या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती. म्हणतात नं, If there is will, there is way. बाईने दावा साधलाच शेवटी. थ्यंक यु रे शाहरुख़ खान.
या निमित्ताने आम्ही (म्हणजे मी ) काही सन्माननीय लोकांच्या मुलाखती घेतल्या.
दिग्गी राजा उर्फ़ दिग्विजय सिंह - हे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान आहे.
मोहन भागवत: हे काँग्रेस पक्षाचं षड्यंत्र आहे. पूनम हि मूलतत्ववाद्यांच्या/पाकिस्तानच्या हातातले बाहुले आहे.
हीना रब्बानी खार - यह हिंदुस्तान की साजिश हैं, हम भी इसका मुहतोड़ जवाब देंगे! (आणि नंतर या बाईने वीणा मलिक यांना फोन केल्याचं ऐकिवात आहे)
अरविंद केजरीवाल - हा प्रश्न सोडवण्यासाठी अण्णाजी उपोषण करणार आहेत.
अण्णा हजारे - डॉक्टरांनी मला उपोषण करू नका असे इंग्लिश मध्ये लिहून दिले आहे.
प्रशांत भूषण - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. ते उपोषण नव्हे तर आमरण उपोषण करणारच. पूनम शिखंडी आहे.
किरण बेदी -प्रशांत भूषण, पूनमला शिखंडी म्हणालेच नाहीत.
अण्णा हजारे - जर पूनमला आमच्यापैकी कोणी शिखंडी म्हणाले असतील तर मी राजीनामा देईल.
अरविंद केजरीवाल - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. अण्णा राजीनामा नव्हे तर आमरण उपोषण करणार आहेत.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.
अण्णा हजारे - मी उपोषण करणार नाही. मात्र ही पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
कपिल सिब्बल - ह्या प्रकाराला पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे.
सुषमा स्वराज - कपिल सिब्बल यांनी अण्णाजींची माफी मागावी. मी अण्णाना विनंती करते, त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देईन.
कॉंग्रेस प्रवक्ता - ते कपिल सिब्बलांचे वैयक्तिक मत आहे. अण्णाजीनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी रामलीला मैदानावर आमरण उपोषण करणारच.
अरविंद केजरीवाल - मी अण्णाना विनंती करतो , त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.
रामदेव बाबा - अरेच्च्या, मी जिचे कपडे घालून पळून गेलो तिचे नाव पूनम पांडे आहे तर.
निर्मल बाबा - वह मेरे पास आयी थी, मुजसे पूछा, "बाबा मैं famous कैसे बनूँगी? मैंने पुछा "बेटा कपड़े पहनती हो? उसने जवाब दिया "हांजी" मैंने तभी उसे कह दिया "तभी तो कृपा रुकी हुयी हैं"
मनमोहन सिंग - या असैन्विधानिक कृत्याचा मी निषेध करतो. (आणि नंतर म्याडम ला फोन जातो, आज्ञा विचारायला)
सोनिया गांधी - आम्ही या घटनेचा निषेध करतो. (आणि नंतर एक फोन प्रणब मुखार्जीना जातो)
प्रणब मुखर्जी - सरकारच्या प्रगतीवरच लक्ष हटवण्यासाठी हे विरोधकांच कारस्थान आहे.
मोमता ब्यानर्जी - घटक पक्षांना काँग्रेस ने विचारात घेवून कृती करावी अन्यथा आम्हाला निर्णोय घ्यावा लागेल. ही डाव्या पक्षांची चाल आहे. आम्ही पूनमला कोपडे देणार आहोत.
जयललिता: आम्ही तिला मोफत कपडे पुरवणार आहोत.
शरद पवार - सरकारी गोदामात मुबलक कपडे पडून आहेत. कापसाचा भरपूर उत्पादन झालं आहे. पूनमला कपडे देण्यासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवू.
जया बचपन - मैं किसी पूनम पांडे को नहीं जानती, मैं सिर्फ पूनम धिल्लों को जानती हूँ!
राम गोपाल वर्मा : माझ्या पुढच्या पिक्चर चे नाव आहे "पूनम के शोले"
महेश भट्ट: जिस्म ची खरी हेरोईन मिळाली.
शक्ती कपूर - आऊ!
गब्बर सिंग - कितने कपडे थे!
कमाल आर खान - ती ज्या दिवशी पूर्ण कपडे घालेल, त्या दिवशी मी माझे सगळे कपडे काढणार आहे.
अवधूत गुप्ते - चाबुक तोडलंस sorry काढलस सगळं काढलस (आणि नंतर मिठी नेहमीच्याच सवयीने)
आदेश बांदेकर - पूनम वाहिनीने कपडे काढले म्हणून काय झालं मी तिला एक पैठणी देणार आहे.
ACP (सी आय डी फेम) - पूनम ने कपडे नहीं पहने इसका मतलब समजे दया? इसका मतलब यह हैं की, खुनी एक औरत हैं जो पूनम के कपडे ले भागी हैं!
राखी सावंत: मी एवढ्या वेळेस कपडे काढले तरी मला कोणीच का भाव देत नाही.
इतर पक्षी
मोन्टेक सिंग हळू हळू वालिया -लवकरच आम्ही तिला दारिद्र्य रेषेखाली आणणार आहोत.
सचिन तेंडूलकर - आयला.
राहुल गाँधी - मी तिच्या सेट वर जाऊन जेवण करणार आहे.
महाराष्ट्र माझा
धाकले ठाकरे - करून दाखवलं (ते कॅमेरा घेवून कुणाचे तरी फोटो काढायला गेल्याचं ऐकिवात आहे.)
राज ठाकरे - परप्रांतीयांचा आक्रमण आम्ही सहन नाही करणार, सडकून काढील एकेकाला, तिकडे विदर्भात पहा..... (आणि नंतर महाराष्ट्रीय अगम्य प्रश्न राखी सावंत यांना फोन गेल्याचा कळते )
दादा - एकदा सत्ता द्या मग दाखवतो...
सुशीलकुमार शिंदे -हायकमांड जसे सांगतील तसे करू. मी एक पट्टेवाला.........
मुख्यमंत्री - हायकमांड सोबत आज बैठक आहे. बैठकीनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.
मानवतावादी कार्यकर्ते -
तिस्ता सेटलवाड - कपडे काढायचा हक्क तिला घटनेने दिला आहे, मी तिच्या पाठीशी उभी आहे.
ज्येष्ठ गांधीवादी - पूनम हि गांधीजींची शिष्य आहे, विदेशी कपडे काढून तिने तिच्या उच्च सामाजिक मुल्यांच दर्शन घडवलं आहे. मी तिला सुत कातायच शिकवणार आहे.
आम्ही - बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले | तोची साधू मानावा, देव तेथेची जाणावा ||
आता होऊन जाऊ द्या. या लेखाचं वस्त्रहरण आणि तुमच्या प्रतिक्रियाही...
किरण बेफिकिर
किरण

बेफिकिर साडी चोळी सेंटर
मस्त.
मस्त.
भारीच लिहिलय.>> +१ बेफीं>>>
भारीच लिहिलय.>> +१
बेफीं>>>
(No subject)
निर्मल बाबा - वह मेरे पास आयी
निर्मल बाबा - वह मेरे पास आयी थी, मुजसे पूछा, "बाबा मैं famous कैसे बनूँगी? मैंने पुछा "बेटा कपड़े पहनती हो? उसने जवाब दिया "हांजी" मैंने तभी उसे कह दिया "तभी तो कृपा रुकी हुयी हैं" >>>>>>>>
अशक्य! अजुन हसतो आहे!
पूनम पांडेचा फोटो बघायला मजा
पूनम पांडेचा फोटो बघायला मजा नव्हती आली तेवढी मजा हा लेख आणि प्रतिक्रिया वाचताना आली...
(No subject)
"पूनम साड्यांचे ठोक व्यापारी"
"पूनम साड्यांचे ठोक व्यापारी"

किरण्या........
धन्यवाद बिल्वा | बस्के |
धन्यवाद
बिल्वा | बस्के | मृण्मयी सिंडरेला झंपी वत्सला पुरंदरे शशांक मित अश्विनीमामी दादाश्री रचु चाणक्य. तुमचा अभिषेक स्वाती२
चिखल्या, अगदी ईमानेऐतबारे
चिखल्या,
अगदी ईमानेऐतबारे सगळ्यांचे नाव घेऊन आभार मानतोयेस....... काय पूनमताईंच्या वतीने त्यांचं "चैत्रातलं हळदीकुंकू" उरकतोयेस का......
म्हणजे ज्या बायका प्रतिसादक आहेत त्यांना वाण आणि बाप्ये प्रतिसादक आहेत त्यांना "वाटलेली आंब्याची डाळ"

भुंगा, काय करणार, चिखलेश्वर
भुंगा,
काय करणार, चिखलेश्वर महाराजांचा तसा आदेशच आहे मला. म्हणून सगळे सोपस्कार.
आणि पूनम ताईचं म्हणशील तर बाई लईच वंगाळ हाय लेका. सण-वार काय ठाव नाय तिला.
चिखल्या तू तर लगेच सेंटी होऊन
चिखल्या तू तर लगेच सेंटी होऊन आभारच मानायला लागलास... विनोदाचा धागा बघून मी पण मस्करी केली रे.. असे कधी होईल का .. की पूनम पांडेचे "ते" फोटो बघण्यापेक्षा हा लेख वाचायला जास्त मजा येईल..
तुमचा अभिषेक लइ भारी लेका...
तुमचा अभिषेक
लइ भारी लेका... तु बी इरसाल हायेस...
हे काय विचारणे झाले का...
हे काय विचारणे झाले का... परवाच्या दिवशी सकाळीच तिचा बॉम्बे टाईम्समधील फोटो ट्रेनमध्ये असताना पाहिला... मुद्दाम पेपर उघडून मांडीवर ठेवला आणि खिडकीच्या बाहेर बघायचे नाटक करत बाजूच्या लोकांच्या तिथे खिळून राहणार्या नजरा न्याहाळत होतो.. बाकी आज चांगलेच मनोरंजन केले या धाग्याने.. चलो शुभरात्री.. शब्बाखैर.. खुदाहाफिज..
पहिल्यांदा बेफिकीर यांनी
पहिल्यांदा बेफिकीर यांनी लिहीलेली अशोकजींची प्रतिक्रिया घाईत अशोकजींनीच लिहीली आहे असं वाटलं. अशोक पाटील हे मायबोलीवरचे कान उपटू आयडी असल्याने ( तसा अधिकार त्यांना असला तरी ते तसं काही करत नाही ) सुरूवातीला खरंच त्यांना कान उपटलेत असं वाटल्याने नंतर माऊस इकडे वळालाच नाही. नंतर पुन्हा अशोक पाटील यांचा खरा प्रतिसाद आला आणि उलगडा झाला.
अनन्या वर्तक यांच्या पहिल्या प्रतिसादातील पहिल्या ओळीशी सहमत
क्रांतिकारी लेख आणि त्याहीपेक्षा क्रांतिकारी प्रतिक्रियांद्वारे एकहाती धागा चालवल्याबद्दल चिखल्या, टोल्या, कावळा, रिया, गापै, बेफिकीर, रतन जाधव, अनन्या वर्तक, यांचे अभिनंदन (अनवधानाने कुणी सुटले असल्यास क्षमस्व !)
क्रांतिकारी लेख आणि
क्रांतिकारी लेख आणि त्याहीपेक्षा क्रांतिकारी प्रतिक्रियांद्वारे एकहाती धागा चालवल्याबद्दल चिखल्या, टोल्या, कावळा, रिया, गापै, बेफिकीर, रतन जाधव, अनन्या वर्तक, यांचे अभिनंदन (अनवधानाने कुणी सुटले असल्यास क्षमस्व !) >>>>>> +१
माझ्यातर्फेहि!
अरे किती तास मुलाखत घ्यायची
अरे किती तास मुलाखत घ्यायची बेफ़िकीर? मुलाखतीला जायच्या अगोदर साडीचोळी दुकानाची जाहिरात बघितली असेल तर मायबोलीकरां तर्फे पुनमताईंना एक साडी सप्रेम भेट द्या.
हा केवळ प्रसिद्धी साठी स्टंट होता असे उगाचच जळणार्या लोकांना वाटते, किती चिप मेंटॅलिटी. प्रवाहच्या विरुद्ध पोहोण्याची तयारी ठेवणारी पुनम अशा जळणार्या लोकांच्या टिकेकडे लक्ष देणार नाही.
चिखल्या लेख जबरी आहे.. बेफी
चिखल्या लेख जबरी आहे..
बेफी आणी हह .. :P.. त्यांचे प्रतिसाद ..:D
किरण चाणक्य राम धन्यवाद
किरण चाणक्य राम
धन्यवाद
उदय हा हा हा
उदय
हा हा हा
ए मारा पापडवाले को.....
ए मारा पापडवाले को.....
बेफ़िकिर एकदम मस्त , या
बेफ़िकिर एकदम मस्त , या लोकाना रस्त्यावर उभे करुन गोल्या घातल्या पहिजे
>> या लोकाना रस्त्यावर उभे
>> या लोकाना रस्त्यावर उभे करुन गोल्या घातल्या पहिजे
म्हणजे कोणाला ?
काय हसल्येय मी लेख,
काय हसल्येय मी
लेख, त्यावरच्या बेफिंच्या, हह च्या पोस्टी... किरणं चे दुकान.... सगळेच अफलातुन!!!
बेफी, हह अजुन येऊ द्यात
चिखल्या, बेफि ... धमाल मजा
चिखल्या, बेफि ... धमाल मजा आली!
मस्त धागा... या धाग्याचे कपडे विणले तर ?
>>या धाग्याचे कपडे विणले
>>या धाग्याचे कपडे विणले तर
धागा धागा अखंड विणुया ! आणि ते कपडे पुपां सारख्या लोकांना वाटूयात का ?
फुल्ल टु धमाल चालुये लोकहो.
फुल्ल टु धमाल चालुये लोकहो. जबरी.
बेफिकिर साडी चोळी सेंटर
"पूनम साड्यांचे ठोक व्यापारी"
किरण _____/\_______
लेख जबरी आहे आणि प्रतिक्रिया
लेख जबरी आहे आणि प्रतिक्रिया तर भन्नाटच.

पूनम पांडेच उद्दीष्ट सफल झाल, बाकी कुठे का नसेना पण माबोवर तिला प्रसिद्धी मिळालीच
बापरे , भन्नाट ! आम्ही - बोले
बापरे , भन्नाट !
आम्ही - बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले | तोची साधू मानावा, देव तेथेची जाणावा ||>> लगोटीचाही विसर व्हावा !
पूनम पांडेच उद्दीष्ट सफल झाल,
पूनम पांडेच उद्दीष्ट सफल झाल, बाकी कुठे का नसेना पण माबोवर तिला प्रसिद्धी मिळालीच
------- पूनम पांडे यांचे उद्दीष्ट प्रसिद्धी मिळवणे हा होता असे म्हणणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल... बेफिकीरांनी घेतलेली मुलाखत वाचायला मिळाल्यावर या सर्व शंका दुर होतील याची खात्री आहे.
Pages