"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागील रविवारी प्रसारित झालेल्या ' सत्यमेव जयते ' कार्यक्रमातील हि व्यक्ती आहे हरीश अय्यर गेली ११ वर्षे आपण बाल शोषण पिडीत असल्याचा दावा करणारी हीच व्यक्ती २९ एप्रिल २०११ च्या आय बी एन ७ वाहिनीच्या 'जिंदगी लाइव ' या कार्यक्रमात दिसला होता तेथे स्वतः ला समलैंगिक असल्याचे जाहीर करत आपल्याला समलैंगिक असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे ..<<<

मीरा जोशी, थोडा डोळे उघडून अभ्यास करण्याची गरज आहे तुम्हाला.

समलैंगिक असणे आणि बाल शोषण पिडीत असणे हे परस्परविरोधी कसे काय?
समलैंगिक असण्यामधे लाजिरवाणे, चुकीचे काहीही नाही.
समलैंगिक आणि बाल शोषण करणारे हे दोन्ही समानार्थी शब्द नाहीत.
समलैंगिक वा विषमलैंगिक दोन्ही प्रकारचे लोक हे बाल शोषण करणारे असू वा नसू शकतात. लैंगिक कल कुठल्या बाजूला आहे यावर ते ठरत नाही.

मीरा जोशी, हे दोन्ही विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहेत. यावर स्वतःचे अनुभव इतरांसमोर मांडणारे लोक सहजासहजी दिसत नाहीत, तयार होत नाही. श्री. हरीश अय्यर हे स्वतःहून आपले बालपणचे अनुभव आणि आताचा लैंगिक कल या विषयावर बोलू इच्छित आहेत म्हणून या दोन वेगवेगळ्या विषयांवरच्या, दोन वेगवेगळ्या चॅनलवरच्या, दोन वेगळ्या कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतलं गेलं आहे एवढाच निष्कर्ष आपण काढू शकतो. खरंतर श्री अय्यर यांच्या हिंमतीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. शिवाय बालपणीच्या कटू अनुभवानंतरही ते जर निकोप लैंगिक जीवन जगू शकत आहेत तर तेही अतिशय पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे.

दोन वेगवेगळे शो व्यक्ती तीच पण मते भिन्न >>> पहिला शो चा विषय : समलैंगिकता आणि दुसरा विषय : शोषण
दोन्ही विषय पूर्ण वेगळे आहेत तर मत एकच कसे असेल मीरा.

एक तर बालवयात झालेले शोषण..... त्याने शाळेत असताना आपल्या मित्राला याबद्दल सांगितले तर त्याने पुढे कॉलेजमधे असे पसरवले कि याचे समलैंगिक संबंध आहेत. तेव्हा त्याला खुप त्रास झाला. (अगदी आत्महत्या करण्याचा प्रयत्न)
नंतर त्याला स्वत:ला जाणवले कि आपण समलिंगी आहोत. तेव्हा ते स्विकारुन त्याने ते लपवुन नाही ठेवले. जे अजुनही आपल्याकडच्या लोकांना सहज स्विकारता येत नाही.

>> पहिला शो चा विषय : समलैंगिकता आणि दुसरा विषय : शोषण
दोन्ही विषय पूर्ण वेगळे आहेत तर मत एकच कसे असेल मीरा.>>> मलाही हेच बोलायचे होते. अजून कुठेतरी ही अश्याच प्रकारची विधाने वाचलीयत. ज्या कार्यक्रमाचा जो विषय आहे त्याचविषयी बोलणे म्हणजे आपले ईतर वैयक्तिक जीवनशैली लपवणे असं होतं का? जिथे त्याविषयी बोलायचे तो बोललाच आहे ना. कमाल आहे एखाद्या गोष्टीचा किती विपर्यास करावा.

दुसरा भाग हा महत्वाचा विषय असला तरी त्याचा बेस हा महिला आणि बालकल्याण विभागाने केलेला सर्वे हा आहे. अर्थातच हे आकडे सरकारी असल्याने ते आमीरने घेतले. पण प्रत्येक दुसरे मूल हे धक्कादायक वाटले. आजूबाजूला असे काही अनुभव दिसले नाहीत. अशा प्रकारच्या बातम्या वाचनात येतात हे नाकारता येत नाही पण आकडा शंकास्पद वाटल्याने त्या सर्वेबद्दल अधिक माहिती घ्यावी असे वाटते.

In 2007 the Ministry of Women and Child Development published the "Study on Child Abuse: India 2007."[166] It sampled 12447 children, 2324 young adults and 2449 stakeholders across 13 states. It looked at different forms of child abuse: physical abuse, sexual abuse and emotional abuse and girl child neglect in five evidence groups, namely, children in a family environment, children in school, children at work, children on the street and children in institutions.

The study's[166] main findings included: 53.22% of children reported having faced sexual abuse. Among them 52.94% were boys and 47.06% girls. Andhra Pradesh, Assam, Bihar and Delhi reported the highest percentage of sexual abuse among both boys and girls, as well as the highest incidence of sexual assaults. 21.90% of child respondents faced severe forms of sexual abuse, 5.69% had been sexually assaulted and 50.76% reported other forms of sexual abuse. Children on the street, at work and in institutional care reported the highest incidence of sexual assault. The study also reported that 50% of abusers are known to the child or are in a position of trust and responsibility and most children had not reported the matter to anyone.

भारताची ४२% लोकसंख्या ही लहान मुले आहेत. म्हणजे अंदाजे ४५ कोटी येतील. त्यांच्यापैकी 12447 मुलांचा वेगवेगळ्या राज्यातून सर्वे केला गेला. हे प्रमाण इतकं अल्प आहे कि हाच सर्वे पुन्हा केला गेला तर निकाल वेगळे येतील असं वाटतं. त्यातून प्रश्नांच स्वरूप काय होतं हे पहायला हवं म्हणजे नेमकं भाष्य करणं शक्य होईल. या सर्वेमधे काय कसोट्या लावल्या गेल्या हे ही पहायला हवं.

लहान मुलाची चड्डी काढणे आणि पुन्हा घालणे हे कित्येक घरात चालतं. असं व्हायला नको. पण कमी शिकलेल्या घरातून मुलाची गंमत करण्यासाठी हा खेळ चालतो. आणि त्यात ते मूलही हसत असतं. चिडचिडं मूल असेल तर ते रडतं. त्याच्या बाबतीत हा प्रकार लगेच बंद होतो. मुलाला हवेत फेकून झेलणे हा खेळ देखील सर्रास चालतो. आता या प्रकारात मोठ्यांचा हेतू हा विकृत असेलच असं म्हणता येईल का ? विचारलेल्या प्रश्नांमधे याचा समावेश असेल तर हे सर्व पालक किंवा जवळचे मोठे लोक हे विकृत ठरतील.

सर्वे मधे गर्ल चाइल्ड कडे दुर्लक्ष करणे हा देखील एक मुद्दा होता असं वाचनात आलं होतं.

नेमका रिपोर्ट वाचल्याशिवाय आकडेवारी बद्दल सहमत होणे कठीण आहे हे माझं वैयक्तिक मत असल्याने या भागाबाबतच्या चर्चेत सहभाग नोंदवता आला नाही.

भरत
तोच रिपोर्ट डाऊनलोड करून पाहत होतो.

2.10 LIMITATIONS
2.10.1 Limitations in research methodology:
1. This study, being the largest study of its kind, had little existing information base to build upon. There
was an absence of a universal definition of child abuse in the Indian context and little understanding of
the extent of the different forms of abuse. The study had difficulty in defining some of the terms due to
the lack of well defined indicators.
2. The study attempted to represent the situation of child abuse in the country including its different forms,
each of which is complex in itself. However, these complexities could not be addressed because of
limitations of design. The design primarily aimed at collecting data on trends that were indicative without
going in-depth into the causes leading to the abuse. Neither has the study looked into the impact of
abuse on the growth and development of the child.
3. While the design identified the sample size to be collected in different evidence groups, during data
collection the exact number of respondents within the specified evidence group was difficult to identify.
For example, the research team was unable to identify the required number of street children and
children in institutional care in Mizoram and had to elicit information from greater number of school
going children than intended in the design.
4. The design of the questionnaire had the following difficulties:
a. The data did not allow scope for probing into details of various forms of abuse within specific
evidence groups. For example, the section on children in institutions did not probe into cases
of sexual abuse in institutions. Similarly, the study did not collect data on sexual abuse among
street and working children.
b. Data pertaining to neglect was collected only from the girl child because it was assumed that
only the girl child faced neglect.
c. In the questionnaire, sometimes, stand alone questions were asked without further probing,
thus making qualitative analysis difficult. For example, in the section on sexual abuse child
respondents were asked who they reported the matter to without further probing about the
follow up action after reporting.
d. In all forms of abuses, the questions asked from child respondents and those asked from Young
adults were not only different but there was little correlation between them, making it difficult to
draw conclusions.
e. The questionnaire did not ask relevant questions pertaining to socio-economic profile of
respondents and neither was the rural-urban divide clear. As a result correlations could not be
established on the basis of socio-economic profile or rural-urban divide.

2.10.2 Limitations in data collection:
1. The questionnaire administered to child respondents had 135 variables, looking at four forms of abuse
(physical, sexual, emotional abuse and girl child neglect) over five different evidence groups through
FGDs, one to one interaction and use of other child friendly methods to elicit responses from child
respondents. Further, the enumerators had to get the consent forms signed by children/ parents/

schools/ institutions/ caregivers. The process therefore was cumbersome and time consuming making
it difficult to prevent data impurities.
2. As the study was very large in sample size and geographically spread over 13 different states, there
were difficulties in maintaining a uniform standard of data collection and quality control that required
strong management and supervision at all levels. Such inadequacies could have been reduced by
consistent and effective monitoring.
3. The sensitivity of the subject made it difficult to probe and collect in-depth information on different
aspects of abuse. The problem became more acute due to the diversified socio-economic scenario.
2.10.3 Limitations in data analysis:
1. The study took around one and a half years to be completed with the involvement of various people in
different stages of the research design. During this period the study went through various phases with
different teams being part of the process to ensure the completion of the study. While the data collection
was carried out by the agency hired for the purpose, the final report was prepared by a Core Committee
constituted by the MWCD.
2. The lack of comprehensive research studies on different forms of abuse made the corroborative
analysis difficult.
The successful conclusion of a study of this size and magnitude was a challenge in itself. Despite all the
limitations mentioned above and the operational difficulties, the MWCD with the support of the partners,
successfully completed the study with minimal time and cost over run. The study has been able to throw
light on many important findings that will serve as the benchmark and support the Government to formulate
legislations, policies and schemes for child protection.

शो वर याबद्दल सांगायला हवे होते असं माझं मत झालं आहे.

सँपल साइझ आणि त्यावरून काढलेल्या अनुमानाला सार्वत्रिक मानणे यात चूक होण्याचा धोका असतोच. पण म्हणजे ती समस्या अस्तित्वातच नाही, ज्या प्रमाणात आहे त्यात तिचे स्वरूप काळजी करण्यासारखे नाही असे होत नाही.
ही समस्या समाजात आहे, तिच्यावर पांघरुण घालण्याची पालकांची/समाजाची मनोवृत्ती आहे, मुलांना आपल्या प्रश्नाला वाचा फोडणे कठीण आहे या गोष्टी तर आहेतच.

भरत

समस्या अस्तित्वात नाही असा अर्थ माझ्या पोस्टमधून निघत नाही असं मला वाटतं. या लिमिटेशन्सची माहिती प्रेक्षकांना देणं हे कर्तव्य आहे असं माझं मत आहे. विशेषतः नॉर्वेच्या त्या दोन मुलांच्या बाबतीत आपण जी भूमिका घेतली होती आणि त्या निमित्ताने देशा देशांमधे असलेल्या व्याख्या कशा बदलत जातात हे लक्षात घ्यायला हवं..

मीरा जोशी,

आपला इथला संदेश वाचला.

१.
>> ....हरीश अय्यर गेली ११ वर्षे आपण बाल शोषण पिडीत असल्याचा दावा करणारी हीच व्यक्ती....तेथे
>> स्वतः ला समलैंगिक असल्याचे जाहीर करत आपल्याला समलैंगिक असल्याचा अभिमान असल्याचे
>> म्हटले आहे ..

बर्‍याचदा समलैंगिक व्यक्ती (विशेषत: पुरूष) अजाणत्या वयात लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या असतात. याचं कारण म्हणजे त्यांचा स्वत:वरील विश्वास उडालेला असतो. अल्पवयीन मुलगे वयात येतांना स्वत:ला मुलगी समजू लागतात. कधीकधी लैंगिक उत्तेजनायंत्रणेचं संस्करण (कंडिशनिंग) चुकीच्या प्रकारे झाल्याने त्यांना भिन्नलिंगी व्यक्तीच्या संपर्काने (शारीरिक व/वा मानसिक) उत्तेजना येत नाही. अशा वेळेस समुपदेशनाची प्रचंड निकड भासते. ते उपलब्ध असेलंच असं नाही.

हरीश अय्यरची नक्की काय परिस्थिती असेल ते माहीत नाही.

२.
>> दोन वेगवेगळे शो व्यक्ती तीच पण मते भिन्न ...' सत्यमेव जयते ' कार्यक्रमाचा हेतू चांगला असला तरी
>> च्यानेल वाल्यांचा धंदा लोकांच्या नजरेतून सुटणार नाही ...

असू शकतं. फाय काय हरीश अय्यरही कदाचित पैसे कमवू पहात असेल. किंवा कदाचित स्वप्रतिमेमुळे त्याला दुसरं काही करता येत नसेल. शोषणाची शिकार झालेल्या अल्पवयीन बालकाच्या बाबतीत पुढे काय घडू शकेल ते (या घडीला तरी) सांगता येत नाही.

असो.

विषय अत्यंत संवेदनाशील आहे. त्यामुळे संशयाचा फायदा दिला जावा. हे अर्थात माझं मत झालं. आपली व/वा इतरांची मते वेगळी असू शकतात.

काय घडलं असावं याचा वेध घेण्याचा हा अल्पमति प्रयत्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

पण मुळात येथे हरीश अय्यर ची दोन शो मधे "मते भिन्न" म्हणजे नक्की काय कळाले नाही. संशयाचा फायदा द्यायला त्याने केले त्यात गैर काय आहे?

फारएण्ड,

हा धागा गुन्हेगारी कोर्ट नाही! Happy त्यामुळे संशयाचा फायदा हा वाक्प्रयोग शब्दश: घेऊ नये! Happy

मला म्हणायचंय की ह.अ.ची मनस्थिती अतिशय दोलायमान असू शकते. त्यामुळे जरी त्याच्या व्यथेचं भांडवल झालेलं दिसलं तरी त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा (=संशयाचा फायदा मिळावा). Happy

आ.न.,
-गा.पै.

गापै, आपला खुलासा मान्य आहे. आधी त्याने दुसरीकडे आपण गे आहोत म्हणणे म्हणजे त्याने सत्यमेव मधे सांगितले त्याच्यापेक्षा "भिन्न मत" आहे असा सूर (तुमचा नाही) दिसला, म्हणून विचारत होतो.

एका seminar मधे ऐकलेला किस्सा.

आई आणि वडिल दोघेही नोकरी करणारे म्हणून मुलगा दिवसभर पाळणाघरात. आई रोज घरी जाताना दिवसभर काय केले याची चौकशी करायची.

एक दिवस मुलगा म्हणाला की पाळणाघरातल्या काकुंच्या मुलाने माझ्या चड्डीत शू केली. आई एकदम चमकली. लगेच मुलाला घेऊन doctor कडे गेली. आणि एक भयानक सत्य बाहेर आले.

मला एक प्रश्न पडलाय, फार वेगळा वाटेल पण तरिही धाडस करून विचारतेय.
प्रौढ पुरूषांप्रमाणे, प्रौढ स्त्रिया सुद्धा अशा प्रकारचं शोषण करत असतील काय? मी खूप लहान असताना वगैरे आसपास घडलेलं एक उदाहरण आहे ऐकिवात म्हणून विचारतेय. कदाचित शोषण हे फार गंभीर प्रकारचं नसेल किंवा एकूण टक्केवारी सुद्धा कमी असेल, पण अगदीच नसेल असा आपण दावा करू शकतो का?
आमिरने या गोष्टीवरही थोडं बोलायला हवं होतं का?

भरत मयेकर, धन्यवाद!

लोकहो,

हरीश अय्यरच्या अनुदिनीवरून वाटते की तो मुळातून समरती (homosexual) आहे. मात्र इथे एके ठिकाणी वेगळीच माहीती आहे. यातल्या बर्‍याचशा बाबी सर्वेक्षणातून निष्पन्न झालेल्या नसून अटकळी (speculated) आहेत. मूळ प्रश्न :

what percentage of homosexuals have been molested / raped as children?

मला सापडलेले सर्वोत्तम उत्तर :
http://www.godlikeproductions.com/forum1/message445519/pg1#add_quote_rep...

समरती पुरुषाचे अल्पवयीन लिंगशोषण झालेले असल्याची शक्यता बरीच असवीसे वाटते. म्हणून हा संदेशप्रपंच.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै. तुम्ही लिंक दिलेल्या ठिकाणी
Re: what percentage of homosexuals have been molested / raped as children? या प्रश्नाला

१)I think if you were to look at the numbers would see that the reason people become homosexuals is because they were abused,

२)Well, considering these statistics, I would say a good number of children who are sexually abused do not become homosexual.

ही उत्तरे मिळाली.
पहिले उत्तर 'आय थिंक' म्हणजेच गेसवर्क आहे. दुसरे आकडेवारीवर आधारित आहे. माझ्या इंग्रजी भाषेच्या आकलनानुसार त्याचा अर्थ "ज्यांचे बालपणी लैंगिक शोषण झाले आहे व जी पुढे समरती झाली नाहीत अश्या मुलांची संख्या जास्त आहे."
हरीश अय्यर स्वतः समरतींच्या आणि बालशोषितांच्या हक्कांसाठी समुपदेशकांच्या बरोबरीने काम करताहेत. त्यांचा स्वत:चा अनुभव, मत आणि वक्तव्य स्पष्ट आहेत.

"Sex abuse did not make me gay. I am gay because I am gay.

I'm no psychologist or psychiatrist but in my understanding, sexual habits and sexual orientation are two different things. Like sexual abuse may lead to sexual habits like if you are abused as a child and it is done in a "take candy as I massage you" way, one may grow up wanting that kind of touch and massage- sexual habit. But eventually hormones would play up towards your natural sexual orientation.

In my experience of speaking about the issue of child sexual abuse, I know of equal number of boys abused by men who are heterosexual as homosexual. "

हेही वाचा:
http://www.pandys.org/articles/abuseandhomosexuality.html

if there is a causal link between childhood sexual abuse and identifying as GLBT later in life, then why aren’t the figures for the number of GLBT people in the population reflected by the abuse statistics? There are significantly more cases of sexual abuse than there are people that identify as GLBT (Macmillan, 1997), and furthermore, the vast majority of persons sexually abused as children are heterosexual (Keith, 1991).

मात्र समरतींचे वर्तन लहानपणापासून वेगळे असले तर त्यांचे लहानपणी लैंगिक शोषण होण्याची शक्यता जास्त आहे असेही इथेच म्हटले आहे. जे हरीश अय्यर यांच्या बाबत झालेले असू शकते.
Homosexuality itself could increase the chance of abuse:

There is one interesting theory put forward by Wachob (1999) that children who grow up later to identify as LGBT are more at risk of sexual abuse as children. She stipulates that being abused does not cause homosexuality, but rather that children who will later identify as LGBT are more vulnerable to child abuse.

The reasons she gives for this is that LGBT adults report that their behavior and interaction with others was often atypical in childhood when compared to their peers. Being or feeling “different” can result in social isolation / exclusion, which in turn can lead to a child being more vulnerable to the instigation and continuation of abuse (Gracia, 2003).

समलैंगिकता नैसर्गिक आहे हे मान्य नसणार्‍यांकडून समलैंगिकतेची आपल्याला पटतील अशी कारणे शोधण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे लहानपणी झालेले लैंङिक शोषण व समलैंगिकत्व यांचा संबंध जुळवणे.

आणि समजा अ‍ॅब्यूजमुळे क्ष व्यक्ती गे बनली असे मानले तरीही त्याने अ‍ॅब्यूजला जाहीररीत्या विरोध करणे व त्याचे गे असणे हे परस्परविरोधी कसे काय?

भरत मयेकर,

>> समलैंगिकता नैसर्गिक आहे हे मान्य नसणार्‍यांकडून समलैंगिकतेची आपल्याला पटतील अशी कारणे
>> शोधण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे लहानपणी झालेले लैंङिक शोषण व समलैंगिकत्व यांचा
>> संबंध जुळवणे.

समलैंगिकता नैसर्गिक नाही. १९७३ सालापर्यंत अमेरिकेत हा दोष मानला जाई. त्यावर समुपदेशन सत्रेही होत असंत. हळूहळू याला नैसर्गिकतेच रंग देण्यात आला. समाजात समलैंगिक २% हून कमी आहेत. यास्तव ही सवय नैसर्गिक नाही.

सर्व शोषित मुळे समलैंगिक बनत नाहीत हे खरंय. मात्र बरेच समलैंगिक लहानपणी शोषित असतात. या बाबीवर संशोधन झाले आहे का असा मूळ प्रश्न होता. मूळ मुद्दा विधान नसून प्रश्न आहे, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. अशा प्रकारचे शास्त्रीय (सांख्यिकीय) संशोधन प्रश्नकर्त्याच्या पहाण्यात आले नाही.

असं का ते कोणाला माहीत आहे का?

आ.न.,
-गा.पै.

दक्षिणा, माझ्या ऐकण्यात एकच प्रकार, तोही नक्की किती वाईट पातळीवरचा झाला किंवा (मुलाची आई वेळीच लक्ष न घालती तर) होऊ शकला असता हे आपणच ठरवा. तो प्रकार म्हणजे माझा नवरा व त्याचे दोन तीन मित्र, सर्वांचे वय सोळा किंवा आसपास (दहाव्या इयत्तेची सुट्टी). एका मित्राच्या हवेलीसारख्या मोठ्या वाड्यात वापरात नसलेल्या भागात दंगा, खेळणे इ. प्रकार चालायचे. उरलेल्या घराच्या भागात काही भाडेकरू ठेवले होते. त्यातील एका बाईचा नवरा व्यवसाय स्थिर नसल्याने त्या कामासाठी दिवस रात्र कष्ट, प्रवास यात गुंतलेला. ही महिला साधारण चाळीशीची. मूलबाळ नाही. पण यामुलांचे खेळणे चालू असताना मुद्दामहोऊन झाडलोट करणे इ. निमित्ताने तेथे येत असे. झाडताना पदर पाडणे, तो न सावरणे. खेळण्यात ज्या मुलांची बाजू जिंकली त्यांना शाबसकी देण्याच्या निमित्ताने पाठीवरून सहेतुक हात फिरवणे यामुळे काहीतरी विचित्र आहे हे मुलांना समजले. ज्यांचे घर होते त्या मुलाला दुपारी सगळे झोपले असताना किंवा रात्री नवरा नसताना काहीतरी मदत करण्याच्या निमित्ताने बोलावणे व पाठीपरून हात फिरवणे हे चार दोन वेळा केले ते त्या मुलाच्या पडलेल्या चेहर्‍यावरून आईच्या लक्षात आले व तातडीने लक्ष घातले गेले. हा प्रकार फार पुढे गेला नाही हे नशिब! नाहीतर मुलाचे अडनिडे वय, शिवाय ही महिला अशी वागणारी, दोष कोणाला द्यायचा?

गापै , समलैंगिकता नैसर्गिकच आहे. ती प्राण्यांमध्येही आढळते. कोणतेही वेगळे कंडिशनिंग(उदा: लहानपणी लैंगिक शोषण) न झालेल्या, रादर हेट्रोसेक्स्युअल कंडिशनिंग झालेल्या व्यक्तींमध्येही आढळते. समलैंगिकता उपचारांनी नष्ट होत नाही.
सायकॉलॉजीतल्या अधिकाधिक संशोधनामुळे समलैंगिकता ही संपूर्णतः नैसर्गिक आहे, व्यक्तीमधली वेगळी जीन्स, हार्मोन्सचे वेगळे संतुलन यामुळे ही वृत्ती उत्पन्न होते.

सध्या जी आकडेवारी ग्राह्य मानली जाते ती २ % पेक्षा बरीच जास्त आहे. समलैंगिकता ही काही जणांच्या बाबत तात्पुरती सवय असेल, पण त्यांना समलैंगिक म्हणता येणार नाही. ती एक वृत्तीच आहे.

भारतीय दंडविधानाच्या कलम ३७७ च्या अनुषंगाने समलैंगिकता नैसर्गिक आहे की नाही याविषयी बरीच मते भारताच्या सर्वोच्च न्यायालयात मांडली गेली.

वर उद्धृत केलेला प्रश्न अनेक लोकांना पडला आहे हे खरे, पण त्याचे उत्तरही दिले गेले आहे. समलैंगिकतेबद्दलच्या अनेक गैरसमजांपैकी तो एक.

http://www.lokprabha.com/20120203/samarthincha-sampraday.htm

child abuse bill लोकसभेत पास झाले का ? अशी बातमी पाहिली काल लोकमतवर.

बाकी कोणी कितीही खुसपटे काढोत हा सर्वच बाजुंनी कार्यक्रम १००% यशस्वी होतोय. अमिर खान व टीम चे विशेष अभिनंदन

आमीर खान च्या फेसबुक पेज वर त्याची खालील प्रतिक्रिया होती..

Aamir Khan
My congratulations to all the various people- NGOs, experts who have been working in the field of child care. The Child Protection bill being passed is a result of all the hard work that y'all have put in over all these years. Thank You.

मैना मी ऐकलेला प्रकार बर्‍यापैकी गंभीर होता.
ती स्त्री त्या मुलाकडून ब्राचे हुक लावून घेत असे. Sad

प्रौढ पुरूषांप्रमाणे, प्रौढ स्त्रिया सुद्धा अशा प्रकारचं शोषण करत असतील काय? >> हो. पुण्यात एका ४ वर्षांच्या मुलाच्या बाबतीत हा प्रकार घडलाय. त्याला सांभाळणारी १५ वर्षांची मुलगीच दोषी आहे. काल्च बात्मी आली आहे.
मुळात भरतीय स्त्री पुरुष (लग्न झालेले सुध्दा)sexually deprived असतात्.खुप जण मग लहान मुलांना soft target करतात.
कारण वेश्यागमन आपल्या संस्क्रुतीत allowed नाही,लोकांना लाज वाटते.
आपले सरकार red light areas legalise करत नाही कारण गरीब देशात flesh trade ची भीती असते किंबहुना तो मोठा प्रश्न आहेच. ह्यावर उपाय म्हणजे
१. मुलांना लैंगिक शिक्षण (ह्या शब्दाची भीती वाटत असेल तर शरीर शिक्षण )देणे
२.अमेरीकेत असतात तशी दर्जेदार sex toys (पुरुष आणि स्त्री दोघांसाठी) विकणारी दुकाने सुरु करणे जेणे करुन लहान मुले बळी पडणार नाहीत.

१६ वर्षाच्या मुलामुलींना शरिर आकर्षनाबद्दल खूप काही कळत! प्रश्न अतिलहान मुलांचा आहे १ ते १० वयोगटातील मुलांचा. ह्यामधे १ ते ५ काहीच कळत नाही. ५ ते १० मधे देखील ५ ते ७ आणि ७ ते १० वयोगटातील मुलांची संवेदना वेगळीवेगळी असते. खरा धोका हा लहानपणी नको त्या गोष्टीची 'चटक' लागणे ह्याचा आहे.

Pages