"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

arc

मी वाचली ती बातमी. नेमका काय प्रकार आहे हे उघड होईपर्यंत निष्कर्ष काढू नये असं वाटतं. जिच्यावर आरोप आहे ती मुलगी १९ वर्षांची आहे. तिचं नाव आजच्या वर्तमानपत्रात छापलं. जर ती निर्दोष होती असं उद्या सिद्ध झालं तर तिच्या मानहानीला कोण जबाबदार ? मागे असंच एका घरात काम करणा-या मुलीवर असेच आरोप झाले होते. पोलीस तपासात नव-याचं दुष्कृत्य तिने उघड करू नये म्हणून मालकिणीने रचलेला तो बनाव होता असं आढळून आल..

बी इथे चटक हा शब्द अयोग्य आहे असं मला वाटतं. कारण चटक लागणे ही घटना तेव्हा घडू शकते जेव्हा एखाद्या मुलाने अयोग्य वयात एखादी गोष्ट अनुभवली असेल आणि तीच गोष्ट तो पुन्हा पुन्हा करत असेल तर.
इथे लहान मुलांच्या शोषणाचा विषय सुरू आहे, शोषणातून शरिरसुखाची चटक लागणे निव्वळ अशक्यप्राय आहे, त्यातून फक्त घृणाच निर्माण होऊ शकते.

दक्षिणा, कळत्या वयातील शोषण घृणा निर्माण करु शकते पण नकळत्या वयात गोडीगुलाबीने केलेले शोषण चटकही निर्माण करु शकते. असे माझे मत आहे.

१६ वर्षाच्या मुलामुलींना शरिर आकर्षनाबद्दल खूप काही कळत! प्रश्न अतिलहान मुलांचा आहे १ ते १० वयोगटातील मुलांचा. ह्यामधे १ ते ५ काहीच कळत नाही. ५ ते १० मधे देखील ५ ते ७ आणि ७ ते १० वयोगटातील मुलांची संवेदना वेगळीवेगळी असते. खरा धोका हा लहानपणी नको त्या गोष्टीची 'चटक' लागणे ह्याचा आहे.>>>>
बी इथे चटक हा शब्द अयोग्य आहे असं मला वाटतं. कारण चटक लागणे ही घटना तेव्हा घडू शकते जेव्हा एखाद्या मुलाने अयोग्य वयात एखादी गोष्ट अनुभवली असेल आणि तीच गोष्ट तो पुन्हा पुन्हा करत असेल तर.
इथे लहान मुलांच्या शोषणाचा विषय सुरू आहे, शोषणातून शरिरसुखाची चटक लागणे निव्वळ अशक्यप्राय आहे, त्यातून फक्त घृणाच निर्माण होऊ शकते.>>>>>
मैना ने सांगितलेल्या प्रसंगालाधरुन..... मला वाटते कि १५-१६ वर्षाच्या मुलांना हे समजते कि काय वाईट काय चांगले आणि शोषणातून शरिरसुखाची चटक लागणे निव्वळ अशक्यप्राय आहेच. पण ईथे ती बाई त्या मुलांला त्या गोष्टीसाठी प्रेरित करते. ईथेही शोषण आहेच पण त्यात त्या मुलाचीही ईच्छा असेल तर तिच्यासाठी ते सोपे होईल. तेव्हाच त्या मुलाला नको त्या गोष्टीची 'चटक' लागण्याचा धोका जास्त आहे.

Pages