एवेएठि मे २०१२

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

थोबाडपुस्तकाचे रोखे बाजार येऊन त्यावर नवीन खटले सुरू झाले तरी एवेएठिचा वॄत्तांत नाही या घटनेवर काही बाराकरांनी, त्यातून काही हजर असलेल्यानी, आणि बहुतेक एवेएठिचा काहीच संबंध नसलेल्यानी चर्चा करायला सुरूवात केली असून, वृत्तांतच नाही तर 'त्याला साधे गटग म्हणावे, एवेएठिचा दर्जा कशाला?' असा नाराजीचा सूर लावला आहे, अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.
उलटपक्षी 'हह' या आयडीचा एवेएठिमधे दोनदा उल्लेख झाल्याने एवेएठि खरेच झाले की नुसत्याच वावड्या या प्रश्नाला धसास लावून खर्‍या खुर्‍या एवेएठिचा खराखुरा वॄत्तांत लिहायची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी वॄत्तांत लेखन सन्यास घेणे अतिशय आवश्यक असल्याने सध्यापुरता तोही घेण्यात आलेला आहे.

एवेएठिची तयारी या विषयावर ९००+ पोस्टी टाकून बाराकरांनी , आणि त्यांच्या शेजार्‍यांनी आधीचे सगळे विक्रम मोडलेले असल्याने त्याबद्दल अधिक माहिती सांगण्याची गरज नाही. गरजूंनी गरज वाटल्यास योग्य बाफ बघून खात्री करून घ्यावी. त्यातल्या कित्येक ( खरंतर बहुतेक) पोष्टी आकडे वाढवण्याच्या दॄष्टीने महत्वाच्या असल्याचीही खात्री करून घ्यावी.

अकरा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणारे एवेएठि साडे अकरापर्यंत कुणीच तोंड न दाखवल्याने तात्पुरत तहकुब करावे या विचाराने मी दारे बंद करणार, एवढ्यात वॄंदाताईंनी हजेरी लाऊन सुरूवात करून दिली. मैत्रेयी शेजारीच राहत असल्याने ती ठरल्यावेळेनुसार दोन वाजेपर्यंत नक्कीच पोहोचेल याची खात्री होतीच गरजूनी जुने वॄत्तांत चाळावेत).

सकाळीच उठून मत्स्याहार्‍यांसाठी मुडदुश्यांची आमटी, आणि अंडे शाकाहारी की नाही यावर चर्चा करणार्‍यांसाठी कुळथाची आमटी, सोलकडी वगैरे स्वयंपाक अर्ध्या तासात उरकल्यामुळे वेळच वेळ उरला होता, तेव्हा माबोकरांची वाट बघणे हा एकच कार्यक्रम हाती राहीला. कामवाल्या बाईंनी 'भरवश्याच्या बाईला टोणगा' ही म्हण खरी करून दाखवून घराची साफसफाई करवून घेतली.

निघालेल्या बशी, आणि त्यात बसलेले माबोकर कप, बारा साडेबाराच्या सुमारास पोहोचले तेव्हा मैच्या घरी अलार्म वाजला, तो माझ्या घरी ऐकू आला. त्वरीत दोन माणसे पाठवून तिकडे अडकून पडलेल्या लोलादी, मृ इत्यादी मंडळींना सोडवून आणण्याची सोय केली.

तोपर्यंत बुवानी आणलेल्या पदार्थांची चव बघावी म्हणुन समोसा उचलला, आणि खाण्याच्या कामाला सुरूवात केली, तो कार्यक्रम दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत चालला (म्हणजे समस्त मायबोलीकरांचा). मधूरंपाचे सेवन, त्यावरची चर्चा, आम्रखंड, जिलेब्या, अळूचे फदफदे, मिसळ, सिडी-मसाले भात इत्यादी पदार्थांच्या सेवनात मैत्रेयी कधी पोहोचली हे कळलेही नाही. फक्त गाडी Reverse घेताना श्री. मै यांना किती त्रास झाला हे ऐकावे लागले.

सांस्क्रुतिक कार्यक्रम हे तर बाराकरांच्या एवेएठिचा मानबिंदू.. त्याची सुरूवात बाईंच्या गाण्याने झाली. भाई हल्ली स्वतः गाण्याऐवजी त्यांच्या गाण्याच्या शिड्या ऐकवतात (हा शिडी मसालेभाताचा परीणाम असावा) कारण हेच परवडते म्हणे. त्यानंतर हि ह ह्यांचा 'हायहोलिहर हि ह' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात हि ह ह्याना हह हा हेकच हायडि हणता हेतो हे हळले. 'उ उ वि' सध्या बंद असल्याने त्यावर फारशी चर्चा झाली नाही. मध्यंतरीच्या काळात विकुंनी हळूच प्रवेश करून, 'सगळे ठिक चाललेले आहे' बघुन, 'हातावर शिक्का मारा' असा सल्ला देऊन पलायने केल्याचे ऐकतो. मग अजून काही गाणी, एबाबा यांचे 'उउवि' प्रयोग, आणि गाणे झाले. वेबमास्तर यांनीही गाणे म्हटले. या एवेएठिमधे तेवढा एकच विरंगु़ळा त्यांना मिळाला असावा.. कारण त्यानंतर समस्त महिलामंडळाने त्यांची 'उलटतपासणी' घेतल्याची बातमी हाती आली आहे.

बेडेकर उत्तम चहा ओततात (म्हणजे उत्तम चहा असेल तर त्यांना ओतायचे काम आवडते) त्यामुळे त्यानी योगिनीने केलेला 'उत्तम चहा' कपात ओतून दिला. मध्यंतरीच्या काळात एवढी बडबड झाली पण ती यजमान या नात्याने मी नजरेआड करतोय.

चहापाणी, खाणेपिणे, गप्पाटप्पा (मराठी माणूस असे का बोलतो), देवाण घेवाण वगैरे करून दमलेले बाराकर संध्याकाळी घरातून निघाले आणि चमन यांच्याकडे दुसर्‍या एवेएठिला गेले. आणि मी आणि योगिनी कामवाल्या बाईला,
'कधी येशील परतून क्लिनरा, कधी येशील परतून' म्हणत बेसमेंटमधे बसून राहिलो... Sad

तळटीपा:
१. यातले काहीही झोंबल्यास लोलादींना जबाबदार धरावे, मिसळ तिखट होती.
२. तुमच्या नावाचा अनुल्लेख झाला असल्यास आम्ही जबाबदार नाही, लेखावर प्रतिक्रिया टाकून आपण हजर असल्याची साक्ष द्यावी.
३. तुम्ही आणलेल्या खाण्याचा अनुल्लेख वाटल्यास फोटोग्राफरला जबाबदार धरावे, त्याने/तिने फोटो काढले नसल्याने आठवण राहिली नाही.
४. मुडदुश्या हे माशाचे नाव आहे, कुणाला लावलेले विशेषण नाही.
५. फेसटाईमावर हजेरी लावणे म्हणजे 'एवेएठि'ला हजर असणे नाही.
६. बकलावा उत्तम होता.
७. मैला नवीन पोळ्यांच्या बाईचा नंबर देण्यात यावा यावर माझे एकमत झाले आहे.
८. झक्कींची कुणीही आठवण काढली नाही, याचे आश्चर्य वाटले असेल तर ते वेगळे नमुद करावे.

दिवे घेणे आवश्यक आहेच 'दिवे लावणे' आवश्यक नाही..

*** समाप्त ***

प्रकार: 

फेसटाईमावर हजेरी लावणे म्हणजे 'एवेएठि'ला हजर असणे नाही. >> आं ? हा तर झक्कींचे बाबा हापपॅण्ट घालत होते त्या काळातला नियम झाला की .

भाई हल्ली स्वतः गाण्याऐवजी त्यांच्या गाण्याच्या शिड्या ऐकवतात >> काय राव.. एवढी मेहनत घेवुन कॅरीओकी तयार करुन आणखी एक लाईव्ह गाणी म्हंटल ते विसरलात की राव. Sad
सशल,
मग यावे की सरळ.. Happy

मस्त वृत्तांत!

कल्लोळाचा काय क्रायटेरिया असतो? बुवा मधूनमधून, 'बारा सोडून ३ स्टेट्समधून लोक आले. आता याला कल्लोळ म्हणायला हरकत नाही' असं सांगत होते. Proud

(अजूनही पॅटीस न मिळाल्याच्या दु:खात)..

भारी वृत्तांत देसाई! Happy
सगळ्यांच्या खादाडी माझ्याच पोटी... आपलं माथी मारलीत!

मैला नवीन पोळ्यांच्या बाईचा नंबर देण्यात यावा यावर माझे एकमत झाले आहे.
>>>>>> त्या पोळ्या तिनी केल्या असतील तर एक दोन महिने तरी तुम्ही कम्युनिटी मध्ये मै आहे हे माहित असल्यावर कृपया बाहेर जाण्याचे टाळा! देव तुमचे रक्षण करो! Proud

आक्का, व्हय! एक व्यक्ती विमान तिकीट काढून, दोन किंवा अधिक व्यक्ती ट्राय स्टेट बाहेरून आणि वेबमास्तरांची हजेरी हे क्रायटेरिया पुर्ण भरुन (फुलफिल Proud ) झाले की "कल्लोळ"!

>> कृपया बाहेर जाण्याचे टाळा!
काय रोजचा पेपर मिळणार नाही इतकंच ना! नेटवर वाचा हो न्यूज (चट्टेरी पट्टेरी लेंगा घालून.) Proud

अरे वा वा ! वृतांत आला.

हो हा कल्लोळच होता. सहा राज्यांतून मंडळी आली होती म्हणजे काय चेष्टा आहे.

जाहीर 'क्रायटेरिया' नाही करायचाय. 'कल्लोळ' आहे हे जाहीर केले नव्हते. अजून नीट कळायला उदाहरण देऊ का? Proud

इतक्या अनावर नंबरात चपात्या होत्या, की देसायांनी ब्लॉक पार्टी ठेवली असती, आणि धरून चाला सगळ्या नेबरहुडानं बेशुध्द न पडता पोटभर खाल्लं असतं तरी लोलाचा कट, मैत्रेयीची मटकी आणि चपात्या नक्कीच गल्लीला पुरून उरल्या असत्या.

(को. ए. का. मै. विशिष्ट गावची रहिवासी होती यावर विश्वास बसत नाही! :P)

आधी जाहीर न केल्यामुळे याला कल्लोळ म्हणता येणार नाही. <<< मोदक..

आम्ही एवेएठिला एवेएठि म्हणतो.. त्याला दुसरे काहीही म्हणायची गरज नाही (आणि तशी परवानगीही नाही).

हुकूमावरून Proud

लोलाचा कट, मैत्रेयीची मटकी आणि चपात्या नक्कीच गल्लीला पुरून उरल्या असत्या <<< या वाक्यात सिडी मसालेभाताचा अनुल्लेख? णिशेध.. णिशेध.. Proud

Pages