"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व संवेदनशील माबोकरानी प्रसाद चिक्सेंची लिंक पहावी. सुन्न होतो अन मग त्वेषाने काहीतरी करावेसे वाटते. अतिशय समयोचित आहे ,प्रसादजी अन त्या सुनिताताईंना दाद द्यावी लागेल,केवढे मनोधैर्य अन कमिटमेंट, सकारात्मका,नेव्हर से डाय , कसले रसायन आहे हे? वाखाणणी करावी तितकी थोडीच आहे.
आता या समस्येची गंभीरता अधिकच जाणवते Sad

हा एपिसोड पाहून 'वाटेवरती काचा गं' आठवलं. आमिरने ज्या पद्धतीने वर्कशॉप घेतला, त्याच पद्धतीने त्या नाटकातही समजावून सांगितले होते.

हा विषय अतिशय महत्वाचा आहे...
एक घडलेलीच घटना आहे.. यात मी पहिल्यांदाच आयुष्यात कुणावर हात उचलला होता..
कॉलेज मधे एक मैत्रिण होती... बोलत वगैरे छान होती..मिसळत सुध्दा व्यवस्थित होती.. पण कोणी मुलाने तिला स्पर्श केला तर लगेच आक्रमक होत होती.. सगळेच या तिच्या विचित्र वागण्यावर गोंधळेले होते.. तिचे नाव "मिस टचनॉट" ठेवलेले.. एकदा पिकनिक मधे सगळे गेले असताना बोलता बोलता सहज यावर तिला विचारले की काय प्रोब्लेम आहे.... फार फार खोदुन खोदुन विचारल्यावर तिने सांगितलेले..लहान पणी तिच्या काकांनी काही प्रकार करण्याचा प्रयत्न केलेला..घरी आई आणि बाबा दोन्ही ऑफिस ला असायचे आणि ती एकुलती एक ...त्यातच घरी मिलिटरी सारखे अतिशय कडक वातावरण असल्याने घरी काही बोलुच शकली नाही हिंमतच नाही झाली.. प्रचंड तनावा खाली सारखी त्या काका पासुन स्वतःला वाचवत होती एक प्रकार ची भीती मनात भरलेली.. हळुहळु भितीची जागा घृणाने घेतली..
तिला हात लावण्याचा प्रयत्न करणार्या प्रत्येक व्यक्तीत तिला तिचा काका दिसायचा..एक फोबिया मनात भरलेला तिच्या...तिचे आयुष्य एकदम बदलेले होते.. ती हसत होती बोलत होती पण मनात ते घरच करुन राहिलेले..
दुसर्‍यादिवशी तिला घेउन एक दोन मित्र मैत्रिन तिच्या काका च्या घरी गेलो..काका ला बाहेर तिच्या समोर जाब विचारला... सुरुवातीला नाटके केलीत पण रट्टे दिल्यावर .. कबुल झाला.. तिच्या आई वडिलांना सुध्दा बोलावुन घेतलेले..त्यांना सुध्दा विश्वासच बसला नव्हता... चांगला मार दिला... आई वडिलांच्या सांगण्यावरुन पोलिसात नाही दिला फक्त..( घराची आब्रु इत्यादी नेहमीची वाक्य त्याच्या बायको मुली कडुन ) ... त्या दिवसानंतर हळु हळु बदल होत गेला त्या मुलीत......
आता लग्न झाले तिचे.. मुल सुध्दा आहेत.....
.
.
कित्येक अश्या असतील ... ज्यांना घरातुन साथ मिळाली नाही त्यांना समजुन घेतले गेले नाही...आपण आपल्याच घरात इतके कडक वातावरन करुन टाकतो ना कि मुले आईवडिलांपासुन दुर जातात..लहान वयात जे प्रश्न त्यांच्यामनात येतात त्याची उत्तर आई वडिलांना न विचारता इतर मित्रांना विचारतात सल्ले त्यांच्याकडुन घेतले जातात.. ते सल्ले ते उत्तर किती बरोबर असतात देवालाच ठाउक असते..:(
इतके ही वातावरण कडक करु नये की त्या कडक आवरणातुन मुल तुमच्याच जवळ येता येणार नाही.... थोडे वातावरण मउ बनवा... आपण आपल्या पाल्याचे मित्र बनुया..

उदय, कौटुंबिक वातावरण माझ्या पिढीपासून मोकळे होत गेले. त्या पूर्वीच्या काळात मूले तर वडीलांशी बोलायलाही घाबरत असत. पण त्याही काळात मुलांवर असे अत्याचार झालेच असतील. त्या समस्यांना कधी वाचाच फूटली नसेल.

उदय +१०

त्या अय्यरच्या आईने सांगितले ना, की तुमचं मूल तुम्हाला नुसत्या इशार्‍यानेही काही सांगत असेल तर त्याचं ऐका.......जगाचं नाही.

हा एपिसोड पाहून 'वाटेवरती काचा गं' आठवलं. >> मीना नाईकांचं नाटक होतं हे. त्यातल्या छोट्या मुलीने फार छान काम केलं होतं. मीना नाईक तिची मावशी आणि कौन्सेलर दाखवल्या होत्या. त्यांनी अमीरखान सारखंच, मुलगा आणि मुलीचं चित्र दाखवुन कोणते भाग प्रायवेट असतात आणि परक्या व्यक्तींनी स्पर्श करायचे नसतात ते दाखवलं होतं. फार उत्कृष्ट रीत्या हाताळला होता विषय. सत्यमेव मुळे या विषयाची एवढी चर्चा चालु असताना, एखाद्या मराठी चॅनेलने ते परत दाखवायला हवं.

दिनेशदा,

आपला इथला प्रतिसाद वाचला.

१.
>> सगळ्या नीतीमूल्यांच्या कल्पना नंतर निर्माण झाल्या ना ?
>> पण मूलांवर जर त्यांचा विपरीत मानसिक परिणाम होतोय असे कळल्यावर, आता आपल्याला ते
>> रोखावेच लागेल.

भारतीय परंपरेत इंद्रियांवर संयम सांगितला आहे. त्यामुळे प्राचीन ग्रीक लोकांशी भरपूर संपर्कात असूनही भारतात अशा प्रकारच्या प्रथांचा फैलाव झाला नसावा. अर्थात कापालिक लोक त्यांच्यात्यांच्यात काय करीत होते हे कुणालाच समजणारं नाही.

आज हे प्रकार रोखण्याबद्दल दुमत नाहीयेच मुळी! Happy

२.
>> तशाही ग्रीक रोमन संस्कृतीमधे, आता कालबाह्य झालेल्या अनेक प्रथा आढळतात.

तसंही हल्ली कोणी प्राचीन ग्रीक वारसा सांगत नाही. मात्र कापालिकांप्रमाणे गुप्त संघटना (secret societies) या रूढी चालू ठेवीत असतीलही कदाचित. कोणी काय सांगावे. Sad विशेषत: युरोपात अनेक गुप्तसंस्था आहेत.

हे असले प्रकार कायद्याने रोखले जायला पाहिजेत, हे उघड आहे. जगातल्या बहुतांश देशांत यांच्याविरुद्ध कायदे आहेत. तरीपण हे प्रकार कमी झाले नाहीत. यावरून हे प्रकार करणार्‍यांची पोहोच दिसून येते.

त्यामुळे कायद्यांसोबत जणजागृतीसारखे दुसरे मार्गही शोधले पाहिजेत.

आ.न.,
-गा.पै.

मी ही तेच म्हणतोय दिनेश दा......... आपण आपल्यामुलांना दुर करतोय आपल्या पासुन...जुण्या जमान्यात या विकृती इतक्या मोठ्या प्रमाणात (५३% सांगितले जाते सध्या) नसेल..तेव्हा वडिलांचे कडक असणे आई जरा वडिलांच्या धाकात.. मुलांना मोठ्यांचा धाक नेहमीच,, काही विचारायचे सांगायचे तर आधी १० वेळा विचार करायला भाग पडते.. हेच नेमके बदलायला हवे... बदल्यावर काही प्रमानात का असेना चित्र बदलेल...
.
.
मी आयुष्यात पहिल्यांदाच कुणावर हात उचललेला त्यामुळे फार चुकिचे वाटत होते मनात .. पण त्याचबरोबर त्याकाकाच्यांबरोबर मनात तिच्या आई वडिलांवर पण प्रचंड राग आलेला.. जर त्यांनी सुरुवातीलाच लक्ष दिले असते मुली वर ... तर हे घडले नसते ...नाही मी वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्तिला इतकी मारहाण केली असती.. Sad

<जुण्या जमान्यात या विकृती इतक्या मोठ्या प्रमाणात (५३% सांगितले जाते सध्या) नसे<> तेव्हा अशी सर्वेक्षणे होत नसत इतकेच.

गा. पै.
अशा संघटना नक्कीच आहेत. आणि अत्यंत छुप्या रितीने त्यांचा कारभार चालतोच. गोव्यात जरा चौकस
नजरेने बघितले तर काही गोष्टी नजरेत भरतातच. गोव्याचे नाव घेतोय कारण तिथे बराच काळ वास्तव्य झाले. टुरिझम संबंधित क्षेत्रात असल्याने, थोडाफार परदेशी टूअर ऑपरेटर्सशी संबंध यायचाच. सिझनमधे लंडन, मॉस्को आणि फ्रूकफुर्ट वरुन रोज एक चार्ट्र्ड फ्लाईट यायचे तिथे. आणि त्यांचे हेतू, उघड असायचे.

कालच्या एपिसोडमधला तो ड्रेस डिझायनर बघितला का ? केवढ्या तणावाखाली होता तो. त्याने माफी मागायची
आठवण, उच्च बिंदू होता.

राजस्थानच्या स्वास्थ्य मिनिस्टरने आज अकलेचे तारे तोडले. अर्थात वेगळे काहि अपेक्षित नाहिच आहे या लोकांकडुन!

आमिरने या एपिसोड मधे, मूलांना आता टिव्हीसमोरुन दूर करा, असे सांगणे, हा त्याच्या संवेदनशील
असण्याचा पुरावा आहे. >>>>>> +१

>> महत्वाचे विषय आणखी बरेच असतीलही पण स्वतःच्या मुलाइतकं माणसाला महत्वाचं काहीच नसेल! >>
अनुमोदन १००००००० +

उदय , तुमचे खूपच कौतुक वाटले.

मला एकाच म्हणायचं आहे
आमीरच्या शो बद्दल प्रतिकूल मत व्यक्त करणे किंवा त्यपेक्ष महत्त्वाचे विषय असू शकतात ,असे म्हणणे ही मानसिक विकृती कशी काय ठरते बुवा?

शाब्बास उदयवन.

फुटपाथवर राहणार्‍या कुटुंबातल्या लहान मुलांना तर कोणी वाली नसतो. तशात त्यांना फाटके कपडे घालून भीक मागायला पाठवतात. किती मुलं यात बळी पडत असतील. Sad आणि त्यांना तर दुसरं काही आयुष्य आहे याची कल्पनाही नसेल. Sad

>>आमीरच्या शो बद्दल प्रतिकूल मत व्यक्त करणे किंवा त्यपेक्ष महत्त्वाचे विषय असू शकतात ,असे म्हणणे ही मानसिक विकृती कशी काय ठरते बुवा? <<

तुमचा प्रश्न रास्त आहे.

तुम्ही तुमच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न काय आहेत हे मांडू शकता. अमीर व इतर त्या मताशी सहमत होतीलच असे नाही. पण त्यामुळे आणखी कोणत्या गोष्टी लोकांना महत्वाचे प्रश्न वाटतात हे कळण्यास निश्चितपणे मदत होईल.

मला स्वत:ला त्याने अत्यंत आवश्यक विषय उत्तम रितीने सर्वांपुढे जाहीर पणे आणून मोठेच काम केले आहे असे वाटते.त्याबद्दल आधीच्या पोस्टमध्ये सविस्तर लिहिले आहेच.

सत्यमेव जयतेची वेबसाईट चाळताना माझ्या असं लक्षात आलं की त्यातल्या टर्म्स अ‍ॅन्ड कन्डीशन्स पेजवर 3.ii मुद्द्यात तेराही भागात दाखवल्या जाणार्‍या एनजीओजची नावं दिल्येत. त्यामुळे कुठले विषय घेतले जाणार आहेत पुढील भागांमध्ये ते आधीच कळतंय. (त्यात डॉ. अवचटांच्या 'मुक्तांगण'चाही समावेश आहे म्हणजे व्यसनमुक्ती हाही विषय घेतला जाईल)
त्यांच्या टीमने एपिसोड प्रदर्शित झाल्यावर मगच त्यात सांगितलेल्या एन्जीओचे नाव या पेजवर द्यायला पाहिजे असं वाट्तं. आत्तापासून सर्व नावं द्यायची गरज नाही वाटत मला तरी...त्यामुळे अख्ख्या सिरीजच्या कंटेटची गोपनीयता एका प्रकारे राखली जात नाहीये असं वाटतंय.

दामोदरसूत, मला स्वत:ला त्याने अत्यंत आवश्यक विषय उत्तम रितीने सर्वांपुढे जाहीर पणे आणून मोठेच काम केले आहे असे वाटते.>>>>>>>>>>>> +१००००००

आई आणि मूल या दोघांचंही प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व असते... आमीरने या दोन संवेदनशील विषयांना हाताळून सुरूवात उत्तम केलेली आहे.

हे दोन संवेदनशील विषय आजपर्यंत बोलणेही टाळले जायचे तिथे आज स्वतः पीडीतांकडून विरोध केला जातोय, आणि त्यांना मदत करण्यासाठी असंख्य हात उभे राहताहेत. बरेच जण असे असतात, ज्यांना मदत कुठे मागायची ते माहीत नसते. बरेचजण असे असतात, ज्यांना मदत तर करायची असते, पण कशी ते माहीत नसते... त्या सर्वांसाठी हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे.

बाकी रविवार आहेतच ना एकेक महत्वाचे विषय मांडण्यासाठी! त्यातूनही अनेकांना वाटत असेल की काही महत्वाचा विषय राहून जातोय तर ते इ मेल, वा संकेतस्थळावर मत नोंदवू शकतातच! ते विषयही समोर येतील. स्टेप बाय स्टेप विषय हाताळूद्या. सगळाच लोड एकाच रविवारी नको नाही का... नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या होइल आणि ज्यासाठी हा कार्यक्रम केला जातोय त्याचं उद्दिष्टच जाऊन फक्त टिआरपी पुरताच उरेल!

सत्यमेव जयतेची वेबसाईट चाळताना माझ्या असं लक्षात आलं की त्यातल्या टर्म्स अ‍ॅन्ड कन्डीशन्स पेजवर 3.ii मुद्द्यात तेराही भागात दाखवल्या जाणार्‍या एनजीओजची नावं दिल्येत. त्यामुळे कुठले विषय घेतले जाणार आहेत पुढील भागांमध्ये ते आधीच कळतंय. (त्यात डॉ. अवचटांच्या 'मुक्तांगण'चाही समावेश आहे म्हणजे व्यसनमुक्ती हाही विषय घेतला जाईल)
त्यांच्या टीमने एपिसोड प्रदर्शित झाल्यावर मगच त्यात सांगितलेल्या एन्जीओचे नाव या पेजवर द्यायला पाहिजे असं वाट्तं. आत्तापासून सर्व नावं द्यायची गरज नाही वाटत मला तरी...त्यामुळे अख्ख्या सिरीजच्या कंटेटची गोपनीयता एका प्रकारे राखली जात नाहीये असं वाटतंय.
<<<
वर्षा,
कुठे दिलीयेत नावं एन जी ओ ची ?
मला वि.पु . मधे लिंक पाठवशील का ?
मला जाणुन घ्यायला आवडेल अपकमिंग विषय..

आमीरच्या शो बद्दल प्रतिकूल मत व्यक्त करणे किंवा त्यपेक्ष महत्त्वाचे विषय असू शकतात ,असे म्हणणे ही मानसिक विकृती कशी काय ठरते बुवा?<<<
बालकांचे लैंगिक शोषण ह्या विषयाला बिनमहत्वाचे, न बोलण्यासारखे समजणे ही मानसिक विकृती आणि दांभिकता दोन्ही आहे. मला वाटतं सगळ्यांचे आक्षेप तिथेच आहेत. आमीरची वाहवा करा नका करू पण विषयाचे गांभीर्य आणि भयानकता समजून घ्या हेच म्हणणे आहे.

ते "यापेक्षा जास्त महत्त्वाचे" विषय कोणते आहेत ते ही अजून लिहीले नाही येथे.

ते "यापेक्षा जास्त महत्त्वाचे" विषय कोणते आहेत ते ही अजून लिहीले नाही येथे. >>> फारेण्डा, त्यांनी पहिल्याच पानावर ज्वलंत विषयांची यादी दिलेली आहे.

.....................पण आजच्या भागातल्या विषय तितका महत्त्वाचा नाहीये जितका "भारतीय शिक्षण व्यवस्था आणि सरकारी शाळांतील शिक्षणांचा खेळखंडोबा " हा विषय महत्त्वाचा आहे ...पाणी टंचाई आणि पाण्याचे गैर व्यवस्थापन इत्यादी मुद्दे हि अतिशय महत्त्वाचे आहेत .

.पण आजच्या भागातल्या विषय तितका महत्त्वाचा नाहीये जितका "भारतीय शिक्षण व्यवस्था आणि सरकारी शाळांतील शिक्षणांचा खेळखंडोबा " हा विषय महत्त्वाचा आहे ...पाणी टंचाई आणि पाण्याचे गैर व्यवस्थापन इत्यादी मुद्दे हि अतिशय महत्त्वाचे आहेत .

आणि समजा आमीरने पाणी टंचाई यावर एपिसोड काढला असता तर पाणी टंचाई हा काही महत्वाचा प्रश्न नाही,त्यापेक्षा बाल लैंगिक शोषण यावर कार्यक्रम का नाही केला असा प्रश्न याच महोदयानी विचारला असता... काही लोकाना विषय खुपले, काही लोकाना तीन कोटी खुपले तर काहीना त्याचे 'खान' असणे खुपले.. इतकाच या खुपण्यामागचा अर्थ. Proud

आमीरची वाहवा करा नका करू पण विषयाचे गांभीर्य आणि भयानकता समजून घ्या हेच म्हणणे आहे. >> अनुमोदन.
समाजात अनेक प्रश्न आहेत. त्यातले १३ आमीरने निवडले त्यामागे काही विचार असेल. प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाचे काय आहे ते सगळेच दाखवणे अवघड आहे. समाजाकडुन कमी दखल गेलेले आणि गंभीर स्वरुपाचे प्रश्न निवडुन त्यातले आपण सर्व सामान्य लोक ज्यात सहभागी होउ शकतो असे प्रश्न निवडले असावेत.

जे विषय अजुन पर्यंत घेतलेले आहेत आणि जे घेणारे आहेत ते सगळेच महत्वाचे आहे... जो जो ज्याज्या विषयातुन गेलेला आहे त्याला ते विषय नक्कीच महत्वाचा वाटणार आहे...स्त्रीभ्रुण हत्त्या.. लैंगिक अत्याचार यासारखे विषय फारच महत्वाचे आहेत... ज्यांना यांसारखे विषय महत्वाचे वाटत नाही त्यांनी त्यांना महत्वाचे वाटणारे विषयांची लिस्ट द्यावी.. आम्हाला ही त्यांचे महत्वाचे विषय जाणुन घ्यायचे आहेत..
१) स्त्रीभ्रुण हत्या : या विषयाचे महत्व बघायचे असल्यास ट्युलिप जोशीचा " मातृभुमी " हा चित्रपट नक्की पाहावा..येत्या १० वर्षात नाही पण २०-२५ वर्षात थोडीफार का असेना झळ सोसावी लागणारच आहे....त्यात समलैंगिक प्रकरण सुध्दा आजकाल वाढीस लागलेले आहे..आपल्या मुलांच्या नातवांच्या वेळेला काय परिस्थिती आपण बनवुन देणार आहोत........ देव जाणे ... Sad
२) लैंगिक अत्याचारः वरिल दिलेले पुस्तक वाचुन बघावे एकदा.. ज्यांच्या बरोबर असे झाले आहेत त्यांना जाउन भेटावे.. तेव्हा तुम्हाला या विषयाची गंभीरता लक्षात येईल.. यात फक्त आपण अजुन जे मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे त्यांचाच विचार करतोय.. जे विकलांग/गतीमंद आहेत.. त्यांचा तर अजुन विचारच इथे झाला नाही आहे.. त्यांची समस्या तर अजुनच गंभीर आहे.. त्यांच्या कडे तर भावना बोल सुध्दा नसतात त्यांच्या बरोबर काय झाले आहे हे सांगायला...:( विचार करा..यावर सुध्दा..

Pages