स्मरणशक्ती वाढवणे..

Submitted by सेनापती... on 2 July, 2012 - 04:59

मला स्मरणशक्ती वाढवणे आणि टिकवणे या संदर्भात ठाणे - मुंबईमध्ये कुठे क्लासेस आहेत का याची महिती हवी होती. कोणी असे क्लासेस केलेले आहेत का?

अनुभव किंवा कुठलिही माहिती असेल तर इथे किंवा विपुत लिहा..

धन्यवाद.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या मुलाचे त्या निमित्ताने अजून एक स्तोत्र पाठ होईल असा विचार करून बघा..
<<<<<<<
नक्कीच शेवटी प्रत्येक गोष्टीची चांगली बाजु बघणे आपल्या हातात आहे Happy

मयेकर +१
युज इट ऑर लूज इट म्हणतात ते मेंदूच्या बाबतीत खरं असावं किंवा असतं असं बराच वेळा वाचनात आलं आहे. डोक्याला काम देत राहिलात तर डोकं नीट काम करेल.

राहिला प्रश्न स्मरणशक्तीचा तर, काही लोकांची स्मरणशक्ती ही निश्चितच जास्त चांगली असते पण माझ्यामते तरी दैनंदिन जीवनात साधं चित्ता ताळ्यावर ठेवून वागलं तरी असं लक्षात येइल की आपल्याला बर्‍या गोष्टी लक्षात राहतात. फक्त एकदा चित्त/मन स्थिर ठेवता आलं तर डोक्यात बाकी चाललेल्या कलकलीकडे बिनकामाचे लक्ष न जाता आहे ते काम माणूस नीट पार पाडतो.
मेडिटेशन (ध्यान) करण्याने त्यात मदत होऊ शकते.

ब्राह्मी वटी, ब्राह्मी कल्प सारखी औषधं थोडे दिवस घ्यायची. लगेच फरक पडतो. पण एकीकडे वरचे स्मरणशक्ती तल्लख ठेवायचे बाकीचे एक्सरसाईझेस सुरु करायचे. नंतर ब्राह्मी बंद करायची.

वैद्यबुवा. धन्यवाद. किमान एका व्यक्तीने माझा प्रतिसाद वाचल्याचे लिहिले. जमाना शॉर्टकटचा, सोप्प्याचा आहे. रच्याकने ब्रह्मविद्येच्या अभ्यासक्रमात ध्यानाच्या सोप्या पद्धतींचाही अंतर्भाव आहे.

हो पूर्वा, मी आत्ता संपूर्ण चातुर्मासमध्ये पाहिले. हेच आहे.
(आईची इतकी बोलणी खाल्ली आहे लहानपणी या स्तोत्रापायी. पण तेव्हादेखील हे पाठ करू शकले नाही! Uhoh )
हा धागा माझ्यासाठी फार उपयोगी आहे. माझा मेंदू गंजलाय असं मी नेहेमीच म्हणत असते! Sad

मयेकर, मला खरं स्मरणशक्ती किंवा एक पाठी, त्रिपाठी ह्या गोष्टींच्या बागुलबुव्याबद्दल लिहायचे होते. सध्याची भारताची परिस्थिती माहित नाही पण मी लहान असताना ह्या गोष्टींबद्दल खुप ऐकायला यायचे, उदाहरण, अमक्यांचा ढमका (मुलगा/मुलगी) अगदी एकपाठी आहे! नुसतं एकदा वाचलं की लक्षात राहतं! डिंगळ्यांचा डुंगळ्या मात्र नुसता घोकंपट्टी करतो!
ह्या पायी कित्येक पोरांचे मोराल पार रसातळाला गेले असेल कोणास ठाऊक (माझेही ही गेले होते पण मुळ स्वभाव कोडगा असल्यामुळे फार काळ टिकलं नाही Proud )
त्यात परिक्षेत प्रश्नांची उत्तरं नुसती बरोबर असलेली चालत नाहीत ती कुठल्याशा पुस्तक/गाईड मधली तंतोतंत जुळलेली लागतात. त्यामुळे ह्या प्रकाराला अजूनच दुजोरा मिळतो. ह्या पुढे जाऊन मी तर म्हणतो एखाद्या मुलानी घोकंपट्टी करुन का असेना, दिली ना उत्तरं बरोबर? तेवढच पुष्कळ नको का? की नेमकं किती वेळा वाचून लक्षात राहिलं ते पण बघायचं आता?

अ‍ॅडल्ट लोकांमध्ये तर मला स्मरणशक्ती वाढवायची आहे हा प्रश्न येतोच कसा ह्याचं आश्चर्य वाटतं! जो पर्यंत तुम्हाला एखादा विकार नाहीये जेणेकरुन तुम्हाला खरच गोष्टी लक्षात राहत नाहीत तर एरवी बर्‍याचवेळा तुमचा विसरभोळेपणा स्मरणशक्ती कमी असल्यामुळे नसून तुमचं तुमच्या कामात (कुठलंही काम, कितीही साधं असलं तरी) लक्ष नाहीये येवढच असतं.

आणि प्रचंड स्मरणशक्ती असून खरच काय फायदा होतो हे ही लक्षात घ्यायला हवं. हे कोल्ह्याला द्राक्ष अंबट सारखं विधान वाटू शकतं पण एकदा नीट विचार करणे आणि मुळात ध्येयच व्यर्थ आहे का हे ही बघायला हवं.
आपल्या दैनंदिन जीवनात, कामाच्या ठिकाणी वगैरे दाणग्या स्मरणशक्ती पेक्षा, जे काही लक्षात राहतय (शॉर्ट टर्म करता का असेना) त्याचा ठराविक वेळात वापर करणे ह्यालाच जास्त महत्वं नाहीये का?

माझ्यामते वयानुसार तुमची स्मरणशक्ती ही कमी होत जाणारच आणि मेंदू तल्लख ठेवणे हे ध्येय म्हणजे स्मरणशक्ती वाढवणे नसून डोक्यात असलेल्या माहितीचा त्वरित आणि योग्य उपयोग करणे हा असायला पाहिजे आणि ते साध्य करणे इतकं अवघड नाहीये. सतत स्वतःला डोक्याला चालना मिळेल अशा कामात व्यस्त ठेवलं तर हे सहज शक्य आहे.

औषधं वगैरे घेऊन स्मरणशक्ती वाढवायला बघणे किंवा फक्त स्मरणशक्ती वाढवायचा क्लास लावणे म्हणजे खरच खुप अतिश्योक्ती आहे.

वैद्यबुवा, तुमची बरिचशी मत पटली.
पण तरिहि काही अ‍ॅनालायटिकल गोष्ट करण्यापूर्वि काही बेसिक गोष्टी स्मरणात असल्या पाहिजेतच .
आता मी नाडकर्ण्याम्चे उदाहरण दिलंय त्यात
पेशंटचे केस रेकॉर्ड पेपर, त्याचा चेहरा, त्याने घातलेले कपडे, त्या दिवशीचा एखादा प्रसंग याची सांगड केस पेपर रेकॉर्ड वरून फोटोस्तॅतिकलि लक्षात ठेवायचे तंत्र त्यानी विकसित केले.

आता कुठला पेशंट आला तर हो हो मागच्या वेळी तुम्ही गणेश विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी तुमच्या मोठ्या काकाम्बरोबर आला होतात आठवतंय मला. अस म्हणाल्यावर पेशंटला डॉक्टरबद्दल किती आपुलकी वाटत असेल ते ही खास सायकिअ‍ॅट्रिक पेशंटना .
आणि हेही इले. रेकॉर्ड सिस्टीम येण्यापूर्वी.

बाकी शालेय अभ्यासात फक्त स्मरणशक्तीवर भर देणे मलाही पटत नाही.

एक प्रकारची (बेसिक) स्मरणशक्ती ही सगळ्यांनाच असते आणि ती पुष्कळ आहे येवढच म्हणणं आहे. हे नाडकर्णी आहेत त्यांनी फक्त गोष्टी लक्षात ठेवण्याचे तंत्र विकसित केलय, त्यामुळे खरच स्मरणशक्ती वाढते का? मला नाही(च) वाटत.
ह्या उपर हे जे काही डिटेल्स अचूक सांगतात त्याचा फक्त पेशंट वर भाव मारला जातो आणि त्यांना सुध्दा ते "तंत्र" शिकून घ्यायला हुरुप येत असणार. तंत्र शिकून घेण्यात काहीच हरकत नाही फक्त त्याची गल्लत स्मरणशक्ती वाढते ह्या गैरसमजाशी करु नये (तुम्ही करताय असं नाही, जनरल म्हणतोय).

बुवा,
हे पेशंट वेगळे ते डिसॉर्डर वाले असतात. Happy
स्मरणशक्ती वैगेरे प्रकार सोडा त्याना नॉर्मल जगणं कठिण असतं.

हे स्मरणशक्ती, आकलनशक्ती वाढविण्याचे गाईडंस नॉर्मल लोकांसाठी.
दोन्हीकडचा क्राऊड वेगळा. पहिला सरकारी ओपीडीत दुसरा त्यांच्या संस्थेत.

आणि हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे त्यानी लक्षात ठेवण्याची शक्ती वाढवायचं तंत्र डेवलप केलय ते ही रेकॉर्ड पेपरवरून.
तोच पेशंट दोन दिवसानी रस्त्यात भेटला तर ओळखेन असेही नाही असे तेच म्हणतात.

पण जनरली एखाद्याची एखादी गोष्ट अचूक लक्षात ठेवायची शक्ती जास्त असेल तर स्मरणशक्ती जास्त आहे असे समजले जाते.

अ‍ॅडल्ट लोकांमध्ये तर मला स्मरणशक्ती वाढवायची आहे हा प्रश्न येतोच कसा ह्याचं आश्चर्य वाटतं! जो पर्यंत तुम्हाला एखादा विकार नाहीये जेणेकरुन तुम्हाला खरच गोष्टी लक्षात राहत नाहीत तर एरवी बर्‍याचवेळा तुमचा विसरभोळेपणा स्मरणशक्ती कमी असल्यामुळे नसून तुमचं तुमच्या कामात (कुठलंही काम, कितीही साधं असलं तरी) लक्ष नाहीये येवढच असतं. >>> मोठ्यांनी स्मरणशक्ती वाढवायचा का प्रयत्न करु नये, कामात प्रमाणापेक्षा जास्त लक्ष असुनही बर्‍याचदा विसरायला होतं. मला तर कधी कधी, बरेच दिवसांनी समोर आलेल्या माणसाचं नाव आठवत नाही. एखादी गोष्ट माहीत असते पण नेमकी वेळेवर आठवत नाही आणि वेळ निघुन गेल्यावर आठवते.

लिंबुटिंबु छान माहिती दिलीत.

वरच्या बर्याचश्या पोष्ट वाचुन असं वाटतयं कि जरा गाडी रुळावरुन घसरतेय.
स्मरणश्क्ती आणि विचारक्षमता (Memory and thinking or thought process) या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. वर कोडी सोडवणे वगैरे मला वाटतयं विचार्क्षमता वाद्ढवणॅ किवा अ‍ॅनॅलॅटीकल स्किल इंप्रुव्ह करणे याच्याशी निगडीत असाव्यात.

स्मरण्शक्ती आणि लक्षात ठेवायचे तंत्र यात काय फरक आहे, जाणकारांनी जरा प्रकाश टाकावा. माझ्या मित्राने एक कोर्स केला होता. त्याच्याकडुन मी समजावुन घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याचे एकच उत्तर ठरलेले असायचे. अरे ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यांची सांगड आपल्या नेहमीच्या गोष्टींशी घालायची म्हणजे त्या गोष्टी लक्षात रहातात. Uhoh गंम्मत अशी कि जी उदाहरणे दिलेली असतात ती लक्षात रहतात पण त्याचा त्याला बाकिच्या बाबतीत फायदा झलेला दिसत नाही. Happy

बुवा+१
ज्या गोष्टी ROM मध्ये असल्या तरी चालतात, त्या RAM मध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायची काय गरज? Proud उगाच आपलं याचे त्याचे मोबाइल नं, वाढदिवस, पत्ते, इमेल आयडी असल्या गोष्टी लक्षात ठेवायची धडपड कशाला करायची ते मला कळत नाही. डिजिटल मेमरी त्यासाठीच आहे की! Wink
आयुष्यातले मह्त्वाचे क्षण, आनंद, दु:ख आपण तसंही विसरत नाही (काही आजार झाल्याशिवाय), तेवढं पुरे! Happy लागेल त्याने दिवा घ्याच.

मला निसर्गतः उत्तम स्मरणशक्ती लाभली आहे. पण तरीही काही तंत्रे, जी आमच्या शिक्षकांनी शिकवली होती, ती इथे लिहितो.

रात्री अगदी डोळे मिटेपर्यंत वाचत बसू नये पण जे वाचू ते शक्यतो मन लावून, त्यासाठी हवे तर पेन्सिल हातात घेऊन, महत्वाच्य शब्दावर खुणा करत वाचावे. आणि सकाळी उठल्याबरोबर ते आठवायचा प्रयत्न करावा, जे आठवेल ते कायम स्मरणात राहिलेले असते. परत वाचायची गरज नसते.

आमचे शिक्षक, महत्वाचे शब्द फळ्यावर लिहून ठेवत असत, आणि ते पुसत नसत. दुसरे शिक्षक येईपर्यंत ते शब्द फळ्यावर रहात. त्यांच्यावर नजर टाकली तरी त्या तासिकेला शिकवलेले सगळे लक्षात रहात असे. मला या तंत्राचा फार उपयोग झाला कारण बी कॉम ते सी ए फायनल पर्यंत मला
अभ्यासाला फारच कमी वेळ मिळत असे.

शाळेतले स्मरणशक्तीचे खेळ, जसे टेबलावरच्या सर्व वस्तू आठवून लिहिणे, किंवा एका क्रमाने शब्द म्हणत जाणे. (एकाने सुरवात करायची, पुढच्याने त्याचा शब्द आणि आपला शब्द त्यात भर घालायचा ) यांची पण मदत झाली.

मी स्वतः केलेले तक्ते, चित्रे यांचा पण फायदा झाला.

पण मला फोन नंबर, गाड्यांचे नंबर आणि रस्ते लक्षात रहात नाहीत.

Shri, mi we're lihilay. Prashna yewu naye mhanje, you already have what you need. Aaplyala goshti athwat naahit hyachi sangad apan thet smaranshakti kami aahe hyachyashi ghaalto, mi tya baddal mhantoy.
I think its only a matter of being mindful of what you're doing.

*

वैद्यबुवा, मस्त लिहिलेत.
<माझ्यामते वयानुसार तुमची स्मरणशक्ती ही कमी होत जाणारच आणि मेंदू तल्लख ठेवणे हे ध्येय म्हणजे स्मरणशक्ती वाढवणे नसून डोक्यात असलेल्या माहितीचा त्वरित आणि योग्य उपयोग करणे हा असायला पाहिजे आणि ते साध्य करणे इतकं अवघड नाहीये. सतत स्वतःला डोक्याला चालना मिळेल अशा कामात व्यस्त ठेवलं तर हे सहज शक्य आहे.> उदा: नव्या व्यक्तीशी ओळख होते तेव्हा त्या व्यक्तीचा परिचय नीट लक्ष देऊन आपल्या मनात रजिस्टर करणे.
मला वाटतं प्रत्येकालाच पुरेशी स्मरणशक्ती मिळालेली असते. फक्त तिचा योग्य वापर कसा करायचा...गरजेच्या गोष्टी लक्षात ठेवण्याकरिता हे समजून घ्यायला हवे.
नुसती स्मरणशक्ती वाढवण्यापेक्षा मेंदूची एकंदरित कार्यक्षमता वाढविण्यावरच भर देणे योग्य.
स्मरणशक्ती= पाठांतरक्षमता असा अर्थ मी घेत नाही.

छान चर्चा चालली आहे Happy
वैद्यबुवान्ची पोस्ट तितकीशी पटली नाही. पण तो स्मरणशक्तिबाबतच्या समजुतीतला बोलीभाषेचा अर्थाचा घोळ आहे असे मला वाटते. कसे? तर......
>>>> पण त्याचे एकच उत्तर ठरलेले असायचे. अरे ज्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यांची सांगड आपल्या नेहमीच्या गोष्टींशी घालायची म्हणजे त्या गोष्टी लक्षात रहातात. <<<<
काल स्नान करीत असता यावर विचार करीत होतो. सवईने पाण्याच्या बादलीत हात बुडवुन पाणी गरम की गार हे बघताना, हात चट्ट्दिशी बाहेर काढायचा आहे, जास्त बुडवायचा नाहिये वगैरे बाबी "सवईने" करुन गेलो, बाथरुममधिल निसरड्या फरशीवर पुन्हा "सवईनेच" अलगद जपुन वगैरे पावले टाकली. अन लक्षात आले की मूद्दामहून न आठवता देखिल, या गोष्टी मी सवईने इतक्या सफाईने करू लागलोय की त्या जवळपास "प्रतिक्षिप्त" क्रिया म्हणून देखिल समजल्या तर हरकत नसावी. पण काय हो? आयुष्यात कधी ना कधी माझ्या आईने मला सान्गितले असेल कि बाळारे, बादलीतील गरम पाणी एकदम अन्गावर घेऊ नकोस आधी तपास किती गरम आहे ते, अन विसावण वगैरे घालुन तपासुन मगच आन्घोळीला घे. आता ते केव्हा कोणत्या तारखेला सान्गितले ते मला आठवत नाही, तिने सान्गितले अन तरी मी तेव्हा ते विसरलो असेन तर तेही आठवत नाही, विसरल्यामुळे मी तसाच ताम्ब्या भरुन अन्गावर घेतल्यावर कडकडीत गरम पाण्याने भाजलो असेन वा हात झप्पकीनी बादलित बुडविल्यामुळे भाजला असेल तर तेही आठवत नाही, म्हणजे माझी स्मरणशक्ति कमकुवत आहे का? अन आज मी मुद्दामहुन न आठवता देखिल जे करतोय त्या कृतीची केवळ "सवय" वा "प्रतिक्षिप्त" क्रिया म्हणुन वासलात लावता येईल का? तर माझ्या मते नाही. मेन्दू दर क्षणी पंचेन्द्रियान्नी दिलेल्या सूचना/अवलोकन्/आकलनाची नोन्द ठेवतच असतो, फक्त नैमित्तिक आयुष्याच्या गरजेप्रमाणे, त्यातिल नेमका कोणता भाग तत्काळ पुढे करायचा यासच केवळ स्मरण्शक्ती म्हणायचे असेल, तर याचाच अर्थ, मेन्दू "न वापरलेली/गरज नसलेली/बुद्धिने-व्यक्तिने दुर्लक्षित केलेली" पन्चेन्द्रियान्कडूनची जाणिव/सूचना/माहिती/आकलन, "गार्बेज" मधे टाकतो. अर्थात असे म्हणता येईल का की केवळ या गार्बेजमधिल बाबी आठवणे म्हणजेच स्मरणशक्ति वाढवणे? माझ्या मते नाही.
माझ्या मते, स्मरणशक्ति वाढविण्याचा थेट संबंध, एक तर अनाहुतपणे आकलन होणार्‍या बाबी लक्षात ठेवण्याशी आहे (जसे की अचानक धावत रस्ता क्रॉस करुन मध्यात येणारा - ज्यामुळे पुढे नेहेमीच डावीउजवीबाजुचे ध्यान ठेवले जाते - थोडक्यात प्रत्यक्ष अनुभवातुन), वा मेन्दूला सुनिश्चित बाबीन्चा/घटक/विषयान्चा मूद्दामहून ओळख करुन देण्याच्या प्रयत्नाशी आहे (जसे की पाढे वगैरे पाठ करणे वा आईने मला सान्गणे की हात बुडवू नकोस, भाजेल - थोडक्यात अनुभव न घेता लक्षात ठेवायच्या बाबी, इथे आईने केलेल्या वर्णनातुन अनुभूती घेणे अपेक्षित आहे, व नि:ष्कर्ष लक्षात ठेवणे अपेक्षित असल्याने मला आईने माझ्या वयाच्या कोणत्या वर्षी, कोणत्या तारखेला काय प्रसन्गात ते सान्गितले ते आठवत नाहीये, पण सान्गितले होते हे नक्की, मेन्दुला अधिक ताण दिला तर मी ते देखिल आठवू शकेन, कारण मेन्दू काही तपशील गार्बेज मधे टाकत असला तरी नःष्ट करीत नाही असे मला वाटते).
आता स्मृती वाढविणे याचा संबंध, मेन्दुने आकलन केलेल्या वरील दोन (वा इतरही प्रकार असतील, मला विचार करुन लिहीणे या क्षणी शक्य नाही) प्रकारातील बाबी नेमक्या वेळी आठवुन त्याप्रमाणे कृती करणे, अन हे केवळ बॉससमोर, त्याला काय आवडते/भावते/हवय हे समजुन घेऊन तत्काळ ते पुढे करणे इतपतच मर्यादित नाही, सबब मी माझ्या दैनन्दिन "गरजेच्या" कामकाजात जे अन जेवढे लागते तितक्याचाच अभ्यास करुन बाकी स्मृतिविषयक अभ्यास/चिन्तन/सराव गरजेचाच नाही वा अ‍ॅडल्ट लोकास याची गरजच काय असे समजत नाही.
हा विषय खूप क्लिष्ट आहे, व उदाहरणे देत मुद्दा सान्गणे हे टायपिन्ग व वेळेच्या मर्यादेमुळे अवघड होते आहे.
तर आज इतकेच Happy

[माझ्या वरील काही पोस्ट आवडल्याचे/नावडल्याचे सान्गितल्याबद्दल धन्यवाद]

लिंबूटिंबू, तुम्ही जे सवयीने कामं करणं, त्यासाठी स्मरणशक्ती किंवा स्पेशली मेंदू न वापरणे लिहीले आहे, तेच सध्याच्या 'द पॉवर ऑफ हॅबिट' पुस्तकात दिले आहे! अतिशय उत्तम लिहीले आहे त्यात! Happy

बस्के, बरोब्बर ओळखलत.
मला
१) "सवईने" लक्षात रहाण्याची मेन्दूची क्षमता, व
२) मेन्दूला मुद्दामहून लक्षात ठेवायला लावण्याची क्षमता आणि
३) सरतेशेवटी, नेमक्या गरजेच्या वेळेस मेन्दूने ते पुढे मान्डण्याची क्षमता
अशा तिनही बाबिन्चा "स्मृतिवर्धन वा संवर्धना" बाबत विचार करावासा वाटतो.
केवळ आत्ताची साहेबापुढे पुढेपुढे करण्यापुरती वा सद्य जीवनशैली जगण्यापुरती स्मृतीची क्षमता बाळगणे इतकाच मर्यादित अर्थाने मी हा विषय घेत नाही.

संगणक, मोबाईल फोन्समुळे स्मरणशक्ती कमजोर होत जाणार, काहि दिवसानी स्वतःचे नाव मोबाईलमधुन शोधावे लागेल

याविषयावर अधिकाधिक विचार करीत असता मन, बुद्धि, अन्तर्मन-बहिर्मन, जाणिवा, चेतना, आत्मा वगैरे अनेक बाबीन्मुळे माझा खूपच गोन्धळ उडत होता. गोष्टी सूसुत्रपणे मान्डल्या जात नव्हत्या. तेव्हा अचानक सुचत / जाणवत गेले की;
१. मूळात जीवधारणा किन्वा आत्म्याचा शरिर प्रवेश (मे बी गर्भधारणेपासुनच्या अमक्यातमक्या महिन्यापासून) झाला तरी, एखाद्या नवशिक्या वाहनचालकाप्रमाणे, सुरवातीला आत्म्याच्या स्वतःच्या अनुभूती/जाणिवा/इच्छा तो नविन धारण केलेल्या देहाप्रमाणे/देहाकडून व्यक्त करु शकतच असेल असे नाही. अन नविन धारण केलेला देह समजण्याचे/वापरण्याचे दृष्टीने त्याचे शिक्षण गर्भावस्थेपासूनच मुख्यतः श्रवणेन्द्रियाद्वारे वा अन्य प्रकारे (मला माहित नाही) सुरु झालेले असेल.
२. मूल जन्माला आल्या आल्या, प्रथमतः श्वास घेते /रडते, तेव्हा त्या दोन्ही दैहिक क्रिया पूर्णतः मेन्दूच्या स्वयंचलित आज्ञावलीमार्फतच होतात, व तिथे या कृती करण्याबाबतची स्मृती वा अन्य आदेश स्वतंत्रपणे दिले जात नाहित.
३. मात्र जसजसे मुल वाढत जाते, तसतसे शरिराच्या हालचाली लक्षात ठेवण्याबरोबरच, मेन्दुचा अधिकाधिक विकसितरित्या वापर करण्याचे कौशल्य मुल सरावाने आत्मसात करत जाते, व लक्षातही ठेवते.
४. पण या अत्यावश्यक गरजेच्या बाबी असल्याने, मेन्दुस मुद्दामहुन सान्गावे लागत नाही की बाबारे, पाय असा चालिव म्हणजे पडणार नाहीस, पाठीच्या कण्याचा / अन्य स्नायुन्चा असा ब्यालन्स कर म्हणजे वाकलास तरी पडणार नाहिस वगैरे वगैरे. मुल बोलू लागते ते देखिल श्रवण केलेले शब्द आपसुक स्मृतीत साठवुन तसेच बोलण्याचा प्रयन्त करुन. हे लक्षात ठेव असे मुद्दामहुन सान्गावे/शिकवावे लागत नाही. मी या सर्व प्रकारच्या लक्षात ठेवण्यास दैहिक मेन्दुची नैसर्गिक किमान क्षमता मानतो.
५. मात्र जगण्याकरता आवश्यक असलेल्या, मे बी गुणसुत्रे/अनुवन्शिकता या मार्फत येणार्‍या स्मृतिविषयक या क्षमता, एका विशिष्ट मर्यादेनन्तर मात्र जितक्या वापराल तितक्याच पद्धतीत वापरल्या जातात. परिसराचे ज्ञान होण्याचे दृष्टीने आवश्यक असलेली पंचेन्द्रिय, त्यान्चेकडूनच्या झालेल्या जाणिवा पूर्वानुभवात परिवर्तित करुन स्मृतित ठेवणे हे किमान पातळीवर मानवी मेन्दू करीतच असतो पण यापेक्षाही त्याच्या जास्त क्षमता "मानव" म्हणुन असतात, त्या म्हणजे तत्काळ गरजेच्या नसलेल्या पण भविष्यात उपयोगी पडणार्‍या बाबी देखिल मूद्दामहून लक्षात ठेवणे व वेळेस पुनरुद्धृत/वापर करणे.
६. मला वाटते की मेन्दूच्या या क्षमता विकसित करण्याचाच संबंध स्मृतिवर्धन क्षमतेशी असावा. Happy

लिंबाजीराव,
तुमच्या प्रतिसादांत जो विचारप्रवाह आहे, तो थोडा अध्यात्मिक लेव्हलचा आहे. म्हणजे काय, की तुम्ही विचार चांगला करता, पण त्यात मनासोबत आत्मा-बित्मा आला की गोंधळ होतो. आत्म्या ऐवजी मेंदू नावाचे फिजिकल स्ट्रक्चर डोक्यात आणुन बघा मग सोपे होईल.

मेंदूचा अभ्यास अजूनही सुरु आहे अन इतर अवयवांइतके सखोलपणे त्याचे कार्य अजूनही उलगडलेले नाही. पण तरीही मेमरी बद्दल जितका अभ्यास झालेला आहे, त्यातला 'ऑफ हॅण्ड' जितका आठवतो तो असा:

१.अल्ट्रा शॉर्ट टर्म, २.शॉर्ट टर्म अन ३.लाँग टर्म मेमरी असे तीन प्रकार आहेत.

१ मधे अगदीच थोड्या वेळासाठीच्या आठवणी असतात, टास्क रिलेटेड. ते टास्क संपले की ती मेमरी डीस्कार्ड होते. हे थोडे काँप्युटरच्या रॅम सारखे. उदा. गाडी चालवताना बदलण्याचे गियर. मघा मी दुसरा टाकला होता. आता मला थर्ड किंवा परत फर्स्ट टाकायचा आहे, तर आधीचा गियर आठवणीत हवा. गियर बदलून झाला, की ही मेमरी डिस्कार्ड करण्यात येते.

२ अमुक ठिकाणी जाण्यासाठी विचारलेले लॅंडमार्क्स, सरळ जाऊन मारूतीच्या देवळाशी डावीकडे मग २ सिग्नल सोडले की बरोडा बँके समोरची बिल्डींग. हे शॉर्टटर्म. किंवा सकाळी डायबेटीसची गोळी घेतली होती की नव्हती? इ. हे थोडे हार्ड डिस्क वर लिहिलेल्या डेटा सारखे. रीड्/राईट मेमरी.

३ लॉंग टर्म मधे, वर्षानुवर्षे आठवण टिकून रहाते. जणू सीडी वर लिहिलेला डेटा. या प्रकारची मेमरी तयार होण्यासाठी त्याच त्या न्यूरोनल लूप मधून सिग्नल फिरतो, अन न्यूरॉन्स चे पक्के सर्किट्स तयार होतात. त्याच मुळे घोकंपट्टी म्हणा की रियाज म्हणा, पुनः पुन्हा तेच तेच करत रहाणे, हा लाँगटर्म मेमरी तयार करण्याशी संबंधीत भाग आहे, ज्याने ही सर्किट्स पक्की होतात. ही मेंदूच्या 'स्ट्रक्चर'मधे बदल करणारी गोष्ट आहे. सीडी लिहिल्यानंतर तिथे जसे पर्मनंट स्ट्रक्चरल चेंज होते, तसेच. मज्जापेशींची नवी 'इलेक्ट्रॉनिक' सर्किट्स = लाँगटर्म मेमरी

(स्वप्न, किंवा ज्याला REM Sleep म्हणतात, त्यावेळी दिवसभरातील स्मृतींचे फ्लॅशबॅक घेऊन त्यांचे वर्गिकरण, जुन्या आठवणींशी पडताळणी इ. सुरु असते. त्यातून मग सिलेक्टेड मेमरीज साठवणे अन इतर डिस्कार्ड करणे आसे काम होते, असा अंदाज आहे, जो बरोबर असावा असे वाटते. यामुळेच जुन्या पक्क्या आठवणींशी सांगड घालून तयार केलेल्या नव्या आठवणी, लाँगटर्मकडे वर्ग होणे सोपे होते. यातच थोडी जागृतावस्था आली की स्वप्न जाणवते/आठवते, अन्यथा सुमारे दर ९० मिन्टात एकदा १० मिनिटे आपण अशी झोप अनुभवत असतोच. मग स्वप्न पडले असे आठवो, की न आठवो.)

या झाल्या 'अ‍ॅक्वायर्ड' मेमरीज.

याखेरीज असते ती 'रेशियल' मेमरी, उदा माकडांना वाटणारी बिबट्याची/सापांची भिती, किंवा त्याही पेक्षा आदीम आठवण म्हणजे निपल तोंडात धरून चोखणे, दूध ओढून घेणे. हे शिकवावे लागत नाही. ती मेमरी बायोस सेटपप्रमाणे बिल्ट-इन असते. मेंदू विकसित होतानाच त्यात बनविलेली ही काही सर्किट्स असतात. त्यात अगदी श्वास घेणे ऑटोपायलटवरून मॅन्युअलवर अन बॅक टू ऑटोमॅटिक इतपत प्रगत प्रणाली असतात Wink काही प्रणाली मॅन्युअल ओव्हरराईडच्या पल्याड असतात, उदा. हृदयस्पंदने.

असो.

तर या लेखाचा मुद्दा: स्मरणशक्ती वाढवावी कशी?
यासंदर्भात माझी मते:

१) प्रत्येकासाठी वेगळा मार्ग आहे. एकाला लागू पडेल ते दुसर्‍याला पडेलच असे नाही.
२) काही नेहेमीच्या वापराचे (वा विशेष आवडीचे) मोबाईल नंबर आपोआप लक्षात रहातात. बाकी नं लक्षात ठेवायलाच ते फोनबुक असते.
३) निरुपयोगी गोष्टी सहसा लक्षात रहात नाहीत. डोक्यातून आपोआप कचरा गायब होतो. सबब कोणत्या गोष्टी लक्षात रहायला हव्या त्याचेही तारतम्य असणे गरजेचे आहे. उगाच प्रत्येकानेच हिरोशिमावर बाँब पडला तो किती टनांचा होता अन कोणत्या वारी किती वाजता पडला हे लक्षात कशाला ठेवायला हवे? गूगल आहे त्यासाठी..
४) आवडीची नसलेली गोष्टही सहसा लक्षात रहात नाही. आवड असेल तर बरोब्बर लक्षात रहाते. म्हणूनच नीरसपणे शिकवलेला अभ्यास ४ वेळा रेकॉर्डेड लेक्चर ऐकूनही लक्षात रहात नाही, पण आवडीने पाहिलेल्या सिनेमाचे डायलॉग / गाणी एकाच पहाण्यात/ऐकण्यात पाठ होतात..

धन्यवाद!

Pages