एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं झालं नविन धागा काढलास Happy

एकूणत जरा रीफ्रेशिंग कथा असावी असं निदान सुरुवातीला तरी वाटते आहे. आसावरी जोशीला पुन्हा मराठी मालिकेत पाहून मस्त वाटलं. तिचा नवा लूक पण सही आहे. मला आवडला. विनय आपटे इतक्या सोज्वळ भूमिकेत पाहवत नाहीत Wink ईला भाटे प्रचंड बोअर Sad मोहन जोशी मस्तच!

मी दोनच एपिसोड पाहिले, पण छान वाटतं आहे काही तरी. मिसलेले एपिसोडस कुठे बघायला मिळतील? का फार माही मिस केलं नाही अजुन? मलाही आजोचा नविन लुक आवडला. काही वेळ आठवायला लागलं कि हिला कुठे पाहिलं आहे, एवढी वेगळीच दिसते.

मागे पण मी कुठे तरी लिहिलं होतं- मुक्ता गोड आहे, पण तिचा मेकअप नाही आवडला. तिला नाही सुट करत.

ईला भाटे प्रचंड बोअर >>> फारच जोरदार अनुमोदन !
सुरूवातीचे एपिसोड्स पाहून प्रपंचची आठवण झाली. पण प्रपंच इतकी मजा येत नाहीये. बर्‍याच विनोदांवर अजिबात हसूही येत नाही.
फक्त मुक्ता बर्वे आणि विनय आपटेंची कामं आवडतायत. बाकी सगळे यथातथाच.
युट्युबवर ५ मिनिटांचे एपिसोड्स नाहीयेत. त्यामुळे बहूतेक पाहिली जाणार नाही नियमीतपणे.

परागला अनुमोदन.
मला जरा बोअरच वाटली मालिका.
प्रपंचसारखी मालिकाच नाही आली परत..ह्यात त्याची कॉपी करायचा प्रतत्न केला आहे असे वाटते. माणसं पण तीच तीच.
आजींची ओव्हरअ‍ॅक्टींग तर बघवत नाही..

मी प्रपंच पाहिली नाही त्यामुळे ठिक वाटली. फार काय ग्रेट नाही.
मुक्ताबर्वे नाही आवडली Sad तिचा मेकअप तर अगदी वाईट.
स्वप्नील त्या मानाने सहन झाला चक्कं
आसावरी जोशींचा मेकप तर याईक्स. हात लावला तर ग्रीझ लागेल. काय झालंय काय या एजेड नट्यांना. इतका का बरं मेकप करतायेत. तशाच छान दिसतात की.

छान चाललीय मालिका सध्यातरी. दोघांनाही लग्नात रस नाहीय आणि घरचे मागे लागलेत. मला वाटते घरच्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी दोघेही एकमेकांना पसंत केल्याचे नाटक करतील आणि मग मालिका संपेसंपेपर्यंत एक्मेकांच्या प्रेमात पडतील.

स्वप्नील मला अजिबात आवडत नाही पण मुक्ताच्या तुलनेत तो बरा वाटायला लागला. नाकात चमकी घातलेली मुक्ता अजिबात आवडली नाही, आ.जो. इक्स... पण कशालाच पर्याय नाहीय.. त्यामुळे पाहात राहणार Happy

मुक्ताला उगाचच 'जास्त शहाणी' दाखवायला गेलेत आणि फसले. तिला ते अजिबात सूट होत नाहीये लांब केस आणि नाकात रिंग..ईईई... त्यापेक्षा अग्निहोत्र मध्ये सही होती.. आजी तर वात आणतायत. प्रपंचला गती नव्हती पण ते रेंगाळणं, शब्दांच्या मधले रिकामे क्षण खूप काही बोलून जायचे.
काय झालंय काय या एजेड नट्यांना. >> हो ना, सारेगम मधे वंदना गुप्ते भ या ण दिसतेय. ती साधीच किती छान वाटते. Uhoh
ईला भाटे घरी करत नसेल एवढी उस्तवार सीरीयलीत करते, Proud पण सहज आहे ती.

हो आशू अगदी अगदी. वंदनागुप्तेंचाही किती तो मेकप. काय मेकप आहे की चेष्टा. शिवाय या बायकांनी कॅमेर्‍यासमोर एखाददोन दशकं काढलीत. आपलं हसं होतय हे त्यांनाच कळु नये? कमाल आहे.

पण भाट्यांनी ज्या काही कपड्यांच्या घड्या घातल्यात त्यावरुन त्यांना कपड्यांच्या घड्याही नीट घालता येत नाही हे सिद्ध झाले. काय त्या गुंडाळ्या. Proud

प्रपंचला गती नव्हती >>> तेंव्हाच्या गतिमान आयुष्याला अनुसरून होतं ते. आताच्या गतीनुसार यांचे एपीसोड्स असणार. वाटलंच तर मध्ये गती (http://www.gati.com/) अ‍ॅड ही करता येईलच की Proud

शेवट गोड करी म्हणत बोअर नाही झालं म्हणजे मिळवलं. राजवाडेंना कुणी साऊथचे सिनेमे द्या रे

रैना, प्रपंच नाही पाहिलीस तू... अरेरे... Wink ( Light 1 ) निदान झोका गेलाबाजार ४०५ आनंदवन तरी पाहिली आहेस का?

स्वप्नील चे लग्न न करण्याचे कारण एकदमच फालतू, हास्यास्पद वाटते. काय तर म्हणे मी अमेरिकेला जाणार आहे. गेली २-३ वर्शे तो अमेरिकेलाच जातोय. सॉफ्टवेअर ई. आहे म्हणतोय आणि कॉम्प्युटर दुरुस्त करतोय. तो सॉ. ई. आहे की हार्डवेअर ? आणि त्याला अगदी कधीही अमेरिकेहुन कॉल येईल म्हणे Biggrin

>>ईला भाटे प्रचंड बोअर
अगदी, अगदी. ती आणि त्या आजी सूरज बरजात्याच्या पिक्चरातून आल्यासारख्या वागताहेत.

>>आणि त्याला अगदी कधीही अमेरिकेहुन कॉल येईल म्हणे
हायला, टू मच. 'हॅन्डसम सॉफ्टवेअर इंजिनियर' हा शब्दप्रयोग ऐकून तर मी सोफ्यावरून पडलेच जवळजवळ. ** कोणी "हॅन्डसम सॉफ्टवेअर इंजिनियर" हे वाचत असतील तर दिवे घ्या हो. Proud

ईला भाटे बोअर म्हणजे त्या रंगवत असलेले कॅरेक्टर बोअर ना?
मुलगी लग्न करायला तयार नाही म्हणून कातवलेल्या बापाच्या भूमिकेत विनय आपटे नाही शोभत. बाळ कर्वे चालले असते.
तशाच निवृत्त कडक शिक्षिका असलेल्या आजी म्हणून रेखा कामत नाही शोभत. प्रपंच मधल्या प्रेमा साखरदांडे आठवल्या.
घनश्यामच्या घरात बरेच जण तर्‍हेवाईक दाखवलेत. कार्यकर्ता कॉलेजकुमार आणि सतत काव्यावणारी मुलगी....आणि काय काय.

प्रपंच, ४०५ आनंदवन इ.इ. प्रतिमा कुलकर्णींच्या मालिका. त्यांची अंकुर ही पण एक छान मालिका होती - कविता मेढेकर, तुषार दळवी.

ईला भाटे प्रचंड बोअर >>> परमनंटली कावरी बावरी आणि सगळीकडे एकसारखाच अभिनय. जरा सविता प्रभुणे, सुहिता थत्ते वगैरे घ्या म्हणावं.

मी फक्त प्रोमोज बघितलेत या मालिकेचे. कधी असते ही?

ज्या पाकिटाच्या अदलाबदलीमुळे गोष्ट घडणार आहे, त्यावर नाव पत्ता न लिहिताच ते कुरियर करायला दिले होते (?)

To see or not to see, that is the question >>>>>>>>> त्यात प्रश्न पडण्यासारखं काहीही नाहिये प्राची. नाही बघितलीस तरी चालेल, अशा टाईपचीच मालिका आहे ही ............. Happy

आजी (रेखा कामत) बोअर, आई (इला भाटे) प्रचंड बोअर ........ यावर सगळ्यांना अनुमोदक ......... Happy

No question at all! अजिबात पाहणार नाहीये! हा बाफ मात्र वाचणार नियमित! Proud

मुक्ता बर्वे आणि विनय आपटेची कामं चांगली आहेत, बाकी स्टोरी डॉयलॉग्स जरा सुधारा.
स्वप्नील ची अख्खी फॅमिली बोअर आणि ती बहिण तर दोन तोंडात मारून गप करावं इतकी इरिटेटिंग आहे..
इला भाटे मला कधीच आवडत नाही, असावरी जोशी चांगली वाटते पण विग लावल्या सारखी एहअर स्टाइल विचित्रं दिसते तिला.

ज्या पाकिटाच्या अदलाबदलीमुळे गोष्ट घडणार आहे, त्यावर नाव पत्ता न लिहिताच ते कुरियर करायला दिले होते

आयला हे काय नविन्??मी मिसले वाटते..

साधना, घनश्यामने आपला बायोडेटा कुरियर करायला आपल्या सहकार्‍याला दिला. तो सहकारी राधाच्या ऑफिसात तिच्या बॉसचा काँप दुरुस्त करायला गेला. त्याच्या टेबलवर राधाचा बायोडेटा(फोटो, पत्रिका) असलेले पाकिट होते. दोन पाकिटांची अदलाबदल झाली. घनश्याम ते पाकिट घेऊन घरी आला आणि कुरियर करायला म्हणून त्याने आईकडे दिले.

पहात्ये. पण अशी अजुन पकड घेत नाहिये मालिका. मुक्ताचा लुक मलाही नाही आवडला. स्वप्निल ओके ओके.
प्राची, पहायला हरकत नाही. अधे मधे नाही पाहिली तरी चालेल. Happy

>>तो सहकारी राधाच्या ऑफिसात तिच्या बॉसचा काँप दुरुस्त करायला गेला. त्याच्या टेबलवर राधाचा बायोडेटा(फोटो, पत्रिका) असलेले पाकिट होते.

राधाच्या बॉसच्या टेबलावर तिचा फोटो, पत्रिका असलेलं पाकिट काय करत होतं? मी हा एपिसोड पाहिला नाही.

आजच्या एपिसोडमध्ये घरात चोर शिरण्याचा प्रसंग ओढूनताणून विनोदासाठी आणलेला वाटला. पण त्यानंतरचा राधा आणि तिच्या वडिलांच्यामध्ये झालेला संवाद सुरेख होता. अर्थात ही मालिका ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही अश्या लोकांनाच बहुधा अपिल होईल आणि अश्या लोकांना ८:३० वाजता रिमोट मिळणं कठिण आहे.कदाचित रिमोट मिळाला नाही तरच बरं आहे. आमच्याकडे राधा जे बोलेल त्यावर 'तुझाच अवतार आहे' अशी कॉमेन्ट लगेच येते Proud

राधा जे बोलेल त्यावर 'तुझाच अवतार आहे' >>स्वप्ना! इथे राधाबद्दल काय(काय) बोलून राहिलेत लोक ते तरी वाचून हे लिहायचंस! Proud Light 1
अगं, राधेच्या लग्नाची काळजी तिच्या बॉसलाही नसणार का? मुलीसारखी ना त्याला ती? कसं बै...! Happy

आमचं एक बरं आहे. मध्ये दहा भाग सोडायचे आणि मग अकरावा बघायचा, तो ही FFwd करुन. गोष्टही कळते आणि वेळही वाया जात नाही Proud
युट्युबवर कुणीतरी आख्खे भाग टाकले आहेत पण ते उडणार हे नक्की. मग आपलीमराठीवर जाईन.

Pages