स्मरणशक्ती वाढवणे..

Submitted by सेनापती... on 2 July, 2012 - 04:59

मला स्मरणशक्ती वाढवणे आणि टिकवणे या संदर्भात ठाणे - मुंबईमध्ये कुठे क्लासेस आहेत का याची महिती हवी होती. कोणी असे क्लासेस केलेले आहेत का?

अनुभव किंवा कुठलिही माहिती असेल तर इथे किंवा विपुत लिहा..

धन्यवाद.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईब्लिस, छान प्रतिसाद.

लर्निंग आणि अनलर्निंग, त्यात मेमरीचा संबंध आणि "विस्मरणशक्ती" वाढवण्याचे उपाय ह्यावर काही माहिती मिळू शकेल का ?

विस्मरणशक्ती म्हणजे नको असलेल्या आठवणी विसरणे Happy

इथे उत्तम चर्चा होत आहे आणि नव्याने चांगली माहिती मिळत आहे.

पण मला 'Study & Memory Techniques' याबद्दल कोणी माहिती देउ शकेल का?

सेना...................६७ पोस्टी.......बघ माबोकरांना तुझ्या स्मरणशक्तीची किती काळजी आहेस.. तु इतिहास शिकवतोस इतक्या चांगल्या प्रकारे ....मग तुझी स्मरणशक्ती टिकण्यासाठी आम्ही नक्कीच जीवतोडुन प्रयत्न करणार...;)

इब्लीसराव धन्यवाद,

मेंदूच्या कार्याचे वर्णन (स्मरणशक्ती ई.) आणि त्या संधर्भातील संशोधनाविषयी डॉ. आनंद जोशींच्या "मेंदूतला माणूस" या पुस्तकात खूप सोप्या भाषेत सांगितले आहे .

प्रज्ञाविवर्धिनी स्तोत्राने खरोखर स्मरणशक्ती वाढते का,
माझ्यामते हा ज्याच्यात्याच्या श्रद्धेचा भाग झाला... मुळात स्मरणशक्ती वाढते की नाही हे तपासण्याची काही सोय आहे का?

शाळेत असताना बाईंनी पाठ करून घेतलं, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून पाठ केलं.. त्याचा फायदा झाला की नाही हे माहित नाही, पण स्तोत्र अजून पाठ आहे आणि बुद्धी वाढत असावी यावर विश्वास ठेवायला तयारी आहे.
तुमच्या मुलाचे त्या निमित्ताने अजून एक स्तोत्र पाठ होईल असा विचार करून बघा..
>>>>
आया, नं. १ पोस्ट Happy

सेनापती,
अभ्यासाच्या संदर्भात त्या विषयात गोडी निर्माण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी मला तरी शिक्षक महत्वाचा वाटतो. पुस्तकात नसलेली उदाहरणे देऊन , चित्रे दाखवून, अनुभव सांगून विषय रंजक केला तर तो जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो.

नुसत्या वाचनाने हे साध्य होत नाही.

मास्तुरे, अल्केमिस्ट,
धन्यवाद!

इब्लिस,

बर्‍याचदा जी स्वप्ने पडतात (आठवतात) ती आदल्या दिवसभरात घडलेल्या घटनांशी बिलकूल संबंधीत नसतात. पण तरी REM झोपेबद्दल जो अंदाज आहे तो खरा असावा असे का वाटते?

'निपल तोंडात धरून चोखणे, दूध ओढून घेणे' हा basic instinct आहे. तो DNA मध्येच कोरलेला असतो. मेंदूतल्या स्मृतीशी त्याचा संबंध नसतो.

रेशियल मेमरी पण DNA मध्येच असते. पण हो बर्‍याच पिढ्यांपूर्वी ती मेमरीत होती. आणि ती खूप उपयुक्त असल्याने DNA मध्ये कायमस्वरुपात नोंदवली गेली असावी.

बाकी पोस्ट मस्त आहे.

माधव,
एक्स्प्लेन करण्याचा प्रयत्न करतो. जमेल की नाही माहित नाही.
आठवण स्टोअर अन रिट्रिव्ह करणे हे एकत्र केले की स्मरणशक्ती हा प्रकार बनतो.
मेमरी, ही शॉर्टटर्म पासून लाँगटर्म मधे बदलताना अनेक गोष्टी घडतात. त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे त्या मेमरीचे तुकडे करणे अन ते जुन्या अनुभवाशी पडताळून पहाणे. तुकडे म्हणजे अनुभवातील आवाज, वास, चव, स्पर्श, चित्रे, इ. वेगळे अनुभव वेगळ्या ठिकाणी अनुभूत होऊन 'जाणवलेले' असतात. ती मेमरी स्टोअर करताना, यापैकी प्रत्येक घटक जुन्या अनुभवांशी पडताळला जातो. उदा, समोर दिसलेली नागमोडी रेघ, हे इंग्रजी एस अक्षर आहे, रस्ता आहे, दोरी आहे, साप आहे... अन मग तो पूर्ण अनुभव पुन्हा स्टोअर करणे, त्याच्या सबसेट्स सह.
हे जेव्हा रिप्ले होत असतं, तेव्हा जुन्या अनुभवांसोबत ताडून पाहिलं जातं. हे काहीसं हार्ड ड्राईव्ह 'डीफ्रॅग' करण्यासारखे आहे.
जेंव्हा स्वप्न 'आठवतं' तेव्हा थोडी अर्धजागृतावस्था असते, अन अनायास ते आपण अर्धजागृतावस्थेत गाईड करीत असतो. अन मग हे सगळे डीस् जॉइंट तुकडे वेगळाच सिक्वेन्स होऊन दिसतात. लॉस्ट फाईल सेगमेंट्स कन्व्हर्टेड इन्टू फाईल्स..=स्वप्न;)
म्हणून म्हटले, की ही केवळ एक थिअरी आहे, अन बरोबर असावी असे मला वाटते. हे सगळे गॅनाँगच्या फिजिऑलॉजित जितकं वाचलेले आठवते (२०-२५ वर्षे जुने... ) तितके ढोबळपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे

>>>> पण मला 'Study & Memory Techniques' याबद्दल कोणी माहिती देउ शकेल का?

Try there simple techniques:
1. Always try to visualize things you study, it can be in any visual form, story format or drawings format.
2. Always have a connection between stories or drawings by which your retrieval process becomes easier.
3. PAY ATTENTION and avoid MULTITASKING
4. Try to revise what you studied after a break without using any books/tools, see how much you remember! verify if you remembered everything and accordingly make modifications to your visual stories/drawings/connections

Hopefully this technique should work as it is proven scientifically and works for most folks.

e.g. If you meet 5-10 people in a group for 1st time, most likely you will ONLY remember 2-3 names or jumble them up.

How to fix this?
1st technique - when each person is introducing themselves, visually attach a characteristic to them in any shape or form you can remember. This helps to remember the names easily.
2nd technique - anytime you engage in conversations with any of them always start sentence with their name. १st few times they will help you with their names and after 2-3 sentences you just know it.

You can search on google and get ton of methods, use methods that work for you.... everyone has their own way of doing things.

Good Luck! Happy

> दिनेशदानी निसर्गाच्या गप्प्पाच्या कुठल्यातरी भागातल्या पहिल्या पानावर उपाय लिहिलेले स्म. वाढवायचे. पाने चघळा.

साधना, कोणती पाने चघळायची ते नाही लिहिले ...

इब्लिस, अनुमोदन.
आपण मेमरी स्टस्टोकरतो ती पिक्चर आणि व्हिडीओ फॉरमॅटमध्ये. तसेच लर्निंग म्हणजेच असोसिएशन. आपण जे शिकतो ते आपल्याशी निगडीत असेल तर जास्त लक्षात रहातं. जास्त म्हणजे डिटेल्ससह आणि जास्त वेळाकरता.

मानवी मेंदू आयुष्यभराच्या आठवणी वागवतो. अगदी बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत. त्यातल्या लक्षात असलेल्या आठवणी त्या असतात ज्यांना आपण इमोशनली अटॅच्ड असतो. उदाहरणार्थ एखाद्याचं लग्न बघून आपल्याला आपलं लग्न आठवतं. हे असोसिएशन टेक्निकचं उत्तम उदाहरण.

डॉग ट्रेनिंगच्या संदर्भात वाचलेल्या काही टिप्स आपल्यालाही शिकताना कामी येतात Happy

१. कुत्र्याने तुम्हाला लिडर मानलं पाहिजे. (सर / मॅडम आवडत्या असल्या तर जास्त चांगलं लक्षात रहातं. आई वडलांनी घेतलेला अभ्यास चांगल्या प्रकारे समजतो.)
२. रीवॉर्ड ऑर पनिशमेन्ट अटॅच्ड. जर एखाद्या गोष्टीला चांगल्या अथवा वाईत अनुभवाने फॉलो केलं तर लक्षात रहायला सोपं पडतं. सिग्नल तोडला तर फाईन पडतो. ...
३. ट्रेनिंग सेशन शुड नेव्हर बी मोअर दॅन १५ मिनीटस् (हे १५ मिन्टांच लिमिट कुत्र्यांनाच फक्त) पंण आपल्यालाही लिमिटस असतात. तासिका ४५ मिनिटांची असण्याचं कारण हे आहे. वी डू नीड अ ब्रेक......

लिंबुटिंबु, पहिला प्रतिसाद चांगला होता - तुमच्या स्वकर्तृत्वाबद्दल माहीत नसते तर एखाद्या चांगल्या गाईडमधे पाहुन लिहिले आहे असेच वाटले असते.

Pages