बच्चेकंपनीसाठी सुट्टीतले उद्योग - ३ - 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार'

Submitted by लाजो on 11 May, 2011 - 23:29


सुट्टीतला उद्योग - ३ - 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार'

हल्ली बाजारात स्नो डोम्स मिळतात. त्यात आपला फोटो लावुन तो उलट सुलट हलवला की स्नो फॉल होतोय असा भास होतो. असाच स्नो डोम घरच्या घरी बनवता आला तर काय मज्जा Happy

वयोगट: ५ ते १२ वर्षे

लागणारा वेळ: १ तास .

साहित्य:

काचेची/ क्लियर प्लॅस्टिकची घट्ट झाकणाची रिकामी बाटली (जॅम वगैरे चा जार) - लेबल काढुन आणि स्वच्छ धुवुन, उकळुन गार केलेले पाणी, एक ते दीड चमचा ग्लिसरीन, एक छोटे बाटलीच्या आत नीट बसेल असे प्लॅस्टिकचे खेळणे, सुपर ग्लु /अराल्डाईट किंवा तत्सम, रंगीत चमकी, स्टार्स, सजावटीचे सामान.

IMG_0508.jpgकृती:

१. प्लॅस्टिकचे खेळणे जारच्या झाकणाच्या आतल्या बाजुला सुपर ग्लु ने घट्ट चिकटवुन घ्या. पूर्ण वाळु द्या.

IMG_0509.jpg

२. जारमधे उकळुन गार केलेल पाणी काठोकाठ भरा.

३. खेळणे चिकटवलेले झाकण जारवर लावा....थोडे पाणी बाहेर येइल.. येऊ देत.

IMG_0510.jpg

४. झाकण काढुन पाण्यात ग्लिसरीन घाला. साधारण चमचाभर चमकी घाला, चकमकीत स्टार्स घालणार असाल तर ते ही घाला.

५. आता खेळणे चिकटवलेले झाकण जारवर लावा.. आता पाणी बाहेर येणार नाही.

६. जारचे झाकण घट्ट बंद करा. त्यावर सुपर ग्लु लावा. पूर्ण वाळु द्या.

७. आता तयार जार ला आपल्या आवडीप्रमाणे सजवा. मी प्ले डो आणि मोठे स्टार्स लावले आहेत.

IMG_0526_0.jpg

८. कलाकृती पूर्ण वाळली की उलट-सुलट हलवा. पाण्यात घातलेली चमकी स्नो पडल्यासारखी खेळण्या वरुन खाली पडेल. परत हलवा... झाला आपला घरच्या घरी 'ट्विंकल ट्विंकल लिट्टील जार' Happy

IMG_0515.jpg

अधिक टीपा:

- काचेची / प्लॅस्टीकची बाटली/जार सिलेक्ट करताना शक्यतो कमी उंचीच झाकण असलेली आणि काही डिझाईन नसलेली सिलेक्ट करा.

- चमकी शक्यतो जाड/भरड वापरा म्हणजे जास्त वेळ तरंगते.

- ग्लिसरीन केमिस्ट/फार्मसिस्ट किंवा काही सुपरमार्केट्स मधे पण मिळते. घरी नसेल तर छोटी बाटली विकत आणायला हरकत नाही कारण ग्लिसरीनचा उपयोग तोंडात फोड आल्यास त्यावर लावणे, कॉन्स्टिपेशन झाल्यास चमचाभर कोमट पाण्यासोबत घेणे यावर सुद्धा होतो. त्यामुळे विकत आणलेलं ग्लिसरीन फुकट जाणार नाही Happy

IMG_0520.jpg

----------------------------------------------------

सुट्टीतला उद्योग: १ : 'अळी मिळी गुपचिळी' http://www.maayboli.com/node/25345

सुट्टीतला उद्योग: २ : 'कडकु मडकु' http://www.maayboli.com/node/25526

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमकी आणली, जार तयार आहे, खेळणं आहे फक्त इथे बरच शोधुनही मला ग्लिसरीन काही केल्या मिळत नाहिये! [:(]

लाजो एकदम जोरदार प्रोजेक्ट...:)
पाच वर्षांसाठी नं? मग पुढच्या वर्षी बघू...(हे म्हणजे प्रत्यक्षात करायला कंटाळणारे न्~ओन क्रिएटिव्ह माझ्यासारखे पालक असतात नं त्यांनी काढलेली पळवाट आहे...सपष्ट शब्दात सांगायचं तर)
पण तुला आणि तुझ्या लेकीला दहापैकी दहा मार्क्स... टाळया... Happy

लाजो, तुझ्या सगळ्या "आयडियाज "खुप छान .मुलांना आवडतील व काहीतरी नविन स्वता:ला करायला मिळाले.याचा आनंद त्याना मिळेल त्याचबरोबर त्यांच्यातली कल्पकता वाढेल.
तू दाखवलेल्या बाऊल सारखेच कागद ओला करुन त्याला प्लास्टिक मास्क वर लावुन कागदी मुखवटे तयार करता येतील.[भिजवलेला कागद,ग्लू/फेविकोल,चेहरा-नाक-डोळे रंगविण्यासाठी रंग]

Pages