भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया

Submitted by चिखलु on 31 May, 2012 - 08:43

या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती. म्हणतात नं, If there is will, there is way. बाईने दावा साधलाच शेवटी. थ्यंक यु रे शाहरुख़ खान.

या निमित्ताने आम्ही (म्हणजे मी ) काही सन्माननीय लोकांच्या मुलाखती घेतल्या.

दिग्गी राजा उर्फ़ दिग्विजय सिंह - हे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान आहे.
मोहन भागवत: हे काँग्रेस पक्षाचं षड्यंत्र आहे. पूनम हि मूलतत्ववाद्यांच्या/पाकिस्तानच्या हातातले बाहुले आहे.
हीना रब्बानी खार - यह हिंदुस्तान की साजिश हैं, हम भी इसका मुहतोड़ जवाब देंगे! (आणि नंतर या बाईने वीणा मलिक यांना फोन केल्याचं ऐकिवात आहे)

अरविंद केजरीवाल - हा प्रश्न सोडवण्यासाठी अण्णाजी उपोषण करणार आहेत.
अण्णा हजारे - डॉक्टरांनी मला उपोषण करू नका असे इंग्लिश मध्ये लिहून दिले आहे.
प्रशांत भूषण - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. ते उपोषण नव्हे तर आमरण उपोषण करणारच. पूनम शिखंडी आहे.
किरण बेदी -प्रशांत भूषण, पूनमला शिखंडी म्हणालेच नाहीत.
अण्णा हजारे - जर पूनमला आमच्यापैकी कोणी शिखंडी म्हणाले असतील तर मी राजीनामा देईल.
अरविंद केजरीवाल - अण्णाजीना अपुरी माहिती आहे. अण्णाजी इंग्लिश वाचू शकत नाहीत. अण्णा राजीनामा नव्हे तर आमरण उपोषण करणार आहेत.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.
अण्णा हजारे - मी उपोषण करणार नाही. मात्र ही पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
कपिल सिब्बल - ह्या प्रकाराला पूनमच्या स्वातंत्र्याची लढाई म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे.
सुषमा स्वराज - कपिल सिब्बल यांनी अण्णाजींची माफी मागावी. मी अण्णाना विनंती करते, त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी देशातील नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा देईन.
कॉंग्रेस प्रवक्ता - ते कपिल सिब्बलांचे वैयक्तिक मत आहे. अण्णाजीनी उपोषण मागे घ्यावे.
अण्णा हजारे - मी रामलीला मैदानावर आमरण उपोषण करणारच.
अरविंद केजरीवाल - मी अण्णाना विनंती करतो , त्यांनी उपोषण मागे घ्यावे.
संतोष हेगड़े- मी केजरीवाल यांच्या मताशी सहमत नाही.

रामदेव बाबा - अरेच्च्या, मी जिचे कपडे घालून पळून गेलो तिचे नाव पूनम पांडे आहे तर.
निर्मल बाबा - वह मेरे पास आयी थी, मुजसे पूछा, "बाबा मैं famous कैसे बनूँगी? मैंने पुछा "बेटा कपड़े पहनती हो? उसने जवाब दिया "हांजी" मैंने तभी उसे कह दिया "तभी तो कृपा रुकी हुयी हैं"

मनमोहन सिंग - या असैन्विधानिक कृत्याचा मी निषेध करतो. (आणि नंतर म्याडम ला फोन जातो, आज्ञा विचारायला)
सोनिया गांधी - आम्ही या घटनेचा निषेध करतो. (आणि नंतर एक फोन प्रणब मुखार्जीना जातो)
प्रणब मुखर्जी - सरकारच्या प्रगतीवरच लक्ष हटवण्यासाठी हे विरोधकांच कारस्थान आहे.
मोमता ब्यानर्जी - घटक पक्षांना काँग्रेस ने विचारात घेवून कृती करावी अन्यथा आम्हाला निर्णोय घ्यावा लागेल. ही डाव्या पक्षांची चाल आहे. आम्ही पूनमला कोपडे देणार आहोत.
जयललिता: आम्ही तिला मोफत कपडे पुरवणार आहोत.
शरद पवार - सरकारी गोदामात मुबलक कपडे पडून आहेत. कापसाचा भरपूर उत्पादन झालं आहे. पूनमला कपडे देण्यासंबंधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवू.

जया बचपन - मैं किसी पूनम पांडे को नहीं जानती, मैं सिर्फ पूनम धिल्लों को जानती हूँ!
राम गोपाल वर्मा : माझ्या पुढच्या पिक्चर चे नाव आहे "पूनम के शोले"
महेश भट्ट: जिस्म ची खरी हेरोईन मिळाली.
शक्ती कपूर - आऊ!
गब्बर सिंग - कितने कपडे थे!
कमाल आर खान - ती ज्या दिवशी पूर्ण कपडे घालेल, त्या दिवशी मी माझे सगळे कपडे काढणार आहे.
अवधूत गुप्ते - चाबुक तोडलंस sorry काढलस सगळं काढलस (आणि नंतर मिठी नेहमीच्याच सवयीने)
आदेश बांदेकर - पूनम वाहिनीने कपडे काढले म्हणून काय झालं मी तिला एक पैठणी देणार आहे.
ACP (सी आय डी फेम) - पूनम ने कपडे नहीं पहने इसका मतलब समजे दया? इसका मतलब यह हैं की, खुनी एक औरत हैं जो पूनम के कपडे ले भागी हैं!
राखी सावंत: मी एवढ्या वेळेस कपडे काढले तरी मला कोणीच का भाव देत नाही.

इतर पक्षी
मोन्टेक सिंग हळू हळू वालिया -लवकरच आम्ही तिला दारिद्र्य रेषेखाली आणणार आहोत.
सचिन तेंडूलकर - आयला.
राहुल गाँधी - मी तिच्या सेट वर जाऊन जेवण करणार आहे.

महाराष्ट्र माझा
धाकले ठाकरे - करून दाखवलं (ते कॅमेरा घेवून कुणाचे तरी फोटो काढायला गेल्याचं ऐकिवात आहे.)
राज ठाकरे - परप्रांतीयांचा आक्रमण आम्ही सहन नाही करणार, सडकून काढील एकेकाला, तिकडे विदर्भात पहा..... (आणि नंतर महाराष्ट्रीय अगम्य प्रश्न राखी सावंत यांना फोन गेल्याचा कळते )
दादा - एकदा सत्ता द्या मग दाखवतो...
सुशीलकुमार शिंदे -हायकमांड जसे सांगतील तसे करू. मी एक पट्टेवाला.........
मुख्यमंत्री - हायकमांड सोबत आज बैठक आहे. बैठकीनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.

मानवतावादी कार्यकर्ते -
तिस्ता सेटलवाड - कपडे काढायचा हक्क तिला घटनेने दिला आहे, मी तिच्या पाठीशी उभी आहे.
ज्येष्ठ गांधीवादी - पूनम हि गांधीजींची शिष्य आहे, विदेशी कपडे काढून तिने तिच्या उच्च सामाजिक मुल्यांच दर्शन घडवलं आहे. मी तिला सुत कातायच शिकवणार आहे.

आम्ही - बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले | तोची साधू मानावा, देव तेथेची जाणावा ||

आता होऊन जाऊ द्या. या लेखाचं वस्त्रहरण आणि तुमच्या प्रतिक्रियाही...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Lol चिखल्या मस्त लिहिलेत

बेफिकीर तुमचे पहिले पोस्ट भारी आहे Lol पण पार्ल्याबद्दल सशलशी सहमत. बाकी तुमचे लिहिलेले पाहून मी हे खरडले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

माध्यम प्रायोजक : दर्जेदार चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व घेणे ही मायबोलीची परंपरा आहे. तेव्हा सादर करीत आहोत शाहरूख खान कृत आणि पूनम पांडे अभिनीत चित्रपट पाघळ - " तू बघ, मी काढणार आहे " . या चित्रपटा निमीत्त आयोजीत केली आहे एक अभिनव दर्जीदार स्पर्धा.

"पूनम पांडे कॉस्ट्चूम डिझायनींग स्पर्धा."

या स्पर्धेत जिंकणार्‍या स्पर्धकाला मिळेल गुंडू टिव्हीवर पाघळ चित्रपटाची दोन तिकीटे बक्षिस.

नीधप : कॉस्च्यूम हा शब्द नीट लिहा. कृपया.

मंदार्_जोशी : माप्रा स्पर्धेचे शिर्षक मराठी ठेवले तर जास्त योग्य वाटेल.

श्री : कॉस्ट चूम वरून मला काही वेगळाच अर्थ वाटला Proud

सिन्डरेला : डिज्गस्टींग! (सगळेच.) (सकाळी घडलेल्या एका आणखी डिजगस्टींग गोष्टी बद्दल माहिती हवी असल्यास मला खोपच्यात संपर्क करा.)

नीधप : श्री ज्या विषयातले आपल्याला काही कळत नाही त्यात फडतूस विनोदनिर्मीती करायला जाऊ नये.

अंजली : खुर्च्या टाकते. पॉपकॉर्न कोण आणतय?

स्वाती_आंबोळे : अंजली खुर्च्या टाकल्यास तरी माप्रा तिकिटे देतील तेव्हाच सिनेमा बघायला मिळेल. Proud

HH : म्हणजे कधीच बघायला मिळणार नाही असच म्हणायचय ना तुम्हाला बाई Proud

लोला : कॉस्च्यूम विषयावरून आजचे मनोरंजन : जॅकेट पोटॅटो. धन्यवाद.

सतत नाव बदलणारा आयडी : तोंपासू

बेफिकीर: तोंपासू >> कशाला बघून म्हणताय नक्की?.

शुम्पी : त्या बाफ वर पूनम पांडे हे नाव "पूनम ताई पांडे" असे का लिहिले आहे?

आर्च : कारण ते तिचे पूर्ण नाव आहे. ती आपल्या आईचे नाव लावते. ताई पांडे म्हणजे पूनमची आई. कौतुकास्पद आहे आईचे नाव लावते हे.

दिपांजली : हो बरोबर. गेल्या महिन्यात बिव्हर्ली हिल्स मधे केलेल्या एका पंजाबी लग्नाला दोघी ताईलेकी आल्या होत्या. ताई पांडे आपले ताई नाव सार्थ करतात. टोटल भैय्यीण!

हह _/\_ Rofl

चिखल्या, मूळ लेख वाचला आत्ताच. झकास जमलाय. धन्यवाद वरच्या पोस्टीतच एडिट करून दिलेत तरी चालतील. ~धन्यवाद! Proud

>>>शक्ती कपूर - आऊ! Biggrin
लेख धमाल आहे चिखल्या!

बेफिकीर यांचं पहिलं आणि हह यांचं वरचं पोस्ट अफाट मस्तं!! (श्री, सिंडी आणि लोला यांच्या बोटच्या ओळी परफेक्ट!!) Proud

HH, Lol

HH Lol

हह Happy

हह, महान आहेस! Biggrin
फारा दिवसांनी धमाल चाललीये इथे!

चिखल्या, मी पण लेख आत्ता वाचला. भारीच जमलाये.
बेफि, नॉट लिसनिंग! Biggrin

हह Rofl

जबरीच - लेख व प्रतिसा.........द ............. दोन्हीही ......

हसून हसून गडबडा लोळण

हसून हसून गडबडा लोळण

Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

मला वाटत झक्की साहेब काल्पनिक प्रतिसादात जे शिव शिव!! म्हणतात ते पूनम तैं ना उद्देशून असाव म्हणजे आता नवे कपडे शिव, कपडे शिव !! असं. एरवी ते हटकेश्वर का काय ते म्हणत असतात त्याचा नक्की इतिहास जाणायला मुद्दाम वेळ काढून जुन्या मायबोलीत एकदा उत्खनन करणार आहे मी.

Pages