चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण देवदास मधे अ‍ॅश उजवी होती हे १०० % प्रामणिक मत.

आता या बी बी वर V & C सुरु होणार !

DJ, देवदास मध्ये अ‍ॅश उजवी होती असं तुझं १००% प्रामाणिक मत असलं तरी माझं २००% प्रामाणिक मत असं आहे की देवदासच काय पण अजुन १०-२० पिक्चर मध्ये त्या दोघींनी एकत्र कामं केली तरी माधुरीच उजवी असेल .. :p

>>पण देवदास मधे अ‍ॅश उजवी होती हे १०० % प्रामणिक मत.
डीजे, तू डावरी आहेस का? Lol

उपास, ह्यावरुन DJ डावरी आहे असं कुठे सिध्द होतं? अ‍ॅश बाकीच्या पिक्चर मध्ये डावरी असते पण देवदास मध्ये मात्र उजवी होती असं म्हणता येईल एकवेळ .. :p

उपास Biggrin

DJ, देवदास मध्ये अ‍ॅश उजवी होती असं तुझं १००% प्रामाणिक मत असलं तरी माझं २००% प्रामाणिक मत असं आहे की देवदासच काय पण अजुन १०-२० पिक्चर मध्ये त्या दोघींनी एकत्र कामं केली तरी माधुरीच उजवी असेल ..
<< तुम्ही माधुरीचे पंखे आहत, तुमच असणारच हे मत, ते बायस्ड असु शकतं पण मी अ‍ॅश ची आणि माधुरीची दोघींची फॅन नसल्यामुळे माझं मत जास्त न्युट्रल Biggrin
********** स्टाइल मे रहनेका !! ************

माधुरी अ‍ॅशच काय तर सध्याच्या इतर सर्व हिरवणींपेक्षा भारी होती.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

माधुरी अ‍ॅशच काय तर सध्याच्या इतर सर्व हिरवणींपेक्षा भारी होती.
<<<< हाहाहा चांगलीच 'भारी' -एकदम भक्कम वजनदार होती, हे काय सांगायला पाहिजे का Rofl
नशीब अत्ता वजन कमी केलं एकदाचं !
********** स्टाइल मे रहनेका !! ************

..

'आजा नाचले' मधे माधुरि बरिक झालि आहे अस कुणाला वाट्त?... मला तर ति त्यात पण जाडच दिसते.... हो पण त्यात तिचा dress sense बराच सुधारलेल वाट्तो... बहुतेक आत्ताच्या designers मुळे...
आणि हो... हे सगळे प्रतिसाद वाचुन... हसुन हसुन पुरेवाट... खरच office मधे... माबो वाचण अवघड आहे... Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!

दिल तो पागल है मध्ये पण माधुरी सुंदर दिसली आहे.

दिल तो पागल है मध्ये पण माधुरी सुंदर दिसली आहे.
>>> पण करिष्मा भाव खाउन जाते त्यात..आणि शाहरुख चा आचरट पणा (शाहरुख आणि आचरट पणा ही द्विरुक्ती होते खर तर ... Proud )

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

कालच 'sandwich' ह गोविन्दा च चित्रपट केबलवर पाहिला... गोविन्दाला तेच तेच करुन कन्टाळा कस येत नाहि?...
'साजन चले ससुराल ' पन तसाच... त्यात फक्त करिश्मा आणि तब्बु होति.... यात जरा वेगळि महिमा आणि रविना होति...
बाकि मसाला सेम...
२ बायका... त्यान्चि २ मुल... मग त्यचि तारेवरचि कसरत... दोघिन्न्न सम्भाळताना......

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!

Kedar_Japan १०० मोदक.
शाहरुख चा आचरट पणा आणि ते हि हि हि करत खोटे हसणे . अगदी डोक्यात जातो तो.

काल परत एकदा सिंडरेला मॅन पाहीला....कितव्यांदा ते आठवत नाही(काही सिनेमे कितीदा पाहीले हे मी तर मोजत नाही..नॉटींग हिल्स,द इयर ऑफ लिव्हींग डेंजरसली,अलवेज,द बेस्ट इयर्स ऑफ आवर लाइव्हज्....इ.इ.सारखे! )

हा सिनेमा अमेरिकेचा माजी हेविवेट बॉक्सींग चॅम्पीयन जेमस ब्रॅडॉक याच्या जीवनावर आधारित आहे.
एका बॉक्सींग मॅचमधे त्याचा उजव्या हाताला कायमची दुखापत होते.आणि याला बॉक्सींगमधून निवृत्ती घावी लागते.... ! त्याचेवेळी (१९२९साली) अमेरिकेत(आणि बाकीच्या बर्‍याच देशात) ग्रेट डिप्रेशन चालू होते. आणि ब्रॅडॉकला आपल्या बायकापोरांना सांभाळण्यासाठी अगदी पडेल ते मोलमजुरीचे काम करावे लागते. तेही फक्त एका हाताने! तरीही त्या परिस्थीतीतही तो स्वतःचा स्वाभिमान आणि निर्धार सोडत नाही.आणि बॉक्सींगमधे परतायची स्वप्ने पाहण पण सोडत नाही !
आणि मग एक दिवस एका मॅचमधे त्याला परत एक संधी मिळते...एका बॉक्सरने शेवटच्या क्षणी मॅचमधून माघार घेतल्याने...पण हा सामना असतो त्यावेळच्या जगातल्या दोन नंबर कंटेंडरशी! संयोजकांनी फक्त आपले पैसे वाया जावू नयेत याहेतू बॉक्सींग बॅग म्हणुन याला बोलावलेले असते.
पण ब्रॅडॉक त्या संधीचं सोनं करतो!

ब्रॅडॉकच्या रोलमधे Russell Crowe चा अभिनय उत्कृष्टच Paul Giamatti चा पण सहीये.
डायरेक्शन आणि इडीटींग परफेक्ट्....मस्ट वॉच !
बॉक्सींग मॅचेस मी तर एवढ्या आवडीने कधीच पाहील्या नाहीत. पण तरीही हा सिनेमा मात्र आवडला. प्रेरणादायी.
(रिसेशन मधे खचलेल्यांनी तर सिंडरेला मॅन अवश्य पहावा.) Happy

सिंडरेला मॅन मलाही आवडला, मस्त आहे.

बाकी हे लोक एवढे चांगले उच्चार कसे करवून घेतात कोणास ठाउक? रसेल क्रो किवी आहे ना? त्याचे नैसर्गिक उच्चार तिकडचे असतील. तसेच ब्लड डायमंड मधे लिओनार्डो डिकॅप्रिओ चे उच्चार (निदान आपल्याला तरी) तिकडचे वाटणारे घेतले आहेत.

The day the earth stood still एकदा बघायला चांगला आहे. बर्‍याच चुका आहेत आणि बर्‍याच गोष्टी लोकांनी आपआपल्या समजून घ्याव्यात अशी अपेक्षा आहे (म्हणजे ते लोक जे काय करणार असतात ते नक्की कोणत्या कारणामुळे ते कोठेच नीट सांगितले जात नाही), पण बघायला बोअर होत नाही. visuals चांगले आहेत.

थोडीफार टर्मिनेटर-२ ची आठवण येते. एकदा तो Keanu Reeves कोणालातरी हात पुढे करून उचलतो तेव्हा तर तो "Come with me if you want to live" म्हणेल असेच वाटते Happy

सिंडरेला मॅन माझा आवडता चित्रपट आहे. मला रेने फारशी आवडत नाही पण ह्या चित्रपटात तिने देखील छान काम केले आहे. रसेल क्रो तर कमाल.

हो रेनेचंही काम सही आहे त्यात. तो रोल तिला सुट झालाय बहुधा !

Come with me if you want to live>> फारेंड Biggrin मला तर जाम बोरिंग वाटला तो सिनेमा.
Keanu Reeves असुनही! त्याचे मॅट्रिक्स्,कॉन्सन्टाइन......स्विट नोव्हेंबर आवडले होते.

पण त्यातली (चान्दोबातली)चित्रे एकदम नादखुळा असायची..

>>>>
चान्दोबातली चित्रे म्हनजे' बच्चा भी देखेगा और बापभी देखेगा' अशी असत ! Proud

"इजाज़त" पाहीला.... एकदम मूक व्हायला झालं सिनेमा पाहून. किती साधी सोपी सामान्य घटना, पण हलक्या कवितेच्या रूपानं सादर होते पडद्यावर आणि बरंच काही सांगून जाते, आपल्याला समजायला लावते, ते ही श्रवणीय गाण्यांच्या सोबतीने... मला सिनेमा खूप आवडला..

नासिरूद्दिन शाह,(मोहिंदर) रेखा(सुधा) आणि अनुराधा पटेल (माया)... प्रेमाचा त्रिकोण...
मोहिंदरचा साखरपुडा सुधाबरोबर झालेला असून तो मायाच्या प्रेमात पडतो... माया एक विलक्षण अगदी नावाप्रमाणे असणारं पात्रं, हाती न लागणारं तरी मोहविणारं. सुधा एकदम साधी, सुंदर, सोज्वळ, समजूतदार तरिही स्वाभिमानी.... मोहिंदर गर्तेत सापडलेला, दोन वाटा समोर दिसताना कोणत्या दिशेने जाऊ या संभ्रमात पडलेला..

चित्रपटाची सुरवात, मांडणी, छोट्या छोट्या गोष्टींतून महत्वाच्या गोष्टी पोहोचवण्याचा सफल प्रयत्न. मोहिंदर- रेखामधली उत्कटता, मायाचा विचित्र स्वभाव, तरिही मोहिंदरची तिच्याबद्दलची आत्मियता आणि प्रेम... त्याची स्वत:ची चलबिचल... सर्वं काही... भावूक.... हा चित्रपट नसून एक कविताच आहे असं मला वाटलं...

कथा - सुबोध घोष
संवाद - गुलजार...
दिग्दर्शन - गुलजार....

इजाजत माझाही खूप आवडता सिनेमा आहे.गाणी तर सगळीच जबरदस्त आवडती ! Happy

इजाजत म्हणजे खरंच रजतपटावरिल कविताच आहे. माझा ही अत्यंत आवडता चित्रपट आहे इजाजत.

अरे नविन सिनेमे कुणी बघत नाही काय ? Proud

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

इजाजत........ माझा अत्यंत आवडता सिनेमा..right people meeting at the wrong time.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

केड्या, तुझ्या दु:खात सहभागी आहे मी... Proud

अरे नविन सिनेमे कुणी बघत नाही काय ?>> पाहिला ना मी केबलवर, ८बाय ११ तस्विर,आणी तसल्याच फ्रेमवर डोकं फोडून घ्यावे वाटले,नागेश कुकनुरचे नाव पाहून फसलो दुसरे काय?
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

इजाजत मला ही खूप आवडला, पण एक दोन गोष्टी उगिचच खटकल्या.
पहीली ही की रेखा जर का इतकी स्वाभिमानी असते तर ती इतकं सगळं माहीत असूनही मोहिंदर बरोबर लग्न कसं काय करते? Uhoh
शर्टला अडकलेलं कानातलं सापडल्यावर रेखा मोहिंदर ला कन्फ्रंट करते पण मोहिंदर त्यावेळीच तिला सत्य परिस्थिती का नाही सांगत की माया ने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून, एरव्ही तो सगळ्या छोट्या गोष्टी तिला सांगत असतो, इतकी मोठी गोष्ट का नाही सांगत?
रेखा निघून जाते याला दिल का छोटा दौरा पडतो, पण हे कसंही सुधापर्यंत पोहोचवावं असं त्याला वाटत नाही? २ महीने तो का वाट पाहतो? आणि दरम्यान मायाला घेऊन स्वत:च्या घरी कसा काय राहतो?

अरे नविन सिनेमे कुणी बघत नाही काय ?>> पाहिला ना मी केबलवर, ८बाय ११ तस्विर,आणी तसल्याच फ्रेमवर डोकं फोडून घ्यावे वाटले,नागेश कुकनुरचे नाव पाहून फसलो दुसरे काय?

Proud Lol

ह्यापेक्षा जुने पाहिलेले परवडले... निदान फसगत तरी होत नाही Happy

दक्षिणा, आता मलाही आठवत नाही गं.. परत पाहायला पाहिजे. पण पिक्चर इतका स्लो आहे की अगदी चिकाटीने बसुन राहावं लागतं टीवीपुढे... Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

निदान फसगत तरी होत नाही >>> म्हणुनच मी विचारले ना इथे Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मी ही नागेश कुकनुरचं नाव ऐकून एक रॉकफोर्ड नावाचास सिनेमा पहायचा (असफल) प्रयत्न केला. २७ मिनिटं पाहीला, मग माझा बांध Proud सुटला सिनेमा पहायचा... कायंच झेपेना... Sad

नुसतं हॉस्टेल, पोरं, शाळा, नंदिता दास..
कुणी पाहीला असला तर सांगा, मग ठरविन परत पहायचा की नाही ते.
सीडीच्या मागे कथेचं विवरण ही नव्हतं त्यामुळे काहि क्ल्यू लागला नाही.

Pages