"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, रजनी ही मालिका फिक्शन होती. एक शून्य शून्य ही मालिका देखील फिक्शनमधेच.
सत्यमेव जयते हा न्युज /इश्यु बेस्ड टॉक शो आहे. त्यामुळे या दोन कार्यक्रमाची तुलना होऊ शकत नाही.

अमिर खानने हे विषय खूप संवेदनशीलतेने, वेगळ्या पद्धतीने, प्रभावीपणे, माध्यमांचा विचारविनिमयपुर्वक वापर करुन मांडले आहेत असे कणभरही वाटले नाही. >>>

तुला असे का वाटले हे जरा विस्ताराने सांगशील का? खास करून माध्यमांच्या वापरबद्दल.

ह्या विषयायचे गांभिर्य सकस प्रभावीपणे जनतेसमोर पोचवायला नक्कीच अमिर खान कमी पडत आहे.

हो का? तुम्ही आमीरखानची ट्युशन घ्या ना मग. आमीर तुमच्याकडून शिकून आणखी प्रभावी काम करु लागला तर आम्हालाही आवडेल. आनंदच वाटेल.

स्नेहालयला मिळालेल्या देणगीबद्दल पेपरमध्ये बातमी होती.
चाईल्ड हेल्प लाईन अर्थात १०९८ ला रविवारनंतर खूप जास्त फोन आले आणि पिडित मुलांनी आपलं मन मोकळं केलं.
हरीश ऐय्यरला ६०००वर ईमेल्स आल्या, हे वरच दिलं आहे.

समस्या अतिशय जुनी आहे. पण तिला आत्तापर्यंत जशी वाचा फोडली गेली तशी गेली नव्हती ह्या आधी. उलट माध्यमांच्या योग्य वापरामुळे ह्या समस्यांना वाचा फुटत आहे. टीव्ही/ रेडियोवर जाहिराती, वर्तमानपत्रात बातम्या, ईमेल्स, मदतीचे मोबाईलवरून समस- सर्वच माध्यमांचा पुरेपूर वापर होत आहे. म्हणून ह्या मालिकेला, आमीरला, त्याच्या टीमला क्रेडिट.

नंदीनी, रजनी आणि १०० ह्या दोन्ही मालिकांमधील सगळे विषय हे अगदी रोजच्या आयुष्यात बघावयास मिळणार्‍या विषयांबद्दल होते. सादरीकरणाची पद्धत जरी पात्र घेऊन असली तरी ती जी वस्तूस्थिती डोळ्यासमोर साकारायचे ते खूप प्रभावी वाटायचे. इथे अमिर खान चार लोकांची मुलाखत घेतो. कुणी जर रडत असेल तर त्याचे अश्रू दाखवतो. हे अश्रू दाखवणे.. चेहर्‍यावर मुद्दाम आणलेले हावभाव दाखवणे इथे मुळीचं गरजेचे नाही. श्रीदेवीचे काय काम होते तिथे? काहीही अगदी !

जागो मोहन प्यारे, शिकवणी घेण्यापेक्षा मला त्यात काय सुधारणा हवी आहे हे एक प्रेक्षक म्हणून सुचवण्याचा अधिक्रार आपणा सर्वांना आहे. माझी आणि अमिरची भेट तुम्ही किंवा इतर कुणीही घालवून दिली तर मी नक्कीच त्यांना हे सर्व सांगेन. सगळेचं जण वाहवा करत आहे म्हणून मीही केलीच पाहिजे हे मी मानत नाही. विषय चांगले आहेत. ही मालिका अजून विस्तारीत व्हावी असे मनापासून वाटते फक्त वस्तूस्थिती प्रभावीपणे उतरायला हवी ज्यात ही लोक कमी पडत आहेत. जसे की एखादे पुस्तक असते छान पण कुठेतरी गंडते तसे इथे वाटले. शब्द फार प्रभावी वाटत नाही प्रस्तावना सांगताना, निवेदन करताना, शेवट करताना. मुलाखतींचा डेटाबेस अजून वाढवायला हवा. श्रीदेवीला तिथे बोलवण्यापेक्षा अजून दोन मुलाखती घेता आल्या असत्या. हे तर मला जिना इसिका नामची नक्कल वाटली.

जागो मोहन प्यारे, मेल करुन काहीही उपयोग होत नाही. कितीतरी करोडोनी मेल्स जात असतील. आपण त्यांच्यापर्यंत पोहचूच शकत नाही असे वाटते मला.

बी चे स्वतःचे हे मत असू शकते, हे मान्य करुन पुढे चला. परत चर्चा त्याच मुद्द्यावर घोटाळत राहते.

हे विषय, आमिरचे सादरीकरण सर्वांना आवडायलाच हवे हा अग्रह सोडा, त्यामूळे मूळ विषय बाजूलाच राहतो
आणि चर्चा भरकटते

अजून ११ भाग व्हायचे आहेत.

बी मला हि माहिती ह्याच बाफवर दिसली.
आणि श्रीदेवी बद्दल म्हणाल तर एका पिडीत मुलाला (मी नाव विसरलेय्,हरिष कदाचित?) श्रीदेवी प्रचंड आवडते.त्याच्यामते तो जेव्हा ह्या शोषणातुन जात होता तेव्हा श्रीदेवीचे चित्रपट पाहून त्याला हिम्मत यायची.
मग तर श्रीचे तिथे येऊन त्याला भेटणे ,ईतना तो बनता है ना बॉस Happy
माझ्यामते आमिर हा कार्यक्रम करतोय म्हणून बरीच लोकं ( माझ्यासकट , मीतर रविवारी चक्क ७ वाजता उठते ह्या साठी) हा कार्यक्रम बघतात.नाहितर रविवारी सकाळी असे वैचारीक कार्यक्रम कितीजण बघतील

मला स्वतःला काही गोष्टी निश्चित अनावश्यक वाटल्या, पण त्याने कार्यक्रमाच्या प्रभावाचे महत्व कमी होत नाही.

हे तर मला जिना इसिका नामची नक्कल वाटली.>>>>> बी त्यात एकाच व्यक्तीवर फोकस असे. त्या व्यक्तीशी निगडीत लोकांना बोलवुन किंवा व्हिडीओ मधुन त्यांचं त्या व्यक्तीबद्दल मत, गंमती विचारलं जाई. इथे त्या गोष्टींचा काय संबंध?

कुणी जर रडत असेल तर त्याचे अश्रू दाखवतो. हे अश्रू दाखवणे.. चेहर्‍यावर मुद्दाम आणलेले हावभाव दाखवणे इथे मुळीचं गरजेचे नाही.>>>>> अरे देवा! अहो प्रत्येक मुलाखत पहातांना मी सारखी रडत होते. ते काय मुद्दाम आणलेले हावभाव? तसेच त्या प्रेक्षकांचं आहे. त्यांना रडु आलं तर ते खोटं असं कसं म्हणता? आणि ते दाखवणं का गरजेचं नाही? सगळ्यांनाच असं वाटतय (एखाद्या मुद्द्यामुळे धक्का बसणं, वाईट वाटणं) हे इतर प्रेक्षकांना दाखवलं/ दिसलं तर त्यात वाईट काय आहे?

श्रीदेवीचे काय काम होते तिथे? काहीही अगदी !>>>> या तुमच्या मुद्द्यालाच काहीही अगदी! अहो प्रत्येक माणुस दु:खातुन जात असतांना कशाच्यातरी आधारे आशा टिकवुन असतो. हा माणुस ६ वर्षांचा असल्यापासुन भयानक मानसिक, शारिरीक, भावनिक यातना सहन करतोय, भीतीनं दर दिवस जगतोय, आपलीच आई आपल्याला यातुन बाहेर काढु शकत नाही/ आपल्याला वाचवत नाही/ विश्वास ठेवत नाही. विचार करा अहो ६ वर्षांच्या पिल्लाला काय कळतं हो? अशा अवस्थेत जर त्याला श्रीदेवीच्या व्यक्तिरेखा, सिनेमे आवडले, त्याला त्यातुन आशा मिळाली तर मी म्हणते काय म्हणुन त्याला एक येवढासा आनंद मिळु नये? तुमचा आदर्श असलेली व्यक्ती तुम्हाला अचानक भेटली तर तो आनंद तुम्हाला आयुष्यभ पुरेल की! आणखी एक ती आल्यावर हरीशचा आनंद पाहुन जरा वातावरण हलकं झालं की नाही? त्यासाठी का होईना आली ते बरं झालं.

तुमचं मत चुकीचं आहे असं मला सांगायचं/ दाखवायचं नाहीये, फक्त ह्या बाजुनही विचार करून बघा असं म्हणतेय.

अमिरची भेट तुम्ही किंवा इतर कुणीही घालवून दिली तर मी नक्कीच त्यांना >>>> तुमची टायपो असावी कारण घालुन असं असायला हवं.

बी, तू कार्यक्रम नीट पाहिला नाहीस असे आता मला वाटतेय.

रजनी अथवा एक शून्य शून्य मधे रोजच्या आयुष्यातल्या समस्या आणि त्यांचे निराकराण दोन्ही असायचे. बरोबर?? पण हे निराकरण प्रत्यक्षात शक्य होतं का? तर नाही. कारण त्या मालिका काल्पनिक होत्या. जेव्हा एखादी गोष्ट काल्पनिक असते तेव्हा तिच्या सादरीकरणावर मर्यादा येत नाहीत. कारण त्या पात्राला कुणीतरी बोलून दिलेले संवाद म्हणायचे असतात. तेही अभिनयासकट.

जीना इसीका नाम है हा सेलीब्रीटीमुलाखतीचा कार्यक्रम होता.

त्या उलट, सत्यमेव जयते अथवा जिंदगी लाईव्ह सारखा एखादा कार्यक्रम असतो ज्यामधे ती व्यक्ती स्वत: येऊन आपली समस्या मांडत असते. त्या समस्येवरती आपल्यापुरता त्यानी काय उपाय केला हे सांगते. स्वत:चा संघर्ष मांडते. हे बोलताना अथवा ऐकताना एखाद्याच्या डोळ्यात अश्रू आले तर ते कसे काय गैर होउ शकते?? इथे ती व्यक्ती अभिनय करत नाहीये. स्वतःच्या आयुष्यातला प्रसंग मांडतेय. हे टीव्हीवर ऐकताना जर मला वाईट वाटले तर प्रत्यक्ष स्टुडिओमधे असलेल्या लोकाच्या डोळयात पाणी आले तर काय बिघडतेय?

तुला यामधे श्रीदेवी आलेली खटकली. पण तू हरिश अय्यरची मुलाखत नीट ऐकलीस का? पुन्हा एकदा शक्य असेल तर नीट ऐक. वयाच्या सातव्या वर्षापासून चाईल्ड अ‍ॅब्युजचा शिकार असलेला एक मुलगा "श्रीदेवी" या सिनेनटीचे सिनेमा बघून मला जगायची प्रेरणा मिळत होती हे जेव्हा कबूल करतो. तेव्हा श्रीदेवीला तिथे बोलावून त्याची आणि तिची प्रत्यक्ष भेट करवली आहे. माझ्या मते तरी, हरीश अय्यर यानी ज्या हिमतीने स्वतःची कहाणी मांडली त्या हिमतीला दिलेली दाद आहे.

माध्यमांच्या वापराबद्दल:

टीव्ही हे माध्यम आतापर्यंत आलेल्या सर्वच माध्यमामधे सर्वात प्रभावी माध्यम मानले गेले आहे. कारण, १. हे माध्यम घरात बसल्याबसल्या वापरता येते. त्यामुळे हे माध्यम वापरण्यासाठी तुम्हाला विशेष मानसिक तयारी करावी लागत नाही.
२. या माध्यमाच्या वापरासाठी सर्वात कमी पैसे लागतात. (एखादा सिनेमा तीन तासात संपतो. वर्तमानपत्र मर्यादित पानांचे असते. त्यामानामे टीव्ही अहोरात्रे चालू असतो.
३. ही माध्यम बुलेट थिअरीचे उत्तम उदाहरण आहे. बंदूकीची गोळी ज्याप्रमाणे सुसाट येऊन मेंदूत घुसते त्याचप्रमाणे संदेश मनामधे घुसतो.

यापलिकडे तांत्रिक आणी इतर बरीच कारणे देता येतील., सध्या इतकीच पुरे. त्यामुळे आमिरने यासाठी टीव्ही हे माध्यम निवडले यात त्याचे काय चुकले?

त्यातही आमिरने रविवार सकाळचाच स्पॉट आणि दूरदर्शनवरून विनामूल्य प्रसारण या दोन अटीमधून त्याची माध्यमाबद्द्लची समज दाखवलीच आहे.

ओह, म्हणजे बी ने हा कार्यक्रम चांगला होता, असे कबूल केल्याशिवाय चर्चा पुढे जाणार नाही तर !

कृपया तुमची पुर्वीची सुरु असलेली चर्चा पुढे न्यावी. माझ्यामुळे व्यत्यय निर्माण झाला असल्यास मी त्याबद्दल दीर्घीर आहे. मी कबुल करतो की हा कार्यक्रम चांगला आहे. विषय चांगले आहेत. अमिरची भुमिका चांगली आहे. माझा अभिप्राय इतकाच की सुधारणा करायला भरपुर वाव आहे आणि नको ते काढून टाकायला देखील बराच वाव आहे.

दिनेशदा, चर्चा पुढे न्यायची म्हणजे नक्की कुठे न्यायचीये???

बी लाजर काही गोष्टी खटकल्या असतील तर लिहू देत ना. त्याला इतर जण उत्तरे देत आहेतच ना? हा या चर्चेचा भाग नाहीये का?

बांगलादेशची लेखिका तस्लिमा नसरीनलाही तिच्या बालपणी (७-८ वर्षांची असताना) अशाच प्रसंगातून जावे लागले आहे. तिच्या एका पुस्तकाच्या मराठी भाषांतरात हे वाचले. "माझे कुंवारपण" किंवा अशाच अर्थाचे, त्या पुस्तकाच्या मराठी भाषांतराचे शीर्षक आहे.

बी, तू सादरीकरणापेक्षा या समस्येला भिडण्याचे तूला सुचणारे काहि उपाय असतील तर ते लिही ना ?
तेच मला अपेक्षित आहे. निदान तूला हि समस्या महत्वाची तरी वाटतेय.

नंदिनी, आत्ता माझा मुद्दा लक्षात आला असेलच ना ?
पुढेही आमिर समस्या मांडणारच आहे. सादरीकरणाबाबत दुमत असू शकेल. आज श्रीदेवी तर उद्या आणखी
कुणी असेल. त्यांची उपस्थिती वादग्रस्तही असेल.
पण ती व्यक्ती, आमिरला मिळणारा पैसा, त्याचे अश्रु, यावर का चर्चा करायची ?
त्यापेक्षा या समस्या महत्वाच्या नाहीत का ?

दिनेशदा, तुमचा मुद्दा अजिबातच पटला नाही.
एखाद्या 'कार्यक्रमा'बद्दलच्या चर्चेत त्याच्या सादरीकरणावर उहापोह होणारच, फक्त 'कंटेंट'वरच चर्चा करा हा अट्टाहास आहे. आणि माफ करा पण -<<<ओह, म्हणजे बी ने हा कार्यक्रम चांगला होता, असे कबूल केल्याशिवाय चर्चा पुढे जाणार नाही तर !>>> या वाक्यातून तर त्राग्याशिवाय काहीच हाती लागत नाही.

आगाऊ +१.

मुळात हा धागा कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आहे. फक्त समस्येवरती चर्चा करण्यासाठी नव्हे. या मधे सादरीकरण, नेपथ्य, वेशभूषा सर्वांवरती चर्चा होऊ शकते. संदेश महत्त्वाचा आहे म्हणून इतर बाबीबद्दल बोलूच नये हे पटलं नाही.

ज्यांना ज्या विषयावर चर्चा करायची आहे ती करा.. कोण चूक कोण बरोबर आहे ते बघत बसलं आणि त्यावर चर्चा केली तर विषय भरकटेल.

सत्यमेव जयते चा पहिला भाग माझ्याकडून पहायचा राहून गेला होता, यावेळी लक्षात ठेवून सकाळी शक्य तितका पाहिला आणि उरलेला (मिस झालेला) संध्याकाळी ४ वाजता प्रवाह वर पाहिला.
या संपुर्ण कार्यक्रमाच्या सकारात्मक गोष्टी म्हणजे नेमके आणि ऐरणीवरचे विषय, अचूक अभ्यास, त्यासाठी घेतलेली मेहनत शिवाय परिणामकारक जाहीराती हे ही अत्यंत महत्वाचे आहे. जब दिल पे लगेगी तो बात बनेगी. या कार्यक्रमाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद हाच लोकांची संवेदनशिलताही दर्शवतो. असो, जाहीराती परिणाम कारक हव्यात हे मला वैयक्तिकरित्या खूप जाणवलं.

या भागात अत्यंत महत्वाचा विषय हताळताना जेव्हा बाल लैंगिक शोषणाचा आकडा किती असावा असा प्रश्न विचारल्यावर कुणि २%, कुणी ५% तर कुणी १०% (जास्तीत जास्त) असे सांगितले. यावरून आपला समाज रिअ‍ॅलिटी पासून किती दूर आहे याची जाणिव झाली. मी त्या कार्यक्रमात उपस्थित असते तर मी अबाऊट ९०% असं उत्तर दिलं असतं. कारण ते वास्तव आहे. Sad (दुर्दैवाने)

सिंड्रेला प्रकाशचं त्या कार्यक्रमातलं प्रक्षेपण हे मला वैयक्तिकरित्या फार पटलं नाही. तिच्या बोलण्यात तितका प्रभावीपणा किंवा जे पेन रिफ्लेक्ट व्हायला हवं होतं ते झालं नाही. (हे माझं वैयक्तिक मत आहे.) त्यामानाने हरिश अय्यर, गणेश आणि अजून एक मुलगी (ड्रग अ‍ॅडिक्ट) हे सर्व अतिशय परिणामकारण वाटले.

आमिर मूळात प्रचंड सेन्सिटिव्ह असल्याने त्याला इतरांच्या भावना फार चांगल्या पद्धतीने फॅसिलिटेट करता येतात. कार्यक्रमाला गांभिर्य प्राप्त करून देण्याचा त्याचा प्रयत्न खूप यशस्वी झाला आहे. देखावा नाही काही नाही. श्रीदेवीला बोलावून कार्यक्रम थोडा टची केला त्याने. ते ही प्रशंसनीयच.

आता थोडं या विषयाबद्दल..
लैंगिक शोषण ही किड आहे आणि ती आपल्या आप्तस्वकियांमार्फतच आपल्या पर्यंत पोहोचते. नातेवाईक, ओळखिचे लोक हेच यासारख्या गोष्टी करतात. मला खात्री आहे आपल्यापैकी जवळ जवळ सर्वजण या प्रकाराची या ना त्या प्रकारे बळी झालेले असतील लहानपणी. फक्त ते फेस करणं हे गंभीर प्रकारात मोडत नसावं. पण त्याचे होणारे परिणाम हे समानच असतात.

पालकांचं आपल्या मूलांवर विश्वास असणं किती गरजेचं आहे हे हरिशच्या टेस्टिमनीवरून कळतं. त्याच्या आईने किंवा त्याच्या वडिलांनी एकदा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 'त्या व्यक्तिला कन्फ्रन्ट केलं असतं तर हरिश इतक्या वर्षांच्या टॉर्चर मधून थोडा तरी वाचला असतात. Sad
लैंगिक शोषण करणार्‍या व्यक्ती या तशा समाजाला घाबरणार्‍या असतात. पण लहान मुलांना सहज धमक्या देता येतात म्हणून त्यांचे फावते. Sad

व्हिक्टिमसनी जशी स्वतःची नावं कार्यक्रमात सांगितली तशीच त्यांच्या बरोबर 'असं' करणार्‍या व्यक्तिंची नावं सांगितली तर? कारण त्याच व्यक्ती अजून कितीतरी अशा प्रकरणात गुंतली असतील तर हा कार्यक्रम पाहून निदान बरेचसे आईवडील सावध होतील.
खूप लिहिण्याजोगं आहे पण वेळेअभावी इथेच थांबवते.. Sad

हरिशच्या आई-वडिलांचा त्याच्यावर विश्वास नव्हता असं नाही पण 'मी काही बोलले तर बहिणीचं जीवन उध्वस्थ होइल असं त्यावेळेस वाटलं, मी माझ्या मुलापेक्षा इतरांना काय वाटेल, लोकं काय म्हणतील याचा त्यावेळेस जास्त विचार केला ' असं काहीसं म्हणणं होतं त्यांचं.

मला दोन्हीही एपिसोड्स कार्यक्रम आवडले, दुसरा जरा टोन्ड डाउन वाटला...अर्थात विषयाची शॉक व्हॅल्यू इतकी आहे की हेही पचवायला जड आहे...

अजून मला खटकलेली बाब म्हण्जे त्या समुपदेशक बाईंनी (श्रीमती गुप्ता ) असं सांगितलं की 'घरांत असं होत असेल तर कदाचित लोकांना बाहेर ( पोलिसांत ) तक्रार कारावीशी वाटणार नाही तेंव्हा घरांत सगळ्या सदस्यांची मिटिंग घेउन, हे असं चालणार नाही असं खडसावून सांगावं, असा सल्ला आम्ही देतो '. यामुळे त्या एका लहान मुलाची कदाचित यापासून सुटका होइल पण नालायक माणसाच्या आसपास येणार्‍या इतर अजाणत्या मुलांचं काय? ही इतर लहान मुलं वासनेला बळी पडू शकतात.

अर्पणा तुमचं बरोबर आहे, पण लक्षात आल्या आल्या ज्या त्या कुटुंबातल्या लोकांनी ही अ‍ॅक्शन घेणं गरजेचं आहे, असा संदेश आहे. Happy

असो, लैंगिक शोषण हे फक्त व्हजायनल अथवा अ‍ॅनल पेनिट्रेशन झालेलं असेल तरच सिद्ध होतं हे किती शॉकिंग आहे, त्यासाठी १०९८ मधले सदस्य जवळ जवळ १० वर्ष आपल्या कायदाव्यवस्थेशी झगडत होतं. हे खरंच फार धक्कादायक आहे.

5 things I Like and Dislike about ‘Satyamev Jayate’

After all the hype and build up, Aamir Khan finally made his Television debut with ‘ Satyamev Jayate ‘. Here are 5 things which I liked and Disliked about the show.

LIKE
1) Content: Star actor exploits his mass popularity to addresses social issues. That’s a first on Indian Television, though the show in itself doesn’t do anything path breaking, there were few shows in the past which have addressed social issues ( who can forget Priya Tendulkar‘s ‘Rajani’ ) but I liked the content which was all pruned up.

2) No Melodrama: The first few minutes gave me scare that this show is just one of those suckers of emotions but luckily they didn’t go deep into the sob stories ( though enough tears were shed, just about bearable ). Also, Aamir didn’t go overboard with melodramatic or “filmy” lines, sanity prevailed and hey, no crazy background music to heighten the drama

3) Guest is the star of the show: Aamir maintained a low profile through out the show and allowed his guests to take the center stage. This is normal in Talk shows but for a superstar to take the back seat needs some guts, Big hand to Aamir for that.

4) Well Researched: Aamir’s team has done awesome amount of research which clearly comes through in the show, no gas, no nonsense, just facts, they presented meaningful data along with good stories from different strata’s of the society which is really terrific.

5) Duration: Initially I felt 1.5 hours is going to be too long but after the first 15 minutes, the show kept up a good pace, none of the sessions were extended and Ad breaks weren’t annoyingly lengthy. Overall a good show and 90 minutes well invested.

DISLIKE
1) ‘ Aamir’ the Actor: I’m sure most of us would agree that Aamir was strictly following the script, he didn’t come out to be natural. unlike BIG B and SRK who establish great connection with the audience, courtesy their charm and zest, Aamir clearly lacks the aura, I found him little out of sorts. I’m not saying he has to make us ROFL but he didn’t seem to connect well with the audience.

2) Poor production value: Something isn’t right about the show. I felt it was badly edited, usually we have these portion where the guest is welcomed onto the stage but here all of a sudden you find the guest on the couch, Aamir is magically transported from the stair to the couch, that is poor editing. The stage erected was strictly ordinary, a ridiculous looking sofa and a round table, the props used in the show were disappointing and the customary SMS bhejo scheme, I mean can’t you do something different ?

3) Paid Audience: What was the audience doing? other than shedding tears, they were left at sea. Aamir needs to quickly learn few tricks from BIG B in getting the audience involved. You can’t have 100 odd people in a room and make no use of them, for me that’s a cardinal sin. Pity the Audience.

4) Nothing tangible: During the show, Aamir said he would write a letter to the CM of Rajasthan, so why waste time ? why didn’t he just write a letter in front of us and mail it? why wait for our SMSes? After all he could have sent a follow up mail with our SMS thingy little later. He had a great opportunity to do something positive but EoD I felt he did what our netas do, promise and escape. where’s the accountability? will we ever know if he’s actually going to send a mail?

5) Low on creativity – Satayamev Jayate team needs to package old wine in new bottle else they would miss out on younger audience. The first episode gave me an impression that the show aimed at middle aged people, younger lot had nothing for them. I know he’s dealing with social issues but that doesn’t mean one has to come out brooding and throw in stats, tell me which youth is interested in all that ?

http://reddyzviewz.wordpress.com/2012/05/07/5-things-i-like-and-dislike-...

4) Nothing tangible: During the show, Aamir said he would write a letter to the CM of Rajasthan, so why waste time ? why didn’t he just write a letter in front of us and mail it?

Proud

Rofl

पत्र लिहिणं म्हणजे भजी खाण्यागत सोपं आहे का? समोर पत्र लिहायचं!

'आमिरचा 'सत्यमेव जयते' पैशांसाठी'

मटा ऑनलाइन वृत्त । जयपूर

अभिनेता आमिर खानच्या ' सत्यमेव जयते ' मुळे एकीकडे देशभरात सामाजिक बदलाचे वारे वाहत असतानाच राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमावर कडाडून टीका केली आहे.

आमिर खान हा सामाजिक विषयांसाठी काम करत नसून पैशांसाठी काम करत असल्याचा आरोप राजस्थानचे आरोग्यमंत्री राजकुमार शर्मा यांनी केला आहे.आमिरने राज्यातली स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे खळबळजनक पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

' सत्यमेव जयते ' कार्यक्रमाच्या पहिल्या भागानंतर राजस्थानमधील सरकारी यंत्रणा स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरणाविषयी जोमाने कामाला लागली आहे. आमिरच्या स्त्रीभ्रूण हत्येविरोधी अभियानानंतर सरकारने या प्रकरणी पावले उचलण्यास सुरुवात केली, असा अनेक जणांचा गैरसमज आहे. पण या आधीही आम्ही स्त्रीभ्रूण हत्येविरोधात काम करत होतो. स्त्रीभ्रूण हत्येविरोधात काम करण्यासाठी सरकारने पैसे उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच या प्रकरणी अनेक प्रकारे कार्यवाही करण्यात आली आहे. आमिर खानने या विषयाला हात घालण्याआधी ब-याच काळापासून सरकार हा विषय हाताळत आहे, असे शर्मा यांनी नमूद केले.

' सत्यमेव जयते ' हा कार्यक्रम सामाजिक बदलासाठी केले जाणारे अभियान नाही. मी एन्टरटेनर असल्याने एकाच मुद्द्यावर जास्त वेळ काम करू शकत नाही, असे आमिरने आधीच सांगितले आहे. याचाच अर्थ, तो हे सर्व आर्थिक फायद्यासाठी करत आहे. आमिर खरंच या विषयावर गांभीर्याने काम करायला उत्सुक असेल तर मी त्याचे स्वागतच करेन आणि येथे येऊन काम करण्याचा सल्ला देईन ' असेही शर्मा यांनी सांगितले.

कळीचानारद, तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करू. लवकर बरे व्हा. तुमच्यासारख्यांसाठीही आमिरने कार्यक्रम करावा अशी त्याला विनंती करू (त्याला तो विषय महत्वाचा वाटेल की नाही ते सोडा).

>>आमिर खान हा सामाजिक विषयांसाठी काम करत नसून पैशांसाठी काम करत असल्याचा आरोप राजस्थानचे आरोग्यमंत्री राजकुमार शर्मा यांनी केला आहे.

हो, करतोय तो पैशासाठी काम. पण जितक्या लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि अज्ञानाला उघडं पाडतोय त्यापुढे सगळं फिकं आहे. शिवाय मी दूरदर्शनचा मुद्दा मांडला तो जरा वाचा नीट. जिथे केबल नाही तिथे - कानाकोपर्‍यात पोहोचतं दूरदर्शन. किती जागरण होत असेल विचार करा.

>>आमिरने राज्यातली स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरणे खळबळजनक पद्धतीने हाताळल्याबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

पार्श्वभागाला चटका बसला की असेच तारे तोडतात राजकारणी

कळिचा नारद तुम्ही हे सर्व मुद्दे देवनागरीत लिहायला हवे होते.

काढायचे म्हणले तर बरेच चूक / बरोबर असे मुद्दे काढता येतील, शिवाय ते व्यक्तिसापेक्ष असतील त्यामुळे त्यावर जितकी चर्चा होईल तितकी व्यर्थच.
आमिरची स्वताची अशी एक वेगळी ओळख आहे, त्याने शाहरूखखान किंवा बिग बी सारखं असलं पाहिजे (निदान प्रेक्षकांशी कनेक्ट होण्यासाठी) हे मला मान्य नाही. योग्य विषयाची यथासक्त हाताळणी प्रेक्षकांशी कनेक्ट व्हायला काफी आहे. जिथे आडात नसतं तिथे बर्‍याच अशा भानगडी कराव्या लागतात.
कन्टेन्ट वाईज मग शाहरूख आणि बिग बीची तुलना आमिरशी बिल्कूल करता येणार नाही. कारण हा कार्यक्रम पाहताना आमिरचा कन्सर्न स्पष्टपणे कळून येतो.

Pages