एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>घनाच्या बेडरुमचा दरवाजा उघडाच होता तरी त्याचे वडील म्हणतात की मी नॉक करुन येणारच होतो

त्याचं काय आहे की राधा आणि घना बेडरुममधे असते तर ते समस्त सिरियलमधल्या शिरस्त्याप्रमाणे नॉक न करता आले असते. तो एकटाच होता म्हणून नॉक करून आले रीतसर

रेव्यूंच्या पोस्टवर विनोद होता तो. Happy

रत्नागिरी भागात युसुफ दांडेकर, करीम केळकर असे बरेच लोक आहेत. असोत.

एक खूप मोठे पत्रकार आहेत. जे स्वतः झोपडपट्टीत अनाथ म्हणून वाढलेले आहेत. त्यांच्या नावा-आडनावामधे हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन अशी तिन्ही नावे आहेत आणि ती मुद्दामून घेतलेली नसून शाळेत त्यांच्या नावाची नोंदच तशी झालेली आहे.

<<< संपदा, उद्याच्या भागाची 'झलक' असते, आणि कालच्या भागाची रीकॅप

कालचा भाग बघून घाईघाईत लिहिलेले पोस्ट आहे गं ते
, मिष्टेक हो गयी !!!!

फिरोज रानडे हे टोपण नाव असावे. ता प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि लेखक आहेत. 'अफगाण डायरी' बहुदा त्यांच्या पत्नी प्रतिभा रानडे यांनी लिहिलंय

फिरोज रानडे यांचे लिखाण बहुदा एखादे शहर, त्याचा अप्रसिद्ध इतिहास, त्यातल्या इमारती, त्यांचं रंजक इतिहास अशा स्वरुपाची असतात. मुंबईचा महिमा, काबुलनामा, इमारत, अशी काही नावे आठवतात. मला वाटत पुण्याच्या मस्तानी महालाबद्दलाही त्यांनी लिहिले आहे.

या धाग्याशी जोडलेली एक गम्मत म्हणजे त्यांचे एक पुस्तक 'काही दिवस शामचे काही राधाचे' अशा नावाचे आहे!

आमच्या ओळखीत उपाध्ये, पाटणकर, मुकादम आणि जोशी ही कुटुंबे आहेत. मुसलमान.

देसाई म्हणून ओळखीमधे आहेत ते क्रिश्चन आहेत.

असो.

जाऊद्या आपण सध्या काळे आणि रानडेंवर फोकस करूया फिदीफिदी>>>>>>>अन देसाई र्‍हायले की रे भुंग्या Proud

ज्यांना कुणाला उत्तर हवे होते त्यांच्यासाठी :
रसिका आणि गिरीष जोशींबद्दल मला जे वाटले ते शुकूने वरच्या एका पोष्टीत अचूक सांगितले आहे. रसिका पडद्यावर जशी सहज वावरायची, तेवढा सहज अभिनय तिच्या नवर्‍याला जमत नाहीय. तो अनुरूप वाटत नै असं म्हणायचं होतं मला. अर्थात तो अनुरूप असायलाच हवा हा आग्रह नव्हे.

१० किमी जास्त नाहिये. ज्यांना आवड असते आणि रोजच पळतात त्यांच्यासाठी नक्किच जास्त नाहि. जास्तीत जास्त दिड तास लागेल.

तरीपण....

>>रानडे रोज १० किमी पळतो?

मला वाटतं तो सुपारी घेऊन लोकांना शूट करणारा शूटर असावा. आणि पोलिसांच्या भीतीने पळायची त्याला सवय असावी.

पण मला अजुन एक गोष्ट लक्षात आली नाही. राष्ट्रीय किर्तीचा नेमबाज ना तो? त्याला पेईंग गेस्ट म्हणुन रहावे लागते? स्वतःचे घर नाही का परवडत?

मला वाटतं तो सुपारी घेऊन लोकांना शूट करणारा शूटर असावा.
>>>>>>>>>>>>

Rofl स्वप्ने...... तू पुरती गॉन केस आहेस Lol Biggrin Light 1

महान.........!!!

>>राष्ट्रीय किर्तीचा नेमबाज ना तो? त्याला पेईंग गेस्ट म्हणुन रहावे लागते? स्वतःचे घर नाही का परवडत?

राष्ट्रीय किर्तीचा नेमबाज?पण तो आधी शेफ होता ना? ही नेमबाजी त्याची आताची हॉबी आहे ना? रच्याकने, तो नेमबाज आहे, क्रिकेटियर थोडाच आहे मुंबईत घर परवडायला Wink

>>सोमणांचा मिलिंद रोज १२-१५ किमी पळतो.

असावा. ते पण तळपणार्‍या उन्हात. पाहिलंय एकदा शिवाजीपार्कात

सोमणांचा मिलिंद रोज १२-१५ किमी पळतो.
>>>>>>>>>>>>>>>>

हो ना. अजूनही तो "टफ" शूज वापरतो Rofl Biggrin फक्त आता जोडीला मधू आणि अजगर नसतात Sad

बरं......नका मानू. पण त्याची बोलण्याची स्टाईल, परफेक्शनचा अट्टाहास, लोकांना एकेरी नावाने हाक मारायची सवय - सगळं तो सुपारी घेऊन खून करणारा असावा हे दर्शवतंय. माझं खोटं वाटत असेल तर एफबीआयच्या प्रोफाईलरला जाऊन विचारा बघू Proud

भुंग्या Happy

स्वप्ना....... तू नवीन नवीन डोक्यात भरवून दे आता. अधेमधे कधीतरी हल्ली बघायला मिळतं..... ते बघताना पण आता माझा "शिवाजी साटम" होणार आहे......... Rofl

निरागस चेहर्‍याआड दडलेला अट्टल शार्प शूटर....... अबीर उर्फ "बटल्या सुपारी" Proud

मी फक्त "दया... तोड दो दरवाजा" च्या ऐवजी "स्वप्ना... तोड दो दरवाजा" असं म्हणायचं ठरवलय Wink

स्वप्ना तुझी राधा होतेय, कूल डाऊन. प्रचंड इम्प्रेस झाली आहेस अभीर रानडेमुळे पण ते सहजासहजी मान्य करता येत नाहीये, म्हणून त्याच्याबद्दल काहीही बोलत्येस! Proud Light 1

पौर्णिमा, नोप, सॉरी बॉस.....मला उका अजिबात आवड्त नाही. ह्यावर आमच्या मातोश्री 'जातीला जात वैर' असं म्हणतात. Proud

ह्यावर आमच्या मातोश्री 'जातीला जात वैर' असं म्हणतात.
>>>>>>>>>>>>

Lol गोत्र पण एकच असेल Wink

Pages