एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं तो सुपारी घेऊन लोकांना शूट करणारा शूटर असावा. आणि पोलिसांच्या भीतीने पळायची त्याला सवय असावी.
>>>>>>>>> स्वप्ना काय ग कहर आहेस तु Rofl

आजचा एपिसोड मस्त... खुप आवडला. कुहूचा भागही आवडला. कुहू आचरट वाटते पण तरीही निरागसपणा लपत नाही. मस्त काम केलंय जोशीबाईंनी Happy

राधा वैतागलेली असताना दरवाजात घनाला बघताच काय मुड बदलतो तिचा.. Happy

तिचे आणि अबिरचे संवाद सॉल्लीड आहेत. मला तर बाई जाम आवडला अबीर.......

तिचे आणि अबिरचे संवाद सॉल्लीड आहेत. मला तर बाई जाम आवडला अबीर....... >>>>>>> अगदी, कसला उचकवतो तो राधाला. मलापण आवडला अबी(भी)र Happy

मुक्ताचं "रानडे" आवडलं. ती आवर्जून त्याला तशीच हाक मारते. सगळा राग काढते हे खरच छान घेतलय. Happy

मला पण अबीर रानडे आवडला...सिरियलमध्ये नुकताच आला आहे असे वाटत नाही.पहिल्यापासूनच आहे असे वाटते.

<<< मला पण अबीर रानडे आवडला...सिरियलमध्ये नुकताच आला आहे असे वाटत नाही.पहिल्यापासूनच आहे असे वाटते.

एक्झॅक्टली हेच लिहायला आले मी. काय कमालीची ईझ आहे उमेश कामतच्या अ‍ॅक्टिंगमध्ये! मी पुन्हा एकदा फिदा Proud केवळ ३- ४ भाग आधी आलाय हे जाणवतच नाही, बाकीचे सगळे कलाकार सीरीयलमध्ये सेटल्ड आहेतच म्हणा, पण तो सुद्धा सीरीयलच्या सुरुवातीपासून काम करतोय असं सतत वाटतं. जबरी Happy

मुक्ताला सुद्धा आजच्या भागात १०० पैकी १०० मार्क तर स्वप्निलला १०० पैकी २०० मार्क Wink

काय कमालीची ईझ आहे उमेश कामतच्या अ‍ॅक्टिंगमध्ये! >>> अगदी अगदी.
आजचा सगळा एपीसोडंच छान होता.

कालच्या भागात देसायांच्या घरात कॉफीच्या ऐवजी मदिरापान करावे अशी चर्चा चालली होती. आता आणखी कोणता पुरावा हवा सिरियलवाले मायबोली वाचत असल्याचा? Wink

काल कुहु मस्त स्वःतच स्व्प्न रंगवुन सांगत होती घनादादा ला...आनि मग तिच हळव होण...माझ्याकडुन फुल मार्क्स तिला... Happy
आनि घनाच्या मनाची घालमेल....राधा च बोलण एकुन...(मुलांनो खरंच तुम्ही लगेच असे अस्वस्थ होता का बायकोने किंवा प्रेयसीने दुसर्याचे नाव घेतल्यावर Wink )
दारात घना उभा असताना राधा त्याला पाहुन खुश होते..तेव्हाची घनाची नजर...आय...हाय...किती गोड..त्याला पण फुल मार्क्स Happy

लोकांना इतका का आवडतोय स्वप्नील? घना या पात्राच्या बहुतेक प्रतिक्रीया या 'माठ दिसणे' एवढ्याच असतात. त्यासाठी स्वप्निलला वेगळे काही करावे लागत नसावे ;). ज्याने कोणी स्वप्नीलला या भूमिकेसाठी निवडले त्याला मात्र मानले पाहिजे.

दारात घना उभा असताना राधा त्याला पाहुन खुश होते..तेव्हाची घनाची नजर...आय...हाय...किती गोड..त्याला पण फुल मार्क्स >>>> अ‍ॅण्ड हाउ कुड यू मिस राधाचे हावभावज् दॅट टाइम? मलातर फार आवडले. (अस लिहिल्यावर मला यू एस मधून लिहिल्यागत वाटतय Happy )

मला सगळ्यात जास्त राधाचा अभिनय आवडला तो म्हणजे 'मी तुम्हाला बोअर होतेय का पपा?' असं मूड जात जात, चिडचिड व्हायला लागल्याचं दाखवताना ...... काय अफलातून सटल एक्सप्रेशन्स देते ती.. टू गुड!

स्वप्निल जोशी पूर्वी मला महेश कोठारे च्या 'झपाटलेला' मधल्या बाहुल्यासारखा वाटायचा Proud पण या भूमिकेसाठी त्याच्याइतकं चपखल आता कोणी वाटत नाहीये Happy

स्वप्निल जोशी पूर्वी मला महेश कोठारे च्या 'झपाटलेला' मधल्या बाहुल्यासारखा वाटायचा >> एकदम चपखल उपमा Happy

पण या भूमिकेसाठी त्याच्याइतकं चपखल आता कोणी वाटत नाहीये >> हे पण खरय कारण ते पात्रच तसं आहे.

<< लोकांना इतका का आवडतोय स्वप्नील

मला स्वतःला स्वप्निल केवळ ह्या सिरीयलमध्येच आवडतोय, पण कारण पूर्वी तो " स्वप्निल जोशी पूर्वी महेश कोठारे च्या 'झपाटलेला' मधल्या बाहुल्यासारखा वाटायचा " Happy घनाला स्वतःबद्दल पूर्ण जाणीव असूनही तो स्वतःवर खूश आहे, कधी अतिशय हळूवार कधी अगदीच केअरलेस असा घना स्वप्निलने अतिशय सहजरीत्या अगदी " बॉय नेक्स्ट डोअर" वाटेल असा रंगवलाय. Happy

राधा म्हणाली ' 'मी तुम्हाला बोअर होतेय का पपा?'
हे ' 'मी तुम्हाला बोअर करतेय का पपा?' असे हवे होते ना ?

राधा तिच्या घरी गेल्यापासुन मी तर खुश आहे....कारण आता राधा आनि तिचे पपा दोघांमधले संवाद पहायला मिळतील...काल जेव्हा तु आता तुझ्या घरी कधी जाणार आहे अस विचारतात तेव्हा राधाचे हावभाव मस्त होते...कस न बिचारी..तिला पण तर जायचच आहे.

<< वेल-टोन्ड

अगदी अगदी. मी मागे लिहिलंय तसं, फिटनेस एखाद्या खेळाडूला शोभेसा आहे Happy

घना, राधा नी अबीर ची नसती स्तुती करण्यापेक्षा सोम्-मंगळ च्या भागात काय झाले ते पण लिहा ना जरा. Happy माझे दोन्ही भाग मिसलेत.

काल स्वच्छतेचा भोक्ता असणार्‍या उकाने टेबल साफ केलं. पण तिथली चिरलेल्या भाज्यांची ताटली उचलल्यावर तिथे सांडलेला कांदा त्याला खुपला कसा नाही????

ताटली उचलल्यावर तिथे सांडलेला कांदा>> अपर्णा, कांदा फोडणीला टकल्यावर केलं असेल त्याने टेबल स्वच्छ.. आपल्याला काय माहित? आपल्या जीवनातले अगदी बारीकसारीकही प्रसंग जसेच्या तसे मालिकेत दाखवत राहिले तर दहा वर्ष मालिका चालेल, बघायचे पेशन्स आहेत का? Proud
तो स्वच्छतेचा भोक्ता आहे हा संदेश योग्य त्या प्रसंगातून प्रेक्षकांपर्यंत पोचला ना? बास झालं.

Pages