मुंजीचा कानमंत्र

Submitted by SuhasPhanse on 10 June, 2012 - 04:37

मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.
मुंजीचा कानमंत्र
काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।
प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥
हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।
नियोजिलेले काम बुद्धीने हात पाय करतात ॥
बुद्धी असता लुळे पांगळे मात करी व्यंगा ।
अंध सुरदासाची रचना सदा मना सांगा ॥
आळविता का जेव्हां तेव्हां, देव कुठे आहे?।
ओळखिले नाही का तुमच्या देव मनामधी आहे ॥
आळविण्याचा अर्थ असे की मला निग्रही बनवा ।
मन घोड्याला लगाम घालुनी काबूमध्ये ठेवा ॥

गुलमोहर: 

छान आहे Happy

फक्त
>>काबूमध्ये ठेवा ॥
याच्या ऐवजी "ताब्यातच ठेवा" असं मराठीत आलं असतं तर अधिक योग्य ठरलं असतं.