कैरीची आंबट गोड चटणी

Submitted by मानुषी on 24 May, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
१ कैरी, अर्धी वाटी ओलं खोबरं, ३/४ मिरच्या, गूळ, १ चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, बारीक आल्याचा तुकडा.
फ़ोडणीसाठी पाव च. तेल, मोहोरी, हिंग, २ चिमटी मेथ्या पावडर.

क्रमवार पाककृती: 

कृती: कैरीची सालं काढून तुकडे करा. या तुकड्यांच्या ऐवजाएवढाच गूळ घ्या. कैरीच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण ठरवा.
मिक्सरमधे कैरीचे तुकडे, गूळ, जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, दाण्याचं कूट सर्व टाकून ग्राइंड करा.
अगदी पाव चमचा तेलाची मोहोरी, हिंग, मेथी पावडर घालून फ़ोडणी करून ती या चटणीवर ओता.
आणि कश्याहीबरोबर खा.
यात कैरी थोडी पाडाची असली तरी चालते.
कोथिंबिरीऐवजी भरपूर पुदिना वापरला तरी चालते.

अधिक टिपा: 

या दिवसात ही चटणी तोंडाला चव आणते.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.