नभी मेघ हिंडायचे बंद झाले

Submitted by कु. कमला सोनटक्के on 25 June, 2012 - 13:56

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/35891

नभी मेघ हिंडायचे बंद झाले
नहाणे फुका आमचे बंद झाले

गजल येत नाही खयालात आता
मला काफिये व्हायचे बंद झाले

निवडणूक ती काल होऊन गेली
पुढारी घरी यायचे बंद झाले

घरी चालल्या आज पाटील बाई
विदेशी सहल जायचे बंद झाले

अयोध्या बुडाली व सेतू उडाला
'कमळ' राम बोलायचे बंद झाले

गुलमोहर: 

छान

अग्गोबाई ! ढग्गोबाई ! कमलाबाईंच्या पाठोपाठ नर्मदाबाई मिनिटात हज्जर. Rofl

आता अनुक्रमे गंगा, भागिरथी, यमुना, जमुना, सरस्वती, कावेरी, भिमा, कृष्णा, कोयना, तापी, मुळा, मुठा, गोदावरी, झेलम, सतलज, ब्रम्हपुत्रा आदी आदी येतात की काय ? Uhoh Proud

काय हे डॉक्टर? आँ?

इथुन अनेकदा तडीपार करुनही, विचार काही बदलत नाहीत काही आयड्यांचे आणि त्यांच्या डुआयड्यांचे.

Proud

आता नभात मेघ हिंडायचेच बंद झाल्यावर पाऊस कसा पडेल ? तो थांबणारच, कॉमन सेन्स आहे हा. मुंबैत पडला पण आमच्या पुण्यात नाय पडला. तुमच्या सांगली, सातारा, नरसोबावाडी, कर्‍हाड आणी कोल्हापूर्कडे पडला का ? Proud

मला काफिये व्हायचे बंद झाले
>>>

तारुण्यपीटिका येणे बंद झाल्यासारखे काफिये बंद झाले म्हणतायत या कुमारी सवाष्णबाई

Rofl

वृत्तासाठी पासवर्ड चे "पासवssड" करावे असे वाटते आहे . पासवर्डातला R ... नाहीतरी सायलेंटच असतो म्हणे (...माझे इंग्रजीचे अगाध ज्ञान दुसरे काय Wink !! )

Proud

छान

गजल येत नाही खयालात आता
मला काफिये व्हायचे बंद झाले>>>>>>>>>>>>>>>>>>>

अगदी अश्शीच परिस्थिती झाली आहे माझी हल्ली
Sad Sad Sad

Pages