीबोर्ड!
अण्णा हजार्‍यांना शिव्या घालताना त्यांचे राळेगण शिंदीचे कार्य विचारात घ्या. एका दुष्काळी कुग्रामाचा कायापालट केला तो काय जनसंपर्क असल्याशिवाय? त्या गावचे लोक त्यांना देवासारखे मानतात ते काय ते उद्धट, अहंकारी, तुसडे आणि प्रसिद्धी लोलूप आहेत म्हणून? काय वाट्टेल ते बडबडायचे का? हा, आता
एका गावाला संघटित करणे आणि देशाला करणे ह्यात फरक आहे आणि ते त्यांना जमेलच असे नाही पण म्हणून वाट्टेल त्या शिव्याशाप देणे अत्यंत चूक आहे. सध्या देशाचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांना अहंकार नाही? तुसडेपणा नाही? प्रसिद्धी लोलुपता नाही? सोनियादेवींनी किती वेळा मुख्यमंत्र्यांना भेट नाकारली आहे? ज्येष्ठ युवा नेते आणि भावी पंतप्रधान राहुलजी ह्यांचे स्टंट विसरलात का? प्लास्टिकचे घमेले उचलून फोटो ऑप, शेकडो ब्लॅक कॅट कमांडोंच्या गराड्यात लोकल प्रवास करणे आणि मग त्याचे रकानेच्या रकाने भरून कौतुक? हे प्रसिद्धीलोलुपपण नाही का? आणि तरीही ते आमचे सर्वोच्च नेते. आपले महान बुद्धीमान, बुजुर्ग पंतप्रधान आपली पगडी त्याच्या चरणावर ठेवायला तयार. आपले पंतप्रधानपद हवे तेव्हा सोडू अशी ओपन ऑफर. ह्या पार्श्वभूमीवर अण्णा हे साक्षात देव वाटावेत अशी परिस्थिती आहे पण आपले बुद्धीवंत त्यांनाच शिविगाळ करण्यात धन्य मानतात.
अविनाश धर्माधिकारींचे काय? ते निवडणुक लढवत असताना भाजपने आपली लायकी दाखवली आणि कलमाडीला पाठिंबा दिला. कुठल्याही राजकीय फूटपट्टीने ह्या निर्णयाचे समर्थन होऊ शकत नाही. इथे भाजपने आपला मूर्खपणा दाखवला आणि एका चांगल्या नेत्याला पाठिंबा देऊन निदान नैतिक विजय मिळवायची संधी सोडली.
अविनाश धर्माधिकार्‍यांच्या लायकीपेक्षा भाजपची नालायकी लक्षात रहायला हवी होती. पण अपयश मिळाले की लोकांना काय वाट्टेल ते बोलावेसे वाटते ही वस्तुस्थिती आहे.
उद्धटपणात आपले अजित पवार काय कमी आहेत का? पण ते आज केव्हाही मुख्यमंत्री होऊ शकतात.

शेंडेनक्षत्र,
>>अण्णा हजार्‍यांना शिव्या घालताना त्यांचे राळेगण शिंदीचे कार्य<<
राळेगण सिद्धी आहे का ते?
शिंदी झालंय.

राळेगण सिद्धी असावे. क्षमस्व.
एक मुद्दा विसरताच कामा नये. कुठल्याही राजकीय राजघराण्याचा वारसा नाही, श्रीमंती नाही, फारसे शिक्षणही नाही. एक निवृत्त सैनिक. असा एक तरुण त्या गावात जातो. गावात दारुचे व्यसन मोठ्या प्रमाणात, दुष्काळ, शिक्षण कमी. हे सगळे असताना त्या गावकर्‍यांना काम करायला उद्युक्त करणे आणि त्यातून स्वच्छ दाखवता येतील अशी कामे करुन दाखवणे, जसे व्यसनमुक्ती, शाळा, पाझर तलाव, गोबर गॅस प्लँट आणि असे अनेक यशस्वी प्रयोग.
जनसंपर्क, नेतृत्वगुण, निस्वार्थीपणा असल्याशिवाय हे शक्य होईल असे मला तरी वाटत नाही.
मी कॉलेजात असताना, जेव्हा अण्णा हजारे हे नाव इतके सर्वमुखी नव्हते तेव्हा ह्या गावात जाऊन आलेलो आहे. आणि अण्णांना भेटलो आहे. त्यांनी मोठ्या कौतुकाने आम्हाला सगळे प्रकल्प दाखवले, आमच्याशी गप्पा मारल्या. आम्ही सगळे कुठलेतरी फाटके विद्यार्थी. एखादा उर्मट, अहंमन्य माणूस असता तर असे वागला असता का?
त्यांच्या बोलण्यात मला तरी उद्धटपणा जाणवला नाही. अमाप उत्साह, आमच्या सगळ्या प्रश्नांना त्यांच्या परीने तपशीलवार उत्तरे ते देत होते.

मला फार आवडतेय आता जे होतेय ते.

बाटली आणि नोट घेऊन मत'दान' करणार्‍यांसमोरच आता अण्णा+ आम्हाला मत द्या म्हणून येतील. आंदोलनासाठी पैसा उभे करणे त्यांना सहजसाध्य होते (कोणा आणि कशामुळे हा भाग अलाहिदा).निवडणुका लढविण्यासाठीही पैसे ते तितकेच सहजरित्या उभे करतील. किरण बेदींचा एक्स्पर्टिज उपयोगी पडेल. पण इथे खर्च केलेल्या पैशाचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यायला लागतो ही थोडीशी अडचण आहे. मुंबईतल्या उपोषणाच्या वेळी गोळा झालेल्या पैशाचा हिशेब द्यायला आम्ही बांधील नाही असे म्हणता येणार नाही. यातूनही पळवाट काढता येईलच. जसे इंडिया अगेन्स्ट करप्शन हे एक जनआंदोलन असून संस्था नाही असे सांगता येईल तसे आपले उमेदवार अपक्ष म्हणून उभे करता येतील. (पक्षांतरबंदीचा कायदा आड येणार नसेल तर).

अण्णांच्या आंदोलनाला फेसबुकवर लाइक करून,टोपी घालून पाठिंबा देणार्‍यांना जरा जास्त श्रम करावे लागतील. मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडून मतदानयंत्रावरची कळ दाबावी लागेल.

दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम साधणे, पाहुण्यांच्या हातून साप मारणे हे वाक्प्रचार यापुढे भाजपला खटकतील. रास्वसंलाही कोलांटी उडी मारावी लागेल.

अण्णा+ नक्की भ्रष्टाचाराविरुद्ध लढतात की आणखी कोणाविरुद्ध हे कळेल.
भ्रष्टाचाराखेरीज अन्य मुद्द्यांवर बोलण्यापूर्वी विचार करावा लागेल (कदाचित).
अण्णा+ना 'अमक्याला तुरुंगात टाका, तमक्याला जाहीर फाशी द्या, ढमक्याला फटके मारा, थोबाडीत द्या' यापेक्षा आम्ही काय काय करू हे सांगावे लागेल (कदाचित).

@ विजय कुलकर्णी फक्त शरद जोशींच्या बद्दल त्यांची वैचारिक बांधणी सुस्पष्ट होती.म्हणजे आर्थिक विचारधारा स्पष्ट होती. कोणताही पक्ष म्हनजे आर्थिक धोरणांचा समूह असतो असायला हवा. बाकीचे अनुषंगिक बाबी.वरही भूमिका घ्यायला लागते. पररष्ट्र धोरण आहे. सामाजिक न्यायाचे प्रश्न असतात. 'राजकारणात आलो तर जोड्याने मारा' अशी शरद जोशींची एके काळी घोषना होती. पुढे शे.सं. स्वतंत्र भारत पक्ष काडून राजकारणातली गम्मतही त्यानी अनुभवली. राजकारणात त्यांनी येऊ नये असे कोणी म्हनणार नाही मग 'जोड्याने मारा' हे कशासाठी? दुसरे असे की की शरद जोशींकडे शेतकर्‍यांचा भाव वगळता इतर बाबी समजा कश्मीर प्रश्न, शैक्षणिक धोरण या बाबत काय संकल्पना होत्या? औद्योगिक, कामगार क्षेत्राला ते काय देऊ इच्छित होते हे कधीच पुढे आले नाही. चीनशी संबंधाबात त्याना काय म्हणायचे होते? मग या बाबींशी संबंधित लोकांनी त्याना काय म्हणून मते द्यावीत. उदा. सामजिक आरक्षणाबात त्यांना काय म्हनायचे होते.(आणि टीम अण्णानाही...)यावर त्या क्षेत्रातील मतदार मते देणार ना? याला दोन्ही बाजू असू शकतात. आरक्षण ठेवणे गरजेचे आहे किंवा आता बस्स झाले ...आरक्षण पुरे अशा दोन भूमिका असू शकतात आणि त्यातली एक घ्यायलाच लागते. त्यानुसार त्या डोमेनमधली मंडळी तुम्हाला पाठिम्बा देणार. तुम्ही आयकरावर काय भूमिका घेणार, पेट्रोल सबसिडीचे काय करणार या सगळ्या गोष्टी पुरेशा स्पष्टपणे समाजापुढे ठेवणे पक्ष काढताना आवश्यक आहे त्याशिवाय पक्ष कसा उभा राहील्?पक्ष ह्या शब्दाचा अर्थच मुळी 'बाजू' 'साईड' असा आहे ना? मग तुम्ही काय लोकाना आम्ही फक्त शेतकर्‍याना बांधील आहोत अथवा जनलोकपाल आणणे आणि भ्रष्टाचार दूर करणे एवढ्यासाठीच आमच्या पक्षाचा 'अवतार' आहे आणि तेवढेच आम्ही करणार असे सांगणार?. नक्षलवादाचा उघड पुरस्कार करणारे अग्निवेशसारखे लोकही 'टीम अण्णा मध्ये होते. अजूनही त्यांचे समर्थन अण्णांना असू शकते.नक्षलवद्यांबाबत केजतीवाल अथवा विश्वास यांची मते नाही कळलेली....
'जो पर्यन्त हा माणूस शुद्ध शेतकरी हिताची गोष्ट करतो आहे तो पर्यन्त हा आमचा दृष्टीने अत्यन्त धोकादायक माणूस आहे. एकदा हा राजकारणाच्या आखाड्यात उतरला की त्याचा आम्ही खुर्दा करून टाकू ' असे उद्गार एका ज्येष्ठ राजकीय पुढार्‍याने खाजगी चर्चेत काढल्याचे प्रसिद्ध आहे. पुढे काय झाले त्याचा साक्षी इतिहास आहे त्यावर खरे तर भाष्य करायची आवश्यकता नाही. आणि 'टीम अण्णा पक्षा' चे काय होणार हे सांगायला कुडमुड्या जोशाची देखील गरज नाही.
@शेन्डे नक्ष्त्र , तुम्हाला अण्णांच्या गावाचे नावही नीट माहीत नाही यावरून तुम्हाला त्यांची आणि त्यांच्या अहंकाराची नीट कल्पना नसावी.शिवाय तुम्ही फार पूर्वी त्या गावी गेला होतात. तेव्हाचे अण्णा आणि आताचे अण्णा यातला फरक तुम्हाला माहीत नसावा. त्यांच्या भोवती गोळा झालेली भुतावळ स्थानिक आणि दिल्लीचीही याची तुम्हाला माहिती नाही. तुमच्या माहितीसाठी:- अण्णांनी २५ वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक गावात होऊ दिली नाही. स्वतःचा हट्ट चालवून (तो कसा याचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सगळ्यानी पाहिलेलेच आहे.) २५ वर्षे दबाव आणून बिनविरोध निवडणुका करून लोकशाहीचा गळा घोटला आणि पाहिजे ते लोक ग्रामपंचायतीत बसवले.२५ वर्षानन्तर तरुणांनी या विरुद्ध बंड पुकारून निवडणुका घ्यायला लावले त्यनन्तर १० वर्षे अण्णा समर्थक लोक स्थानिक ग्रामपंचायतीत पराभूत झाले. त्यावर' माझे कसले आले आहे पॅनेल? मी काय राजकारणी आहे काय?' अशी भूमिका या विश्वामित्राने घेतली. जरा स्थानिक पत्रकारांशी संपर्क ठेवा , तुम्हाला अलिकडे २५-३० वर्षे जायला सवड झालीए नसेल तर. पाहिजेच असेल तर अण्णांच्या संस्थेतील लोकांचे प्रकारही कळतील तुम्हाला. प्रा. भोसले हे नाव राळेगण परिवाराच्या लोकांपुढे नुसते उच्चारा शेन्डेबुवा , कसे थरथरू लागतात हे पहायला तुम्हाला २५-वर्षानन्तर का होईना राळेगण शिन्दी/सिद्धी ला जायला लागेल.(रच्याकने , या गावाचे नाव राळेगण शिंदी च होते ,जवळच दुसरे राळेगण थेरपाळ नावाचे गाव असल्याने ओळखण्यासाठी. तिथे शिंदीची झाडे खूप असल्याने शिंदीचं राळेगण अशी त्याची उपपत्ती आहे. शिंदी हे झाड तुम्ही पाहिले नसेलच २५ वर्षापूर्वी तुम्ही गेले होते तेव्हा अण्णांच्या चरणाकडे पहतापहाता वर पाहिले असते तर तीही दिसली असती. तर अण्णा ही 'सिद्धी' तिथे प्रप्त झाल्याने अण्णा त्याचा उल्लेख 'सिद्धीचं राळेगण ' असं करू लागले व ते नाव रूढ झाले आहे.)
त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आता पक्ष स्थापन होऊन 'दूध भैया देतो आणि पाणी नळाला येते' हे आणि एवढेच माहीत असलेली टीम आता देश चालव्णार आहेत. बीटी कॉटन आणि बीटी वांगी शेतकर्‍याला फायदेशीर की तोट्याची यावर प्रशान्त भूषण , बेदी म्याडमची मते ऐकणे ज्ञानात भर टाकणारी निश्चितच असेल नाही? Proud

डॉ बाबा आढाव, अविनाश धर्माधिकारी,ग प्र प्रधान ही मान्यवर मंडळी एके काळी अण्णांच्या आंदोलनात होती . अण्णांची लोकप्रिअता व आपल्या वैचारिक संकल्पना याचा मिलाफ करून काही वेगळा पर्याय आपण देऊ शकू या कल्पनेतून ही मंडळी अण्णांबरोबर काम करू इच्छित होती. त्या 'एकीचे' पुढे काय झाले ? ही मंडळी अण्णांपासून दूर का गेली याबाबत अभ्यास करावा. (या संदभात निखिल वागळे यानी त्यांच्या कार्यक्रमात थेट बाबा आढावानाच हा प्रश्न विचार्ला होता त्याचे स्प्ष्त उत्तर बाबानी त्याना शोभेल अशा शालीनतेने दिले होते). बहुधाडॉ. आढाव, अविनाश धर्माधिकारी, ग प्र प्रधान सर यांच्या पेक्षा बेदी, केजरीवाल, भूषन, विश्वास ,हे जास्त चारित्र्यसंपन्न असावेत....
अण्णांच्या चळवळीतील पुरेशी वैचारिक स्पष्टता असलेले डॉ विश्वम्भर चौधरी याना मुम्बईच्या आन्दोलनात स्तेजवरून या दिल्लीवाल्यानी हकलून दिले होते. ते चौधरीही आता टीमच्या धोरणांबद्दल किती असहायतेने बोलतात हे टीव्हीवरच पहावे.....

<बहुधाडॉ. आढाव, अविनाश धर्माधिकारी, ग प्र प्रधान सर यांच्या पेक्षा बेदी, केजरीवाल, भूषन, विश्वास ,हे जास्त चारित्र्यसंपन्न असावे> अण्णांनी आपले सहकारी (स्वतःहून) निवडले होते का? त्या लोकांनी अण्णांना निवडून आपल्याबरोबर बोलावले, तुम्हीच आमचा म्होरक्या असे सांगितले असे वाचल्याचे आठवते. अर्थात यामुळे अण्णांवरची आपल्या अनुयायांच्या/सहकार्‍यांच्या बाबतची जबाबदारी कमी होते असे नाही.

>>अपयश मिळाले की लोकांना काय वाट्टेल ते बोलावेसे वाटते ही वस्तुस्थिती आहे. <<
हे वैश्विक सत्य आहे. सर्वांना विनंति की प्रशासकांनी दिलेला इशारा लक्षात ठेवुन प्रतिसाद द्यावेत. अण्णांना सकृतदर्शनी आलेले अपयश म्हणजे त्यांच्याबद्दल वाटेल तसे लिहिण्याचा लायसेन्स मानू नये, ही विनंती
तसेच अण्णा आता राजकारणात उतरणार म्हटल्यावर त्यांना प्रत्येक राष्ट्रीय प्रश्नावर त्यांचे धोरण काय हे विचारले जाणे अपरिहार्यच आहे हेहि अण्णा समर्थकांना ध्यानात ठेवावे लागेल. अण्णा भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असतांना देखील त्यांना मुद्यापासुन भरकटवून नसत्या शब्दजंजाळात अडकविण्याचे काय कमी प्रयत्न झाले? तेथेही ते कांहीवेळा अशा लोकांच्या सापल्यात अडकत असत. आता तर ते आपणहून त्यात गुरफटले जाणार आहेत आणि त्यामुळे हाती घेतलेला मूळ मुद्दा अडगळीत जाऊन पडणार याचे वाईट वाटते.

भरत , अण्णांशिवाय टीमला काही अर्थ /अस्तित्व आहे काय? उद्या समजा काही कारणांमुळे सोनिया माता काँग्रेसला उपलब्ध झाल्या नाहीत तरी कॉन्ग्रेस नष्ट होणार आहे का? राजीव गांधींनन्तर गांधी घराण्याशिवाय नरसिंहरावानी काँग्रेस आणि देश चालवलाच ना ? तसे अण्णांशिवाय टीम अण्णा हे कडबोळे चालू शक्ते काय?

अर्थात यामुळे अण्णांवरची आपल्या अनुयायांच्या/सहकार्‍यांच्या बाबतची जबाबदारी कमी होते असे नाही.

>>>
शेजार्‍याला 'तुमच्या खिडकीची कांच मी नव्हे तर माझ्या मुलाने फोडली आहे , मी त्याला जबाबदार नाही ' असे बापाला म्हणता येते काय ?
अरुण भाटियाना आम्ही एका एन जीओ च्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून बोलवायला गेलो तेव्हा त्यानी संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे क्रेडेन्शियल विचारून , खात्री करून मान्यता दिली होती.

Pages