दक्षे, त्या 'तस्वीर'च्या तुलनेत 'रॉकफॉर्ड' फार म्हणजे फारच झकास होता,निदान कळत तरी होते काय चाललयं ते. इथे म्हणजे अक्षय उगाचच गंभीर कम भकास चेहरा करुन बसतो.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
'रॉकफॉर्ड' सगळ्यांना आवडेलच असं नाही.
मी तो (थियेटरात) पाहिला तेंव्हा अभियांत्रिकीच्या हॉस्टेलमधे रहायचो. ते वय व त्या परिस्थितीत तुफान आवडला होता (आताही आवडतो). ज्याला त्यातला हिरो (तो छोटा पोरगा) समजु शकेल त्याला सिनेमापण आवडेल.
एक्झॅक्टली,सॅम; रॉकफोर्ड पाहिला तेंव्हा मी पाचगणीला एका रेसिडेंशियल शाळेत शिकवीत होतो,त्यामुळे आवडला,आयडेंटीफाय झाला.

दक्षिणादेवी, 'रॉकफोर्ड' हा, इंग्रजीमधे ज्याला 'कमिंग टू एज' म्हणतात त्या जॉनरचा सिनेमा आहे.
मुख्य पात्र असलेला तो मुलगा निवासी शाळेतल्या जीवनात; मैत्री,प्रेम,सत्य-असत्य,न्याय,त्याग आणि विश्वास या कंसेप्ट्सना कसा सामोरा जातो अशी थीम आहे. त्याचा पी.टी टीचरवरचा अढळ विश्वास, जीवाला जीव देणारे मित्र आणि छळ करणारी सिनिअर पोरे, मुलांना मोलेस्ट करणारा रेक्टर,नविन प्रेमाची एक्साईटमेंट आणी त्याचबरोबर नव्या तरुण शिक्षिकेवरचा त्याचा जोरदार 'क्रश'! सॉलिड कॉकटेल आहे हे. अखेरीस हा राजन नायडू, गुंड मुलावर बाजू उलटवतो आणि त्याचा मेंटॉर असलेल्या शिक्षकाची नोकरी वाचवतो.या सर्व अनुभवातून जाताना त्याचे 'मोठा' होणे फार छान दाखवले आहे.
अजून काय शंका आहे का ते 'थोर उपकार' करुन झाले असं समजू?

The Contender
जाम आवडला मला. ज्यांना राजकीय विषयांवरचे चित्रपट आवडतात त्यांना खूप आवडेल. शेवटी शेवटी तर खूप पकड घेतो, आणि क्लायमॅक्स एकदम मस्त. नंतर विचार केला (आणि आपण तो करतोच) की जाणवते की या लोकांच्या डावपेचांमधे दाखवलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त व्यक्तिगत आणि आपल्या पक्षाबद्दल चे स्वार्थ असतील, पण तरीही जबरदस्त आहे.
अशी ही बनवाबनवी चा हिंदी रीमेक येऊ घातलाय...
नाव- पेईंग गेस्ट (पूर्वीचं नाव 'चार यार')
कलाकार- श्रेयस तळपदे, जावेद जाफ्री, आशीष चौधरी आणि वत्सल सेठ... मालकिणबाई ऐवजी जॉनी लीव्हर...
बॅनर- मुक्ता आर्ट्स
हा हन्त हन्त...
{वास्तविक पहाता अशी ही बनवाबनवी पण हृशिकेष मुखर्जींच्या बीवी और मकान वरनं उचलला होता...}
_______
सपनोंसे भरे नैना, तो नींद है ना चैना...
किंग कॉर्न - ही एक डॉक्युमेंटरी आहे. कॉर्न ची शेती, अमेरिकेत सर्वत्र होत असलेला त्याचा वापर - त्याच्या मागची वेगवेगळी (राजकीय सुद्धा) कारणे याची बरीच माहिती मिळते. दोन विद्यार्थी बॉस्टन हून आयोवा राज्यात एक एकर कॉर्न चे शेत भाड्याने घेउन तेथे कॉर्न पिकवतात आणि त्याचे पुढे काय होते ते बघायचा प्रयत्न करतात.
'फास्ट फूड नेशन' वगैरे सारख्या पुस्तक्/चित्रपटातून अमेरिकेतील मुख्यतः मांस बनवण्याबद्दल ची बरीच माहिती पुढे आली त्यात आणखी भर हा चित्रपट घालतो - कॉर्न शेती आणि मांस तयार करणार्या कंपन्या एवढ्या मोठ्या होण्या आधी केवळ गवत खाणार्या प्राण्यांना बरेचसे कॉर्न खायला घालून नेहमीच्या वेळेपेक्षा लौकर 'विकले जाण्यायोग्य वजनाचे' करणे, त्यातून निर्माण होणारे इतर प्रॉब्लेम्स वगैरे ची सुद्धा माहिती आहे.
पिकवल्या जाणार्या कॉर्न पैकी बरेचसे हे अशा 'फीडलॉट' साठी आणि कोक पेप्सी सारख्या सोडा कंपन्यांसाठी (high fructose corn syrup) विकले जाते, त्याच्या वर पिकवताना केल्या गेलेल्या प्रक्रियांमुळे शेतातून काढलेल्या कणसाची चव अजिबात खाण्यायोग्य नसते वगैरे बघून आश्चर्य वाटते. तसेच "आम्ही पिकवतो ते आम्ही स्वतः खात नाही. आम्ही ते फक्त विकतो" म्हणणारे शेतकरी बघूनही.
एकंदरीत खूप इंटरेस्टिंग वाटला.
दुसरा 'Small Time Crooks' - ज्यांनी पाहिला नसेल त्यांना Highly recommended comedy! हा ८-१० वर्षांपूर्वीचा आहे, नवीन नाही. एकदम धमाल आहे. वूडी अॅलन आणि इतर बरेच (मला अजून फारसे माहीत नसलेले) कलाकार आहेत. संवाद मस्त लिहीलेले आहेत. हा वूडी, त्याची बायको आणि इतर अनेक महामठ्ठ लोक मिळून एक बँक लुटण्यासाठी त्याच्या जवळच्या एका दुकानाची जागा घेतात आणि त्याच्या खालून भुयार खोदण्याचे काम करताना कोणाला शंका येउ नये म्हणून वरती दुकानात 'कुकीज' बनवून विकणे चालू करतात. पण ते दुकानच खूप चालू लागते आणि भुयार खणताना या सगळ्या लोकांच्या 'हुशारी' मुळे गडबड होते. ती कशी, आणि नंतर काय होते हे लिहीण्यात अर्थ नाही, तुम्हीच पाहा.
पहिली १०-१५ मिनीटे जरा डल आहे पण नंतर धमाल उडते एकदम. भरपूर हसलो. संवाद ही लक्ष देउन ऐका, मस्त लिहीलेले आहेत.
२००२ सालचा बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म प्रकारात ऑस्कर मिळवलेला बोस्नियाचा Nicija zemlja (No Man's Land) - (2001) बघीतला. खूप दिवसापासुन बघायचा होता.
खर तर युद्धावरचे बहुतेक सगळेच चित्रपट फार अंतर्मुख करायला लावणारे असतात तसाच हा पण आहे.
चित्रपटाचे कथानक २ देशातल्या "नो मॅन्स लँड" मध्ये अडकलेल्या ३ सैनिकांभोवती फिरत रहाते. त्यातला एक माइन वर अडकलेला, तो चुकुन जरी हालला तर ते तिघेही क्षणात नाहीसे होवु शकतील अशी परिस्थिती. त्यांना सोडवण्यासाठी सीमारेषेच्या दोन्हीकडच्या देशांनी, UN नी केलेली चालढकल, मिडीयाला या बातमीचा लागलेला शोध, त्यामुळे UN, आर्मीवरचा वाढता दबाव, त्यावर त्यांनी शोधलेले उत्तर, त्यात होरपळणारे सामान्य सैनिक.. सगळेच फार विचार करायला लावणारे आहे.
No man's land हा खरोखरच भन्नाट आहे.
भन्नाट नाही अतीभन्नाट आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
काल मी ड्यूमा नावाचा एक जूना सिनेमा बघितला. एक अनाथ चित्ता आणि एक धाडसी मुलगा, यांच्या मैत्रीची हळुवार कथा सांगतो हा सिनेमा. प्रत्येक मुलानी बघावा, असा हा सिनेमा आहे. फारसे नावाजलेले कलाकार नाहीत, पण तो मुलगा, त्याचा मित्र आणि चित्ता यांचा अभिनय अप्रतिम आहे. यातला निसर्ग वेड लावेल असा आहे.
अधिक माहिती इथे आहे. http://en.wikipedia.org/wiki/Duma_(film)
मग माझा
मग माझा बांध सुटला सिनेमा पहायचा... कायंच झेपेना...
इथे तु
टाकलंयस... ढसाढसा रडणारी बाहुली मिळेना काय???
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
साधने, अगं
साधने,
अगं वेड लागल्यावर लोकं हसतातच ना? रडतात का कधी?
दक्षे,
दक्षे, त्या 'तस्वीर'च्या तुलनेत 'रॉकफॉर्ड' फार म्हणजे फारच झकास होता,निदान कळत तरी होते काय चाललयं ते. इथे म्हणजे अक्षय उगाचच गंभीर कम भकास चेहरा करुन बसतो.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
'रॉकफॉर्ड'
'रॉकफॉर्ड' सगळ्यांना आवडेलच असं नाही.
मी तो (थियेटरात) पाहिला तेंव्हा अभियांत्रिकीच्या हॉस्टेलमधे रहायचो. ते वय व त्या परिस्थितीत तुफान आवडला होता (आताही आवडतो). ज्याला त्यातला हिरो (तो छोटा पोरगा) समजु शकेल त्याला सिनेमापण आवडेल.
एक्झॅक्टल
एक्झॅक्टली,सॅम; रॉकफोर्ड पाहिला तेंव्हा मी पाचगणीला एका रेसिडेंशियल शाळेत शिकवीत होतो,त्यामुळे आवडला,आयडेंटीफाय झाला.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
ए बाबांनो
ए बाबांनो सिनेमाचा (मतित)अर्थ सांगा थोर उपकार होतील...
उपकार
उपकार होतील... >>> त्यापेक्षा तसवीर बघ

अर्थाचा अनर्थ कसा करायचा ते कळेल
०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...
तस्वीर ची
तस्वीर ची जाहीरात टिव्ही वर पहात होते त्यात अक्षयकाका कुठुनसे वरून उडी मारतात पाण्यात,
त्यातून ते वरंच आले नाहीत तर काय बरं होईल नाई?
अक्षयकाका>>
अक्षयकाका>>>>>

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...
अक्षय
अक्षय उगाचच गंभीर कम भकास चेहरा करुन बसतो.
त्यालाही सुचले नसेल नक्की काय करायचे ते.... बिच्चारा. चांदणी चौक नंतर हा धक्का... दिवस फिरलेत बहुतेक..
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
आता त्याने
आता त्याने गप्प बसावे अन्यथा त्यला खरंच चांदणी चौकात बसावं लागेल, कटोरा घेऊन.
दक्षिणादे
दक्षिणादेवी, 'रॉकफोर्ड' हा, इंग्रजीमधे ज्याला 'कमिंग टू एज' म्हणतात त्या जॉनरचा सिनेमा आहे.
मुख्य पात्र असलेला तो मुलगा निवासी शाळेतल्या जीवनात; मैत्री,प्रेम,सत्य-असत्य,न्याय,त्याग आणि विश्वास या कंसेप्ट्सना कसा सामोरा जातो अशी थीम आहे. त्याचा पी.टी टीचरवरचा अढळ विश्वास, जीवाला जीव देणारे मित्र आणि छळ करणारी सिनिअर पोरे, मुलांना मोलेस्ट करणारा रेक्टर,नविन प्रेमाची एक्साईटमेंट आणी त्याचबरोबर नव्या तरुण शिक्षिकेवरचा त्याचा जोरदार 'क्रश'! सॉलिड कॉकटेल आहे हे. अखेरीस हा राजन नायडू, गुंड मुलावर बाजू उलटवतो आणि त्याचा मेंटॉर असलेल्या शिक्षकाची नोकरी वाचवतो.या सर्व अनुभवातून जाताना त्याचे 'मोठा' होणे फार छान दाखवले आहे.
अजून काय शंका आहे का ते 'थोर उपकार' करुन झाले असं समजू?
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
बरं बरं
बरं बरं ठिक आहे..
आगाऊ, छान
आगाऊ, छान सरांश.
रॉकफर्ड मला तरी जाम आवडतो. अत्यंत साधा सरळ पिक्चर आहे.
--------------
नंदिनी
--------------
The Contender जाम
The Contender
जाम आवडला मला. ज्यांना राजकीय विषयांवरचे चित्रपट आवडतात त्यांना खूप आवडेल. शेवटी शेवटी तर खूप पकड घेतो, आणि क्लायमॅक्स एकदम मस्त. नंतर विचार केला (आणि आपण तो करतोच) की जाणवते की या लोकांच्या डावपेचांमधे दाखवलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त व्यक्तिगत आणि आपल्या पक्षाबद्दल चे स्वार्थ असतील, पण तरीही जबरदस्त आहे.
आवर्जून पाहा, पाहिला नसेल तर.
अरे 'मी
अरे 'मी शिवजी राजे भोसले बोलतोय ' कोणिच नही बघीतला?????
त्यावर इथे
त्यावर इथे दोन बी बी वर लढाइ चालू आहे ते तू नाही बघितलस का?
Transformers 2 Trailer
Transformers 2 Trailer http://www.traileraddict.com/trailer/transformers-2/trailer
गल्लीत
गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा पाहिला.
थेटरात जाऊन पाहण्या लायक नाही.
अनासपुरेच त्याचा निर्माता आहे.
अखंड बडबडण्याची हौस त्याने पुर्ण करून घेतलीय.
अशी ही
अशी ही बनवाबनवी चा हिंदी रीमेक येऊ घातलाय...
नाव- पेईंग गेस्ट (पूर्वीचं नाव 'चार यार')
कलाकार- श्रेयस तळपदे, जावेद जाफ्री, आशीष चौधरी आणि वत्सल सेठ... मालकिणबाई ऐवजी जॉनी लीव्हर...
बॅनर- मुक्ता आर्ट्स
हा हन्त हन्त...
{वास्तविक पहाता अशी ही बनवाबनवी पण हृशिकेष मुखर्जींच्या बीवी और मकान वरनं उचलला होता...}
_______
सपनोंसे भरे नैना, तो नींद है ना चैना...
अमि, मी
अमि, मी आजची ग.गो.दि.मु ची तिकिटं काढली आहेत.
आता पहावाच लागेल.
अगदीच टुकार आहे का? मला ट्रेलर वरून विनोदी वाटला...
दोन चांगले
दोन चांगले चित्रपट पाहिले.
किंग कॉर्न - ही एक डॉक्युमेंटरी आहे. कॉर्न ची शेती, अमेरिकेत सर्वत्र होत असलेला त्याचा वापर - त्याच्या मागची वेगवेगळी (राजकीय सुद्धा) कारणे याची बरीच माहिती मिळते. दोन विद्यार्थी बॉस्टन हून आयोवा राज्यात एक एकर कॉर्न चे शेत भाड्याने घेउन तेथे कॉर्न पिकवतात आणि त्याचे पुढे काय होते ते बघायचा प्रयत्न करतात.
'फास्ट फूड नेशन' वगैरे सारख्या पुस्तक्/चित्रपटातून अमेरिकेतील मुख्यतः मांस बनवण्याबद्दल ची बरीच माहिती पुढे आली त्यात आणखी भर हा चित्रपट घालतो - कॉर्न शेती आणि मांस तयार करणार्या कंपन्या एवढ्या मोठ्या होण्या आधी केवळ गवत खाणार्या प्राण्यांना बरेचसे कॉर्न खायला घालून नेहमीच्या वेळेपेक्षा लौकर 'विकले जाण्यायोग्य वजनाचे' करणे, त्यातून निर्माण होणारे इतर प्रॉब्लेम्स वगैरे ची सुद्धा माहिती आहे.
पिकवल्या जाणार्या कॉर्न पैकी बरेचसे हे अशा 'फीडलॉट' साठी आणि कोक पेप्सी सारख्या सोडा कंपन्यांसाठी (high fructose corn syrup) विकले जाते, त्याच्या वर पिकवताना केल्या गेलेल्या प्रक्रियांमुळे शेतातून काढलेल्या कणसाची चव अजिबात खाण्यायोग्य नसते वगैरे बघून आश्चर्य वाटते. तसेच "आम्ही पिकवतो ते आम्ही स्वतः खात नाही. आम्ही ते फक्त विकतो" म्हणणारे शेतकरी बघूनही.
एकंदरीत खूप इंटरेस्टिंग वाटला.
दुसरा 'Small Time
दुसरा 'Small Time Crooks' - ज्यांनी पाहिला नसेल त्यांना Highly recommended comedy! हा ८-१० वर्षांपूर्वीचा आहे, नवीन नाही. एकदम धमाल आहे. वूडी अॅलन आणि इतर बरेच (मला अजून फारसे माहीत नसलेले) कलाकार आहेत. संवाद मस्त लिहीलेले आहेत. हा वूडी, त्याची बायको आणि इतर अनेक महामठ्ठ लोक मिळून एक बँक लुटण्यासाठी त्याच्या जवळच्या एका दुकानाची जागा घेतात आणि त्याच्या खालून भुयार खोदण्याचे काम करताना कोणाला शंका येउ नये म्हणून वरती दुकानात 'कुकीज' बनवून विकणे चालू करतात. पण ते दुकानच खूप चालू लागते आणि भुयार खणताना या सगळ्या लोकांच्या 'हुशारी' मुळे गडबड होते. ती कशी, आणि नंतर काय होते हे लिहीण्यात अर्थ नाही, तुम्हीच पाहा.
पहिली १०-१५ मिनीटे जरा डल आहे पण नंतर धमाल उडते एकदम. भरपूर हसलो. संवाद ही लक्ष देउन ऐका, मस्त लिहीलेले आहेत.
फारेन्ड,
फारेन्ड, स्मॉल टाईम क्रूक्स चे विवरण मस्तच
पाहीलाच पाहीजे आता.
२००२ सालचा
२००२ सालचा बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म प्रकारात ऑस्कर मिळवलेला बोस्नियाचा Nicija zemlja (No Man's Land) - (2001) बघीतला. खूप दिवसापासुन बघायचा होता.
खर तर युद्धावरचे बहुतेक सगळेच चित्रपट फार अंतर्मुख करायला लावणारे असतात तसाच हा पण आहे.
चित्रपटाचे कथानक २ देशातल्या "नो मॅन्स लँड" मध्ये अडकलेल्या ३ सैनिकांभोवती फिरत रहाते. त्यातला एक माइन वर अडकलेला, तो चुकुन जरी हालला तर ते तिघेही क्षणात नाहीसे होवु शकतील अशी परिस्थिती. त्यांना सोडवण्यासाठी सीमारेषेच्या दोन्हीकडच्या देशांनी, UN नी केलेली चालढकल, मिडीयाला या बातमीचा लागलेला शोध, त्यामुळे UN, आर्मीवरचा वाढता दबाव, त्यावर त्यांनी शोधलेले उत्तर, त्यात होरपळणारे सामान्य सैनिक.. सगळेच फार विचार करायला लावणारे आहे.
No man's land हा
No man's land हा खरोखरच भन्नाट आहे.. आणि त्यातला विनोदसुद्धा..
No man's land हा
No man's land हा खरोखरच भन्नाट आहे.
भन्नाट नाही अतीभन्नाट आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .
आणि
आणि त्यातला विनोदसुद्धा..
>>>>
हो, पण तो black comedy आहे .. विचित्र वाटतं शेवटी
तो सिनेमा
तो सिनेमा अप्रतीम आहे... संपल्यावर बर्याच वेळ मी गप्प गप्प बसुन राहिले होते.
काल मी
काल मी ड्यूमा नावाचा एक जूना सिनेमा बघितला. एक अनाथ चित्ता आणि एक धाडसी मुलगा, यांच्या मैत्रीची हळुवार कथा सांगतो हा सिनेमा. प्रत्येक मुलानी बघावा, असा हा सिनेमा आहे. फारसे नावाजलेले कलाकार नाहीत, पण तो मुलगा, त्याचा मित्र आणि चित्ता यांचा अभिनय अप्रतिम आहे. यातला निसर्ग वेड लावेल असा आहे.
अधिक माहिती इथे आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Duma_(film)
Pages