Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28
कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिरायला बाहेर पडलं पाहीजे
फिरायला बाहेर पडलं पाहीजे त्या वेळी.>>>>>>> मंदार
मी परत मिसलाय कालचा भाग पण आज
मी परत मिसलाय कालचा भाग
>> टोकू तेच बरं नाहीतर मला स्टोरी सांगायची खुमखुमी आली तर तुला बिच्चारीला मागच्या किती इपिसोड्सची भेळ खावी लागेल कोणास ठाऊक.
पण आज संध्याकाळी पाहणारे
उका आवडतोय... पण तो आल्यापासून घना जास्तच आवडायला लागलाय. तसं पण मला अतिपरफेक्शनिस्ट असल्याचं अजीर्णच होतं
घना मोबाईलला घेऊन लोळत होता आणि चादरीत ते तात्याविंचूसारखे केस घुसळ्त पायानेच ते मोबाईलचं धुड वर सरकवलं. आईग्गं अजागळ पणाचा कहर तरीही ते गोडबिड का वाट्टंय कोणास ठाऊक!!! स्वजो पहिल्यांदाच हवाहवासा वाटतोय!
घना राधाला 'तुझ्या पापण्या चंद्रकोरासारख्या दिसतात' म्हणतो... चंद्रकोरीसारख्या हवंय ना? छे छे लिंगाशी फार खेळतात हे लोक! संवादातलं व्याकरण फारच गंडलंय!
राधा घनाची नजरा-नजर.... आये हाये!!!
ज्ञाना प्रेमात... हरे राम आणि ते कसले बोजड अवजड शब्द उच्चारतोय रे देवा... साधं सरळ आकर्षण पण हा मुलगा कॉम्प्लीकेटेट करतोय!!! ज्ञानाला समजुदे हे प्रेम वगैरे सामान्य लोकांचे वेळ घालवण्यासाठीचे अतिसामान्य साधन असून आपण त्यासाठी जन्मलेलो नाहीच्चोत.... ती मुलगी वाचेल बिचारी!
स्वजो पहिल्यांदाच हवाहवासा
स्वजो पहिल्यांदाच हवाहवासा वाटतोय >>>>>> अगदी अगदी
घना मोबाईलला घेऊन लोळत होता
घना मोबाईलला घेऊन लोळत होता आणि चादरीत ते तात्याविंचूसारखे केस घुसळ्त पायानेच ते मोबाईलचं धुड वर सरकवलं. आईग्गं अजागळ पणाचा कहर तरीही ते गोडबिड का वाट्टंय कोणास ठाऊक!!! >>>>>>> माझ्यासाठी तर हा नी असे सीन नेहमीचेच आहेत घरी.
त्यामुळे घना आपल्यातलाच १ वाटतो. 
तसं पण मला अतिपरफेक्शनिस्ट असल्याचं अजीर्णच होतं>>>>>> मलापण
ज्ञाना प्रेमात... हरे राम आणि
ज्ञाना प्रेमात... हरे राम आणि ते कसले बोजड अवजड शब्द उच्चारतोय रे देवा... साधं सरळ आकर्षण पण हा मुलगा कॉम्प्लीकेटेट करतोय!!! ज्ञानाला समजुदे हे प्रेम वगैरे सामान्य लोकांचे वेळ घालवण्यासाठीचे अतिसामान्य साधन असून आपण त्यासाठी जन्मलेलो नाहीच्चोत.... ती मुलगी वाचेल बिचारी! >>> अगदी अगदी.. खरच.
पण एकुणच मालिका रंगतेय एवढं नक्की.. आणि मायबोली वरचा हा धागा मालिकेशी संबधीत असणारं कुणीतरी वाचतय हे पण कालच्या राधाच्या वेशभुषेवरुन जाणवतय. मला तर फार आवडतेय. मालिका आणि सर्वच पात्र ( हो हो ज्ञाना सुध्धा).
राधा आता भुस्न्याचे पालीचे
राधा आता भुस्न्याचे पालीचे जोक्सपण एन्जॉय करायला लागलीय !
भुस्न्या काय डब्या काय.....कूल
घनाला बर्मुडाज जास्त शोभल्या असत्या असं वाटतय किंवा नी लेन्ङ्थ काहीतरी......अजून छान गबाळा वाटला असता !
घनाला लहान बाळं आवडतात हे सांगतानाचे त्याचे संवाद आणि हावभाव लाजवाब !
बरं झालं तू आलास हे सांगताना राधा, आणि तिच्याकडे बघणारा घना तर काय यार ....पैसे वसूल शॉट होता.
राधाचा ड्रेस पॅटर्न बदलला या भागात तेही छान वाटलं...स्टँड कॉलर आणि जरीवाला कुर्ता ....बांधलेले केस..
दुपट्टावाल्या ड्रेसपेक्षा तो न घेता काम करताना तिच्या कामात ईझ जाणवली मला ...
राधा म्हणाली ' 'मी तुम्हाला
राधा म्हणाली ' 'मी तुम्हाला बोअर होतेय का पपा?'
हे ' 'मी तुम्हाला बोअर करतेय का पपा?' असे हवे होते ना ?>>>>
'तुम्हांला बोरिंग होतंय का माझं असणं?' असं विचारते ती.
आयला... ही सिरिअल पोर्शनला
आयला... ही सिरिअल पोर्शनला ठेऊन पुन्हा परीक्षा घेतल्या तर... बोर्डात याल तुम्ही सगळे....
सिरिअल पाठ्यपुस्तक आणि हा
सिरिअल पाठ्यपुस्तक आणि हा धागा गाईड
अनंत अनपेक्षित....
अनंत अनपेक्षित....
नील
नील
कालचं एलदुगो सुरु झालं आणि
कालचं एलदुगो सुरु झालं आणि संपलं, हाती असं काहीच लागू न देण्याची खबरदारी घेतात. राधा वैतागलेली आहे आणि तरीही उका बोलतच राहतो. अजून त्या घरात नवीन असताना राधाला लग्न झाल्यासारखं वाटत नाहीये वै. बोलणं जास्तच वाटतं.
रोजच्या रोज गोट्ट नका
रोजच्या रोज गोट्ट नका शोधू..नाट्य बघा
कालच्या भागातला मुक्ता आणि
कालच्या भागातला मुक्ता आणि स्वप्नील चा अभिनय छान होता. घना ला दरवाजात पहाताच पहिल्यांदा ती मिठी मारायला सरसावते पण हात धरते तो अभिनय आणि अर्थातच दिग्दर्शन उत्तम. थोडे स्वप्नील चे संवाद किंवा pauses कमी realistic वाटतात. तेवढे प्लीज सांभाळायला सांगा.
राधाचा टॉप झक्कास... राधा
राधाचा टॉप झक्कास...
राधा किती चिडचिड करतेस गं पप्पांवर... बिच्चारे
आज स्वप्नील भारी होता.
आज स्वप्नील भारी होता. मुक्ताचं राजा राजा करणं सोडता बाकिचे संवाद मस्त. उकापण मस्त. उद्याचा भाग बघावाच लागेल. राधा आणि उकामध्ये हातमिळवणी
तेहि घनासमोर 
मुक्ता-राधा यांचे प्रणयाराधन
मुक्ता-राधा यांचे प्रणयाराधन >>
कालच्या भागातला मुक्ता आणि स्वप्नील चा अभिनय छान होता. घना ला दरवाजात पहाताच पहिल्यांदा ती मिठी मारायला सरसावते पण हात धरते तो अभिनय आणि अर्थातच दिग्दर्शन उत्तम. >> +१
राधाचा टॉप झक्कास... >> +१
आयला... ही सिरिअल पोर्शनला
आयला... ही सिरिअल पोर्शनला ठेऊन पुन्हा परीक्षा घेतल्या तर... बोर्डात याल तुम्ही सगळे....


>>>
स्वप्ना नापास होईल पण
तिचा नावडता विषय आहे
आजचा भाग जाम आवडला


मुक्ता दिवसेंदिवस आधिक आधिक आवडायला लागलिये
स्वप्निल तर आवडतोच
पण स्वप्निलला स्वप्निल म्हणून न पहाता घना म्हणुनच पहिलं जातं आजकाल
उका पण आवडला
किती त्रास देत होता कालच्या भागात राधाला
कालच्या भागातला मुक्ता आणि
कालच्या भागातला मुक्ता आणि स्वप्नील चा अभिनय छान होता. घना ला दरवाजात पहाताच पहिल्यांदा ती मिठी मारायला सरसावते पण हात धरते तो अभिनय आणि अर्थातच दिग्दर्शन उत्तम. >> +१
उका कसला कमाल आगाऊ व डोक्यात जाणारा घेतलाय!
(तरीपण तो छान वाटतो. अर्थात लग्नापूर्वीचा उका जरा जास्त छान होता. आता किंचित सुजलाय.
)
मुक्ता , विनय आपटे बेस्टच आहेत!
घना तर बेस्ट! उका राधाला उचकवणारे डायलॉग्स टाकत असताना दारात घना दिसल्यावर मला पण हायसे वाटले होते..
कुहूदेखील खूप आवडली गेल्या काही भागात.
मस्त चाललीय एलदुगो एकदम!
उका किंचित सुजलाय>>>>
उका किंचित सुजलाय>>>>
फुदक्कन हसले मी हे वाचुन. 
कित्ती गोड सासू! (काश मेरी भी ऐसी एक तरी सास होती! :उसासा टाकणारी बाहुली: ) 

आणि चक्रमादित्यसारखा शर्ट तोंडाजवळ न्यायचा प्रयत्न करत राधाला म्हणत होता अगं राहुदे ना मी चाटून टाकतो पटकन 
कुहुचं ते ''घनादादा'' मस्तच!
राधाने घनाला दारात पाहिल्यावरचे हावभाव सुपर्ब!
उका,विआ जाम भारी!
काल घनाची आई त्याच्या बाबांना म्हणते की, '' सून काय म्हणता हो? मुलगी आहे ती माझी!''
आणि ती राधा उकासमोर घनाशी लाडीक वागून केवढे नखरे करत होती.
ते चॉकलेट मूस की मूझ नक्की काय होतं? जे गबाळ्या घनाने सांडवलं शर्टवर
(१) राधाच्या आत्याचं सारखं
(१) राधाच्या आत्याचं सारखं सारखं धेडगुजरी भाषेत जमाईबापू काय चाललंय? जमाईबाबू किंवा जावईबापू हे बरोबर आहे ना?
(१) (अ) आणि आजकाल जावयाला नावाने हाक मारतात, यांच्याकडे वेगळं आहे का?
(२) रानडे म्हणजेच उका म्हणजेच शार्प शूटर उर्फ कुक हा पेईंग गेस्ट आहे की स्वयंपाकी/आचारी?
(३) उकाच्या डोक्यावर कुकची टोपी बघितली आणि जाम हसायला आलं. घरातल्याघरात जेवण बनवताना डोक्यावर ती कुकची टोपी घालण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली?
(३) (अ) की "आम्ही सारे खवय्ये" चा यजमान (होस्ट) म्हणून पुढचा भाग तिथेच चित्रित होणार होता? कपडे बदलण्याचे कष्ट नकोत म्हणून तीच टोपी ठेवली होती का?
(३) (ब) घना त्याच्या सासर्यांची माफी मागत असताना उका 'आता खाजगी बोलणं सुरु आहे' हे जाणून आत का निघून जात नाही? ह्याला "सभ्य (सोफिस्टिकेटेड) मानव" म्हणावं का?
<<राधाचा ड्रेस पॅटर्न बदलला
<<राधाचा ड्रेस पॅटर्न बदलला या भागात तेही छान वाटलं...स्टँड कॉलर आणि जरीवाला कुर्ता ....बांधलेले केस..
दुपट्टावाल्या ड्रेसपेक्षा तो न घेता काम करताना तिच्या कामात ईझ जाणवली मला ...>> +१
पहिल्यांदाच आवडली मला राधाची ड्रेसिंग style
ते चॉकलेट मूस की मूझ नक्की
ते चॉकलेट मूस की मूझ नक्की काय होतं? जे गबाळ्या घनाने सांडवलं शर्टवर आणि चक्रमादित्यसारखा शर्ट तोंडाजवळ न्यायचा प्रयत्न करत राधाला म्हणत होता अगं राहुदे ना मी चाटून टाकतो पटकन >>> शी ई ई ई हो ना.. काय वेंधळा दाखवलाय. असो पण एकुणच खुलतेय आणि बघावीशी वाटतेय मालिका.. ८.३० ते ९ वेळ मन रमवण्याची. आता तु घरी येऊ शकतेस हे एकल्यावर राधा च्या मनात उकळ्या फुट्ल्या असणार.. पण ते आपल्याला वाटत होतं ते संपलय ना आता? असं एकमेकांना बोलण आणि हळुच समोरचा काय बोलतोय ह्या कडे जास्त लक्ष देणं.. खरचं राजवाडे ना मानलं..
मंजो, कित्ती लक्ष देऊन बघता
मंजो, कित्ती लक्ष देऊन बघता हो मालिका तुम्ही! आणि तुम्हाला प्रश्नदेखील पडू लागलेत. सांभाळा बरं. तुमचंही राधा-घनासारखंच व्हायला लागलंय का ते तपासा...कावळ्याचा पंचरंगी पोपट किंवा उपम्याचा शिरा....
कालचा भाग बघता आला नाही. तुमच्या पोस्टमधून आयता वृत्तांत कळला. धन्यवाद.
@मंदार, तु मालिकेतले दोष
@मंदार, तु मालिकेतले दोष सोडुन एन्जॉय का नाही करत. प्रवाह वरच्या मालिका बघताना डोक दहा फुट लांब ठेवलं तरी सुध्धा त्या डोक्यात जातात.. ही इतकी साधी सरळ मालिका बघताना इतका त्रास का व्हावा? कदाचित कुरघोड्या, द्वेष, राग हे बघुन बघुन प्रेम, माया, आपुलकी अशाही भावना असतात हे आपण विसरुन गेलोय का? चील मंदार.. आणि राग आला असेल सॉरी, कारण मी एक पंखा आहे या मालिकेचा.
@ भरत हे सुरू असताना दुसरं
@ भरत
लक्ष द्यावच लागत!
ह्या मालिकेचा एक पंखा घरीच आहे. राग येऊन जातो कुठे? 
हे सुरू असताना दुसरं काही करु शकत नाही हो
@राखी
स्टार प्रवाहच्या मालिका तर बघत पण नाही.
जी बघावी लागते त्यावर बोलणारच ना?
मं जो तुझ्या भावना योग्य जागी
मं जो तुझ्या भावना योग्य जागी (म्हणजे "ह्या मालिकेचा एक पंखा घरीच आहे" ह्यांच्या समोर) व्यक्त कर.

वड्याच तेल वांग्यावर काढतोस तु..
काल मलाही पहिल्यांदाच राधाचा ड्रेस वॉव म्हणावा असा वाटला.
मुक्ता भारी आहे राव...
>>मुक्ता भारी आहे
>>मुक्ता भारी आहे राव..
म्हणून मालिका बघवते राव
ह्या सीरियलमधल्या तुझ्या विना
ह्या सीरियलमधल्या तुझ्या विना ह्या नवीन सिचुएशनल गाण्याचं उद्घाटन/ प्रकाशन कुहूच्या हस्ते व्हायचं होतं म्हणे
भुंग्या, कुठायेस?
त्या कुहुला खरंच परीच्या
त्या कुहुला खरंच परीच्या वेषात दाखवुन ...घनादादा...घनादादा...अस ओरडायला लावल असत तर मजा आली अस्ती राव ..
Pages