भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया

Submitted by चिखलु on 31 May, 2012 - 08:43

या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती. म्हणतात नं, If there is will, there is way. बाईने दावा साधलाच शेवटी. थ्यंक यु रे शाहरुख़ खान.

या निमित्ताने आम्ही (म्हणजे मी ) काही सन्माननीय लोकांच्या मुलाखती घेतल्या.

दिग्गी राजा उर्फ़ दिग्विजय सिंह - हे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान आहे.
मोहन भागवत: हे काँग्रेस पक्षाचं षड्यंत्र आहे. पूनम हि मूलतत्ववाद्यांच्या/पाकिस्तानच्या हातातले बाहुले आहे.
हीना रब्बानी खार - यह हिंदुस्तान की साजिश हैं, हम भी इसका मुहतोड़ जवाब देंगे! (आणि नंतर या बाईने वीणा मलिक यांना फोन केल्याचं ऐकिवात आहे)

अरविंद केजरीवाल - हा प्रश्न सोडवण्यासाठी अण्णाजी उपोषण करणार आहेत.
अण्णा हजारे - डॉक्टरांनी मला उपोषण करू नका असे इंग्लिश मध्ये लिहून दिले आहे.
प्रशांत भूषण - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. ते उपोषण नव्हे तर आमरण उपोषण करणारच. पूनम शिखंडी आहे.
किरण बेदी -प्रशांत भूषण, पूनमला शिखंडी म्हणालेच नाहीत.
अण्णा हजारे - जर पूनमला आमच्यापैकी कोणी शिखंडी म्हणाले असतील तर मी राजीनामा देईल.
अरविंद केजरीवाल - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. अण्णा राजीनामा नव्हे तर आमरण उपोषण करणार आहेत.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.
अण्णा हजारे - मी उपोषण करणार नाही. मात्र ही पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
कपिल सिब्बल - ह्या प्रकाराला पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे.
सुषमा स्वराज - कपिल सिब्बल यांनी अण्णाजींची माफी मागावी. मी अण्णाना विनंती करते, त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देईन.
कॉंग्रेस प्रवक्ता - ते कपिल सिब्बलांचे वैयक्तिक मत आहे. अण्णाजीनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी रामलीला मैदानावर आमरण उपोषण करणारच.
अरविंद केजरीवाल - मी अण्णाना विनंती करतो , त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.

रामदेव बाबा - अरेच्च्या, मी जिचे कपडे घालून पळून गेलो तिचे नाव पूनम पांडे आहे तर.
निर्मल बाबा - वह मेरे पास आयी थी, मुजसे पूछा, "बाबा मैं famous कैसे बनूँगी? मैंने पुछा "बेटा कपड़े पहनती हो? उसने जवाब दिया "हांजी" मैंने तभी उसे कह दिया "तभी तो कृपा रुकी हुयी हैं"

मनमोहन सिंग - या असैन्विधानिक कृत्याचा मी निषेध करतो. (आणि नंतर म्याडम ला फोन जातो, आज्ञा विचारायला)
सोनिया गांधी - आम्ही या घटनेचा निषेध करतो. (आणि नंतर एक फोन प्रणब मुखार्जीना जातो)
प्रणब मुखर्जी - सरकारच्या प्रगतीवरच लक्ष हटवण्यासाठी हे विरोधकांच कारस्थान आहे.
मोमता ब्यानर्जी - घटक पक्षांना काँग्रेस ने विचारात घेवून कृती करावी अन्यथा आम्हाला निर्णोय घ्यावा लागेल. ही डाव्या पक्षांची चाल आहे. आम्ही पूनमला कोपडे देणार आहोत.
जयललिता: आम्ही तिला मोफत कपडे पुरवणार आहोत.
शरद पवार - सरकारी गोदामात मुबलक कपडे पडून आहेत. कापसाचा भरपूर उत्पादन झालं आहे. पूनमला कपडे देण्यासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवू.

जया बचपन - मैं किसी पूनम पांडे को नहीं जानती, मैं सिर्फ पूनम धिल्लों को जानती हूँ!
राम गोपाल वर्मा : माझ्या पुढच्या पिक्चर चे नाव आहे "पूनम के शोले"
महेश भट्ट: जिस्म ची खरी हेरोईन मिळाली.
शक्ती कपूर - आऊ!
गब्बर सिंग - कितने कपडे थे!
कमाल आर खान - ती ज्या दिवशी पूर्ण कपडे घालेल, त्या दिवशी मी माझे सगळे कपडे काढणार आहे.
अवधूत गुप्ते - चाबुक तोडलंस sorry काढलस सगळं काढलस (आणि नंतर मिठी नेहमीच्याच सवयीने)
आदेश बांदेकर - पूनम वाहिनीने कपडे काढले म्हणून काय झालं मी तिला एक पैठणी देणार आहे.
ACP (सी आय डी फेम) - पूनम ने कपडे नहीं पहने इसका मतलब समजे दया? इसका मतलब यह हैं की, खुनी एक औरत हैं जो पूनम के कपडे ले भागी हैं!
राखी सावंत: मी एवढ्या वेळेस कपडे काढले तरी मला कोणीच का भाव देत नाही.

इतर पक्षी
मोन्टेक सिंग हळू हळू वालिया -लवकरच आम्ही तिला दारिद्र्य रेषेखाली आणणार आहोत.
सचिन तेंडूलकर - आयला.
राहुल गाँधी - मी तिच्या सेट वर जाऊन जेवण करणार आहे.

महाराष्ट्र माझा
धाकले ठाकरे - करून दाखवलं (ते कॅमेरा घेवून कुणाचे तरी फोटो काढायला गेल्याचं ऐकिवात आहे.)
राज ठाकरे - परप्रांतीयांचा आक्रमण आम्ही सहन नाही करणार, सडकून काढील एकेकाला, तिकडे विदर्भात पहा..... (आणि नंतर महाराष्ट्रीय अगम्य प्रश्न राखी सावंत यांना फोन गेल्याचा कळते )
दादा - एकदा सत्ता द्या मग दाखवतो...
सुशीलकुमार शिंदे -हायकमांड जसे सांगतील तसे करू. मी एक पट्टेवाला.........
मुख्यमंत्री - हायकमांड सोबत आज बैठक आहे. बैठकीनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

मानवतावादी कार्यकर्ते -
तिस्ता सेटलवाड - कपडे काढायचा हक्क तिला घटनेने दिला आहे, मी तिच्या पाठीशी उभी आहे.
ज्येष्ठ गांधीवादी - पूनम हि गांधीजींची शिष्य आहे, विदेशी कपडे काढून तिने तिच्या उच्च सामाजिक मुल्यांच दर्शन घडवलं आहे. मी तिला सुत कातायच शिकवणार आहे.

आम्ही - बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले | तोची साधू मानावा, देव तेथेची जाणावा ||

आता होऊन जाऊ द्या. या लेखाचं वस्त्रहरण आणि तुमच्या प्रतिक्रियाही...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बेफि.............तुफान बरं का...........आणि यावरून तुमचा माबोपेक्षा माबोकरांचा अभ्यास उत्तम आहे हे पण दिसत आहे............... Biggrin

उल्हासरावांची कविता खालीलप्रमाणे:

=============================

गझलतंत्रात असली तरीही मला गझल अजून जमत नाही. २ जानेवारी २०१७ पासून मी गझल करण्याचे ठरवले आहे. तरी हा प्रयत्न एक कविता म्हणूनच पाहावा:

पूनम पांडे झुकवत आहे मान जगाची खाली
हिंदुस्तानी संस्कुतीस ना आता कोणी वाली

क्रिकेटचा सोहळा थांबला बघता बघता तिथला
कलकत्याची भूमी ते बघताना लज्जित झाली

भारतीय कल्चरवर आता प्रभाव भलता आहे
भावगीत गाता गाता त्याची झाली कव्वाली

मी तीनच शेर केले आहेत कारण जे सुचले ते लिहिणे मी महत्वाचे मानतो.

टीप १ - मात्रावृत्तातील रचना आहे

टीप २ - ही कविता प्रकाशित करताना मला अतिशय वाईट वाटत आहे. पूनम पांडेंचा निषेध

==============

अरे वा माझे पण नाव आले आहे वर !
माझे वाक्य जरा बदलून.
माझी अजुनही सर्वांना विनंती आहे की यामधे राजकारण्यांचा स्वार्थ आहे. एकीमुळे सर्व प्रश्न सुटतील. पहा विचार करून.

नमस्कार...
udayone, बेफ़िकीर, प्राची , राजू७६ , मामी, दिनेशदा(मिठी नकोच आहे हा हा हा) , धुंद रवी, कंसराज , रीया , निवांत पाटील धन्यवाद

झक्की - शिव शिव. आता शिव म्हणण्याचीही अडचण झालीय. शैव मतनुसार शिव म्हणावं का काय म्हणावं यावरही वाद. म्हणूनच मी भारतात येत नाही. इथे असे कोणी केले तर शेजारून जाणारा बघतही नाही.
अनेक गोष्टी बरोबर नाहीत हो.
मी शिव शिव कधीच म्हणत नाही. हटकेश्वर हटकेश्वर असे म्हणतो. हटकेश्वर म्हणजे शिव का विष्णू यावर मायबोलीवर अनेक वर्षांपूर्वी सरकारी स्तरावर चर्चा झाली होती. ज्येष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी त्यात भाग घेतला होता. पण त्या काळी वैयक्तिक शिवीगाळ, भाजप वि. काँग्रेस, सावरकर वि. गांधी, अमेरिका-भारत करणारे लोक मायबोलीवर नसत. (गेले ते दिन गेले! हटकेश्वर, हटकेश्वर)
अहो ती कोण बाइ आहे तिने कपडे काढले म्हणून मी शिव कसे म्हणेन? लोक लगेच गैरसमज करून घेतील नेहेमीप्रमाणे, नि म्हणतील मी विबासं चा पुरस्कार करतो! परस्त्रीस स्पर्श करणे माझ्या वैयक्तिक संस्कृतिक बसत नाही. कुणी करावा असे मी सांगणार नाही. नि सांगितले तरी लोक ऐकणार आहेत का?
माझ्या माहितीप्रमाणे अनेक बायका सगळे कपडे रोजच काढतात, स्नान करताना. निदान इथल्या अनेक सिनेमात तसे दाखवतात. त्याचा कथेशी काही संबंध नसतो, पण ......
तर लोकांना इतके काय त्यात चर्चा करण्यासारखे वाटते?

आता लवकरच वैयक्तिक शिवीगाळ, भाजप वि. काँग्रेस, सावरकर वि. गांधी, अमेरिका-भारत या चर्चेत आणून हा बाफ बंद करा.

दामोदरसुत - पूनम पांडेला काळ्या पाण्याची शिक्षा द्यायला हवी
===
जामोप्या - ह्यांना पाण्याचा दुसरा रंग सुचतच नाही
===>>>>
laugh_ha_ha-300x287.jpg

Er.Rohit |खरच माहीत न्हवते मला ह्या पूनम पांड्ये कोण आहेत त्या. माझा समज असाच होता की पूनम ह्या Professional Cheerleading मध्ये कॅरियर करू पाहत आहेत.

चिखल्यानी सांगीतल राष्ट्रीय सम्पत्ति आहे म्हणून उत्सुकता जरा जास्तच वाटली म्हणून गूगल करत होते तर काही थोडेफार प्रची आणि मॉडेल आहे अशी माहिती समजली. बाकी प्रतिक्रिया वाचल्यावर मला मूळ लेखाचा अर्थ समजायला लागला.

ओह् ~ बेफिकीर जी.....काय लिहू अन् काय बोलू तुमच्या अचाट आणि अफाट कल्पनाशक्तीविषयी ? सलामच करतो.

खरे तर 'पूनम पांडे' या युवतीच्या कथीत पराक्रमाच्या कथा वाचून वाचून तिच्याविषयी आता काय वाचायचे असा विचार करून हा धागा बीबीवर आल्याचे समजले तरी तो उघडला नाही....पण येथील एका जालीय मित्राने अगत्याने फोनवरून "निदान बेफिकीर यांच्या प्रतिसादासाठी तर बघाच..." असा सल्ला दिल्यामुळे कुतहूलाने इकडे आलो आणि समजून चुकलो आपण एका चांगल्या आविष्काराला मुकलो असतो.

श्री.चिखल्या यांच्याही "परफेक्ट पिक्चर डेटा कलेक्शन" ला दाद दिलीच पाहिजे.

गंमत म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे + प्रिन्स चार्ल्स यांचा तो किस्सा त्यावेळी कोल्हापूरकरांना "ऑब्जेक्शनेबल" वाटला नव्हता, त्याला कारण इथे राजघराण्याविषयी एकूणच आदराने लिहिले बोलले जाते. हां....चार्ल्सऐवजी मायकेल जॅक्सन वा कॅशिअस क्ले याला तिने मिठी मारली असती तर मात्र बिंदू चौकात (तिचे) पोस्टर जाळणे प्रकार झाले असते.

अशोक पाटील

लेख वाचला नाही अजून... बेफिकीरांचा प्रतिसाद तेवढा वाचला
>>>
+१

सगळेच प्रतिसाद (बेफींचे) लोटपोट आहेत...... Lol

श्री.चिखल्या...

होय....बरोबर. तुमच्यासाठी हे डेटा कलेक्शन नव्हे तर कल्पनाविलास आहे, जो विलक्षणच आहे. पण लेखातील महनीय व्यक्ती आणि त्यांचे स्वभाव व सार्वजनिक सहभाग तसेच भाषा वर्तणूकीवरून "कुमारी पूनम पांडे" च्या कर्तृत्वाविषयी वर्तविलेली मते याना नव्या वाचकासाठी एक आगळ्या प्रकारचे "डेटा कलेक्शन" चे रूप प्राप्त झाले असल्याने तो टॅग मी वापरला होता.

अशोक पाटील

Pages