"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

न राहवून वरचे दोन प्रतिसाद टाकले होते पण मला वाटते की बाकी सगळे लोक समंजस आहेत. तेव्हा मंदार कात्रे, मीरा जोशी यांच्या प्रतिसादांचा (विषयाशी संबंधित नसल्याने आणि विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याएव्हढी समज न दाखवल्याने) अनुल्लेख करण्यात यावा. ही सर्वांना विनंती.

मंदार,
तुमच्या पहिल्या पोस्ट्मध्ये निदान तुमचा विचार तरी समजत होता. नंतरच्या पोस्ट मात्र तुम्ही अक्षरशः काहीही सांगत आहात. तुमच्या पोस्टचे अर्थ काय निघतात हे तुम्ही खरंच एकदा नीट पहा. आणि 'भारतीय शिक्षण व्यवस्था' कितीही महत्त्वाचा विषय असला तरी या विषयाच्या पासंगालाही तो पुरणार नाही. मी भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रॉडक्ट आहे आणि मला आयुष्यात कसल्याही मानसिक/शारिरिक छळ, परिणामी आत्मविश्वास गमावणे, आपल्याला झालेल्या प्रकाराबद्दल सांगायला देखील कमीपणा वाटणे, सर्वत्र हेटाळणी असल्या समस्यांना माझ्या शिक्षणामुळे सामोरे जावे लागले नाही इथेच तुमच्या मुद्द्याचे महत्त्व बाद होते. आणि तुमचे मुद्दे कृपया सांभाळून मांडा ही तुम्हाला कळकळीची विनंती कारण जे तुम्हाला म्हणायचे नाही तेच तुम्ही इथे लिहित आहात.

मीरा जोशी,
पाचकळ आणि बालिश यापलीकडे तुमच्या पोस्ट्ना मला काहीही उत्तर द्यायचे नाही. मी इथल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या पोस्टला प्रतिवाद करणेच्या प्रयत्नात पडू नये.

'या' चर्चेवरील हेमाशेपो. यापुढे विषयाला सोडून मी पोस्ट टाकणार नाही.

डेलिया+१ They might be living in denial. sex हा विषय चारचौघात चर्चिण्याचा
नाही य मानसिकतेतून बाहेर पडणे त्यांना कठीण होत असेल.
------
कार्यक्रमाविषयी
१) अशा विषयावर मुलांशी कसे बोलावे याबद्दल पालक फार अवघडलेले असतात. मुलांशी संवाद साधण्याची वाट कालच्या कार्यक्रमाने खुली केली. त्यादृष्टीने हा कार्यक्रम टीव्हीवर होण्याचे महत्त्व अधिक आहे.
२)आपल्या मुलांना अशा काही गोष्टी सहन कराव्या लागत असतील हेच पालकांना खरे वाटत नाही.
३)त्यातून जुलूम करणारा आपल्याच विश्वासातला, आदरणीय इ.इ. असल्याने काय करावे हेही कळत नाही.
हे तिन्ही मुद्दे चांगले हाताळले.
शेवटचे वर्कशॉप तर फारच छान.

मुलांनी आपला कुठलाही अनुभव आपल्याला सांगावा, असे वातावरण घरात असायला पाहिजे.
मुली, शाळेत घडलेले सर्व सहसा सांगतातच, मुलांना पण ते सांगण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे.
त्यामुळे रात्रीचे एवण, एकत्र बसून, टिव्ही बंद करुन घ्यावे असे मला वाटते.

आमिरने या एपिसोड मधे, मूलांना आता टिव्हीसमोरुन दूर करा, असे सांगणे, हा त्याच्या संवेदनशील
असण्याचा पुरावा आहे.

भरत जी
पहिल्या पोस्टम्धील लिन्क व माहितीबद्दल धन्यवाद!
त्या लिन्कवर असलेली कविता देखील वाचण्याजोगी आहे. तुमच्या आताच्या लेटेस्ट पोस्टवरील मतांशी १०० % सहमत.
दुसर्‍या भागातील विषयदेखील फार फार महत्वाचाच होता. मी तर असे म्हणेन कि हा प्रश्न भारतच काय पण जगभरातच कमीअधिक प्रमाणात महत्वाचा असणार. अमीरच्या या एपिसोडमुळे हा प्रश्न सुटेल असे खुद्द तोही म्हणतांना दिसला नाही. पण त्यामुळे त्याविषयीचा कायदा होण्याच्या दिशेने थोडी तरी प्रगती होईल. पालकांनाही कांही उपयुक्त मार्गदशन होईल. त्यामुळे ज्यामुळे अजाण बालकांचे बालपणच हिरावून घेतले जाते तो गंभीर विषय त्याने घेतला याबद्दल खरे तर त्याचे कौतुकच केले पाहिजे. शेवटच्या वर्कशॉपची संकल्पना करणार्‍या डॉ शुक्लांना आणि तो या भागात समाविष्ट करणार्‍या आमीरला धन्यवाद!

लोकसत्तातील वाचावे नेटके या सदरात मराठी ब्लॉगविश्वात सत्यमेव जयते बद्दल उमटलेल्या प्रतिक्रियेबद्दल
"आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रवाणी कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडनं ‘पर्सनल गोष्ट’ आणि ‘सामाजिक विषयाची चर्चा’ यांतले भेद मिटवले! ‘अपत्यजन्म’ या वैयक्तिक गोष्टीचा विचार निकोप समाजनिर्मितीच्याही दृष्टीने व्हायला हवा, हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आमीर यशस्वी झाला आणि आपल्या कुटुंबातल्या अपत्यजन्माबद्दल आपल्याकडे ‘सांगण्यासारखं’ काही आहे का, याचा विचार ब्लॉगर असलेले वा नसलेले प्रेक्षकही करू लागले"

वरती काहि देशांचा उल्लेख आलाय. इथे केनयात देखील वीस वर्षांपुर्वी हि समस्या होती. असे विकृत लोक शाळेच्या बाहेर (इथे बर्‍याच शाळा बोर्डींग स्कूल असतात ) गाड्या घेऊन येत व मुलांना गोळ्या वगैरे देत.
त्यांना शुगर डॅडी / शूगर मम्मी अशी नावे होती. त्या काळात पेपरमधे लेख येत असत. सध्या याबद्दल काहि
वाचलेले नाही.

गोव्यात तर अशा विकृतीने भयानक रुप धारण केलेले बघितले. तिथे कडक कायदा आहे, परदेशी पर्यटकाबरोबर
अजाणत्या (तिथला शब्द, नेणता ) वयातील मूले दिसल्यास पोलिसांना हटकण्याचा अधिकार होता.
पण बीचवरच नव्हे तर अगदी पणजीच्या रस्त्यावर देखील, एखादा वृद्ध परदेशी पुरुष आणि त्याच्याबरोबर एखादा स्थानिक अल्पवयीन मुलगा, असे दृष्य सर्रास दिसत असे.

दिनेशदा
म्ह्णूनच ही फार मोठी आंतर्राष्ट्रीय गांभीर्याची बाब आहे. हे कुठल्या मानसिकतेमुळे घड्ते , यावर कोणी मानसतज्ञ प्रकाश टाकू शकतील का?
त्यावर ही काही प्रिव्हेंट्व्ह उपाय आहेत का? ज्यामुळे ही प्रवृत्तीच निर्माण व्हायला नको.

या एपिसोड च्या २ च दिवस आधी क्राइम पेट्रोल चा एपिसोड पाहिला आणि सत्यमेव जयते मधेही तोच विषय !
महाराष्ट्रातच गेल्या वर्षी घडलेली खरी घटना : १२ वर्षाच्या मुलीचं ओळखीच्या व्यक्तीकडून लैंगिक शोषण , "ती "ओळखीची व्यक्ती अनेक दिवस मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवते, मुलगी घरी सांगु शकत नाही.. शेवटी मुलीला पोटात दुखणे, बॉडी पेन वगैरे त्रास सुरु होतो, मुलीला आपण प्रेग्नंट आहोत कि काय अशी शंका येऊन ती शेवटी बाबांना सांगते :(.
सुदैवाने प्रेग्नंट नसते पण त्याही पेक्षा वाइट गोष्ट म्हणाजे वडिल "त्या" व्यक्तीचे नाव समजल्यावर त्याच्यावर काही अ‍ॅक्शन त घेत नाहीतच, वर आपल्याच मुलीची चूक असे वाटून घेऊन "त्या " लैंगिक शोषण करणार्‍या व्यक्तीकडे जाऊन अक्षरश्: हात जोडून विनंति करतातात कि झाले ते कुठे बोलु नको, माझ्या मुलीची बदनामी न होणे तुझ्या हतात आहे :(.
क्राइम पेट्रोल च्या शुक्रवारच्या एपिसोड नंतर तर आमिर चा हा एपिसोड आणि शेवटचे वर्कशॉप अतिशय आवश्यक वाटले !

हा क्राइम पेट्रोल चा एपिसोड http://www.youtube.com/watch?v=YNsJr3OdsCs

रेव्यू, कालच्या एपिसोडमधे यावर त्रोटक चर्चा झाली. त्या व्यक्तींचे जाऊ दे कारण त्यांच्या समस्या वेगळ्या
आहेत पण मूले अशी त्या व्यक्तीकडे का आकर्षित होतात, ते बघितले पाहिजे.

मूलांना सतत त्यांच्याकडे लक्ष दिलेले काहि प्रमाणात आवडते. निदान ते जे काही सांगताहेत त्याच्याकडे
तरी काणाडोळा करु नये. आपल्या दृष्टीने ती क्षुल्लक बाब असली तरी त्यांच्या दृष्टीने ती फार मोठी गोष्ट
असते. जर घरातच असे श्रोते मिळाले, त्यांना पुरेसा वेळ दिला गेला, तर असा बाहेरचा आधार त्यांना नाही
शोधावा लागणार.

थोडासा आत्मप्रौढीचा दोष आला तरी चालेल, पण माझा अनुभव लिहावासा वाटतो. मुलींना सहसा बाबा, फार
जवळचे वाटतात (याची शास्त्रीय कारणे आहेत.) माझ्या मानसकन्येच्या बाबतीत तिचे बाबा दुरावल्याने ,
अत्यंत दक्ष आई असूनही तिला काहीतरी आधाराची गरज होती, त्या अभावी तिची प्रगती थांबल्यासारखी
झाली होती. फोनवरुन का होईना, पण तो आधार मी देऊ शकलो. त्यानंतर तिच्यात खुपच आत्मविश्वास आला.

आपण फार महत्वाचे आहोत, आपल्याकडे कुणीतरी लक्ष देत आहे, ही भावना मुलांमधे निर्माण करणे, फार
महत्वाचे आहे.

एकट्या पालकांना या दोन्ही भुमिका निभाऊन न्याव्या लागतात. पण काही काळानंतर
लहान मूले इतकी जबाबदार होतात, कि उलट तिच या एकाकी पालकाचा आधार बनू शकतात.

5782711 for SMS
Y or N for wanting a law against child abuse>>> मी कालपासून प्रयत्न करते आहे.पण समस जातच नाहीये. Sad गेल्यावेळी पण गेला नव्हता. Uhoh

रेव्यु,

>> ही विकृती व मानसिकता आहे-ही वृत्ती कशी निर्माण होते यावरही काही कोणी प्रकाश टाकू शकेल का?

ज्याला आपण सारे विकृती म्हणतो त्याला प्राचीन ग्रीक समाजात व्यवस्थित प्रतिष्ठा होती. अशा प्रकारच्या नात्याला पेडेरास्ट्री म्हणतात. नावीन्याच्या हव्यासापायी पेडेरास्ट्रीचं रूपांतर बालगमनात झालं असावं.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : बालगमन हा माझा शब्द आहे. भारतीय भाषांत यास प्रतिशब्द नाही.

गामा,
सगळ्या नीतीमूल्यांच्या कल्पना नंतर निर्माण झाल्या ना ?
पण मूलांवर जर त्यांचा विपरीत मानसिक परिणाम होतोय असे कळल्यावर, आता आपल्याला ते रोखावेच लागेल.

तशाही ग्रीक रोमन संस्कृतीमधे, आता कालबाह्य झालेल्या अनेक प्रथा आढळतात.

कालचा भाग सहन झाला नाही. कुठल्याही लहान मुलाला अशा प्रसंगाला सामोरे जावे लागू नये. ही समस्या इतकी गंभीर आहे याची कल्पना आली नव्हती. आता महिला आयोगाच्याच सर्वे मध्ये ५३% हा आकडा आलेला आहे म्हटल्यावर मान्य करावाच लागेल. पण प्रत्येक दुसरं मूल ???? भयानक आहे

निशदे +१

>>माझे मत आहे की हाही तितकाच महत्त्वाचा होता. विशेषतः ज्या गोष्टी भारतात फारशा होत नाहीत असा सर्वसाधारण लोकांचा समज असतो त्याबद्दल लोकशिक्षण अत्यंत आवश्यक आहे.

फारेण्डाने मांडलेला हा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा आहे.
लहान मुलांचे लैंगिक शोषण होण्याचे प्रमाण, मुलींबरोबरच मुलांच्याबाबतीतही हे होते ह्याची जाणीव करुन देणे आणि अधोरेखित करणे ह्या गोष्टी हा कार्यक्रम नक्कीच करतोय.

मी आधी म्हटल्याप्रमाणे जिथे केबल टिव्ही नाही, त्या ठिकाणीही दूरदर्शन (वाहिनी) दिसतं. अशी अनेक गावं अजूनही आहेत जिथे एकच दूरदर्शन संच आहे आणि संध्याकाळी अनेक जण तिथे जमा होतात टीव्ही बघायला. अशा असंख्य ठिकाणी आज आमिर हे मुद्दे पोहोचवतो आहे हे महत्वाचं आहे.

>>आता महिला आयोगाच्याच सर्वे मध्ये ५३% हा आकडा आलेला आहे म्हटल्यावर मान्य करावाच लागेल.

आणि हा आकडा ज्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत त्याचा आहे. नोंदवल्या गेलेल्या नाहीत अशा केसेस किती असू शकतात अंदाज लाव.

>>लैंगिक शोषण हे जवळच्या व्यक्तींकडून होतेच पण खुद्द वडिलांकडूनही झाल्याच्या बर्‍याच केसेस वाचल्या आहेत. ह्या मुद्द्यावर मात्र अजिबातच बोलले गेले नाही.

अगदी हाच विचार मनात आला होता कालच. संकेतस्थळावर या विषयी सूचना द्यायला हवी.

हा किस्सा वाचा. शहर: पुणे:

एका बाईने तिच्या नवर्‍याविरुद्ध Domestic Violence खाली तक्रार दाखल केली. कारण त्याने तिच्यात श्रीमुखात भडकावली होती.

चौकशीत खरे कारण बाहेर आले ते असे: प्रत्यक्ष आई तिच्या नवर्‍याला सांगते की मुलीने "बाहेर" "तसले" अनुभव घ्यायच्या ऐवजी आपल्या वडीलांकडूनच घेतलेले चांगले म्हणून त्यालाच तिच्याशी संबंध ठेवायचा आग्रह केला. त्याला त्याचा अतिशय राग येऊन (कोणत्याही शहाण्या माणसाला याचा राग येणारच) त्याने तिच्या थोबाडीत मारली.

आज कित्येक शहरांतून नवरा-बायको दोघंही नोकर्‍या करतात, रादर कराव्या लागतात. सगळ्यांच्याच घरात आज्जी आजोबा नसतात (कारणे काहीही असोत!) मुले पाळणाघरात ठेवावी लागतात! कित्तीही चौकशी केली, इतरांचे अनुभव विचारले, तरीही स्वतःला / स्वतःच्या पिल्लाला काय अनुभव येइल सांगू शकत नाही...

आमच्या कंपनीतील कलिगच्या २ वर्षाच्या मुलीच्या गालावर दंडावर दातांचे व्रण होते. चौकशी केल्यावर लहान मुलांच्या भांडणातून झाल्याचे समजले... डॉक्टरने सांगितले, ही नखं व दातांच्या खूणा लहान मुलाच्या वाटत नाहीयेत... मुलगी फक्त घाबरते, बुजते, काहीही सांगत नाही!

महत्वाचे विषय आणखी बरेच असतीलही पण स्वतःच्या मुलाइतकं माणसाला महत्वाचं काहीच नसेल! आणि हे विषय माहीत नसलेले, बोलता न येणारे, मानसिक ओझं घेऊन जगणारे कित्येक जीव देशाची पुढची पिढी आहे. जर पुढची पिढी जन्मालाच येण्याआधी अशी संपवली जात असेल, नासवली जात असेल तर शिक्षणाच्या समस्या कोण आणि कोणासाठी मांडणार...

वयात येणार्‍या प्रत्येक प्रत्येक मुलीला या प्रॉब्लेमचा सामना करावाच लागला असेल अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद! इथे मी उघड कबूल करते, जे आजपर्यंत माझ्या आईबाबांनाही मी सांगू शकले नव्हते... मलाही या प्रॉब्लेमचा सामना आठ - नऊ वर्षांची असताना करावा लागला होता... पण आमीरने मांडलेल्या २ किंवा ३ र्‍या मुद्द्यामध्ये असल्यामुळे तो इतका गंभीर नसावा... पण त्या संवेदनशील वयात त्या प्रकाराचा कशा आणि किती प्रकारे मनावर परीणाम होतो हे मी चांगलेच अनुभवले आहे.

माबोवर आधी याच आशयाची हाफ मर्डर ही नंदीनीची अप्रतिम कथा वाचली होती. वाटेवरती काचा गं ही याच विषयावरील नाटुकली ही उत्तम आहे. आमीरने दोन्ही विषय उत्तम निवडले आहेत. त्यांची मांडणीही उत्तम! पण प्रेक्षकांचे अश्रू पाहून तोच तोच पणा काही जणांना जाणवू शकतो. त्या परीस्थितीतून गेलेल्या प्रत्येकाला ती आपलीच व्यथा वाटल्यास नवल नाही. कार्यक्रम फील करून पाहील्यास नक्कीच भावतो! त्याचंतर वाक्यच आहे ना दिल पे लगेगी तभी बात बनेगी!

महत्वाचे विषय आणखी बरेच असतीलही पण स्वतःच्या मुलाइतकं माणसाला महत्वाचं काहीच नसेल! आणि हे विषय माहीत नसलेले, बोलता न येणारे, मानसिक ओझं घेऊन जगणारे कित्येक जीव देशाची पुढची पिढी आहे. जर पुढची पिढी जन्मालाच येण्याआधी अशी संपवली जात असेल, नासवली जात असेल तर शिक्षणाच्या समस्या कोण आणि कोणासाठी मांडणार.>>> +१
ड्रीमगर्ल चांगली पोस्ट

ड्रीमगर्लच्या लेटेस्ट पोस्टला संपूर्ण अनुमोदन !

कालच्या कार्यक्रमाने अस्वस्थ झालो. हे वास्तव ज्यांच्या वाट्याला आले असेल, त्यांचा विचार करून अंगावर काटा येतो. त्यांच्याप्रती सहानुभूती वाटत नसेल, तर किमान त्यांच्या प्रश्नाला 'महत्त्वाचा नाही' म्हणत निकालात काढण्याचा कद्रूपणा कोणी करू नये, ही अपेक्षा !

बिखरे टूटे टुकडे सारे
गीत - स्वाती चक्रवर्ती
संगीत, गायक - राम संपत

बिखरे टूटे टुकडे सारे
जुड रहे है धीरे धीरे हौले हौले
बेतुके से सूर वो सारे
मिल रहे है धीरे धीरे हौले हौले
आईने का धुंदला चेहरा
खिल रहा है धीरे धीरे हौले हौले

नन्ही सी इक जान ने अपना बचपन खोया
खौफ की मैली चादर ओढ के सोया
बेबस अकेला, बेझुबां चुपचाप रोया
बरसों से ये बहते आँसू
थम रहे है धीरे धीरे हौले हौले
खुल रही आँखे जो अबतक
नम रही है धीरे धीरे हौले हौले
आईने का धुंदला चेहरा
खिल रहा है धीरे धीरे हौले हौले

चुरा के खुदसे आँख मै हर पल जिया
जहर जो उसने घोला मै वो पिया
चुप्पी के आडमें छिपकर उसने जुर्म किया
झुबां पर लगा वो ताला
खुल रहा है धीरे धीरे हौले हौले
मेरी नही कोई खता,
ये पता चल रहा है धीरे धीरे हौले हौले

लहानपणच्या अशा अनुभवाचे, बाळाच्या पुढच्या आयुष्यात काय आणि कसे परिणाम होतील ते सांगता
येणार नहीत. कदाचित, ती घटना खोल मनात कुठेतरी द्डून राहिल, आणि अत्यंत वेगळ्या तर्‍हेने तिची
प्रतिक्रिया उमटेल.
जखम ताजी असताना, जर उपाययोजना झाली तर नक्कीच फायदा होईल. कालच्या पहिल्या मुलीच्या
(सिंड्रेला) बोलण्यातून तिचा आत्मविश्वास डोकाव्त होता.

Pages