वापरलेली गाडी घेणे/विकणे

Submitted by तोषवी on 7 May, 2012 - 09:17

कार फॅक्स रिपोर्ट मध्ये अ‍ॅक्सीडेंट दाखवलेली गाडी घेणे कितपत ठिक आहे? विकताना अडचण येउ शकते का?मालकाचे म्ह्णणे आहे की बंपर बदलायला लागला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या बाबतीत सल्ला देणे अवघडच आहे. अपघात किती गंभीर होता हे माहीत आहे का ? खरं तर शंका असेल तिथे ते काम टाळलेलेच बरे...

तोषवी रिसेल व्हॅल्यु खुपच कमी मिळते अशा गाड्यांना त्यामुळे तुम्हाला किती दिवस वापरायची आहे त्यानुसार ठरवा.जर चांगली असेल तर शक्यतो कुणी विकण्याच्या भानगडीत पडत नाही.

कारफॅक्स रिपोर्ट मध्ये कश्याप्रकारचे नुकसान झाले त्याबद्दल माहिती कळु शकेल त्यावरुन आणी गाडी एखाद्या मेकॅनिकला दाखवुन घ्यायला काहीच हरकत नाही. त्याप्रमाणे किंमत कमी जास्त मागता येऊ शकेल. गाडी किती जुनी आहे/तुम्हाला किती वर्ष वापरायची आहे/बजेट काय आहे असे अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतील. अ‍ॅक्सिडेंट झालेली गाडी वाईटच असे नाही.

जर चांगली असेल तर शक्यतो कुणी विकण्याच्या भानगडीत पडत नाही.>> गाडी विकण्याची हजारो कारणे असु शकतात.

गाडी किती जुनी आहे/तुम्हाला किती वर्ष वापरायची आहे/बजेट काय आहे असे अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतील. अ‍ॅक्सिडेंट झालेली गाडी वाईटच असे नाही. >> +१
रिसेल व्हॅल्यु कमी मिळते अशा गाड्यांना आणि तुम्ही २न्द मालक (ओनर) होणार, त्याने पण व्हॅल्यु कमी होते..
kbb किंवा तश्या साईट वर पड्ताळून पहा...

गाडी प्रत्यक्ष पाहिल्याखेरिज मत देणे शक्य नाही. मात्र जास्त कालावधीसाठी हवी असल्यास न घेतलेलीच बरी.

श्री... जर चांगली असेल तर शक्यतो कुणी विकण्याच्या भानगडीत पडत नाही.
>>> असे काही नाही. मी माझी उत्तम स्थितीमधील गाडी विकतोय. Happy इथे जाहिरात विभागात तशी जाहिरातही दिली आहे. Happy