एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबीरचे काळ्याशिवाय अजूनही रंग असतात. ही माहिती नणंदे कडून कळली. माझ्या भाच्याचं नाव आहे अबीर. नॉर्थ मधे बरंच कॉमन नाव आहे म्हणे. अबीर नाव ऐकल्यावर आम्ही पण ह्याच रेफरन्सने विचारलं होतं असं जाणून बुजून बुक्का या अर्थाचं नाव का ठेवलं. त्यावेळी हे ज्ञान मिळालं होतं.

अगदी शेवटचा शॉट फक्त बघितला.
अबीर आणि घना दोघंही निळा शर्ट खाकी पँट.
शाळा सुटल्यावर दोघं युनिफॉर्म मधे घरी आल्याचं दाखवलय कां ?

अबीर

अरेबिक मध्ये हे मुलीचे नाव असून अर्थ सुगंध.

हिब्रु मध्ये मुलाचे नाव. अर्थ- शूर.
बंगाली मध्ये मुलाचे नाव. अर्थ- संध्याकाळचा , सूर्यास्ताच्या वेळेचा आकाशातील लाल रंग.

~इति विकी. Happy

राधा सकाळी कॉफी प्यायला येणार आहे का असं घनाचे वडिल घनाला विचारत होते. घ्या, आम्ही इथे घरातून निघताना पाच मिनिटं लेट झाला तर दूध घेऊ शकत नाही आणि ऑफिसच्या वाटेवर सासरी जाऊन कॉफी घेण्याइतकं सासर-माहेर जवळ आहे राधाचं? हे ऐकून जे झालं त्याला जळफळाट म्हणत असावेत...

मला एक कळत नाहिये की घनाचे बाबा त्याला बाहेर जॉगिंगला जा असं का सांगताहेत. काळ्यांचं घर एव्हढं मोठ्ठं आहे ना? मग घरातल्या घरात फिरला तरी व्यायाम होईल ना.......

बाकी आज घनाच्या फोनची कीव आली. तो फोन बेडवर टाकून त्याच बेडवर घना रात्री झोपला होता तरी तो फोन सकाळी चालू होता म्हणजे सॉल्लीड दणकट असणार.

आज घनाने राधाला केलेला फोन अबीरने उचलला. घना घरी आला तेव्हाही तो तिथे होता. आता हा अबीर बहुतेक घनाकडून 'बुक्का' खाणार

अब

तो फोन बेडवर टाकून त्याच बेडवर घना रात्री झोपला होता
मला तो वातानुकुलन यंत्राचा रिमोट वाटला आधी.

अबीर आणि घना दोघंही निळा शर्ट खाकी पँट
हे आधी लक्षात आलं नव्हतं माझ्या, पण काहीतरी सारखेपण आहे असं वाटलं होतं.
त्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये एकजण अजागळ आणि दुसरा नीटनेटका आहे असं काहीसं दाखवायचं असावं.

उ का आणि राधाचे डायलॉग्ज आवडले मला Happy उ का सुद्धा अगदी सहज अभिनय करतो , २ -३ भाग आधीच आलाय असं वाटत नाही Happy ( मी उ का ची आधीपासूनची फॅन आहे Happy )

उद्याच्या भागाच्या री कॅपमध्ये तिघांचेही एक्स्प्रेशन्स पाहण्यासारखे होते Happy

अभिर म्हणजे सामर्थ्यवान असा अर्थ मागे कोणीतरी लिहिलाय.
अबीर म्हणजे सुवास असा मला गूगलून अर्थ मिळाला होता Happy

उ का आणि राधाचे डायलॉग्ज आवडले मला >>> मला पण. तसंच उ का देखील घना सारखंच , वाक्याच्या शेवटी किंचीत पॉझ घेऊन 'राधा ' म्हणतो. त्या दोघांच्यात अश्या काही गोष्टींमध्ये साम्य दाखवण्यात दिग्दर्शकाचा असा हेतू असावा, की ज्या योगे त्यांच्यातले दुसरे काही ठळक बदल राधाच्या झटकन लक्षात येतील. वा ! आवडलं.

>>आज घनाने राधाला केलेला फोन अबीरने उचलला. घना घरी आला तेव्हाही तो तिथे होता. आता हा अबीर बहुतेक घनाकडून 'बुक्का' खाणार

Rofl Rofl

उमेश कामतचं पात्र आत्तापर्यंत जेवढं दाखवलं त्यावरुन तरी 'कुछ जम्या नहीं' असं वाटलं. अतिरंजित वाटलं. + २
>>आज घनाने राधाला केलेला फोन अबीरने उचलला. घना घरी आला तेव्हाही तो तिथे होता. आता हा अबीर बहुतेक घनाकडून 'बुक्का' खाणार

Rofl

ती राधाची आत्या एखाद्या स्थळाच कौतुक करावं, तशी भरभरून बोलते आहे अबीर बद्दल!. एकतर हा कटाचा भाग आहे, किंवा बावळटपणा! ती बहुतेक इंदोर् वाल्या काकांना सोडून इकडेच सेटल होणार.

घन आणि राधाचा रात्रीचा फोन, आणि खुललेले चेहेरे छान वाटले. आणि फोनवर कोणीतरी भलताच आला, शिवाय राधा पण 'मी नंतर बोलते' म्हणाली, त्यामुळे तो ताबडतोब परिस्थितीचा मुआयना करायला हजार झाला, हेही छान.

नेमबाज आणि चश्मा??? असु शकतो का?
आणि तो मोठ्यांना नावाने हाक मारतो ठीके पण अरे तुरे करणं जरा खटकतय मला तरी.

कदाचित तो अबीर म्हणजे त्या मथुमावशीचा कोणीतरी असेल? प्राचीआत्याचा कोणी असला तरी राधा ओळखत असेलच ना?

आता हा अबीर बहुतेक घनाकडून 'बुक्का' खाणार >>>>>>> हे भारीये Biggrin

मला तर वाटतं, ती माईआजी पण एक दिवसासाठी पुण्याला गेली होती, साधारण त्याच सुमारास बेबी आत्या पण पुण्यालाच गेली होती, हे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग आहे नक्की, आणि तो अबीर ही त्यांनीच आणलेलं पात्र आहे राधा घना ला एकत्र आणण्यासाठी, कदाचित माईआजीला त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सुगावा लागला असावा, कारण अधूनमधून ती कोणाला तरी फोन करून सगळं नीट आहे ना असं विचारत असते.

अभिनव बिंद्राला आहे की चश्मा.
अबीर राधाच्या वरताण आहे असे काल तिच्या गब्बुआत्याने म्हटले. स्वच्छता, टापटीप, व्यायाम आहार याबाबत आग्रही. आता राधाला हेच आपले गुण आवडेनासे होताहेत. काल चक्क तिने पाणीपुरी खाण्याचे समर्थन केले.

नेमबाज आणि चश्मा??? असु शकतो का?<<<<<< अभिनव बिंद्राला आहे की.

काल की परवाच्या भागात दिग्याकाका पुण्याबद्दल काहीतरी संशयास्पद आहे असं म्हणत होता. म्हणजे माईआज्ज्जी आणि नथु की काय त्या मावशीआज्जीबरोबर आणखी कोणीतरी होतं तिथे, काहीतरी हातवारे खाणाखुणा सुरु होत्या म्हणे त्या आज्ज्यांच्या अस सांगत होत्रा . बहुदा ही प्राचीआत्त्याच असणार

मयेकर +१.
आणि राधा त्याला कटाक्षाने आडनाव 'रानडे'ने हाक मारते कारण तो इतर सगळ्यांनाच नावाने हाक मारतो! कसलं मस्त दाखवलं हे Happy

संपदा, उद्याच्या भागाची 'झलक' असते, आणि कालच्या भागाची रीकॅप Happy Light 1

घना कसला बुक्का देतोय? इन्सेक्युरिटीमुळे तो पळायला जाईल उद्यापासून! Proud

ओके ओके Happy

अरेच्चा सगळ्यांनीच लिहिलय की अभिनव बिंद्राबद्दल
आणि या उकाचा गेटपही अभिनव बिंद्राचाच आहे, त्याला बघुन उकाचीच आठवण येते.
पंजाबी रानडे<<<<< नी Proud

>>पंजाबी रानडे

रानडेची आई पंजाबी असू शकते ना? वडिल मराठी असतील. मागे एकदा एका कार्यक्रमाच्या शेवटी श्रेयनामावलीत किंवा लोकसत्तात कुठेतरी 'फिरोज रानडे' हे नाव वाचल्याचं मला पक्कं स्मरतंय Proud

गुंतता हृदय हे सारखं त्या राजवाड्याने मालिकेच्या शेवट शेवटच्या भागात 'पूर्वी आणि आता' असं दाखवलं नाही म्हणजे मिळवलं... नाहीतर अबीरचं सिक्रेटसाठी सुद्धा तो तसं पाल्हाळ लाऊ शकतो Uhoh

फिरोज रानडे >> हे लेखक आहेत. अफगाण डायरी का कायतरी पुस्तक वाचलं होतं त्यांचं.

अब्दुल नारायण डिसोझा पण नाव येईल आता Lol

Pages