"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागो मोहन प्यारे | 13 May, 2012 - 12:28
आजच्या भागा त काय आहे? दुसरा धागा काढा

जागो मोहन प्यारे | 13 May, 2012 - 12:36
चाइल्ड सेक्शुअल अ‍ॅब्युज... http://www.satyamevjayate.in/issue02/videos/ दुसरा धागा काढा

विजय_आंग्रे | 13 May, 2012 - 13:17
.

चाणक्य. | 13 May, 2012 - 13:10
दुसरा धागा काढा.
आजचा विषय तेवढाच महत्वाचा होता. salute आमिरखानला. त्याने शेवटी जे workshop घेतले ते खरोखर चांगले होते. कमी वेळेतहि ज्या पद्धतीने तो सर्व बसवतो आहे त्याबद्दल कौतुक आहे. आणी नंतरचे गाणे ... अप्रतिम!
-- child abuse चे बिल पडुन आहे गेले १ वर्ष राज्यसभेत आमीर त्याबद्दल पाठपुरावा करणार आहे

चाणक्य. | 13 May, 2012 - 13:16
आंग्रे . जरा आधी रीना आणी इरा यांच्याशी बोलुन घ्या, अथवा तुम्हि जेथुन हे copy केले त्यांना बोलायला सांगा
http://daily.bhaskar.com/article/ENT-aamirs-special-gesture-for-beti-ira...
http://wonderwoman.intoday.in/story/When-ex-spouse-turns-best-buddy/3/83...
अशा कितीतरी बातम्या आहेत पण हा विषय नाहि तेव्हा हवेतर दुसरा धागा काढा याबद्दल. आपण बोलु.

Mandar katre | 13 May, 2012 - 13:28
आजचा एपिसोड पहिला .पण पहिल्या भागा इतका चांगला नाही वाटला , यापेक्षा महात्व्वाचे विषय असू शकतात

श्रुती | 13 May, 2012 - 13:33
आजचा एपिसोड पहिला .पण पहिल्या भागा इतका चांगला नाही वाटला , यापेक्षा महात्व्वाचे विषय असू शकतात >>> बापरे! Are you serious?

भान | 13 May, 2012 - 13:45
श्रुती +१

जिल्लेइलाही | 13 May, 2012 - 13:49
छान

चाणक्य. | 13 May, 2012 - 14:06
आजचा एपिसोड पहिला .पण पहिल्या भागा इतका चांगला नाही वाटला , यापेक्षा महात्व्वाचे विषय असू शकतात >>> >>>>>
यापेक्षा महात्व्वाचे विषय ???? ५३% ! कात्रे साहेब तुम्हि इपिसोड पाहिला असेल तर हा आकडा तुम्हाला समजला नाहि का तुम्हि विसरलात ?

नीधप | 13 May, 2012 - 14:34
मी आज एपिसोड पाह्यला नाहीये. रात्री पाहीन. पण 'लहान मुलांचे लैंगिक शोषण' हा विषय कमी महत्वाचा वाटणार्‍यांच्या डोळ्यावर कसली झापडं लावली आहेत?
एक काम करा पिंकी विराणी यांचे 'बिटर चॉकलेट' नावाचे पुस्तक आहे ते जरा वाचा. मराठीत अनुवादही उपलब्ध आहे.

रेव्यु | 13 May, 2012 - 15:08
आजचा भाग पाहिला- अत्यंत व्यथित अंतःकरणाने पाहिला आणि हा भाग तसे पाहू गेल्यास वैश्विक समस्येबद्दल आहे. जपानी, जर्मन अन कोरीयन ( ही प्रातिनिधिक म्हणून देशांची नावे दिली आहेत्-इतरही आहेतच) नागरिक या प्रकारच्या विद्रूपतेने व विकाराने लिप्त आहेत व हा एक व्यवसायाचे स्वरूप होवून बसला आहे.
शॉकिंग आहे -याच्याशी सामाजिक ,आर्थिक स्तराशी काहीही संबंध नाहीये. ही विकृती व मानसिकता आहे-ही वृत्ती कशी निर्माण होते यावरही काही कोणी प्रकाश टाकू शकेल का? लैंगिक विकृती मधील हा सर्वात घृणास्पद प्रकाल आहे.
एपिसोड खूपच प्रभावी होता.

भरत मयेकर | 13 May, 2012 - 15:12
आजचा भागही अत्यंत संवेदनशीलतेने, संतुलितपणे हाताळला होता.

महागुरु | 13 May, 2012 - 15:22
खुपच धक्कादायक आणि विचार/कृती करायला लावणारा भाग होता. समाजात ही विकृती आहे माहिती होते पण इतके प्रमाण असेल असे वाटले नव्हते. आमिरखानने परत एकदा प्रभावीपणे या विषयाची गंभीरता लोकांसमोर मांडली आहे.
मी इथे पाहिला. भारताबाहेरील लोक 'डेली मोशन' च्या लिंक वापरुन पाहु शकतील.

आनंदयात्री | 13 May, 2012 - 16:17
नॅव्हिगेशन सोयीसाठी दुसर्‍या भागाबद्दल चर्चा इथे करूया-
http://www.maayboli.com/node/34947

छान

आत्ताच पाहिला.
I was stunned! speechless! shocked... कदाचित आपल्या समाज-संस्कृतीतील समजुती, विचारधारा, परंपरा, काही अलिखित नियम इत्यादी इत्यादींमुळे जाहीरपणे न दिसणारा आणि मुख्यतः दडपला जाणारा नाजूक विषय!

त्या शोषित बालकांना कुठल्या प्रसंगांतून जावं लागत असेल या कल्पनेनेच वाईट वाटलं.

या भागात सहभागी झालेल्या हरीश अय्यर यांचा ब्लॉग

सत्यमेव जयते आणि आमीर खानबद्दल हरीशचे मत : "I'm overwhelmed by the response the show has been getting for the first show. And love the fact that it brings social issues, least discussed to the for".
This brings me to the big question people are asking "does aamir khan think he could bring about social change" . The answer is NO. He or my other pals Richa Anirudha or Barkha Dutt can only bring the issue to the fore. Their production team can put stories together, package them together. But they can in the end only ignite the thought, to walk on it or not, is your prerogative.
I see half of Bhadralok in my timeline on facebook analysing aamir's PR strategy and looking at it with utmost cynisism. Well, he did decide to take a plunge and bring a well packaged and wonderfully strategised show to us. Its a huge risk for him too. Imagine, him in a gibberish TV show. It will certainly screw his image even in films. The whole star value would be at a toss. But at his level this is the best activity he could do. To expect him to become a shabana azmi or nandita das is like expecting too much. And the whole drama over "male oprah"... Well, it is just good copy. I'm sure there is no comparison. And even if there is, I guess we should be happy about it. What's with you cynics yaar? When was the last time you stood up for something without questioning the intent?
when you see an oppurtunity to do something good, DO GOOD. i f you have a chance to see something good. SEE GOOD. your bloody dissection, doesn't lead anyone anywhere."

your bloody dissection, doesn't lead anyone anywhere.>>>>>>>>> +++१००००००

आजच्या भागातले अजुन एक महत्वाचे वाक्य - Dont respect elders, respect the behaviour !

>>>>>your bloody dissection, doesn't lead anyone any>>>>>>>>+१०००००००
यालाच मी याच विभागात काही दिवसापूर्वी 'चर्वित चर्वण' वा चोथा म्हटले होते,नि:सत्त्व व निरर्थक.

मी यू ट्यूब वर बघितला.
आपले अनुभव सांगणार्‍या व्यक्तींच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक थोडेच.
त्यातला वर्कशॉप तर प्रत्येक लहान मूलाने, परत परत बघावा असा होता.

>>I was stunned! speechless! shocked... >> अगदी रे !!

असे वर्कशॉप व्हायला हवेत. शाळेत वगैरे.. नीट समजावून सांगितले की मुलांना समजतेच..

आमिरचे पुन्हा एकदा अभिनंदन ईतका संवेदनशील विषय संयतपणे हाताळल्याबद्दल.

या विषयावरचे 'मीना नाईक' यांचे 'वाटेवरती काचा गं' हे नाटक पूर्वी टीव्हीवर पाहिलेले. तेव्हाच मी सुन्न झालेले. अशा वेळी प्रत्यक्ष आईला कळूनपण ती सोबत नसते तेव्हा लहानग्यांना किती अगतिक व्हायला होते, त्यांची किती घुसमट होते ते पाहणं ह्रद्यद्रावक आहे. हे नाटक पहायला मिळाले तर जरुर पहा.

मायबोलीवर यापूर्वी ईथे चर्चा झालीय.

मी माझ्या मतावर १०० % ठाम आहे, पहिल्या भागाची मी तोंड फाटेपर्यंत स्तुती केलेली होती, पण आजच्या भागातल्या विषय तितका महत्त्वाचा नाहीये जितका "भारतीय शिक्षण व्यवस्था आणि सरकारी शाळांतील शिक्षणांचा खेळखंडोबा " हा विषय महत्त्वाचा आहे ...पाणी टंचाई आणि पाण्याचे गैर व्यवस्थापन इत्यादी मुद्दे हि अतिशय महत्त्वाचे आहेत .

लहान मुलांचे लैंगिक शोषण हा मुद्दा महत्त्वाचा आहेच ,यात वाद नाही,,पण तो मुद्दा आणि वर्कशॉप शालेय स्तरावर ही घेता येऊ शकतात ,अर्थात त्याबद्दल जागृती करण्यासाठी अमीर चे प्रयत्न कौस्तुकास्पद आहे,,

पण स्त्री-भ्रूण हत्या या विषया इतका आजचा विषय महत्त्वाचा नव्हता ....तेच तेच करुण कहाण्या ऐकवून, डोळे पुसणारे प्रेक्षक दाखवीत बसून इमोशनल करण्याचा प्रयत्न असेल ,तर आमीर एक चांगला प्लेटफोर्म वाया घालवीत आहे ,असे नांइलाजाने म्हणावे लागेल

१३ विषय आहेत म्हणजे एखादा कमी जास्त महत्वाचा असे होणारच. सगळेच विषय सगळ्यानाच महत्वाचे वाटतील असे नाही.

मंदार, तुमच्या मताबद्दल राग करावा की कीव हेच समजत नाही. हा मुद्दा समोर आणणे किती महत्त्वाचे होते हेच खरे तर तुमच्या मताने अधोरेखित केले. अशी अंधारात असलेल्या माणसांसाठीच खरे तर या मुद्द्याची गंभीरता दाखवल्याबद्दल 'सत्यमेव जयते' चे कौतुक करावे लागेल.
'भारतीय शिक्षणव्यवस्था' ला शतपटीने मागे टाकेल इतका मोठा मुद्दा आज चर्चेत आला आहे. केवळ १३ भागांची तयारी केलेल्या या मालिकेत असा पडद्याआडचा आणि धाडसी मुद्दा आणल्याबद्दल खरे तर 'सत्यमेव जयते'च्या टीम चे अभिनंदन करावे लागेल

<<मंदार, तुमच्या मताबद्दल राग करावा की कीव हेच समजत नाही. +१
स्त्री-भ्रूण हत्या इतकाच हा विशयही महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा विशय महत्त्वाचा वाटत नाही हे दुर्दैव :(. असो प्रत्येकाचे मत/ विचार वेगळे. नुसत्या शाळेच्या लेवल वर वर्क्शॉप करून काय होणार आहे? बरेचदा मुलं आवाज उठवायच्या वयाचीही नसतात. आई वडिलांना कळून पण ते काही करत नाहीत किंवा कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

लहान मुलांचे लैंगिक शोषण हा मुद्दा महत्त्वाचा आहेच ,यात वाद नाही,,पण तो मुद्दा आणि वर्कशॉप शालेय स्तरावर ही घेता येऊ शकतात ,अर्थात त्याबद्दल जागृती करण्यासाठी अमीर चे प्रयत्न कौस्तुकास्पद आहे,,>>> मग त्या दृष्टीने आजचा विषयही योग्यच नाही का? उलट आजच्या एपिसोड मधे लोकांना थेट उपयोगी पडणार्‍या गोष्टी होत्या - १. हे अत्याचार वाटतात त्यापेक्षा जास्त मुलांना सहन करावे लागलेले आहेत याची प्रेक्षकांना कल्पना देणे, २. याबद्दल आपण मुलांना काय सांगू शकतो त्याचे प्रात्यक्षिक आणि ३. त्याबद्दल काम करणार्‍या एखाद्या संस्थेला निधी उभारण्याकरिता मदत.

माझे मत आहे की हाही तितकाच महत्त्वाचा होता. विशेषतः ज्या गोष्टी भारतात फारशा होत नाहीत असा सर्वसाधारण लोकांचा समज असतो त्याबद्दल लोकशिक्षण अत्यंत आवश्यक आहे.

मंडळी आपल्या सर्वांच्या वैयक्तिक मतांचा पूर्ण आदर करुण आणि मुलांचे लैंगिक शोषण या मुद्द्याची संवेदन-शीलता अधोरेखित करून एक गोष्ट सांगावीशी वाटते -

आपल्यापैकी कुणी २ वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या INDIA TODAY -TEENAGER'S SURVEY ON SEX AND SEXUALITY चा रिपोर्ट वाचला आहे का?

त्याचे रिपोर्ट अतिशय धक्कादायक आहेत , मला आठवते त्याप्रमाणे भारतातील १० ते १६ वयोगटातील सुमारे ४०% मुली आणि ६० % मुलांनी या वयात शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात काहीही गैर नाहीये ,असे मत व्यक्त केलेले होते ...

या बाबतीत सर्वंकष चर्चा कुठे झाल्याचे जाणवत नाही .पण आजच्या पिढीचे वास्तव स्वरूप आणि त्यांची वैचारिकता याबाबत पालक फारच अनभिज्ञ असल्याचे जाणवते .

या गोष्टीचा सत्यमेव जयते च्या आजच्या भागाशी संबंध मी जोडत नाही, पण मी वर म्हटल्याप्रमाणे अशा अनेक रौद्र समस्या आहेत ज्या समाजापुढे दृश्य/अदृश्य स्वरूपात उभ्या आहेत ....त्यांना किती महत्त्व द्यायचे आणि त्यावर कशी आणि कधी उपाय-योजना करायची ते आपणच ठरवायचे आहे

१३ व्या भागानंतर आमीरची thought process जास्ती स्पष्ट होईल... पण या दोन एपिसोड वरून अस वाटतय तो भारतीय समाजाच्या दंभिकतेचा बुरखा फाडतो आहे.

@निशदे-तुझ्या पोस्ट्ला १००००००+ अनुमोदन. असल्या झोपेच सोंग घेतलेल्या लोकांना जाग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आमीरचा कार्यक्रम करत आहे. भारतीय संस्कृतीच्या ग्रेट्पणाची..दांभिक चर्चा ऐकून तर कान विटले. आयुष्यातली २७ वर्ष अमेरिकेत राहून एक गोष्ट कळून चुकली की समाजात घडणार्‍या वाइट गोष्टी जाजमाखाली सरकवणारी संस्कृती कसली ग्रेट??

मंदार, तूमच्या क्षेत्रातल्या समस्या तूम्हाला महत्वाच्या वाटाव्या यात काहीच गैर नाही. आमिर खानच्या
टिमने ज्यावेळी काही अभ्यास केला असेल त्यात कुठल्या समस्या पटावर घ्याव्यात याचीही चर्चा
झाली असेलच आणि त्यासाठी काही लोकांची मते विचारली असतीलच, आणि त्यापैकि बहुतेक लोकांना
ज्या महत्वाच्या वाटल्या, त्याच समस्यांवर कार्यक्रम करावेत असेच ठरले असणार नाही का. हि काही
सास बहूची सिरियल नाही. मर्यादीत कार्यक्रम करायचे तर असे करणे स्वाभाविक आहे.

आता हे सगळे तूम्हाला उमगत नाही असे अजिबात नाही, पण तूम्ही एक मत मांडलेत, तितपतही ठिक.
पण यापुढे तूम्ही तूमचे मत परत परत मांडत रहावे आणि बाकिच्यांनी तूम्हाला हा विषय
कसा महत्वाचा आहे हे पटवत रहाणे, याने चर्चा भरकटतेय असे नाही वाटत ?

तूम्ही सूज्ञ आहातच.

दुसर्‍या भागात अमीरखानने कोणता विषय मांडायला हवा होता याकरता हा धागा उघडलेला नाही हे कृपया लक्षात घ्यावे. आणि दुसर्‍या भागात जो काही विषय मांडला गेला त्याबद्दल बोलावे हे ठीक.

मी अजून हा एपिसोड पाहिला नाहीये. पण हा विषय मलातरी अतिशय महत्त्वाचा वाटतो.

समाजात ज्या उतरंडी असतात त्यात लहान मूल हे सगळ्यात व्हल्नरेबल असतं. ना जगाचा अनुभव, ना सक्षम झालेलं, ना आर्थिकदृष्ट्या सबल, ना अन्यायाचा प्रतिकार करण्याची ताकद. बरेचदा हा अन्याय आहे हे ही माहित नसतं. त्यामुळे हा गट अत्याचार होण्यास अत्यंत सहजप्राप्य आहे. एक समाज म्हणून, एक जबाबदार नागरीक म्हणून आणि एक सजग पालक म्हणून आपण या विषयाकडे बघायला हवे.

घरातील मुलांची वर्तणुक जरा जरी बदलली तरी त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मुलांच्यात विश्वास निर्माण करा.

मंदार, तुमच्या मताबद्दल राग करावा की कीव हेच समजत नाही. हा मुद्दा समोर आणणे किती महत्त्वाचे होते हेच खरे तर तुमच्या मताने अधोरेखित केले. >>> +१ . प्रत्येक पालक जरा अशा विचारसरणीचा असेल तर मुलांच्या आयुष्याचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही. आणि प्रमोद देव सारखी जाणती माणसं पण अशा विचारसरणीला अनुमोदन देतात , अरेरे !

मामी, यू ट्यूबवर बघ.
फुलपाखरासारखी बागडणारी मुले, पाच मिनिटे नजरेआड झाली तर, मनात काय चलबिचल होते, याचा
अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच आहे,

मी आणखी खुलेपणाने बोलू शकतो, पण काही बंधने आहेत

कुणाच्या भावना दुखवायचा उद्देश नाही, पण.................................................................................................

Pages