स्मरणशक्ती वाढवणे..

Submitted by सेनापती... on 2 July, 2012 - 04:59

मला स्मरणशक्ती वाढवणे आणि टिकवणे या संदर्भात ठाणे - मुंबईमध्ये कुठे क्लासेस आहेत का याची महिती हवी होती. कोणी असे क्लासेस केलेले आहेत का?

अनुभव किंवा कुठलिही माहिती असेल तर इथे किंवा विपुत लिहा..

धन्यवाद.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तेजग्यान फाउंडेशन म्हणजेच हॅप्पी थॉट्स वाल्यांचा एक क्लास असतो बघ.
अर्थात मे स्वतः केलेला नाहिये किंवा माझ्या पाहण्यात कोणी केलेला नाहिये पण त्यांचा डेमो पाहिलाय मी.
त्यांच्या मुंबई ठाण्यातही असेलच एखादि शाखा.

मलाही कळवा.. माझी शक्ती पुर्ण गेलीय Sad

दिनेशदानी निसर्गाच्या गप्प्पाच्या कुठल्यातरी भागातल्या पहिल्या पानावर उपाय लिहिलेले स्म. वाढवायचे. पाने चाळा. Happy

क्लासेसचे माहित नाही
मात्र काही सूचनावजा कल्पना देऊ शकतो.
१. सर्वसाधारणतः सामान्य माणूस बहुतेक बाबी "आशयरूपात" लक्षात ठेवतो.
२. जे आवडते, ते लक्षात ठेवायला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, उदा. एखादे गाणे तुम्ही आजही गुणगुणता, तेव्हा ती चाल्/सूर व शब्द तुम्ही पाठ केलेले नसतात तरी ते लक्षात असतात.
३. लय व तालाचे ज्ञान माणसास उपजत असते, व लयतालासहित एखादी गोष्ट मोठ्याने उच्चारली/ऐकली तर ती जास्त लौकर आठवणीमधे ठसते.
४. नावडती, वा अर्थानुसार किचकट वाटणारी, वा ज्या बाबीमध्ये मनापासून रस नाही अशी बाब लक्षात ठेवणे अवघड जाते, व त्याकरता, पुर:श्चरणाला पर्याय नाही.
५. वाढत्यावयात, वाढत्या जबाबदार्‍यान्च्या/व्यापांच्या/मोहाच्या घाईगर्दीच्या आयुष्यात पुरःश्चरण अथवा पाठांतर अवघड बनत जाते, पण विशिष्ट बाबी आठवणीत रहाणे अत्यावश्यक अस्ते.
६. सामान्यतः, वाढलेल्या म्याच्युअर्ड वयात, एकपाठी, द्विपाठी किन्वा त्रिपाठी या दरम्यान सामान्यमाणसाची स्मरणशक्ति विभागली जाते, क्षमता अगदीच कुचकामी असेल, वा अत्याधिक नावडीचा वा जबरदस्तीचा विषय असेल, तर अन तरच माणसास त्रिपाठापेक्षा जास्त वेळा पाठान्तराची गरज भासते. मात्र हल्लीच्या रेडीमेडच्या जमान्यात, विशिष्ट रित अनुसरल्याशिवायच वा कष्ट घेतल्याशिवायच माणसे एकपाठी असल्यागत वागू पहातात व अनेकानेक बाबी विसरतात.
७. एकच बाब, पुन्हा पुन्हा तिन वेळेस वाचली की लक्षात रहाणे यास त्रिपाठी म्हणू शकतो. मात्र, एकामागोमाग तिनवेळा वाचताना, दोन वाचनादरम्यान किती काळाचे अन्तर असावे हे माणसान्च्या वैयक्तिक क्षमतेवर आधारीत आहे, व जितका वेळ कमी तितके लक्षात रहाण्याचे प्रमाण जास्त हे धोरण ठेवणे इष्ट होय. म्हणजे समजा आज मी एक बाब वाचली/ऐकली, व नन्तर ती दुसर्‍या दिवशी वा एकदम आठवड्यानंतर वाचली, तर कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसास, पहिल्यान्दा वाचल्याचा अभ्यास तितकासा उपयोगी पडणार नाही. सबब दोन वाचनातील वेळ कमी करणे/ठेवणे, व दरम्यानच्या काळात, वाचलेल्याची मनातच उजळणी/चिन्तन-मनन करणे हे स्मृती वाढविण्यास उपयुक्त ठरते.
८. विषयाबाबतचा नावडता/उदासिनतेचा भाव बदलुन तटस्थ करता येणे आवश्यक व गरजेपोटी सवईने हे देखिल जमुन जाते. फक्त मनात ठसवावे लागते की याची आत्ता इथे गरज आहे.
९. सर्वसाधारणतः माणुस बाह्यानुवर्ती असतो, म्हणजे दुसर्‍यास "काय दाखवायचे/दिसेल" याचेच चिन्तेत असतो, व मी अमुकतमुक करताना काय काय आत्मसात करायचे आहे याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे, एखादे दृष्य बघितले तरी त्याचा कार्यकारणभाव/तपशील आकलन होतोच असे नाही अनलेस तिथे काही गम्भिर/धक्कादायक घडामोड होत नाहीये. तेव्हा, घडणार्‍या प्रत्येक घटना/दृष्य/वाचन/श्रवण इत्यादीबाबत चतुरस्रपणे आपले ध्यान ठेवणे अत्यावश्यक ठरते, व एकदा ही सवय लागली की वाचन/श्रवण्/बघणे याबाबत माणसास एकपाठी प्रमाणे तपशील लक्षात राहू लागतो.
१०. स्मृतीबाबत विविध बाबी/सवई लहानपणापासूनच विकसित होत जाव्यात अशा तर्‍हेनेच शालेय अभ्यासक्रम ठरविला जातो, वा त्यात स्मृतीबाबतचाही विचार केला जातो. (प्रत्यक्षात, विविध कारणान्नी मूळ अभ्यासक्रम/उद्दिष्ट बाजुला राहुन भलतेच घडते)
११. स्वतःस काय गोष्ट कोणत्या परिस्थितीत वा काय स्वरुपात "कळली"/आकलन झाली असता जास्त लक्षात रहाते त्याचा आढावा घेऊन, महत्वाच्या मजकुराबाबत तीच पद्धत अनुसरणे योग्य ठरते.
१२. बरेचदा, (मी देखिल) गोष्ट लक्षात ठेवण्याकरता चिठ्ठी लिहून खिशात ठेवतो/व्हाईटबोर्डवर लिहून ठेवतो, पण कित्येकदा, कामाचे गर्दीत वा अन्य कारणाने वा शब्दशः विसरल्याने चिठ्ठी वा बोर्डवरील मजकुर वाचण्याचेच राहून जाते, यास काय उपाय? अर्थात यात बराचसा वैयक्तिक "अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा" / स्वयंशिस्तिचा भागही असल्याने, मी यास केवळ विस्मृती असे ठरवू शकत नाही, पण विस्मृतीवर स्वयंशिस्त असेल तर मात करता येते व स्वयंशिस्त नसेल तर ती विस्मृतीस सहाय्यकारीच ठरत जाते असा अनुभव आहे.
१३. अत्यंत नावडती/किचकट्/क्लिष्ट गोष्ट लक्षात रहाण्यास, उत्तम उपाय म्हणजे, ती ती बाब, जरा सोपी करुन समजुन घेणे, अखण्ड ऐवजी तुकड्या तुकड्यात समजुन घेणे व तुकडे जोडण्याची किल्ली मनाशी तयार करणे. यामुळे अनेकानेक बाबी लक्षात ठेवणे सुकर होते असा अनुभव आहे.
१४. कोणतीही घटना/प्रसंग/बाब, घडल्यानंतर/वाचल्यानंतर, थोड्याच कालावधीनन्तर पुन्हा एकदा तिचे स्मरण करणे हे उपयुक्त ठरते, अशा स्मरणाने, मेन्दुला सूप्त आदेश मिळतो की ही बाब लक्षात ठेवायचि आहे. असा आदेश देता येणे सवईने जमु लागते. नाहीतर मेन्दूच्या अन्तर्गत रचना, वापरली/आठवली न जाणारी बाब विस्मृतीच्या कोषात ढकलुन देतात, जी जागृत मनोवस्थेत आठवणे अशक्य बनते. (मात्र विशिष्ट शारिरिक स्थितीत/मनोभुमिकेत मात्र जुन्या जुन्या आठवणी उफाळून वर येतात, ज्या एरवी आपल्या गावीही नसतात)
१५. दर दिवशी सकाळी उठल्यावर काल काय काय झाले, आज काय काय करणार याचे थोडक्यात सूत्रबद्ध/वेळेनुसार आठवण/चिन्तन आणि रात्री झोपताना दिवसभरात काय झाले याची उजळणी, व असेच दर आठवडा/महिना या कालाकरता केले असता, थोड्याच अवधीत स्मृती वाढण्यास मदत होऊ लागते असा अनुभव आहे.
१६. दु:ख खुपते, पायात बोचलेल्या काट्याप्रमाणे खुपत रहाते, अन म्हणूनच लक्षातही रहाते, सुख खुपत नाही, अन म्हणूनच, सुखात घालविलेला कालखण्ड तपशीलात लक्षात रहात नाही ( ते फक्त स्वप्नदृष्ये वगैरे प्रकारे सिनेमातच शक्य असते, वास्तवात नाही) हे सूत्र लक्षात ठेवणे भाग आहे. तद्वतच, जे लक्षात ठेवायचे आहे, ते मनास आन्तरिकरित्या खुपवुन घेतले, त्याची बोच /जाणीव मनास करुन दिली तर कोणतीही बाब विसरणेही अशक्य.
१७. स्मृतिवर्धन स्त्रोत्राचे मोठ्याने उच्चारणकरित पठणाचाही उपयोग होतो.
आशा आहे की वरील विवेचनाचा थोडाबहुत उपयोग होईल Happy

मी मानसोपचार घेतलेले............................त्याने बराच फरक पडतो.......

नुकतेच माझ्या घरी पेपरमधून जाहीरात आली होती.
'स्मार्ट मेमरी' तर्फे ८ स्मरणतंत्रे शिकवणारे तासाभराचे विनामूल्य व्याख्यान मुलुंड वेस्ट स्टेशनजवळील 'मुलुंड विद्यामंदीर" या शाळेत आयोजित केले होते. शनि-रवि सकाळी व रात्री होते.
सोयीसाठी त्यांनी हे व्याख्यान १२ वेळा ठेवले आहे. त्यामुळे या आठवड्यातही असू शकेल. दुर्दैवाने मी ती जाहिरात फेकून दिली. त्यामुळे डीटेल्स नाहीत. पण कुठूनतरी त्या शाळेचा नंबर मिळवलात तर तिथे फोन करुन विचारता येईल.

गंम्मत करत नाही. १०० पर्यंत पाढे पाठ करा. तुम्हाला काय हवयं ते मिळेल.आणि लहान मुलांकरता खुपच परिणाम कारक. Happy
बहुतेक लक्शात ठेवायची सवय लावणे म्हणजेच त्याचा व्यायाम करुन त्याला (मेमरी सेल ) बळकट करणे असेल. जाणकार प्रकाश टाकतीलच.
एल्टीने सांगितल्याप्रमाणे काहेतरी पाठ करणे हाच चांगला उपाय आहे असे वाटते.

लिंबू, भारी पोस्ट!
सहमत.
ते स्मृतीवर्धन स्तोत्र ऑनलाईन किंवा कसेही कुठे मिळेल?

माझ्यामते तरी लहानपणी वेगवेगळी शुद्ध भाषेत असलेली आणि चांगल्या आशयाची स्तोत्रे पाठ केल्यास वाणी भाषा आणि स्मरणशक्ती तीनही सुधारतील.

निवान्त, पाढे पाठ करणे हा खरच उत्कृष्ट उपाय आहे. Happy
त्यात वर उल्लेखिल्याप्रमाणे लय/ताल साधला जातो. पुरःश्चरणाची सवय लागते. किचकट्/न समजणारे असले, तरी मनाला काबुत ठेवुन मेन्दूला आज्ञा देण्याची सवय लागते की हे लक्षात ठेवायचय. या सरावानेच "मेमरी सेल" बळकट होत असतील तरी "वैज्ञानिक/प्रयोगशालेय नि:ष्कर्षानुसार" कल्पना नाही - मला सिद्ध करुन दाखविणे अवघड आहे (हे विश्लेषण अन्निसवाल्यान्करता मुद्दामहून, कारण ते जिथेतिथे कोणत्याही बाबी सिद्ध करा प्रयोगशाळेत असे फर्मावित अस्तात Proud )

आयुर्वेदात विशिष्ट औषधी द्रव्यान्चे सेवनही स्मृतीवाढीकरता उपयुक्त मानले आहे (बहुधा शन्खपुष्पी असावे - डॉक्टरान्चा सल्ला घेणे उपयुक्त). तरीही पुनःपुन्हा सरावाला पर्याय नाही हेच खरे.

साती, "स्मृतीवर्धन" अशाप्रकारे स्तोत्र आहे की काय की माझाच तो टायपो झाला ते बघुन सान्गतो, पण "प्रज्ञावर्धनस्तोत्र" मात्र आहे, दोन्/चार दिवसात देतो.

लिंबूटिंबू,
खूप छान पोस्ट. Happy

<<माझ्यामते तरी लहानपणी वेगवेगळी शुद्ध भाषेत असलेली आणि चांगल्या आशयाची स्तोत्रे पाठ केल्यास वाणी भाषा आणि स्मरणशक्ती तीनही सुधारतील.>>

१०० % अनुमोदन साती.
नास्तिक्/आस्तिक वेगळा प्रश्न...पण स्तोत्र पाठांतराने स्मरणशक्ती नक्कीच चांगली राहते.

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र माबोवर "स्तोत्र्,श्लोक..." च्या धाग्यात आहे.
मी लहान असताना म्हणत होते. आता परिक्षेसाठी पुन्हा चालू करावं काय ? Wink

शब्दकोडी सोडवण्याचा फायदा होतो. सूर्यनमस्कारानेही स्मरणशक्ती वाढते असं म्हणतात.

इथली माहिती उपयुक्त वाटली.
http://www.helpguide.org/life/improving_memory.htm
आधी अनेक ठिकाणी जे वाचलं, ऐकलं त्यातलं, बहुतेक इथे एकत्र मिळालं.

शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी जसा त्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करून व्यायाम देतो, तसेच मेंदूच्या बाबतही करायला हवे.
लक्षात ठेवणे हा एक भाग आणि लक्षात असलेले आठवून बघणे हा दुसरा. यासाठी एक व्यायाम, रात्री अंथरुणावर पडल्यावर, सकाळी उठल्यापासून काय काय झाले ते आथवून बघणे.
अभ्यासाच्या बाबतीत एखादा विषय समजून , वाचून , लक्षात ठेवून पाहिल्यावर त्यातले सगळे मुद्दे आपल्याला आठवतात का ते ताडून पाहणे. हे केले नाही तर लक्षात राहिलेल्या गोष्टींवरच पुन्हा पुन्हा घालवलेला वेळ वाया जाऊ शकतो. माझा स्वतःच्या तीव्र स्मरणशक्तीवर पूर्ण विश्वास बसायला खूप उशीर झाला.

मेंदूला आव्हानात्मक कामे करायला लावणे : जसे नव्या गोष्टी, भाषा इ. शिकणे, सुडोकू किंवा शब्दकोडी सोडविणे हे अल्झायमरवर प्रतिबंधक उपाय म्हणून वाचले आहेत.

ब्रह्मविद्येत एक स्मरणवर्धक व्यायामप्रकार शिकविला जातो. दीर्घ आणि पूर्ण श्वासोच्छ्वासाच्या संथ लयीत मानेची/डोक्याची वरखाली हालचाल केली जाते. मुलांसाठीही ७ आठवड्यांचा (आठवड्यातला एक दिवस) अभ्यासक्रम आहेत.

त्यांचे प्राथमिक अभ्यासक्रम याच आठवड्यात सुरू होत आहेत.
http://www.brahmavidya.net/time_table/brahmavidya_course_time_table.php

>>> शब्दकोडी सोडवण्याचा फायदा होतो. <<<< येस्स, हा देखिल उत्कृष्ट उपाय आहे, शिवाय मला वाटते की काही बैठे/मैदानी खेळ देखिल उपयुक्त ठरु शकतात (मला नेमके आठवत नाहीयेत Wink )
स्तोत्र पाठांतराचा तर नक्कीच उपयोग होतो Happy

एल्टीची पोस्ट आवडली.

दादरला धुरू हॉल मधे स्मरणशक्ती विकास या विषयावर एका संस्थेने परिसंवाद आयोजीत केला होता. त्यात स्मरणशक्ती विकास कसा करावा यावर काही युक्त्या सांगीतल्या होत्या. डावा मेंदू, उजवा मेंदू यांची कार्यपद्धती समजवून सांगितली होती. मुळात आपण मेंदूच्या स्मरणशक्तीचा फार कमी वापर करतो, म्हणून स्मरणशक्ती विकास खुंटतो.. हाच त्यांचा मुख्य मुद्दा होता.

१० आकडी भ्रमणध्वनी क्रमांक लक्षात ठेवण्याचे त्यांनी सांगितलेले तंत्र मी आजही वापरतो. त्या क्रंमाकाची ४+३+३ अशी फोड करावी व त्या ३ फोडी त्या माणसाच्या संबंधीत गोष्टींशी जुळवून लक्षात ठेवाव्यात.

मिटिंग मधील अनोळखी लोकांची नावं कशी लक्षात ठेवावीत व इतर उपयुक्त गोष्टी ते क्लास मधे शिकवतात.

सेनापती , स्मरणशक्ती तुम्हाला स्वतःला वाढवायचीय की दुसर्‍या कोणाची?
दुसर्‍याची असल्यास त्या व्यक्तीचे वय, व्यवसाय काय आहे याबद्दल माहिती दिल्यास मी आणखी माहिती देऊ शकेन .

डॉ. आनंद नाडकर्णी एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यानी सुरूवातीस स्वतःच स्वतःची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही टेक्निक्स शोधून काढली, सुधारलीत.
त्यांच्या ज्ञानाचा फायदा पेशंट तसेच नॉर्मल लोकाना देतात.

त्यांच्या संस्थेची ही वेबसाईट-
http://www.healthymind.org/default.asp

इथे सगळे आवश्यक पत्ते, फोन नं इत्यादी आहेत.

आपण आपल्या गरजेनुसार इथे मार्गदर्शन घेऊ शकता विथ कंसल्टेशन फी किंवा काही ठिकाणी ठाण्यात ते फ्री काउंसेलिम्गही करतात.

ही जाहिरात नाही.

>>>> मुळात आपण मेंदूच्या स्मरणशक्तीचा फार कमी वापर करतो, म्हणून स्मरणशक्ती विकास खुंटतो.. हाच त्यांचा मुख्य मुद्दा होता. <<<< अगदी अगदी, अन हल्ली तर हे फारच होते आहे. क्यालक्युलेटर आले तेव्हा आम्ही अशीच बोम्ब मारली होती, नन्तर कॉम्प्युटर आले, मग काय? नुस्ता कीबोर्ड बदडायचा.....! तेवढ्या सव्वीस कीज लक्षात ठेवल्या की झाले, हाय काय अन नाय काय, कुठेही जावा, कॉम्प्युटर बघा नैतर आयपॉड नैतर मोबाईल, सगळा नुस्ता आयकॉन अन शॉर्टकट्स्चा जमाना झालाय. असो.

बाकी छान माहिती मिळत्ये Happy

लिंबु, चांगली माहिती.

मीही लक्षात राहण्य॑असाठी प्रत्येक गोष्ट करताना त्याच्याशी निगडीत असे काहीतरी मुद्दाम लक्षात ठेवते जेणेकरुन मुळ गोष्ट लक्षात राहिल.

कोणाचा विश्वास बसणार नाही, पण घराचे दार उघडेच ठेऊन मी ३-४ वेळा ऑफिसात गेलेय. प्रत्येक वेळी नंतर आठवुन शेजा-यांना फोन करुन दार लावुन घेतलेय पण एकदा मात्र नवरा संध्याकाळी घरी आला आणि मी दार उघडे ठेऊन शेजारी गेलेय असा समज करुन त्याने बराच वेळ माझी वाट पाहिली, शेवटी कंटाळून फोन केला तेव्हा मला कळले की मी दरवाजा लॉक करायला विसरले. गाडीची चावी गाडीलाच ठेऊन गाडी वाशी ब्रिजखाली दिवसभर पार्किंगमध्ये उभी करायचा उद्योगही केलाय... Happy हल्ली आठवणीने प्रत्येक गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवायचा प्रयत्न करते.

छान धागा आणि उपयुक्त माहिती.

लिंबुकाकांची पोस्ट छान!

प्रज्ञाविवर्धिनी स्तोत्र मी ही म्हणत असे! Happy अजूनही पाठ आहे.

१० आकडी भ्रमणध्वनी क्रमांक लक्षात ठेवण्याचे त्यांनी सांगितलेले तंत्र मी आजही वापरतो. त्या क्रंमाकाची ४+३+३ अशी फोड करावी व त्या ३ फोडी त्या माणसाच्या संबंधीत गोष्टींशी जुळवून लक्षात ठेवाव्यात. >>
इंद्रा, इथे लिही ना कसे ते.

निंबुडा.. पहिले चार क्रमांक म्हणजे Network operatorचा कोड असतो... तो लक्षात ठेवायला सोपा... पुढचे ३+३ क्रमांक त्या व्यक्तीच्या नावाशी, स्वभावाशी किंवा त्या वक्ती संबंधीत इतर ठळक घडामोडीशी निगडीत करून लक्षात ठेवावेत.

प्रज्ञाविवर्धिनी स्तोत्राने खरोखर स्मरणशक्ती वाढते का, मी माझ्या मुलासाठी ते विकत घेतले आहे, तसा अजुन तो लहान ( ३ वर्ष ) आहे पण थोडा मोठा झाल्यावर त्याच्याकडुन ते वाचुन घ्यायचा विचार आहे

प्रज्ञाविवर्धिनी स्तोत्राने खरोखर स्मरणशक्ती वाढते का,
माझ्यामते हा ज्याच्यात्याच्या श्रद्धेचा भाग झाला... मुळात स्मरणशक्ती वाढते की नाही हे तपासण्याची काही सोय आहे का?

शाळेत असताना बाईंनी पाठ करून घेतलं, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून पाठ केलं.. त्याचा फायदा झाला की नाही हे माहित नाही, पण स्तोत्र अजून पाठ आहे आणि बुद्धी वाढत असावी यावर विश्वास ठेवायला तयारी आहे.
तुमच्या मुलाचे त्या निमित्ताने अजून एक स्तोत्र पाठ होईल असा विचार करून बघा.. Happy

Pages