Submitted by पुरंदरे शशांक on 15 April, 2011 - 03:29
काज पांडुरंगाचे....
कटेवरी हात | विचाराल मात | पाहतसे वाट | भक्तांची मी ||
कुठे गेला ज्ञाना | नामाही दिसे ना | टाहो ऐकू ये ना | तुकयाचा ||
आता येथ सारी | गर्दीचीच वारी | नावा वारकरी | उरलासे ||
भक्तीचा जिव्हाळा | नामाचा उमाळा | सकळ लोपला | इये काळी ||
काय उरलेसे | काज ते कोणते | मजलागि निके | कळेचिना ||
परि कोपर्यात | दिसे कोणी गात | पूर्ण तो भावात | बुडालेला ||
असोनी आंधळा | भक्तिचा तो मळा | दिसे की फुलला | परिपूर्ण ||
होवोनी तल्लीन | गातसे भजन | पूर्ण एकतान | वांछाहीन ||
तोचि की एकला | दिठीवान भला | येर तो आंधळा | जन वाटे ||
गेला गेला शीण | गेलो विसरुन | पांडुरंगपण | पूर्ण माझे ||
राहे मी निवांत | त्याच्या हृदयात | काज सापडत | माझे मला ||
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुरेख!
सुरेख!
मस्त ! आवडली कविता !
मस्त !
आवडली कविता !
वाह.........अप्रतिम
वाह.........अप्रतिम रचना.......
<<तोचि की एकला | दिठीवान भला | येर तो आंधळा | जन वाटे ||>>
अश्या त्या एकासाठीच देव अजून तेथे थांबला आहे.......
आशय आवडला .... व्यवस्थित
आशय आवडला .... व्यवस्थित मांडला गेलाय
..... छान
राहे मी निवांत | त्याच्या ह्रदयात | काज सापडत | माझे मला ||
….. हे जास्त आवडलं
मन प्रफुल्लीत झाले !
मन प्रफुल्लीत झाले !
मस्त ! आवडली
मस्त ! आवडली
सुरेख !
सुरेख !
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार..........
मनाला भिडली.
मनाला भिडली.
आवडली
आवडली
सुस्मिता, विशाल.... मनापासून
सुस्मिता, विशाल.... मनापासून आभार...
विठ्ठल विठ्ठल जयहारी विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल जयहारी विठ्ठल.
बहुत बहुत सुंदर, शशांक.
बहुत बहुत सुंदर, शशांक. "त्या" भाषेचा झोक किती सुरेख संभाळलाय... खूप आवडली.
अतिसुंदर
अतिसुंदर
सर्वांचे मनापासून
सर्वांचे मनापासून आभार..........
दाद यांची दाद अगदी नेमकी
दाद यांची दाद अगदी नेमकी भावना व्यक्त करते .............
रचना म्हणाल तर ...कुणालाही प्रेमात पाडेल अशी!! .अगदी विठ्ठलाला सुद्धा !!
_________/\______________
वा सुंदर अभंग
वा सुंदर अभंग
मस्तच
मस्तच
सर्व जाणकार रसिकांचे पुनः
सर्व जाणकार रसिकांचे पुनः पुन्हा आभार..... असेच प्रेम असू द्या.......
गेला गेला शीण | गेलो विसरुन |
गेला गेला शीण | गेलो विसरुन | पांडुरंगपण | पूर्ण माझे ||
राहे मी निवांत | त्याच्या ह्रदयात | काज सापडत | माझे मला ||
सर्वांगसुंदर ......:)
वाह !
वाह !
विठ्ठल, विठ्ठल जय हरि विठ्ठल
विठ्ठल, विठ्ठल
जय हरि विठ्ठल .....
अप्रतिम !
अप्रतिम !
अभंग खूप अप्रतिमच आहे . मी जे देवळात मांडले त्यापेक्षा कितीतरी सुंदर . केवळ अप्रतिम. हेच शिकतोय तुमच्या साहित्यकृतीतून .
फार पूर्वी ऐकलेले
रुक्मिणी पांडुरंगाला विणवतेय की आपण पंढरपूर सोडून जाऊ कारण तुझ्याभोवतालची गर्दी या अर्थाच्या गीताची आठवण झाली . शब्द आठवत नाहीत .